ठाणे : १९५२ ते १९६२ या शाळकरी वयात मी ‘ठाणेकर’ होतो. पण आज आयुष्याचा ८५ व्या वर्षी सिंहावलीकन करताना माझ्या शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक आणि शिक्षण म्हणून यशाची पायाभरणी श्री. हुनुमान व्यायामशाळेच्या या सोनेरी दशकातच झाली. बुध्दीला खेळाने उर्जा देता येते आणि ८ तासा झाेप ही बुध्दीमत्तेची सख्खी बहिण आहे. असा माझा विष्कर्ष आहे. पण त्यासाठी क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक आणि धार्मिक अशा बुहुविध आघड्यांवर एकाचवेळी कार्यरत असणाऱ्या शताब्दीपूर्ती करणाऱ्या श्री. हनुमान व्यायामशाळांसारख्या संस्थांनी मज्जा मानसशास्त्र अभ्यासायला हवे करण मज्जा मानसशास्त्र हा यशाचा पाया आहे. असे बोध्ाप्रज विचार प्रा. रमेश पानसे यांनी व्यक्त केले.
श्री. समर्थ  सेवक मंडळ, ठाणे संचालित श्री. हनुमान व्यायामशाळेच्या शिव दौलत सभाग्रहात संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ सोहळा शनिवारी सायंकाळी संप्ान्न झाला. त्या प्रसंगी बालशिक्षण महर्षी प्रा. रमेश पानसे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना बोलत होते.
प्रारंभी ध्वजवंदन करण्यांत आले तर बाल भवनाच्या चिमुरड्यांनी स्वागत केले. ४२ ते ८४ वर्षे वयोगटाच्या जेष्ठांनी मार्च पास्ट सादर केला.
श्री. हनुमान व्यायामशाळा शताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष पुंडलिक खामकर यांनी प्रास्ताविक केले. शताब्दी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष उल्हास प्रधान, कार्याध्यक्ष संजीव हजारे, समिती कार्यवाहक सविता कळसे व्यासपीठावर उपस्थित होते. मिलिंद वैद्य यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. दिलीप वाघोलीकर व ८५ वर्षीय विलास शिरोडकर यांनी कविता सादर केल्या. विख्यात खो-खो प्रशिक्षक राजेंद्र साप्ते व शातायुषी सेवाभावी श्री आनंद भारती समाज ठाणे यांच्या शुभसंदेशांचे वाचन करण्यांत आले. महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष गिरीश लेले यांनी ऋणनिर्देश केले तर समितीचे खजिनदार डॉ. चैतन्य साठे यांनी नेटके सुत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *