अनिल ठाणेकर
ठाणे : पावसाळ्याच्या पुढील तीन महिन्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने झाडांच्या फाद्यांची छाटणी योग्य प्रकारे करण्यासंदर्भात संबंधितांना निर्देश द्यावेत तसेच आपल्या जबाबदारीची जाणीव न ठेवता नागरिकांच्या जिवाशी खेळणार्या अधिकाऱवर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई कर अशी मागणी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
ठाणे महानगरपालिकेचे स्वत:चे वृक्ष प्राधिकरण विभाग व उद्यान विभाग असून या ठिकाणी त्या क्षेत्राशी संबंधीत अधिकारी बसलेले आहेत. असे असतानाही गेल्या आठवड्यामध्ये पावसाच्या पहिल्याच तडाख्याने शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी अपघात झाले असून, काही ठिकाणी मोटार गाड्यांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. गावंडबाग येथे फुटबॉल खेळत असताना क्रीडापट्टूना अपघात झाल्याची बातमी मला मीरा-भाइर्दर मधील एका कार्यक्रमादरम्यान रात्री १० वाजता कळली. बातमी कळल्यानंतर मी तातडीने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील रस्त्यावरून बेथनी हॉस्पिटलकडे येत असताना माझ्या समोरच ८ ते ९ मोठ-मोठी झाडे कोसळली. त्याचबरोबर शहराच्या इतरही भागामध्ये अनेक झाडे उन्मळून पडल्याचे समजले. त्या दिवशीच्या घटनेवरून असे लक्षात आले की, ह्या सर्व झाडांच्या फाद्यांची छाटणी पावसाळ्यापुर्वी योग्य प्रकारे न झाल्याने त्या फाद्यांचे वजन व सोसाट्याच्या वार्यामुळे ही सर्व झाडे उन्मळून पडल्याचे दिसून येते. माझ्या मतदारसंघामध्ये ठाणे महानगरपालिकेबरोबरच मीरा-भाइर्दर महानगरपालिकेचा भाग येत असून त्या ठिकाणी झाडांच्या फाद्यांची छाटणी योग्य प्रकारे झाल्यामुळे तेथे झाडे पडल्याच्या तुरळक घटना दिसून येतात. परंतू, ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण व उद्यान विभागाच्या अधिकार्यांच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना या घटनाना सामोरे जावे लागत आहे. झालेल्या पावसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली असली तरी सुदैवाने कोणतीही भयंकर घटना घडलेली नाही. तरी पावसाळ्याच्या पुढील तीन महिन्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने झाडांच्या फाद्यांची छाटणी योग्य प्रकारे करण्यासंदर्भात संबंधितांना निर्देश द्यावेत तसेच आपल्या जबाबदारीची जाणीव न ठेवता नागरिकांच्या जिवाशी खेळणार्या अधिकाऱवर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशो मागणी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
000000
