अशोक गायकवाड

 

रायगड : Revert back झालेला अर्ज देखील विहीत वेळेत म्हणजेच दि.३० जून २०२४ पूर्वी विद्यार्थ्याने त्याच्या लॉगीनमधून महाविद्यालयीन शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन फेरसादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्ग तसेच विमुक्ती जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याकडून पोर्टलवर नजर चुकीने अथवा अनावधानाने RIGHT TO GIVE UP पर्याय निवडला गेला आहे, अशा विद्यार्थ्यांकरीता रायगड जिल्ह्यातीलल अधिनस्त असलेल्या महाविद्यालयांनी महाडीबीटी पोर्टलवरील वरील महाविद्यालयांच्या प्राचार्य लॉगीन मधून REVERT RIGHT TO GIVE UP APPLICATION उपलब्ध असलेल्या पर्यायाचा वापर करुन सदरचे अर्ज दि.३० जून २०२४ पूर्वी Revert back करुन घेणे आवश्यक आहे. तसेच Revert back झालेला अर्ज देखील विहीत वेळेत म्हणजेच दि.३० जून २०२४ पूर्वी विद्यार्थ्याने त्याच्या लॉगीनमधून शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन फेरसादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव यांनी केले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *