Author: bittambatami.com

आदर्श आचारसंहिताभंगाविषयक तक्रारी निवारणासाठी नियंत्रण कक्ष स्थापन – डॉ.संदिपान सानप*

अशोक गायकवाड रायगड : आदर्श आचारसंहिताभंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा समिती प्रमुख आदर्श आचार संहिता समिती ३२- रायगड लोकसभा मतदार संघ डॉ.संदिपान सानप यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि.१६ मार्च २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्याल आली आहे. ३२- रायगड /३३ मावळ लोकसभा मतदार संघामधील विधानसभा मतदार संघामध्ये नागरिकांकडून येणाच्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी पुढीलप्रमाणे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून या नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. विधानसभा मतदार संघ- १८८ पनवेल, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२२- २७४५२३९९, १८९- कर्जत, नियंत्रण कक्ष क्रमांक ९३७३९२२९०९, १९० -उरण, नियंत्रण कक्ष क्रमांक ९८९२५३८४०९, १९१-पेण, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२१४३. २५३०३२, १९२- अलिबाग, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२१४१- २२२०४२, १९३- श्रीवर्धन, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२१४७- २२२२२६/ ७३४९५७९१५८, १९४ -महाड, नियंत्रण कक्ष क्रमांक ७३८५८१५२१०, २६3- दापोली, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२३५२- २२६२४८,२६४- गुहागर, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२३५६- २६४८८८ त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, रायगड यांचे कार्यालयात निवडणूकीसंदर्भात नागरिकांकडून येणाऱ्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा जिल्हा संपर्क केंद्र क्र. १९५० असा आहे. तसेच नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. ०२१४१- २२२०९७ हा आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा समिती प्रमुख आदर्श आचार संहिता समिती ३२- रायगड लोकसभा मतदार संघ डॉ.संदिपान सानप यांनी दिली आहे.

माथेरान पर्यटनस्थळाच्या विकासाला ब्रेक कुणामुळे ?

माथेरान : अनेक वर्षांपासून नावाजलेल्या माथेरान पर्यटनस्थळावर पहिल्यांदाच मागील दोन महिन्यांपासून तीव्र मंदीची झळ स्थानिकांना सोसावी लागत आहे त्यामुळे इथे जी काही थोड्याफार प्रमाणात विकासकामे मार्गी लागली आहेत आणि अजूनही काही कामे पूर्णत्वाकडे जाताना दिसत आहेत. पर्यटकांना अभिप्रेत असणाऱ्या सोयीसुविधाचा अभाव त्याचप्रमाणे काही व्यावसायिक यांच्याकडून दिशाभूल होऊन पर्यटकांचा एकप्रकारे खिसा रिकामा करण्यासाठी प्रयत्न केला जाणाऱ्या व्यावसायिक यांच्यामुळे इथे पर्यटक फिरकत नाहीत की ह्या गावाला विकासाच्या प्रवाहात आणताना काही विघ्नसंतोषी लोकांमुळे खोडा घातला जात असल्याने महत्वपूर्ण विकास कामे जलदगतीने मार्गी लागत नाहीत. काळानुसार  पर्यटन वाढीसाठी आवश्यक बदल घडवून आणणे गरजेचे आहे परंतु स्वतःच्या व्यावसायासाठी गावाच्या विकास कामांना खोडा घालून एकप्रकारे ठेकेदाराला वेठीस आणून आपल्या पदरात चिरीमिरी पाडून घेण्यासाठी काही मंडळी याबाबत निष्णात आहेत. परंतु यामध्ये नकारात्मक धोरणामुळे हे छोटेसे गाव प्रगती पासून खूपच दूर फेकले जात आहे. सद्यस्थितीत इथे पर्यटकांचा भरणा अल्पप्रमाणात दिसून येत आहे. ज्यांची हातावर कमाई आहे अशा लहानसहान स्टोल्स धारकांना,तसेच मोलमजुरी करणाऱ्या श्रमिकांना मंदीचा सामना करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.मुंबई पुण्यापासून अगदी जवळ असणाऱ्या याठिकाणी वर्षाचा सुट्टयांचा शेवटच्या एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या कालावधीत प्रथमच तीव्र मंदी आल्यामुळे वाढत्या महागाईला तोंड देताना महिला वर्गाला त्रासदायक बनले आहे. पर्यटकांना अभिप्रेत असणारी महत्वपूर्ण कामे आजही पूर्ण झालेली नाहीत.इथल्या विकासाला ब्रेक लागत असल्यामुळे याचाच पर्यटनावर विपरीत परिणाम झालेला दिसून येत आहे. परिणामी प्रशासनाच्या अधिकारी वर्गाचा हतबलपणा की मतांच्या राजकारणा पायी सर्वच मतदारांना गोंजारणार्या अकार्यक्षम लोकप्रतिनिधीमुळे विकास खुंटत चालला आहे हा सुद्धा संशोधनाचाच विषय बनला आहे. त्यासाठी कार्यक्षम लोकप्रतिनिधीची माथेरानला आवश्यकता आहे अशीही चर्चा ऐकावयास मिळत आहे.

नवी मुंबईत आठही विभाग कार्यालय क्षेत्रात प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडक मोहीम

नवी मुंबई :‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ अंतर्गत ‘थ्री आर’ संकल्पनेवर विविध उपक्रम राबविण्यात येत असून या अनुषंगाने एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलेले आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर…

मनसेच्या भिवंडी कार्यालयाला कपिल पाटील यांची भेट

भिवंडी : मनसेच्या भिवंडी शहरातील अशोकनगर येथील मुख्य कार्यालयाला महायुतीचे उमेदवार व केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी सदिच्छा भेट दिली. या वेळी भिवंडी शहर व ग्रामीण भागातील प्रचाराच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. या वेळी भाजपाचे आमदार महेश चौघुले, मनसेचे ठाणे-पालघर विभाग अध्यक्ष अविनाश जाधव, भिवंडी पूर्व मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख संतोष शेट्टी, शिवसेनेचे भिवंडी शहर जिल्हाप्रमुख सुभाष माने, मनसेचे डी. के. म्हात्रे, मनोज गुळवी, परेश चौधरी, रवींद्र विशे, विकास जाधव, कामिनी खंडागळे, भाजपाचे माजी नगरसेवक सुमित पाटील, राजू गाजेंगी आदींची उपस्थिती होती.

 ‘प्रत्येक मतदान केंद्रावर वीज, पाणी, रॅम्प, फर्निचर, शौचालय, व्हीलचेअर आदी अत्यावश्यक बाबी उपलब्ध करा !’

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांचे निर्देश अनिल ठाणेकर ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रत्येक बूथनिहाय, मतदान केंद्रावर वीज, पाणी, रॅम्प, फर्निचर, शौचालय, व्हीलचेअर या सर्व अत्यावश्यक बाबी उपलब्ध असल्याची खात्री करा असे निर्देश ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिले. पंचायत समिती मुरबाड येथे जिल्हा परिषद, ठाणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आज पार पडली. यावेळी गट विकास अधिकारी श्वेता पालवे याच्या समवेत पंचायत समितीच्या सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत विभाग निहाय आढावा घेण्यात आला. विविध कामकाज जलदगतीने करण्याच्या सुचना देण्यात आल्या. सॅममॅम बालकांची संख्या वाढ होऊ नये यासाठी विशेष लक्ष देण्यासाठी सुचना देण्यात आले. प्रत्येक ग्रांमपंचायत अंतर्गत पाणी पुरवठा किंवा पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष लक्ष देण्यासाठी यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कार्यक्रमानुसार बूथनिहाय प्रत्येक मतदान केंद्रावर वीज, पाणी, रॅम्प, फर्निचर, शौचालय, व्हील चेअर या सर्व अत्यावश्यक बाबी उपलब्ध असल्याबाबत आढावा घेण्यात आला. महिला बचत गटातील महिलांना मतदानाबाबत जनजागृत करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बचत गटातील महिलांसमवेत मतदान जनजागृतीपर शपत घेतली तसेच स्वीप कार्यक्रमाबाबत आढावा घेण्यात आला. बांबू लागवड व मनरेगा संदर्भांतील सुरु असलेल्या कामाची विस्तारित माहिती घेण्यात आले. माझी  वसुंधरा अंतर्गत झालेल्या कार्यक्रमांची माहिती वेळेत भरण्याच्या सुचना दिल्या. यावेळी समाज कल्याण विभागप्रमुख संजय बागुल, जिल्हा कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे, पंचायत समिती मुरबाडचे गटविकास अधिकारी श्वेता पालवे तसेच पंचायत समिती अंबरनाथ येथील सर्व विभाग प्रमुख व केंद्रप्रमुख उपस्थित होते. अंबरनाथ विधानसभा स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृतीसाठी केलेल्या उपक्रमांची माहिती घेण्यात आली. तसेच मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी विविध पध्दतीचा वापर करुन, जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचून मतदान जनजागृती करणे. पंचायत समिती अंबरनाथ येथील जिल्हा परिषदेच्या ४२८ शाळेत प्रभात फेरी काढणे, रांगोळी, गायन, नृत्य, नाटक, पथनाट्यद्वारे मतदान जनजागृती करणे महिला बचत गटांद्वारे मतदानाबाबात जनजागृती करून जास्तीत जास्त महिलांचा सहभाग वाढविणे. प्री- मॅट्रिक शिष्यवृत्ती संदर्भात सर्व शाळांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन पूर्ण करणे याबाबत सूचना देण्यात आल्या तसेच कामकाज वेळेत पुर्ण करण्याबाबत सांगण्यात आले. मुख्याध्यापक व शिक्षक यांचे नांवाचे रजिस्ट्रेशन करणे. एक शिक्षकी शाळा आहे तेथे प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकाने रजिस्ट्रेशन करणे व शिष्यवृत्ती योजनेचा ऑनलाईन अर्ज भरणे. ग्रामीण भागातील ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळांना लाईट/ पिण्याच्या पाण्याची सोय, खोली वर्ग व्यवस्था सुस्थितीत असल्याची माहिती घेण्यात आली. राज्य शासनाच्या माझी वसुंधरा पोर्टलवर नोंदणी करून प्रशिक्षण घ्यावे व शेवटी शपथ घेऊन प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याबाबत सांगण्यात आले. संस्थेमार्फत कचरा उचलण्यात येणाऱ्या नेवाळी नाक्याच्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट दिली. कचरा व्यवस्थापन व रस्त्यालगत साठलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना गटविकास अधिकारी, पंचायत समिती अंबरनाथ यांना यावेळी देण्यात आल्या. यावेळी समाज कल्याण विभागप्रमुख संजय बागुल, जिल्हा कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे, पंचायत समिती अंबरनाथचे गटविकास अधिकारी नारायणसिंग परदेशी, अंबरनाथ नगरपालिका अतिरिक्त मुख्याधिकारी अभिजीत पराडकर, पंचायत समिती अंबरनाथचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार जतकर, कुळगाव- बदलापूर प्रशासन अधिकारी विलास जडये, तसेच पंचायत समिती अंबरनाथ येथील सर्व विभाग प्रमुख व केंद्रप्रमुख उपस्थित होते.

हनुमान जयंती उत्सवानिमित्त पुरी,  गुळवणी व चटणीचा महाप्रसाद

पुणे : पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील जागृत देवस्थान असलेला श्री. हनुमान जयंती उत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २३  एप्रिल २०२४  रोजी मोठ्या उत्सवात संपन्न झाला.  हनुमान जयंती उत्सवानिमित्त आलेल्या भाविकांनी देवाचे दर्शन घेऊन,  शेरणी वाटप झाल्यानंतर  पुरी,  गुळवणी व कांद्याच्या चटणी या महाप्रसादाचा लाभ घेतला. थोरांदळे येथील ग्रामस्थ दरवर्षीप्रमाणे शिवकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आपल्या जागृत श्री. हनुमान जन्माचा सोहळा साजरा करतात. थोरांदळे गावचे ह. भ. प. श्री. विलास मिंडे महाराज यांचे पहाटे हनुमान जन्माचे व काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर वाजत गाजत शेरणी वाटप,  हारतुरे व आलेल्या भक्तांना महाप्रसाद दिला. यासाठी गावातील महिलांनी बनविलेल्या ३ लाखाहून अधिक पुऱ्या,  ५  पिंप गुळवणी व ३०० किलोहून अधिक चटणी बनविण्यात आली होती. या सोहळ्यासाठी पुणे मुंबईहून  मोठ्या प्रमाणात भाविक आले होते. उत्तर पुणे जिल्ह्यातील हा सर्वात मोठा सोहळा मानला जातो. हनुमान जयंती उत्सव कार्यक्रमाची सर्व व्यवस्था श्री. मारुती देवस्थानचे सर्व ट्रस्टी,  ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी,  थोरांदळे ग्रामस्थ,  मुंबईकर मंडळी,  महिला व युवक मंडळांनी एकत्रितरित्या यशस्वीपणे केली.  या सोहळ्यासाठी आंबेगाव तालुक्यातील रांजणी,  वळती,  नागापूर, भराडी, जाधवाडी, मांजरवाडी, खडकी, निरगुडसर, पिंपळगाव, चांडोली, लवकी या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी बैलगाड्यांच्या भव्य शर्यती झाल्या.

ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांना स्व. शि. म. परांजपे स्मृती पुरस्कार जाहीर !

ठाणे : महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा स्व. शि.मं. परांजपे स्गृती पुरस्कार यावर्षी, ठाणे वैभव दैनिकाचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांना जाहीर झाला आहे. मिलिंद बल्लाळ यांनी संपादक म्हणून दैनिक ठाणे वैभवच्या माध्यमातून परखड भाष्य करत शहराच्या विविध उपक्रमांतून योगदान दिले आहे. तसेच साहित्य क्षेत्रातही त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटविलेला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र संपादक परिषदेने ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांना मानाचा स्व. शि.मं. परांजपे स्गृती पुरस्कार जाहीर केला आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व महावस्र असे पुरस्काराचे स्वरुप असून शनिवारी, ४ मे २०२४ रोजी, माटूंगा कल्चरल सेंटर, माटूंगा,  मुंबई येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मिलिंद बल्लाळ यांना स्व. शि.मं. परांजपे स्गृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी समारंभाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, प्रमुख अतिथी, ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर, ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे, संपादक प्रकाश पोहरे, ज्येष्ठ साहित्यिक रविंद्र आवटी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात झी  २४ तासचे संपादक कमलेश सुतार,  सायंदैनिक संध्याकाळच्या संपादक रोहिणी खाडिलकर आदी ज्येष्ठ पत्रकारांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.

ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती

ठाणे :  १४६ ओवळा माजिवडाविधानसभा क्षेत्रातील विविध भागात मतदान नोंदणी अधिकारी आशिषकुमार बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली नोडल अधिकारी वर्षा दिक्षीत यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत स्वीप (Sveep) मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमातंर्गत शिवाई नगर मध्ये देवदया नगर रिक्षा स्टॅण्डवर रिक्षा चालक यांना मतदान करण्याकरिता प्रवृत्त करण्यात आले. तसेच सेंट मेरी हायस्कूल, वसंत विहार हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज हरिकिसन स्कूल पोखरण रोड येथे देखील जनजागृती करण्यात आली. हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून वसंतविहार येथील श्री. बंशिधरजी हनुमान ट्रस्ट येथे आलेल्या भाविकांमध्ये देखील मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. 146 ओवळा-माजिवडा प्रभाग अंतर्गत भाईंदर पूर्व नवघर रोड येथील भारतरत्न सचिन तेंडुलकर मैदान येथे क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांमध्ये तसेच Max Moxa Gym येथे सरावासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये  मतदान जनजागृती करण्यात आली व जास्तीत जास्त मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. मिरा भाईंदर महानगरपालिका, कार्यक्षेत्र अंतर्गत महिला बचत गटाच्या कार्यक्रमात उपस्थित महिलांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. लोढा पेरेडाईज व लोढा क्लब माजिवडा ठाणे येथे नोडल अधिकारी  सुनिल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या स्वीप पथकाचे श्री.कैलास शेवंते, श्री.अशोक भोये व सर्व स्वीप कर्मचारी यांनी  मतदारांमध्ये जनजागृती करण्या बाबत सर्व महिला व नागरिकांना 100% मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

क्रिकेटच्या देवाचा वाढदिवस

दिन विशेष श्याम ठाणेदार क्रिकेट हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे म्हणूनच क्रिकेट हा भारताचा धर्म आहे असे मानले जाते आणि खेळात सचिन तेंडुलकर याने जी असामान्य कामगिरी केली आहे…