Author: bittambatami.com

ठाकरेंच्या सभेनंतर काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये फ्री स्टाईल कुस्ती

खामगाव : खामगाव येथे महाविकास आघाडीची सभा संपताच काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व काँग्रेस सेवादलाचे कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्यात धक्काबुक्की झाली. महाविकास आघाडीचे बुलढाणा लोकसभेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ काल…

मोदी सरकार नव्हे आम्हाला भारत सरकार हवंय- उद्धव ठाकरे

अमरावती : शेतकऱ्यांना उपाशी ठेवणारे, महिलांचा अपमान करणारे, युवकांना बेरोजगार करणारे, दहा वर्षात देश लुटून कंगाल करणारे, हुकूमशहा मोदी सरकार नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालणारे भारत सरकार हवेय अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र…

अजून खूप सत्य उघड व्हायचयं – एकनाथ शिंदे

मुंबई :  मी आयुष्यात कधी खोटं बोललो नाही आणि बोलणारही नाही. माझे काही तत्व आहेत. माझ्यावर बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे संस्कार आहेत. त्यामुळे जिथे अन्याय तिथे न्यायासाठी लढणारा माझा स्वभाव आहे, अजून खूप सत्य उघड व्हायचयं असा…

‘मोदींच्या रुपाने नवा पुतीन नको’

शरद पवारांचा मोदीवर हल्लाबोल अमरावती: संसदेपासून राज्याराज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची हुकुमशाही वाढत आहे. या देशात मोदींच्या रुपाने नवीन ‘पुतीन’ तयार होत आहे का, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे अशा शब्दात शरद…

सुरतमध्ये भाजपा विजयी; काँग्रेसला दगाफटका?

सुरत : भाजपाने यंदाच्या निवडणूकीत आपले खाते उघडले आहे. सुरतमध्य काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने बाद ठरविल्यामुळे भाजप उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी…

आरटीईमधून खाजगी शाळा गायब

नवी मुंबई : राज्य सरकारने आरटीई प्रवेश नियमावलीत केलेल्या आमूलाग्र बदलामुळे प्रवेशप्रक्रिया करताना पालकवर्गात मोठा गोंधळ उडाला आहे. एक किलोमीटरच्या परिसरात सरकारी शाळा असल्यास इतर खासगी अथवा अनुदानित शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश न देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे आरटीईच्या माध्यमातून खासगी शाळांमध्ये आपल्या मुलांना शिक्षण देण्याचे पालकांचे स्वप्न भंगले आहे. सध्या आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. नवी मुंबईत प्रत्येक प्रभागात महापालिकेच्या पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करताना पालकांना इतर खासगी शाळांच्या जागा दिसत नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत अनुदानित खासगी, विनाअनुदानित आणि महापालिका अशा सुमारे दीड हजार शाळा आहेत. नवी मुंबई शहर हे सिडकोने नियोजन करून वसवल्यामुळे प्रत्येक प्रभागात महापालिकेची शाळा आहे. ज्या भागात महापालिकेची शाळा आहे, त्याच परिसरात इतर संस्थांच्या खासगी आणि अनुदानित शाळाही आहेत. सध्याच्या स्पर्धेच्या युगात सामान्य ते उच्चवर्गीय गटांतील प्रत्येक पालकाला त्यांच्या मुलांनी ही चांगल्या खासगी शाळेत शिक्षण घ्यावे, अशीच धारणा आहे. समाजातील प्रत्येक घटकातील विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे, तो वंचित राहू नये, याकरिता सरकारने सर्वशिक्षा अभियानांतर्गत सक्तीचे शिक्षण हे धोरण अवलंबले. याच धोरणातून आरटीईचा जन्म झाला. सरकारी शाळा अनुदानित आहेत, अशा स्वायत्त संस्थांमधून आरटीईद्वारे शिक्षण देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले होते. त्यामुळे खासगी शाळांमध्ये पालकांना शिशू वर्गापासून ते आठवीपर्यंत शिक्षण मोफत देता येत होते; मात्र आता सरकारने आरटीई धोरणात बदल केल्यामुळे आरटीईच्या पोर्टलमधून खासगी शाळांची नावे गायब झाली आहेत. ज्या भागात सरकारी अथवा महापालिकेची शाळा आहे, अशा परिसरात इंग्रजी खासगी शाळांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे आता पालकांना खासगीऐवजी सरकारी शाळांमध्ये मुलांना पाठवावे लागणार आहे. पोर्टलहून महापालिकेच्या शाळा गायब नवी मुंबई शहरात सीवूड्स, सारसोळे, कोपरखैरणे या ठिकाणी सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या शाळा ज्या परिसरात आहेत, त्या ठिकाणच्या पालकांना आरटीई पोर्टलवर इतर खासगी शाळा दिसत नाही; मात्र महापालिकेच्या शाळाही पोर्टलवर दिसत नसल्याने प्रवेश कसा घ्यायचा, असा नवा गोंधळ निर्माण झाला आहे. प्रवेशासाठी महापालिकेचे नवीन पोर्टल सीबीएसई शाळेत विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया सुलभ व्हावी, याकरिता महापालिकेतर्फे वेगळे पोर्टल तयार केले जात आहे. या पोर्टलद्वारे अर्ज भरून पालकांना पाल्याचा प्रवेश करता येणार आहे. हे पोर्टल अद्याप तयार न झाल्यामुळे प्रवेशप्रक्रिया थांबवली असल्याचे समजते आहे. शाळांना मान्यता नाही नवी मुंबई महापालिकेच्या सीबीएसई शाळांना अद्याप दिल्ली बोर्डाकडून मान्यता मिळालेली नाही. गेल्या सात वर्षांपेक्षा अधिक काळ मान्यता मिळवण्यात नवी मुंबई महापालिका अपयशी ठरली आहे. अशा परिस्थितीत आरटीई पोर्टलवर नवी मुंबईच्या शाळा मान्यता नसल्याने दिसत नाही. मात्र, एकीकडे शाळांना परवानगी आणण्याचे आणि दुसरीकडे प्रवेशप्रक्रियेकरिता पोर्टल तयार करण्याचे दोन्ही समांतर काम सुरू असल्याचे समजले. महापालिकेच्या सीबीएसईच्या शाळांना मान्यता घेणे आणि प्रवेशप्रक्रिया राबवणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शहरातील पालकांकरिता स्वतंत्र प्रवेशप्रक्रिया राबवण्यासाठी महापालिकेतर्फे स्वतंत्र पोर्टल तयार करण्याचे काम वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहे. – डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

ट्रॉमा केअर सेंटरअभावी रूग्णांची हेळसांड

मुंबई : मुंबई-नाशिक महामार्ग, मुंबई-कसारा मध्य रेल्वे मार्ग, समृद्धी महामार्ग, शहापूर-मुरबाड-नगर अशा मार्गाचे जाळे शहापूर तालुक्यात आहे. येथील म्हामार्गावर वारंवार भीषण अपघात नेहमीच घडतात. त्यात अनेकांना तत्काळ उपचार न मिळाल्याने प्राणही गमवावे लागले आहेत; परंतु शहापूर तालुक्यात अपघातग्रस्तांवर तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी ट्रॉमा केअर सेंटर उपलब्ध नाही. तसेच ट्रॉमा केअर सेंटर सुरू व्हावे, यासाठी प्रशासकीय पातळीवर कोणतेच प्रयत्न होत नसल्याने नागरिक संताप करीत आहेत. समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर जखमींवर तत्काळ उपचार करण्यासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो; परंतु येथे उपचारास मर्यादा आहेत. त्यामुळे अत्याधुनिक उपचारांसाठी अपघातग्रस्तांना ठाणे, कल्याण व मुंबई यांसारख्या शहरातील रुग्णालयात न्यावे लागते. मागील वर्षी समृद्धी मार्गावर अपघातात २० च्या आसपास मजुरांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मृतदेह ठेवण्यासाठी कक्ष नसल्याने ते मृतदेह उघड्यावर ठेवले होते. रस्ते अपघात झाल्यास जखमींना प्रथम शहापूर उपजिल्हा रुग्णालय आणि तेथून ठाणे-मुंबईतील रुग्णालयांत दाखल करावे लागते. त्यामुळे अपघातग्रस्तांवर वेळेत उपचार व्हावेत, यासाठी रेल्वे प्रवासी संघटना व स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत शहापूर तालुक्यात ट्रॉमा केअर सेंटरची मागणी होत आहे; मात्र प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींकडून मागणी होत नसल्याने ट्रामा केअर सेंटर सुरू झालेले नाही. खर्डीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण झाले असून येथील पहिल्या मजल्यावर ट्रामा केअर सेंटर तत्काळ सुरू करावे, अशी मागणी होत आहे. पाच एकर जागा मंजूर ग्रामीण रुग्णालय हे खर्डी रेल्वेस्थानक व मुंबई-आग्रा महामार्गालगतच मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे येथे जखमींना तत्काळ उपचार मिळून अनेक अपघातग्रस्तांचे जीव वाचू शकतात; तर या रुग्णालयालगत पाच एकर जागाही ट्रामा केअर सेंटरसाठी मंजूर आहे. त्यामुळे बांधकाम होईपर्यंत खर्डीच्या ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी होत आहे. खर्डी येथे ट्रामा केअर सेंटर व्हावे, यासाठी मंत्रालय स्तरावर प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. – डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

 रायगड लोकसभा मतदार संघात १३  उमेदवार रिंगणात

८  जणांनी घेतली उमेदवारी मागे तीन अनंत गीते निवडणुकीच्या रिंगणात. अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड लोकसभा मतदार संघात १३  उमेदवार निवडणुकीच्या  रिंगणात उरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी  रायगड लोकसभा मतदार संघातील ८  उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. ७  मे रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी सोमवारी दिली. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे , उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे , अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यावेळी उपस्थित होते. अनंत गिते, (अपक्ष),अनंत बाळोजी गिते, (अपक्ष),  अनंत गंगाराम गिते, (शिवसेना , उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे तीन अनंत गीते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  रायगड लोकसभा मतदारसंघासाठी २८  उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छानणीत  ७ जणांचे अर्ज बाद झाले. सोमवारी  दुपारी ३  वाजेपर्यंत ८  उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळे १३  निवडणूकीच्या रिंगणात उरले आहेत. १३ उमेदवार असल्यामुळे एक युनिटवर  मतदान घेता येणार आहे.  प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन व निवडणूक विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली. निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार १) अनंत गिते, (अपक्ष), २) अनंत बाळोजी गिते, (अपक्ष), ३) अनंत गंगाराम गिते, (शिवसेना , उद्धव बाळासाहेब ठाकरे), ४)  नितीन जगन्नाथ मयेकर, (अपक्ष), ५) मंगेश पद्माकर कोळी, (अपक्ष), ६) प्रकाश बाळकृष्ण चव्हाण, (भारतीय जवान किसान पार्टी)…

ठाणे जिल्हा समन्वय समितीची 24 एप्रिलला बैठक

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आणि ठाणे जिल्हा समन्वय समिती यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांची  बुधवारी, 24 एप्रिल दुपारी 3.00 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात ही बैठक होणार असून जिल्ह्यातील सर्व वर्ग एक व वर्ग दोनच्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महासंघाच्या ठाणे जिल्हा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे. राजपत्रित अधिकारी महासंघ ही संघटना अधिक सबळ आणि कार्यशील करण्याच्या दृष्टीने या बैठकीचे  आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी संस्थापक अध्यक्ष व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर, कोषाध्यक्ष नितीन काळे या मान्यवरांसह राज्य कार्यकारीणीचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.‌ या बैठकीस जिल्ह्यातील सर्व विभागाच्या राजपत्रित वर्ग- अ आणि ब अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महासंघाच्या ठाणे जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, कार्याध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, उपाध्यक्ष मोहन पवार व सरचिटणीस तथा जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.

एनसीपीए हे सामाजिक बांधिलकी जपणारे केंद्र

रमेश औताडे मुंबई  : नरीमन पॉइंट, मरीन लाइन्स समुद्रालगत एकूण ८ एकर जागेवर वसलेले एनसीपीए हे सामाजिक बांधिलकी जपणारे केंद्र आहे. ‘संस्था भेट चर्चा थेट’  या उपक्रमाव्दारे एनसीपीए कलादालने तसेच लायब्ररी भेट व त्याची माहिती जाणून घेण्यासाठी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी नयन कळे ,  मुख्य ग्रंथपाल सुजाता जाधव यांनी तसेच  रुग्ण मित्र विनोद साडविलकर यांच्या संकल्पनेतून कलाकार तसेच वाचकांसाठी असलेली सामाजिक बांधिलकी टाटा थिएटर, जमशेद भाभा थिएटर, एक्सप्रिमेंटल थिएटर, गोदरेज डान्स थिएटर, लिटील थिएटर, दिलीप पिरामल प्रदर्शन गॅलरी, एनसीपीए रेकॉर्डिंग स्टुडिओ इतर ची वैशिष्ट्ये, आसन क्षमता, विद्युत व्यवस्था, श्रोत्यांसाठी ध्वनी व्यवस्थापन, एनसीपीए आर्ट ॲट द पार्कची सामान्य नागरिकांसाठीची संकल्पना ही महत्वपूर्ण आहे.अशी माहिती नयन काळे यांनी दिली. लायब्ररीतील पुस्तकांची नियोजनबद्ध मांडणी,संदर्भित वास्तु विशारद पुस्तके,विविध संगीत क्षेत्रातील इसवी सनातील माहिती,सभासद नोंदणी प्रक्रिया,सभासदांना मिळणार-या सुविधांची माहिती सुजाता जाधव यांनी दिली. रूग्ण मित्र परिवार तथा सहयोगी संस्थेच्या साधारण ३५ हून अधिक संस्था पदाधिका-यांनी यावेळी आपली उपस्थिती नोंदवली. एनसीपीएच्या भेटीत मिळालेली माहिती सामाजिक संस्था पदाधिका-यांनी मौखिक प्रचार-प्रसार करण्यासाठी पुढाकार घेऊ अशी ग्वाही  दिली. एनसीपीए व्यवस्थापनाच्या उत्तम नियोजनातून भेटीचा हेतू सफल झाल्याचे धनंजय पवार, नवीन कुमार पांचाळ, रमेश चव्हाण, श्रुती साडविलकर या समन्वयकांनी आपले मत व्यक्त केले. नयन काळे व सुजाता जाधव यांचा शाल व रुग्ण मित्र संस्था भेट चर्चा थेट तथा वैद्यकीय मदत पुस्तक देऊन नागेबाबा मल्टिस्टेट पतसंस्थेचे आरोग्य दूत सुभाष गायकवाड़ यांच्या हस्ते कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. संस्था भेटीत पूर्वा कदम, बाळकृष्ण नाणेकर, प्रदीप कुलकर्णी, अमिता शर्मा, सी.पी.पावसकर, गोविंद मोरे, प्रविण खेडेकर, प्रज्वला इंगळे, शांताराम मोरे, रूपाली कापसे, अक्षता कापसे, रोहन पालकर, एस.पी.जहागीरदार,अमेय गिरकर, छाया भटनागर, वैष्णवी शिंदे, अन्वी भटनागर, आद्या भटनागर,डाॅ.स्मिता तरे, डाॅ.अलका थरवळ, मिनाक्षी वेलणकर, आदिती गायकवाड, सुभाष गायकवाड, डी.डी.सावंत, रेहाना शेख, अख्तर हुसेन यांनी सहभाग घेतला.