Author: bittambatami.com

निवडणूक खर्च निरीक्षक अंकुर गोयल यांचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर यांच्याकडून स्वागत

अशोक गायकवाड रत्नागिरी : लोकसभा निवडणूक – २०२४, निवडणूक खर्च निरीक्षक अंकुर गोयल यांचे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्याकडून स्वागत ४६- रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक अंकुर गोयल…

 ग्रामस्थांना पाणीपुरवठा वेळेत व्हावा – छायादेवी शिसोदे

जल जीवन मिशन अंतर्गत ठाणे : जल जीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा वेळेत व्हावा. येथील कामकाज भौतिकदृष्ट्या पुर्ण झाले असून मुंबई महानगर महापालिका यांच्या मार्फत जल जोडणी झाल्यावर येत्या १० दिवसांत अनगावात पाणीपुरवठा सुरळीत चालू होईल अशाप्रकारे कामकाज करावे, अशा सूचना ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिल्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी भिवंडी पंचायत समिती येथे भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली. माझी वसुंधरा अंतर्गत दिलेल्या कामाविषयी माहिती घेत वेळेत काम पूर्ण करण्याबाबत उचित कार्यवाही करण्याच्या सुचना यावेळी दिल्या. अनगाव येथील जल जीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा वेळेत व्हावा. येथील कामकाज भौतिक दृष्ट्या पुर्ण झाले असून मुंबई महानगर महापालिका यांच्या मार्फत जलजोडणी झाल्यावर येत्या १० दिवसांत अनगावात पाणीपुरवठा सुरळीत चालू होईल अशाप्रकारे कामकाज करावे यासाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी डॉ. प्रदीप घोरपडे व उप अभियंता पापू सासे यांना सुचना दिल्या. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजना अंतर्गत अकलोली ग्रामपंचायत अंतर्गत सुरु असलेल्या ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम पाहणी करण्यात आली. कामकाज तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना उपस्थितींना दिल्या. प्रादेशिक पाणीपुरवठा संदर्भातील जल जीवन मिशन अंतर्गत विहिरींची कामे पहाणी करून पाणी शुद्धीकरण केंद्र येथे फिल्टर प्लान्टला भेट देऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तपासण्यात आली. तसेच वज्रेश्वरी ग्रामपंचायतीला भेट देण्यात आली. पुढील महिन्यातील वज्रेश्वरी देवीच्या यात्रेसंदर्भात पूर्व नियोजन करण्यासाठी सुचना देण्यात आल्या. यात्रेत स्वच्छ्ता, पिण्याचे पाणी, रस्ता व इतर सोयीसुविधा बाबत पोलिस निरीक्षक गणेशपुरी धर्मराज सोनके, सरपंच, ग्रामसेवक व कमिटी सोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वरी येथे भेट देऊन रुग्णालयात सर्व सोयीसुविधाची प्रत्यक्ष पाहणी करून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन कामकाज करावे असे मार्गदर्शन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी केले. प्राथमिक आरोग्य केंद्र अनगाव येथील नवीन बांधकाम सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची पहाणी देखील करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी डॉ. प्रदीप घोरपडे, उप अभियंता पापू सासे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलीनी ठोंबरे, विस्तार अधिकारी सुधाकर सोनावणे, पंचायत समिती भिवंडी येथील अधिकारी व कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी येथे उपस्थित होते.

रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू – किशन जावळे

 अशोक गायकवाड अलिबाग : रायगड लोकसभा मतदार संघातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया १२ एप्रिल २०२४ रोजी सुरू होत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय…

मातीच्या मडक्यांना अच्छे दिन

वाढत्या गरमीमुळे माठाला अधिक पसंती वडखळ : मागील दोन आठवड्यांपासून वातावरणात वाढत असलेल्या गरमीमुळे अनेकांनी बचावात्मक पवित्रा घेत अनेक वेगवेगळे उपाय करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणजे फ्रीजऐवजी…

‘संसद ताब्यात घ्या; पण मित्रपक्षांचाही मान राखा’

शिंदे गटाचे खासदार कीर्तिकर यांचा मोदींना टोला मुंबई : विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे ही भाजपने आणलेली नवी संस्कृती आहे. अनुच्छेद ३७० रद्द करणे, वस्तू सेवा कर, राम मंदिर…

उल्हासनगर महापालिकेने केली प्लास्टिक कारखान्यावर कारवाई,

९ मॅट्रिक टन प्लास्टिक जप्त उल्हासनगर : उल्हासनगर शहरात बंदी असलेल्या प्लास्टिक चे उत्पादन सुरु असुन बिनधास्तपणे प्लास्टिक च्या पिशव्या दुकानदार ठेवत आहेत. ही माहीती अतिरिक्त जमीर लेंगरेकर यांना मिळताच…

‘पाणी नाही तर मतदान नाही’

रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा…! कल्याण : कल्याण लोकसभेतील अंबरनाथ मध्ये पाण्याची टंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्यात ही समस्या जास्तच तीव्र झाली आहे. पाणी टंचाईच्या त्रासाला कंटाळून कानसई विभागातील…

हाफकिनकडून आणखी १६ औषधांचे उत्पादन!

मुंबई : राज्य सरकारने हाफकिनला आणखी १६ औषधांची निर्मिती करण्याची परवानगी दिली आहे. परिणामी, हाफकिन निर्मिती करीत असलेल्या औषधांची संख्या २५ हून अधिक होणार आहे. हाफकिन जीवऔषध निर्माण महामंडळ निर्मिती…

पक्षाने संधी दिली तर लढणार-संजय केळकर

ठाणे : ठाणे लोकसभेच्या उमेदवारी वरून महायुतीत खलबत्ते सुरु आहेत. त्यात हि जागा कोणाकडे जाणार हे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप कडून या जागेवर…

आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

माथेरान : 11 एप्रिलला शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे औचित्य साधत भारतीय बौद्ध महासभा, माथेरान – शाखा क्रमांक 10 व माथेरान गिरीस्थान नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि तेरणा…