Author: bittambatami.com

ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत कदम तर सचिवपदी जगदीश शिंगाडे यांची निवड

ठाणे : ठाणे जिल्हा बार असोसिएशनची (वकील संघटना) सन 2024-2026 साठी निवडणूक 6 एप्रिलला पार पडली. आता या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यावेळी अ‍ॅड. प्रशांत गणपत कदम (आप्पा) यांना 859 मते मिळाली तर त्यांचे विरोधक अ‍ॅड. संजय अनंत म्हात्रे यांना 497 मते मिळाली. कदम यांना 362 मतांनी दणदणीत विजय संपादन केला. तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड. सलिल श्रीकांत बुटाला यांचा बहुमताने विजय झाला. तसेच सचिवपदी अ‍ॅड. जगदीश शिंगाडे यांची निवड झाली. तर खजिनदारपदी अ‍ॅड. रेखा नरेंद्र हिवरे तसेच उपसचिवपदी (पुरुष )अ‍ॅड. भरत सोनावणे व महिला गटात अ‍ॅड. कविता सचिन चौधरी यांची निवड झाली. तर कार्यकारी सदस्यपदी अ‍ॅड. नारायण अवचर, अ‍ॅड. सोपान चव्हाण, अ‍ॅड. शैलेश कदम, अ‍ॅड. पुनम कामतकर, अ‍ॅड. पुजा कासळे, अ‍ॅड. प्रशांत लिहिनर, अ‍ॅड. संतोष पांडे व अ‍ॅड. सायली वालमे आदींची निवड झाली. सर्व विजयी उमेदवारांचे ठाणे जिल्ह्यांतून अभिनंदन करण्यात येत आहे. ठाणे जिल्हा बार असोसिएशनची सन 2024 ते 2026 या कालावधीसाठी पदाधिकार्‍यांची निवडणूक 6 एप्रिल 2024 रोजी पार पडली. या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील 1467 मतदारांनी सहभाग घेतला. पैकी 1379 जणांचे मतदान झाले. अध्यक्षपदाची निवडणूकीत अ‍ॅड. प्रशांत कदम यांनी  362 मतांची आघाडी घेत 859 मते मिळाली तर विरोधी उमेदवार अ‍ॅड. संजय म्हात्रे यांना 497 मते मिळाली. उपाध्यक्ष पदासाठी 4 जण रिेंगणात होते. त्यामध्ये अ‍ॅड. सलिल बुटाला यांना 568, अ‍ॅड. हेमलता देशमुख यांना 531, अ‍ॅड. मनोजकुमार राय यांना 133 मते तर अ‍ॅड. कुंदा सावंत यांना अवघी 87 मते मिळवून चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर सचिवपदाची निवडणूक अटीतटीची झाली. अ‍ॅड. जगदीश शिंगाडे यांना 725 मते मिळाली तर अ‍ॅड. नरेंद्र गुप्ते यांना 610 मते मिळाली. अ‍ॅड. शिंगाडे यांचा 115 मतांनी विजय झाला. सर्व विजयी उमेदवारांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

अश्विनी शिंदे व रुपेश कोंडाळकर सर्वोत्कृष्ट खेळाडू इलेट्रिक बाईक देऊन गौरव केला गौरव

विद्यमाने कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा पुणे, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २०२२-२३ घेण्यात आली होती, या स्पर्धेतील अष्टपैलू…

ईदनिमित्त सलमान खानच्या घरासमोर चाहत्यांची तोबा गर्दी

पोलिसांचा लाठीचार्ज मुंबई : अभिनेता सलमान खानच्या मुंबईतल्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी जमली आहे. ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची बातमी समोर आली आहे. रमजानच्या दिवशी सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी…

 माथेरानकरांची प्रतीक्षा केव्हा संपणार?

पनवेल माथेरान पर्यायी मार्ग लाल फीतीमध्ये अडकला माथेरान :माथेरान पर्यटन नगरीला भेट देण्याकरिता सध्या नेरळ ते माथेरान हा एकमेव घाट रस्ता उपलब्ध आहे त्याचबरोबर नेरळ माथेरान मिनी ट्रेनच्या मर्यादित सेवा…

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीदिनी नमुंमपा मुख्यालयात अभिवादन

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सामाजिक समतेचे अग्रणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात…

मराठी शाळांचा विषय वचननाम्यात घ्या!

मुंबई : मराठी भाषिक राज्य असतानाही राज्यात मराठी भाषा ही पोरकी होण्याच्या मार्गावर आली असून यासाठी विविध पक्षांची राजकीय मानसिकतादेखील कारणीभूत आहे. विविध सरकार आणि अधिकाऱ्यांच्या युतींमुळे मराठी शाळा उद्‌ध्वस्त…

प्रचारासाठी वाहनांची परवानगी बंधनकारक

पनवेल : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर प्रमुख पक्षांसह उमेदवारांकडून प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. या प्रचारासाठी लागणाऱ्या वाहनांची पीयूसी, आरसीबुकसह इतर आवश्यक कागदपत्रे आणि चालकांकडेही परवाना असणे आवश्यक आहे.…

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन

महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन ठाणे दि : श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. १० एप्रिल २०१९ श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन श्री…

रमझान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना पनवेल महानगरपालिकेचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, पवन सोनी,…

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत प्रसारित होणार !

मुंबई : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी राज्यात प्रशासन सज्ज’ याविषयी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत प्रसारित होणार आहे.…