Author: bittambatami.com

उद्धव ठाकरे, राहुल गांधींना मतदारच तडीपार करतील

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा घणाघात मुंबई : भ्रष्ट नेत्यांच्या अटकेविरोधात एकत्र येत दुखवटा साजरा करण्यासाठी रामलीला मैदानावर जमणा-या सर्व भ्रष्ट नेत्यांना त्यांच्या पराभवाची गॅरंटी असल्यानेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असभ्य भाषेत टीका केली. अशा लायकी नसलेल्यांना मतदारच निवडणुकीत तडीपार करतील अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी, संजय राऊत यांच्यावर मंगळवारी घणाघात केला. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. राणे बोलत होते. भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते. राजकीय उंची आणि बौद्धीक कुवत नसलेल्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पातळी सोडून टीका करणे थांबवावे अन्यथा भाजपा कार्यकर्त्यांना त्यांची लीला दाखवावी लागेल असा इशारा ही श्री.राणे यांनी विरोधकांना दिला. श्री.राणे म्हणाले की अब की बार भाजपा तडीपार म्हणणा-यांनी स्वत:ची लायकी तपासून पहावी. कोरोना काळात गरीबांच्या टाळूवरचे लोणी खाणा-यांना सूज्ञ मतदारच यावेळी घरी बसवतील. मोदी सरकारवर मॅच फिक्सिंग चा आरोप करणारे उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व विरोधक, भ्रष्ट नेत्यांच्या समर्थनासाठी एकत्र येतात ही संतापजनक बाब आहे. तपास यंत्रणांच्या धाडी दरम्यान अव्वाच्या सव्वा रोकड मिळत असताना, अनेक घोटाळे समोर येत असताना भ्रष्ट मंत्र्यांवर होणा-या कायदेशीर कारवाई विरोधात ही मंडळी गळे काढत आहेत. लोकशाही तत्वांनुसार कायद्याचे पालन करत सर्व भ्रष्ट नेत्यांवर कारवाई होत असून गरीब सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचा पैसा पंतप्रधान मोदी मिळवून देतील असा विश्वास श्री.राणे यांनी व्यक्त केला. मोदींच्या कार्यकाळातील देशाची होणारी प्रगती विरोधकांना सहन होत नसल्यानेच जळफळाटातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपावर  बिनबुडाची टीका होत आहे असेही ते म्हणाले. श्री.राणे यांनी देशाच्या प्रगतीचे द्योतक असलेली अर्थव्यवस्थेशी संबंधित आकडेवारीच पत्रकार परिषदेत सादर केली. पंतप्रधान मोदीजींच्या समर्थ नेतृत्वाखाली देशाच्या विकासाची तुफान वेगाने घोडदौड सुरू असून यंदा ‘अब की बार ,400 पार’ चे  उद्दीष्ट एनडीए नक्की साध्य करेल असा विश्वास श्री.राणे यांनी बोलून दाखवला.

वसई न्यायालयात ऐतिहासिक नाण्यांना उजाळा

वसई : अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी फार पूर्वीपासून नाणी चलनात आहेत. प्राचीन साम्राज्य, राजवटींसह स्वातंत्र्यपूर्व काळातील नाणी वसईकरांना पाहता यावी, यासाठी वसई न्यायालयाच्या आवारात असलेल्या बार असोसिएशन रूम येथे नाणी प्रदर्शनाचे आयोजन (ता. २) करण्यात आले होते. या वेळी प्राचीन नाणी व त्याचा इतिहास समजण्यासाठी न्यायाधीश, वकिलांसह मोठ्या संख्येने नागरिकांनी भेट दिली. शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बार असोसिएशनचे अॅड. भरत पाटील, अॅड. आनंद घरत, अॅड. पूनम जाधव यांनी नाणी संग्रह प्रदर्शनाचे आयोजन केले होते. मुंबई कॉईन्स सोसायटी न्यूमिसमॅटिक सभासद जोसेफ लोपीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शाहू महाराज, व्यंकोजी राजे भोसले, पेशवेकालीन व पोर्तुगीज, तसेच बसिन (वसई) अशी दुर्मिळ नाणी जमा केली आहेत. जोसेफ लोपीस यांच्या मदतीने नाणी प्रदर्शन भरविण्यात आले. सुमारे एक हजार नाणी प्रदर्शनात होती. तोफगोळेदेखील नागरिकांना पाहण्याची संधी मिळाली. या वेळी न्यायाधीश आर. डी. देशपांडे, न्यायाधीश खोंगल, नाथानी, वाळके आदींनी भेट दिली, तर ज्येष्ठ वकील अविनाश विद्वांस, नंदन भगत बार असोसिएशनचे अध्यक्ष परमानंद ओझा, दिगंबर देसाई, साधना धुरी यांच्यासह मोठ्या संख्येने वकील मंडळी सहभागी झाली होती. जग तंत्रज्ञानात पुढे जात आहे. नव नवी संशोधने होत आहेत, अशावेळी प्राचीन इतिहासालादेखील तितकेच महत्त्व आहे. नाणी प्रदर्शन म्हणजे जगात पूर्वी घडलेल्या घडामोडी आणि तेव्हाच्या राजे- महाराजे, नागरिकांनी…

बदलापूर एमआयडीसीमध्ये डी.के. फार्मा या केमिकल कंपनीला आग!

बदलापूर : बदलापूरच्या एमआयडीसी परिसरात प्लॉट नंबर १५ येथील डी.के फार्मा या केमिकल कंपनीला दुपारी १२ च्या सुमारास अचानक भीषण आग लागली, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. दुपारी अचानक एमआयडीसी परिसरातून धुराचे लोळ दिसू लागल्यावर सगळीकडे एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले कारण यापूर्वी जानेवारी महिन्यातच पहाटेच्या सुमारास विके केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटाने लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच पुन्हा दोन महिन्याच्या फरकानेच येथील डी.के. फार्मा या कंपनीला देखील आज भीषण आग लागली. डी.के.फार्मा या कंपनीत वैज्ञानिक प्रयोगशाळेत वापरण्यात येणारे व औषधांसाठी वापरात वापरात येणाऱ्या केमिकल चे रसायन प्रक्रिया होत असते. दुपारी अचानक कंपनीच्या ८/३२ या प्लॉटच्या शेवटच्या टोकाला असलेल्या रिॲक्टर आणि प्रोसेसर या भागात ही आग लागली. यावेळी आगीचे स्वरुप पाहता अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीम ने पाऊण तासात या आगीवर नियंत्रण मिळवले. यापूर्वी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कंपनीतील आग प्रतिबंधक यंत्रणेचा वापर करण्यात आल्याने आग जास्त प्रमाणात वाढली नाही अशी माहिती सोनोने यांनी दिली. या कंपनीत एकूण १५० कर्मचारी असून, शिफ्ट नुसार ड्युटी असल्याने, घटना घडली तेव्हा कंपनीत साधारण १०० माणसे असल्याचा अंदाज कंपनी व्यवस्थापक अजित बेहरे यांनी दिली. या घटनेत कंपनीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी, कंपनीत असलेल्या आग प्रतिबंधक यंत्रणेने आग विझवताना कंपनीतील एक कर्मचारी व नंतर अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली असून, केमिकल आणि आगीचे डोळ्यांना रिअँक्शन झाल्याने त्यांच्यावर बदलापूर पूर्व ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापकानी यांनी दिली. ही आग शॉर्ट सर्किट होऊन लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी, केमिकल ची गळती होऊन आग लागल्याची चर्चा देखील सुरु झाली आहे. आगीचे कारण आम्ही नेमके आता सांगू शकत नाही. त्या कारणांचा आम्ही शोध घेत आहोत. आमच्या कंपनीत एकूण १५० कर्मचारी कार्यरत आहेत मात्र, शिफ्ट ड्युटी असल्याने आगीची घटना घडली तेव्हा कंपनीत कर्मचाऱ्यांची संख्या जास्त नव्हती म्हणून आम्हाला लवकर सगळ्यांना सुखरूप बाहेर काढता आले. यात कोणत्याही कर्मचाऱ्याला दुखापत झाली नसून, लवकरच आगीचे कारण स्पष्ट होईल – अजित बेहरे व्यवस्थापक डी.के. फार्मा कंपनी.

ठामपा महिला व पुरुष कबड्डी संघाला विजेतेपद

अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा   ठाणे : तामिळनाडू, बंगलोर, पाचगणी, वर्धा, मध्यप्रदेश आदी विविध ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेच्या महिला व पुरुष कबड्डी संघाने चमकदार कामगिरी करीत विजेतेपद पटकाविले.आयुक्त सौरभ राव यांनी संघाचे अभिनंदन केले. महापालिकेच्या कबड्डी संघांच्या कामगिरीबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महिला व पुरूष कबड्डी संघाचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, क्रीडाअधिकारी तथा प्र. उपआयुक्त मीनल पालांडे, तसेच महिला कबड्डी संघाच्या व्यवस्थापक नीना गोळे, प्रशिक्षक संतोष शिर्के, पुरूष कबड्डी संघाचे व्यवस्थापक गणेश म्हात्रे, प्रशिक्षक जसपालसिंग राठोड उपस्थित होते.

सामाजिक भान देणारी आध्यात्मिक चळवळ!-शामसुंदर महराज सोन्नर

शेतकरी कीर्तन महोत्सव! शेतक-यांच्या व्यथा -वेदनांवर संत विचारांची हळूवार फुंकर घालून त्यांचे जगणे सुसह्य करण्याचा प्रयत्न शेतकरी कीर्तन महोत्सवातून होत आहे. व्यवस्थेने केलेल्या अन्यायाची जाणीव करून देत असताना त्याविरोधात लढण्याचे…

एनडीए’मध्ये मुजोरी; ‘इंडिया’त कुरघोडी

मागोवा भागा वरखडे लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचे अर्ज भरून दुसर्‍या टप्प्याचे अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. ‘इंडिया’ आघाडीत अनेक पक्ष सामील झाले, तरी त्यांची काँग्रेसवर कुरघोडी चालू आहे. एकीकडे साधन, संपत्ती,…

समांतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गठित करण्याचा हा अव्यापारेषु व्यापार थांबवावा…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर पदाधिकाऱ्यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त तसेच देशाचा निवडणूक आयोग यांच्याकडे नुकतीच एक तक्रार केली आहे. त्यात नागपुरातील जनार्दन मून नामक व्यक्तीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेच्या…

महाराष्ट्राला दुहेरी मुकुटासह सुवर्णपदक

 ५६ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा दिल्ली (क्रि. प्र.), दिल्ली येथील करमाळी सिंग क्रीडांगण, बसंत लेन, रेल्वे कॉलनी, पहारगंज येथे संपन्न झालेल्या ५६ व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने डबल धमाका करताना…

मालमत्ता कराची 716.97 कोटी वसूली

मागील वर्षीपेक्षा 83.66 कोटी रक्कमेची अधिक वसूली नवी मुंबई : मालमत्ताकर हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या महसूलाचा सर्वात मोठा स्त्रोत असून या आर्थिक वर्षात सन 2023-2024 मध्ये रु. 716.97 कोटी रक्कमेचे उत्पन्न मालमत्ताकरापोटी जमा झाले असून ते मागील 2022 -2023 वर्षापेक्षा 83.66 कोटींनी अधिक आहे. मालमत्ता कर विभागाने वर्षभरात जमा केलेल्या महसूलाचा हा आत्तापर्यंतचा विक्रम आहे. मागील वर्षी महानगरपालिकेकडे मालमत्ता करापोटी 633.31 कोटी इतकी रक्कम जमा झाली होती. यावर्षी वसूलीचे सुयोग्य नियोजन करीत प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्या अनुषंगाने सुरुवातीपासूनच मालमत्ता कर थकबाकीदारांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. त्यांच्या थकबाकी रक्कमेनुसार उतरत्या क्रमाने यादया तयार करण्यात येऊन अधिकाधिक महसूल वसूलीचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार पाठपुरावा करण्यात आला. याशिवाय मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा मिळावा व थकीत मालमत्ता कर महानगरपालिकेकडे जमा व्हावा यादृष्टीने 1 ते 31 मार्च 2024 या कालावधीत मालमत्ताकर अभय योजना लागू करण्यात आली. यामध्ये 1 ते 20 मार्च या कालावधीत थकबाकीच्या दंडात्मक रककमेवर 75% सवलत तसेच 21 ते 31 मार्च या कालावधीत 50% सवलत लागू करण्यात आली होती. या योजनेचा लाभ नागरिकांनी मोठया प्रमाणावर घेतला व 8740 थकबाकीदारांनी 116 कोटी इतकी रक्कम अभय योजनेअंतर्गत थकबाकीच्या दंडात्मक रक्कमेवरील सुटीचा लाभ घेत भरणा केली. या अभय योजनेअंतर्गत थकबाकीदार नागरिकांना रु. 45.56 कोटी इतकी रक्कम सवलत देण्यात आली. याचा एकत्रित परिणाम म्हणून गतवर्षीच्या तुलनेत 83.66 कोटी रक्कमेने अधिकची मालमत्ता करवसूली झाली. नागरिकांना मालमत्ता कर भरणा करणे सुलभ व्हावे यादृष्टीने आवश्यक काळजी घेत या आर्थिक वर्षातील अखेरचे तीन दिवस सार्वजनिक सुट्टी आल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता महानगरपालिकेची सर्व कार्यालये  व नागरी सुविधा केंद्रे करभरणा करण्यासाठी सुरु ठेवण्यात आली. त्यामुळे सुट्टीच्या तीन दिवसात 29 मार्चला 28.78 कोटी, 30 मार्चला 8.38 कोटी व 31 मार्चला 4.10 कोटी अशाप्रकारे अखेरच्या 3 दिवसात एकूण 41.26 कोटी इतकी रक्कम जमा झाली. त्याचप्रमाणे मार्च 2024 या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात 163.50 कोटी इतक्या रक्कमेचा करभरणा नागरिकांनी केला. नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे नवी मुंबईच्या विकास प्रक्रियेला नेहमीच गती मिळालेली असून मालमत्ता करापोटी जमा होणारी रक्कम ही दर्जेदार नागरी सेवासुविधा पूर्तीसाठी वापरली जात असल्याने नवी मुंबईकर नागरिकांनी शहराच्या प्रगतीत आपले योगदान दिलेले आहे. नागरिकांनी आपल्या मालमत्ताकराची रक्कम विहित कालावधीत भरणा केल्याबद्दल महानगरपालिकेच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.