Author: bittambatami.com

 केडीएमसी महापौरांनी अधिकाऱ्यांसमवेत केली महापौर निवासाची पाहणी

केडीएमसी महापौरांनी अधिकाऱ्यांसमवेत केली महापौर निवासाची पाहणी केडीएमसी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे करदात्या नागरिकांच्या पैशांचा चुराडा कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीनंतर महापौरांची निवड देखील झाली आहे. मात्र महापौरांसाठी महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या महापौर निवासस्थानाची दुरावस्था झाली आहे. गेली कित्येक वर्षे हा बंगला बंद असल्याने वाळवी लागली आहे. या महापौर निवासस्थानाची आज केडीएमसी  महापौर हर्षाली चौधरी थविल यांनी शहर अभियंता अनिता परदेशी, अतिरिक्त शहर अभियंता जगदीश कोरे, प्रशांत भागवत, शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे यांच्यासह पाहणी केली. कल्याण पश्चिमेतील आधारवाडी जेल परिसरात २०१० साली जनतेचे लाखो रुपये खर्च करून हे महापौर निवासस्थान बांधण्यात आले होते. मात्र, या निवासस्थानाला जाण्यासाठी रस्ता नसल्याने तसेच इतर वादामुळे हे निवासस्थान सुरुवातीपासूनच चर्चेत राहिले. बांधकामानंतर अनेक वर्षे हा बंगला वापराविना ओस पडून होता. यानंतर पुन्हा लाखो रुपये खर्च करून बंगल्याची डागडुजी करण्यात आली. मात्र, तत्कालीन महापौरांनी केवळ बंगल्याची पूजा करून त्यामध्ये वास्तव न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा हा बंगला वापरात आला नाही. कोरोना काळापासून तर हा बंगला पूर्णपणे बंद अवस्थेत असून, देखभालीअभावी त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. सध्या बंगल्यातील संपूर्ण लाकडी फर्निचर खराब झाले असून, अनेक ठिकाणी वाळवीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. नियमित देखभाल व संरक्षण न केल्यामुळे महापौर निवासस्थानाची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली आहे. केडीएमसी प्रशासनाने या बंगल्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने पुन्हा एकदा दुरुस्तीसाठी जनतेच्या लाखो रुपयांची उधळपट्टी होणार आहे. या या निवासस्थानाची पाहणी करण्यात येऊन लवकरच या निवासाच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे शहर अभियंता अनिता परदेशी यांनी सांगितले. दरम्यान महापौर हर्षाली चौधरी थविल या सद्ध्या मोहने येथे भाड्याच्या घरात राहत असून, महापौर निवासस्थानाची डागडुजी लवकर झाल्यास कल्याणमध्ये महापौर निवासस्थानी राहून नागरिकांच्या कामासाठी जास्तीत जास्त वेळ देता येईल.

अपयशात दिसला आशेचा किरण

अपयशात दिसला आशेचा किरण अलिकडे इस्रो‌’च्या दोन मोहिमा अयशस्वी झाल्या. ‌‘इस्त्रो‌’च्या माध्यमातून परकीय चलन मिळवून देशाला अर्थकारणाचे नवे साधन मिळवून देताना हे अपयश चिंताजनक ठरले. मात्र याच सुमारास भारतीय अंतराळ…

विमानतळ बाजारपेठेला नवे धुमारे

विमानतळ बाजारपेठेला नवे धुमारे विमानतळांना विमान प्रवाशी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांकडून मिळणाऱ्या महसुलातूनच उत्पन्न मिळत होते. विमान थांब्याचे भाडेही उत्पन्नाचे एक साधन होते; परंतु आता वाढीचा पुढील टप्पा अधिक विमानसेवा पुरवण्याने…

दखलपात्र वाटाघाटी

दखलपात्र वाटाघाटी युरोपियन संघ हा जगातील सर्वात मोठ्या व्यापार गटांपैकी एक आहे. तर भारत हा वेगाने वाढणारा, मोठ्या लोकसंख्येचा आणि उत्पादनक्षमतेकडे झुकणारा देश आहे. त्यामुळे या दोन्ही घटकांचा ताजा दखलपात्र…

मी ज्या देशात वाढलो तो हा देश नाही- नसीरुद्दीन शाह

मी ज्या देशात वाढलो तो हा देश नाही- नसीरुद्दीन शाह स्वाती घोसाळकर मुंबई : “मी कधीही सत्तेची अंध स्तुती केली नाही, नेहमी प्रश्न विचारले. पण आज प्रश्न विचारणेच देशद्रोह ठरत आहे का?” असा…

मेघालयात कोळसा खाणीत भीषण स्फोट ; १६ मजुरांचा मृत्यू

मेघालयात कोळसा खाणीत भीषण स्फोट ; १६ मजुरांचा मृत्यू शिलाँग : मेघालयातील पूर्व जयंतिया हिल्स जिल्ह्यातील एका बेकायदेशीर कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला असून या स्फोटात आतापर्यंत १६ मजुरांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात…

लोकसभेत भाजप बॅकफुटवर

मोदींच्या भाषणाशिवाय आभार प्रस्ताव मंजूर २२ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं नवी दिल्ली : लोकसभेच्या इतिहासात तब्बल २२ वर्षानंतर पहिल्यांदाच असं घडलंय की अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या भाषणावरील आभार प्रस्ताव हा पंतप्रधांनांच्या भाषणाशिवाय मंजूर झालाय. आज सातव्या…

अजित पवारांच्या अपघातामागे पार्थसहीत तटकरे, पटेलांचा हात?

अजित पवारांच्या अपघातामागे पार्थसहीत तटकरे, पटेलांचा हात? अंजली दमानियांच्या वक्तव्याने खळबळ मुंबई : घरातील पाळीव कुत्रा मेला तरी आपण दुखावटा पाळतो, येथे महाराष्ट्राच उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धक्कादायक अपघाती निधन झाल्यानंतर ज्या पद्धतीन…

मोदींचा राज्यसभेतून काँग्रेसवर घणाघात

मोदींचा राज्यसभेतून काँग्रेसवर घणाघात नवी दिल्ली : माजी लष्करप्रमुख नरवणेंच्या पुस्तकावरून लोकसभेत गदारोळ सुरु असतानाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आपल्या भाषणात कांग्रेसवर घणाघाती टिका केली. दरम्यान मोदींचे भाषण सुरू होताच विरोधकांकडून…