“घुसखोर पंडित” वेबसिरीज विरोधात महाराष्ट्र करणी सेनेची पोलिसांत धाव
“घुसखोर पंडित” वेबसिरीज विरोधात महाराष्ट्र करणी सेनेची पोलिसांत धाव रमेश औताडे मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारित होत असलेल्या ‘घुसखोर पंडित’ या वेब सिरीजमुळे ब्राह्मण समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत महाराष्ट्र करणी सेनेने खांदेश्वर पोलिस ठाणे, नवी मुंबई येथे तक्रार दाखल केली आहे. या वेब सिरीजचे शीर्षक व कथानक समाजात द्वेष आणि तेढ निर्माण करणारे असल्याचा दावा संघटनेने केला आहे. महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ घुसखोर पंडित ” हे नाव ब्राह्मण समाजाचा अपमान करणारे असून हिंदू धर्मासाठी पूज्य मानल्या जाणाऱ्या ब्राह्मण समुदायाची अवहेलना करण्याचा प्रयत्न यातून होत आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक धार्मिक विधी ब्राह्मणांद्वारे पार पाडले जातात आणि त्यामुळे ब्राह्मण जातीचा अपमान म्हणजे संपूर्ण हिंदू धर्माचा अपमान असल्याचे त्यांनी सांगितले. या वेब सिरीजमुळे ब्राह्मण समाजासह विविध हिंदू संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, सामाजिक शांतता बिघडण्याची शक्यता निर्माण झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित वेब सिरीज समाजात द्वेष, असंतोष आणि धार्मिक तेढ वाढवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला असल्याचे सेंगर यांनी सांगितले. या प्रकरणी वेब सिरीजचे दिग्दर्शक मनोज बाजपेयी तसेच संबंधित निर्मात्यांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १९६, २९९, ३५२, ३५३ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र करणी सेनेने केली आहे. पोलिसांनी तक्रार स्वीकारून पुढील तपास सुरू करावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
रस्त्यावर खायला टाकणाऱ्या प्राणीमित्रांवर बंदी
रस्त्यावर खायला टाकणाऱ्या प्राणीमित्रांवर बंदी विशिष्ट ठिकाणी भटक्या श्वानांना मिळणार मेजवानी मिरा -भाईंदर: नागरिकांकडून अनेकदा मुक्या प्राण्यांना भररस्त्यात अन्न टाकले जाते. यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने उघड्यावर खाद्यपदार्थ टाकण्यास सगळ्यांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र असे करतानाच भटक्या कुत्र्यांची उपासमार होऊ नये याकरता महापालिकेने शहरात २० ठिकाणी फिडिंग स्पॉट तयार केले असून या ठिकाणी येऊन श्वानांना यतेच्छ ताव मारावा लागणार आहे. न्यायालयाने नोव्हेंबर २०२५ मध्ये मोकळ्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसेच महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींनी भटक्या कुत्र्यांसाठी जागा निश्चित करून त्या ठिकाणी पाणपोई व फिडिंग स्पॉट तयार करण्याचे आदेश दिले होते. परिपत्रक राज्य शासनाकडून काढण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांनंतर मिरा- भाईंदर महापालिकेकडून भाईंदर पूर्वेत १, पश्चिमेत ७ व मीरा रोडमध्ये १३ फिडिंग स्पॉट तयार करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी दिली आहे. प्राणीमित्र रस्त्यावर तसेच मोकळ्या ठिकाणी या भटक्या कुत्र्यांना खायला टाकतात. एकाच ठिकाणी खाद्यपदार्थ मिळत असल्याने भटके कुत्रे त्या ठिकाणी टोळी बनवतात. परिणामी रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांवर भुंकणे आणि हल्ला केल्याच्या घटना घडतात. याला आळा घालण्यासाठी, नागरिकांची सुरक्षा व प्राणी मित्रांना शिस्त लावल्यासाठी महापालिकेकडून हे फिडिंग स्पॉट तयार करण्यात आले असून त्याबाबत जनजागृती करणे सुरू असल्याची माहिती महापालिकेने दिली. फिडिंग स्पॉटसाठी केलेला खर्च वाया जाऊ नये यासाठी भटक्या प्राण्यांसाठी निश्चित केलेल्या ठिकाणांवर प्राणीमित्रांनी खाद्यपदार्थ टाकण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या फिडिंग स्पॉटला उत्तम प्रतिसाद मिळाल्यास आवश्यकतेनुसार ठिकाणे वाढवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी दिली.
कुंभमेळ्यासाठी नाशिक होणार प्रकाशमान!
कुंभमेळ्यासाठी नाशिक होणार प्रकाशमान! सिन्नरच्या बंद वीज प्रकल्पातून पुन्हा सुरू होणार वीज निर्मिती हरिभाऊ लाखे नाशिक – सिन्नर येथील खासगी औष्णिक वीज प्रकल्प सर्वाधिक बोली लावून ताब्यात घेतल्यानंतर महाजनकोने आता २७० मेगावॉट वीज निर्मिती क्षमतेची दोन संयंत्रे पुन्हा सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या माध्यमातून सुरुवातीला ५२० मेगावॉट इतकी वीज निर्मिती होईल. सिंहस्थ कुंभमेळ्यात विजेची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी ही वीज निर्मिती महत्वाची ठरणार आहे. सि्न्नर तालुक्यातील हा औष्णिक वीज प्रकल्प पूर्वी बहुचर्चित इंडिया बुल्स कंपनीचा होता. विभाजनानंतर तो रतन इंडिया पॉवर कंपनीकडे गेला. १३५० मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प आहे. पहिल्या टप्प्याचे बांधकाम झाल्यानंतर थकबाकी न भरल्यामुळे दिवाळखोरीत निघाला. लिलाव प्रक्रियेत महाराष्ट्र सरकारच्या मालकीची वीज निर्मिती कंपनी महाजनको आणि सार्वजनिक क्षेत्रातील नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने (एनटीपीसी) यांनी एकत्रितपणे ३८०० रुपयांची सर्वाधिक बोली लावली. फेब्रुवारी अखेरपर्यंत या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण होऊन प्रकल्पावर पूर्णत: नियंत्रण मिळणार आहे. या माध्यमातून रतन पॉवरच्या प्रकल्पाचा हिश्याचा भाग आणि ‘नॉन प्रोसेसिंग क्षेत्र’ ताब्यात येईल. या भागातील उर्वरित मोकळ्या जागेशी महाजनकोचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले जाते. आता महाजनकोने बंद पडलेला औष्णिक वीज प्रकल्प नव्याने सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. सिन्नर येथील हा प्रकल्प १३५० मेगावॉट क्षमतेचा आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येकी २७० मेगावॉटचे दोन संयंत्र (युनिट) सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. हे काम पुढील सहा ते आठ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे महाजनकोचे संचालक (प्रकल्प) अतुल सोनजे यांनी सांगितले. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिकला वीज पुरवठ्याचा एक शाश्वत स्त्रोत उपलब्ध करून देणे हे महाजनकोचे मुख्य उद्दिष्ट आहे. एक मार्चपासून सिन्नर येथील प्रकल्पावर कर्मचारी नियुक्ती आणि इतर प्राथमिक कामांना वेगाने सुरुवात होणार असल्याचे सोनजे यांनी नमूद केले. तूर्तास रस्ते मार्गाने कोळसा वाहतूक सिन्नरचा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी कोळसा वाहतुकीसाठी एकलहरे ते सिन्नर असा रेल्वे मार्ग टाकण्यासाठी महाजनकोने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जोपर्यंत रेल्वे मार्ग तयार होत नाही, तोपर्यंत एकलहरे येथील प्रकल्पात कोळसा उतरवला जाईल.आणि तेथून रस्ते मार्गाने तो सिन्नरला नेला जाणार आहे. प्रारंभी कार्यान्वित केल्या जाणाऱ्या दोन संयंत्रांसाठी दररोज आठ हजार टन कोळसा लागणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रेल्वे मार्गातील काही क्षेत्राचे भूसंपादन होणे बाकी आहे. रेल्वेमार्ग कार्यान्वित झाल्यानंतर सिन्नरचा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे सुलभ होणार असल्याचे सांगितले जाते.
डेज संस्कृतीमुळे संस्कृती आणि मूल्यांशी दुरावा !
फेब्रुवारी महिना सुरू झाला की तरुणांना वेध लागतात ते वेगवेगळे डेज साजरे करण्याचे. त्यासाठी ते जय्यत तयारीही करतात. रोझ डे पासून सुरू झालेला डेजचा हा महोत्सव व्हॅलेंटाईन डे ला संपतो.…
अशा शस्त्रक्रिया नको रे बाबा…
वैद्यकीय उपकरणांच्या उद्योगाला कृत्रिम बुद्धिमत्तेने घेरले आहे त्यामुळे आता शस्त्रक्रिया कक्षात नजर टाकली तर कृत्रिम बुद्धिमत्तेने चालणारी अनेक उपकरणे आढळतील. या उपकरणांच्यामुळे शस्त्रक्रिया अधिक अचूक होतात असे मानले जात असले…
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यायलाच हवा…
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार प्रदान केल्यास सावरकरांचा नाही तर या पुरस्काराचाच गौरव वाढणार आहे, इतके सावरकरांचे योगदान मोठे आहे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले…
विलीनीकरण अडकले कुठे?
विलीनीकरण अडकले कुठे? गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत वारंवार बैठका होत होत्या. दहाहून अधिक बैठका झाल्या होत्या. अजित पवार यांचे बदललेले सूर त्याचे द्योतक होते. शरद पवार यांच्या पक्षाकडून…
घंटागाडी चालकांचा थकीत पगार त्वरित अदा करा
घंटागाडी चालकांचा थकीत पगार त्वरित अदा करा महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनची मागणी कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत घंटागाडीवर कार्यरत असलेल्या चालकांचा थकीत पगार त्वरित अदा करण्याची मागणी महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनने केली असून याबाबत त्यांनी केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी थविल यांची भेट घेतली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत घंटागाडीवर कार्यरत असलेले ठोक पगारी जड वाहन चालक नियमितपणे आपले काम पार पाडत असतानाही त्यांचा १५ डिसेंबर पासून अद्यापपर्यंतचा पगार अदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे संबंधित कामगारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत तातडीने दखल घेऊन संबंधित ठोक पगारी जड वाहन चालकांचा थकीत पगार त्वरित अदा करण्याची व्यवस्था करावी. तरोच, सदर कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी महापौरांकडे करण्यात आली. यावेळी युनियनचे संघटक मच्छिंद्र सकट, कॉम्रेड उदय चौधरी उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता गांधी विचार व संविधान स्विकारायला हवे – सुरेशचंद्र राजहंस
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता गांधी विचार व संविधान स्विकारायला हवे – सुरेशचंद्र राजहंस आरएसएसला सलमान खान, अदनान सामींसह सिने तारे तारकांची गरज का भासावी? मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १०० वर्षे पूर्ण करताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर वंदन केले ही संघाला लागलेली उपरती आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींना संघ शरण गेलाच आहे तर आता गांधी विचार मान्य करायला हवा आणि देशाच्या संविधानाचाही स्विकार करावा, असे मुंबई काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे. संघाच्या शतकपूर्ती कार्यक्रमा संदर्भात बोलताना काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस पुढे म्हणाले की, मुंबईतील संघाच्या कार्यक्रमात सिनेमाविश्वातील तारे तारकांना बोलावण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गरज का भासावी हा प्रश्न आहे. यात सलमान खान, अदानान सामी यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. एरवी हिंदु मुस्लीम, हिरवा रंग, औरंग्यांची औलाद म्हणून मुस्लीम समाजाचा अपमान करायचा, समाजात द्वेष पसरवायचा आणि आपल्या कार्यक्रमाला मात्र मुस्लीम समाजातील लोकप्रिय व श्रीमंत लोकांना बोलावायचे हा दुटप्पीपणा आहे. तारे तारकांना बोलवण्यात काहीच गैर नाही पण हिंदु मुस्लीम करून गरिबांवर बुलडोझर चालवायचा, दडपशाही करायची आणि लोकप्रिय व श्रीमंत मुस्लीमांना जवळ करायचे आणि मुस्लीम तुष्टीकरणाचा आरोप मात्र काँग्रेस पक्षावर करायचा हे ढोंग व सोंग आता थांबायला हवे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईच्या कार्यक्रमात केलेली विधाने व वस्तुस्थिती यांच्यातही मोठी तफावत आहे. संघप्रमुख कोणत्याही समाजाचा होऊ शकतो असे ते म्हणतात तर मग आजपर्यंत एकही महिला, दलित, आदिवासी, मुस्लीम समाजाचा व्यक्ती सरसंघचालक का झाला नाही, याचे उत्तरही त्यांनी द्यायला हवे. संघाच्या करनी व कथनीत फरक आहे. सरसंघचालक जे बोलतात त्याचे प्रतिबिंब संघाच्या कार्यातून व भाजपाच्या राजकारणातूही दिसत नाही, असेही सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.
