Author: bittambatami.com

 कल्याण पूर्वेतील शिवप्रेरणा यात्रेत ५०० हून अधिक वारकऱ्यांचा जागर 

कल्याण पूर्वेतील शिवप्रेरणा यात्रेत ५०० हून अधिक वारकऱ्यांचा जागर आचार्य प्रल्हाद शास्त्री महाराज आणि संजय राघो काळोखे ‘शिवकल्याण पुरस्कार – २०२६’ ने सन्मानित कल्याण : सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ कल्याण पूर्व यांच्या वतीने शिवजयंती निमित्त सिध्दार्थ नगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावर शिवजयंती उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला वारकरी संप्रदायाच्या सुमारे ५०० हून अधिक वारकरयांनी सहभाग घेवून हरिनामाचा गजर केला. या उत्सवात कल्याण पूर्वेच्या नावलौकिकात भर घालणारे आचार्य प्रल्हाद शास्त्री महाराज तसेच संजय राघो काळोखे यांना कल्याणकरांसाठी मानाचा म्हणून ओळखला जाणार ‘शिवकल्याण पुरस्कार २०२६ ‘ हा पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर सुमारे ५०० वारकऱ्यांच्या उपस्थितीत सामूहिक हरिपाठ करण्यात झाला. या समयी हरिनामाच्या गजराने परिसर भक्तिमय झाला होता. या वेळी आपल्या कतृत्वाने उल्लेखनीय कार्य करणारे आचार्य प्रल्हाद शास्त्री महाराज तसेच संजय काळोखे यांना आमदार सुलभा गायकवाड, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, एसीपी कल्याणजी घेटे या मान्यवरांच्या हस्ते ‘शिवकल्याण पुरस्कार २०२६ ‘ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. . सन्मान चिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मिरवणूक व प्रेरणा यात्रा . या प्रेरणा यात्रेत द्वारका विद्या मंदिर नांदीवली, नुतन ज्ञान मंदीर, मॉडेल कॉलेज आणि हायस्कुल, जय हनुमान दांडपट्टा पथक, तिसाई बिटस् बॅण्ड पथक, बासरीवाला ढोल ताशा पथक, मैत्रेय संगत, सहयोग सामाजिक संस्था, शाम बाबु गुप्ता आणि पथक, आदि संस्था संघटनांच्या सहभागासह कल्याण शहर वारकरी सांप्रदाय प्रबोधन ट्रस्ट या आध्यात्मिक संस्थेचे ५००हून अधिक वारकरी आणि सेवेकरी सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीत शिवप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. “नामात विठ्ठल, कर्मात शिवराय” या संकल्पनेनुसार आणि ह.भ.प. जगन्नाथ रामभाऊ नेहरकर महाराज यांच्या अध्यक्षते खाली साजरा झालेल्या या शिवजयंती उत्सवात भक्ती आणि शौर्य यांची सांगड घालणारा हा उत्सव यशस्वीरीत्या पार पडल्याची भावना मंडळाचे विश्वस्त नरेंद्र सुर्यवंशी आणि विष्णू जाधव यांनी व्यक्त केली. या शिव प्रेरणा यात्रेत आमदार सुलभा गायकवाड, नगसेवक रमेश जाधव, निलेश शिंदे, सचिन पोटे, नगसेविका मनिषा गायकवाड, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्यासह संजय मोरे, सुभाष म्हस्के, राजु अंकुश, रमाकांत देवळेकर, विवेक जगताप, प्रभाग ४ जे च्या सहाय्यक आयुक्त सविता हिले आदी मान्यवर आणि विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी, शिवप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

  फक्त ६७० रुपये वीज बिल थकीत असताना वीज पुरवठा केला खंडीत

फक्त ६७० रुपये वीज बिल थकीत असताना वीज पुरवठा केला खंडीत बील भरुन २४ तास उलटले तरी वीज पुरवठा सुरळीत नाही घरात ८० वर्षाची आजी आणि मतीमंद मुलगा २४ तासापासून…

जलवाहिनीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वार जखमी

जलवाहिनीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वार जखमी कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोड वरील हॉटेल प्रसाद समोरील रस्त्यावर जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात दुचाकीस्वार युवक वाहनासह खड्डयात पडून गंभीर जखमी झाला आहे. महापालिकेचा हा  निष्काळजीपणा नागरीकांच्या जिवावर उठला आहे. या रस्त्यावर डंपरचा दुचाकीस्वाराला धक्का लागल्याने दुचाकीस्वार दुचाकीसह खड्ड्यात पडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला असून  दुचाकीचे नुकसान झाले आहे. संपूर्ण केडीएमसी क्षेत्रात खोदकामे चालु आहेत, ही विकासकामे होत असतांना नागरीकांच्या सुरक्षेकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. या ठिकाणी पायी चालणाऱ्या नागरीकांचा फुटपाथ सुद्धा उखडून टाकण्यात आला असल्याने नागरिकांना चालणे देखील अवघड झाले आहे. हे काम गेल्या दिड महिन्याहून अधिक काळ या ठिकाणी चालु आहे. एकदा टाकलेले पाईप परत काढून पुन्हा टाकले आहेत. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून आता तरी प्रशासनाने योग्य ती उपाय योजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

 दिव्यातील ११ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात

दिव्यातील ११ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात अनधिकृत शाळेकडून दहावीचा फॉर्मच न भरल्याचा धक्कादायक प्रकार उघड दिवा- दिवा पूर्वेतील मॉडर्न वर्ल्ड इंग्लीश स्कूल, दिवा या अनधिकृत शाळेच्या गंभीर निष्काळजीपणामुळे दहावीतील अकरा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. दहावीच्या परीक्षेचा पहिला पेपर झाल्यावर संबंधित विद्यार्थ्यांचा दहावी बोर्ड परीक्षेचा फॉर्मच भरला गेला नसल्याचे समोर आल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सदर शाळेत साहील शाह, शिवम बिंद, सपना हलवाई, आयुष पटवा, अनुक्षा सिंग, साहिल वलावटे, रिया कनोजिया, कृष्णा सोनावणे, सोनी कोरी, सपना राम आणि सगुन जैस्वाल हे अकरा विद्यार्थी दहावीत शिक्षण घेत आहेत. वर्षभर अभ्यास करूनही शाळेच्या हलगर्जीपणामुळे त्यांना परीक्षेला बसता आले नाही. शाळेने फॉर्म न भरल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. संतप्त पालकांनी दिवा पोलीस चौकीत धाव घेतली. मात्र, तेथे तक्रार नोंदवून घेण्याऐवजी त्यांना मुंब्रा पोलीस स्टेशन येथे जाण्याचे सांगण्यात आल्याचे पालकांनी नमूद केले. दिव्यात गेल्या काही वर्षांत अनधिकृत शाळांची संख्या वाढताना दिसत असून त्यांच्यावर शासकीय नियंत्रण नसल्याची भावना नागरिकांत निर्माण झाली आहे. माध्यमिक विभागाच्या देवीदास महाजन या शिक्षणाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळेच अशा दिव्यातील अनधिकृत शाळांना आळा बसत नसल्याची टीका पालकांकडून होत आहे. गेली तीन ते चार वर्षे दिव्यातील अनधिकृत शाळांचा प्रश्न चर्चेत असला तरी त्यावर ठोस कारवाई झालेली नाही, असेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित शाळेकडून विद्यार्थ्यांना जूनमधील परीक्षेला बसवण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. मात्र, नियमानुसार मार्चमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांनाच जूनमध्ये पुनर्परीक्षेला बसण्याची संधी मिळते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे एक संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. या प्रकाराबाबत शाळेच्या ट्रस्टी व प्रशासनावर कठोर कारवाई करावी तसेच दिव्यातील अनधिकृत शाळा कायमस्वरूपी बंद करण्यात याव्यात, अशी मागणी संतप्त पालकांकडून करण्यात येत आहे.

 २३ फेब्रुवारीला भव्य सामूहिक गीतगायन

श्री गुरु तेग बहादूरजींच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त २३ फेब्रुवारीला भव्य सामूहिक गीतगायन ५१ लाख विद्यार्थी व १.५ लाख शिक्षकांचा सहभाग कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आवाहन…

 मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा

मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा शिळफाटामार्गे तळोजा मेट्रो, काटई, देसाई नाका, कल्याणफाटा, दहिसर मोरी मेट्रो मार्ग डोंबिवली (आरती परब) – कल्याण लोकसभा मतदार संघाला मुंबई आणि नवी मुंबई या शहरांशी जोडण्याच्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदेे यांच्या प्रयत्नांना आता आणखी एक यश आले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका ऐतिहासीक प्रकल्पाची घोषणा केली आहे. कल्याण – डोंबिवली शहराला थेट तळोजा मार्गे नवी मुंबईशी जोडणाऱ्या मेट्रो १२ या मार्गाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यासाठी मेट्रो १२ अ हा प्रकल्प आता राबवला जाणार असून कल्याण शीळफाटा रस्त्याला समांतर मेट्रो मार्गाची उभारणी केली जाणार आहे. कल्याण फाटावरून ही मेट्रो दहिसर मोरी मार्गे तळोजा मेट्रो स्थानकापर्यंत जाईल. यामुळे कल्याण शिळफाटा रस्त्यावरील वाहनांचा भारही कमी होणार आहे. या प्रकल्पासाठी ८ हजार ४१४.५३ कोटींच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासह कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी घेतला. कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनांमध्ये गेल्या काही वर्षात कमालीची सुधारणा झाली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण लोकसभा मतदारसंघात नियोजनपूर्ण प्रकल्पांची आखणी करण्यात आली. त्यामुळे मतदारसंघातील वाहतुकीचा वेग वाढला आहे. मेट्रो, रेल्वे, रस्ते, उड्डाणपूल, उन्नत मार्ग, रेल्वे पूल, रस्त्याचे रूंदीकरण अशी अनेक ऐतिहासिक प्रकल्प पूर्ण झाले आणि अनेक सुरूही आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक प्रकल्पांना गती मिळाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नुकताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) २०२६- २७ वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध प्रकल्पांसाठी ४ हजार ८९७.१९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा शुक्रवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतला. यावेळी त्यांनी पलावा उड्डाणपूल, मेट्रो १२, तिसरा पत्री पूल, वालधुनी नदी लगत विठ्ठलवाडी स्थानक ते कल्याण अहिल्यानगर महामार्गा पर्यंतचा उन्नत मार्ग आणि कल्याण रिंग रोड या प्रकल्पांची त्यांनी पाहणी केली. यावेळी प्रकल्पाला गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करून तो नागरिकांसाठी खुला करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी कल्याण ते तळोजा मेट्रो १२ मार्गाच्या विस्तारीकरणाची घोषणा केली. कल्याण ते तळोजा या मेट्रो १२ मार्गाच्या विस्तारीकरणाचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. या त्यामुळे मेट्रो १२ हा मार्ग दोन भागातून जाणार आहे. नव्या विस्तारीत मार्गामध्ये कल्याण शीळफाटा रस्त्याच्या समांतर मार्गिका नेण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विस्तारीत डोंबिवलीसह, मानपाडा, कटाई नाका, ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडलेगाव, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसार मोरी, दहिसारगाव, किरावली गाव, रोहिंजण, खुतारी गाव या भागातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. या नव्या मार्गामुळे शिळफाटा रस्त्यावरील वाहनांची संख्याही कमी होईल. कळवा, दिवा, मुंब्रा भागात जाणारी ही पहिली मेट्रो ठरणार असून भविष्यात मेट्रो १४ सोबत इंटीग्रेशन झाल्याने त्याचा फायदा थेट नवी मुंबई, कांजुरमार्ग ते मुंबईला जाण्यासाठी होईल. त्यामुळे या मेट्रोचे महत्व वाढलेले आहे, असेही खासदार डॉ. शिंदे म्हणाले. कशी असेल ही मेट्रो १२ अ मार्गिका ही विस्तारित मेट्रो लाईन कल्याण– मानपाडा– कटाई नाका– कल्याण फाटा मार्गे विद्यमान मेट्रो लाईन– १2 शी खुतारी गावाजवळ एकत्रित होऊन तळोजा रेल्वे स्थानक अर्थात अमनदूत पर्यंत पोहोचेल. कटाई नाका ते कल्याण फाटा दरम्यान मेट्रो १४ (कांजुरमार्ग ते बदलापूर) बरोबर कॉमन ट्रॅक व स्टेशन शेअरिंग प्रस्तावित आहे. निलजे डेपो कनेक्शन, मेट्रो १४ इंटिग्रेशन आणि नॅशनल हायस्पीड रेल्वेच्या ठाणे– बुलेट ट्रेन स्थानकाशी या मेट्रो मार्गाने जोडणी केली जाणार आहे. या सुधारित मार्गिकेची एकूण लांबी १८.४ किलोमीटर आहे. त्यातील सध्या सुमारे १०.५ किलोमीटरवर बांधकाम प्रगतीपथावर आहे. मेट्रो १२ अ ची स्थानके या मार्गात एकूण १२ उन्नत (एलिव्हेटेड) स्थानके प्रस्तावित आहे. प्रमुख स्थानके: मानपाडा, काटई नाका, कल्याण ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडलेगाव, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसर मोरी, दहिसारगाव, किरावली गाव, रोहिंजण, खुतारी गाव. संरचनात्मक संकल्पना या प्रकल्पासाठी प्रिकास्ट ट्वीन यू टाईप गर्डर प्रणाली जी सिंगल पिअरवर आधारित असेल ती वापरली जाणार आहे. मेट्रो आणि प्रस्तावित कल्याण– राजनोली फ्लायओव्हर साठी एकत्रित खांब (Integrated single…

 दिवा स्थानकात कामगाराचा मृत्यू

दिवा स्थानकात कामगाराचा मृत्यू अभियंता, ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल दिवा –दिवा रेल्वे स्थानकात तिकिट खिडकी नजीक अर्थिंगसाठी खड्डा खोदताना विजेचा धक्का लागून राजस्थान येथील खंगाराम हरजीजी रावल (वय ३७) या कामगाराचा…

‘आयसीएआय’च्या कल्याण-डोंबिवली शाखेच्या अध्यक्षपदी अमित मोहरे यांची निवड

‘आयसीएआय’च्या कल्याण-डोंबिवली शाखेच्या अध्यक्षपदी अमित मोहरे यांची निवड कल्याण : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या कल्याण-डोंबिवली शाखेच्या वर्ष २०२६-२७ या वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. शाखेच्या अध्यक्षपदी डोंबिवलीकर आणि सीए अमित मोहरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष अमित मोहरे, उपाध्यक्ष प्रदीप मेहता, सचिव अमृता जोशी, कोषाध्यक्ष ईश्वर रोहरा, विकासा अध्यक्ष रोहन पाठक, माजी अध्यक्ष राकेश अग्रवाल, कार्यकारिणी सदस्य गिरीश तारवानी, अनुराग गुप्ता आणि विपुल शाह यांचा समावेश आहे. कल्याण-डोंबिवली शाखेचे कार्यक्षेत्र अतिशय मोठे असून यामध्ये कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर, तसेच कर्जत आणि कसारा या भागांचा समावेश होतो. सध्या या शाखेशी ४ हजार ८०० हून अधिक सीए सभासद आणि १३ हजार हून अधिक विद्यार्थी जोडले गेले आहेत. सध्या ही शाखा ५ अभ्यासिका आणि २ आयटी प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून भाड्याच्या जागेतून कार्यरत आहे. मात्र, सभासद आणि विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या  सहकार्याने लवकरच संस्थेची स्वतःची सुसज्ज इमारत उभी राहणार आहे, अशी माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष सीए अमित मोहरे यांनी दिली. व्यावसायिक पारदर्शकता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि सामाजिक बांधिलकी जपत ही शाखा येणाऱ्या काळात उल्लेखनीय कार्य करेल, असा विश्वास नवनिर्वाचित कार्यकारिणीने व्यक्त केला आहे.

 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा पहिला टप्पा राज्यात सुरू

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा पहिला टप्पा राज्यात सुरू जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती अशोक गायकवाड अलिबाग : राज्यातील सामान्य जनता, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आणि तक्रारी सत्वर निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा १)’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान व्हावे, या उद्देशाने प्रत्येक जिल्हयातील तालुक्यातील मंडळ स्तरावर या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत १८ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत पूर्व तयारी करण्यात येणार असून, प्रत्यक्ष शिबिरांची सुरुवात ७ मार्चपासून होणार आहे. या विशेष मोहिमेद्वारे नागरिकांना एकाच दिवशी सेवा पुरविण्यावर आणि महसूल संहितेतील नवीन तरतुदींची जनजागृती करण्यावर भर दिला जाणार आहे. या अभियानाचे महत्त्व अधोरेखित करताना रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी समस्त रायगडकरांना या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अभियानाच्या वेळापत्रकानुसार, मार्च महिन्यात ७ आणि १४ तारखेला मंडळ स्तरावर शिबिरे होतील. त्यानंतर एप्रिल महिन्यात १० आणि १७ तारखेला पुन्हा मंडळ स्तरावर आयोजन करण्यात येईल, तर मे महिन्यात ८ आणि १५ तारखेला नगर परिषद व नगर पंचायत स्तरावर ही शिबिरे घेतली जातील. या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढणे, ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष हेल्प डेस्क उपलब्ध करून देणे आणि उत्पन्न, अधिवास व जातीच्या दाखल्यांचे वाटप करणे अशा महत्त्वाच्या सेवा पुरविल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, अकृषिक (NA) रूपांतरणासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची गरज नसून, विकास आराखडा मंजुरी हीच परवानगी समजली जाईल, यासारख्या नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नांसंबंधी बदलांची माहितीही या शिबिरात दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त, जमिनीच्या तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा, एक वेळचे अधिमूल्य भरण्याची सोपी व्यवस्था आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ उताऱ्यांची कायदेशीर वैधता यांबाबत नागरिकांचे प्रबोधन केले जाईल. भूसंपादन झालेल्या जमिनींचे कमी-जास्त पत्रक तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्याची कार्यवाही देखील याच कालावधीत पूर्ण केली जाणार आहे. ‘एक खिडकी योजना’ राबवून सर्व महसूल अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध राहतील आणि लोकांचे प्रश्न तातडीने सोडवतील, याची दक्षता घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

  कचोरे कोळीवाडा येथील गणेश घाट सुशोभिकरणाचा शुभारंभ

कचोरे कोळीवाडा येथील गणेश घाट सुशोभिकरणाचा शुभारंभ नगरसेविका रेखा चौधरी यांच्या प्रयत्नांना यश कल्याण : कल्याण ठाकुर्ली समांतर रस्त्यावर असलेल्या कचोरे कोळीवाडा येथील खाडी किनारी गणेश घाट सुशोभिकरणाचा शुभारंभ कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्याहस्ते आज करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा तथा स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व प्रयत्नांमुळे या विकासकामाला सुरुवात होत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राला मोठा खाडी किनारा लाभला असून काही ठिकाणी गणेश घाट तयार करून सुशोभिकरण करण्यात आले आहे. अशाच प्रकारे कचोरे कोळीवाडा येथे असलेल्या खाडी किनाऱ्याचे देखील सुशोभिकरण व्हावे यासाठी नगरसेविका रेखा चौधरी पाठपुरावा करत होत्या. या ठिकाणी सागर देवीचे मंदिर असून गणपती विसर्जन देखील केले जाते. यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक आणि नागरिक येत असतात. त्यामुळे या परिसराचे सुशोभिकरण करून कायापालट करण्याची मागणी नागरिकांकडून देखील करण्यात येत होती. त्यानुसार रेखा चौधरी यांनी प्रशासनाकडे, खासदार, आमदार यांच्याकडे पाठपुरावा करून या कामासाठी निधी उपलब्ध करून घेतला आहे. त्यानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे यांनी या कामासाठी तब्बल 5 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून या खाडी किनाऱ्याचे सुशोभिकरण करून रुपडे पालटणार आहे. आज या सुशोभिकरण कामाचा शुभारंभ आमदार राजेश मोरे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. या कामासाठी स्थानिक नागरिकांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे आणि स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांचे आभार मानले आहेत. यावेळी आमदार राजेश मोरे, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा तथा स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, बजरंग दल कल्याण जिल्हा संयोजक राजन चौधरी, भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्ष अतिश चौधरी, शिवसेना सचिव संतोष चव्हाण, माजी परिवहन सभापती मनोज चौधरी यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.