Author: bittambatami.com

– महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या राज्यव्यापी दौऱ्याला ठाणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

Unit-11   कल्याण : महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या राज्यव्यापी दौऱ्याचा दुसरा टप्पा ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक कल्याण शहरात उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला. “कुस्तीचा विकास… खेळाडूंचा सन्मान… महाराष्ट्राचा अभिमान” या ब्रीदवाक्यासह सुरू झालेल्या या चळवळीला ठाणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, वस्ताद, पैलवान, कुस्ती आयोजक आणि कुस्तीप्रेमींनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या कार्यावर विश्वास व्यक्त करत संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका मांडली. कुस्ती क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न, पैलवानांचे हक्क, वस्तादांचा सन्मान आणि पारंपरिक कुस्तीच्या संरक्षणासाठी ही संघटना ताकदीने काम करेल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी पैलवान संग्राम कांबळे यांनी संघटनेची भूमिका, उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि आगामी राज्यव्यापी बांधणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ठाणे जिल्ह्यात संघटनेची मजबूत पायाभरणी करण्यात आली. यावेळी सर्वांच्या वतीने महाराष्ट्र कुस्ती संघटना ठाणे जिल्हाप्रमुखपदी पैलवान जितेंद्र भगत यांची निवड करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातून सुरू झालेली ही चळवळ आता ठाणे जिल्ह्यात भक्कमपणे रुजली असून, येत्या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संघटना मजबूत करून कुस्ती क्षेत्रासाठी पारदर्शक, सक्षम आणि शाश्वत व्यासपीठ उभारले जाईल. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित राहिलेले ठाणे जिल्ह्याचे पहिले शिवछत्रपती पुरस्कार विजेते वस्ताद चैनू लोखंडे, महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे प्रमुख पैलवान संग्राम कांबळे, जय मल्हार कुस्ती संकुलचे संस्थापक अध्यक्ष गोरख खळदकर, ननगरसेवक अविनाश गायकवाड, देवीदास जाधव, नंदू पाटील, विनोद पाटील, दिनेश थळे, संतोष बोधले, राजू चौधरी, नगरसेवक जयवंत भोईर, संकेत भोईर, महाराष्ट्र पोलीस नवनाथ शिर्के, वस्ताद, पैलवान, कुस्तीप्रेमी, आयोजक, मान्यवर आणि महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानण्यात आले. 0000000000  

ईशा नेत्रालयातर्फे “समर किड्स फन इव्हेंट” संपन्न

कल्याण : ईशा नेत्रालयातर्फे मायोपिया अवेअरनेस वीक २०२६ निमित्त “समर किड्स फन इव्हेंट” चे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम विशाखा शाह यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. पुष्पांजली यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व नेतृत्व मानसी विशे यांनी केले. ५ ते १५ वयोगटातील मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. सर्व सहभागी मुलांची बाल नेत्रतज्ज्ञांकडून मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. कार्यक्रमात डॉ. सिद्धार्थ वोरा यांनी मायोपिया जागरूकता विषयावर विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. पालकांना मुलांच्या डोळ्यांची काळजी, स्क्रीन टाइमचे दुष्परिणाम आणि नियमित नेत्र तपासणीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. सर्व मुलांना ड्रॉइंग किट्स देण्यात आले तसेच प्रत्येक सहभागी कुटुंबाला कॉम्प्लिमेंटरी जेल आय मास्क भेट देण्यात आला. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मुलांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला पालक व मुलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून बाल नेत्र आरोग्य जनजागृतीसाठी हा उपक्रम विशेष ठरला. 0000000000

 महागाईने त्रस्त जनतेवर पेट्रोल-डिझेलची दरवाढ अन्यायकारक

वर्षा गायकवाड यांचे प्रतिपादन मुंबई : महागाईने जनता त्रस्त असताना पेट्रोल डिझेलची दरवाढ ही सर्वसामान्य जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटण्याचा प्रकार आहे. मागील ११ दिवसात पेट्रोल डिझेलचे दर प्रति लिटर ८ रुपयांनी वाढले आहेत. ही इंधन दरवाढ सर्वसामान्यांचा खिसा रिकामा करणारी असून  केंद्रातील भाजपा सरकारने ही अन्यायकारक दरवाढ तात्काळ मागे घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे. इंधन दरवाढीवर बोलताना खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी हे पेट्रोल डिझेलचा आवश्यक तेवढा साठा देशात आहे हे सांगत होते. पण विधानसभा निवडणुका होताच पेट्रोल डिझेलची दरवाढ सुरु केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलची दरवाढ होणार असा इशारा दिला होता आणि राहुल गांधी पुन्हा एकदा खरे ठरले, मोदी सरकारने निवडणुका होताच इंधन दरवाढ केली. मागील महिन्यातच एलपीजी सिलेंडरच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढवल्या. व्यावसायिक सिलेंडरच्या किमती तर दुप्पट केल्याने हॉटेलसह खाद्य पदार्थ बनवणारे छोटे व्यवसाय संकटात आले व खाद्य पदार्थांचे दरही वाढले आता पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत, त्यामुळे महागाई आणखी वाढेल. युपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहनसिंह यांनी सबसीडी देऊन जनतेला दिलासा दिला आणि महागाईची झळ बसू दिली नाही, पण मोदी सरकार मात्र जनतेला कोणत्याच प्रकारे दिलासा देत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महागाई, बेरोजगारी, यासह जनतेच्या प्रश्नात काहीच स्वारस्य नाही. जनता पिचलेली असताना पंतप्रधान मात्र विदेशी दौरे करत चॉकलेट वाटत फिरत आहेत, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पेट्रोलचा पर्याप्त साठा आहे हे सांगत आहेत पण राज्यातील काही भागात पेट्रोल पंप बंद आहेत. आजच काही प्रसारमाध्यांनी मुंबईतील दादर सायनमध्येही पेट्रोल पंप बंद असल्याच्या बातम्या दिल्या. पेट्रोल-डिझेल टंचाईच्या झळा राजधानी मुंबईपर्यंत पोहचल्या तरी मुख्यमंत्री फडणवीस जागे झालेले दिसत नाहीत. खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल डिझेलची टंचाई होणार नाही व महागाईची झळ जनतेला पोहचणार नाही, याकडे लक्ष द्यावे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.. 00000

राज्यपालांच्या पुढाकाराने आजपासून ‘टीबीमुक्‍त मुंबई’ अभियान

अशोक गायकवाड मुंबई : महाराष्‍ट्र लोकभवनाच्या पुढाकाराने बृहन्‍मुंबई महानगरपालिका आज मंगळवारपासून ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान सुरु करीत असून अभियानाचा आरंभ राज्‍यपाल जिष्‍णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत २६ मेला सकाळी ११ वाजता…

वेदांश कुशवाहाचा चुरशीच्या लढतीत विजय

आवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धा मुंबई : वांद्रे येथील ऑटर्स क्लब कोर्टवर खेळल्या गेलेल्या आवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेच्या (२०२६) पुरुष एकेरीच्या मुख्य ड्रॉच्या राऊंड ऑफ ६४ फेरीमध्ये जेएसडब्ल्यूच्या वेदांश कुशवाहाने आपला संघ सहकारी आयुष वर्माचा चुरशीच्या लढतीत ११-४, १४-१२, १३-१५, ११-८ असा पराभव केला. राऊंड ऑफ ६४ फेरीच्या आणखी एका सामन्यात, अव्वल मानांकित उत्तराखंडच्या अंश त्रिपाठीने अदीव देवैयावर ११-३, १२-१०, ११-४ असा सहज विजय नोंदवून पुढील फेरीत प्रवेश केला. निकाल – पुरुष मुख्य ड्रॉ (राऊंड ऑफ ६४): १-अंश त्रिपाठी विजयी वि. अदीव देवैया ११-३, १२-१०, ११-४; वेदांश कुशवाहा विजयी वि. आयुष वर्मा ११-४, १४-१२, १३-१५, ११-८; संकल्प आनंद विजयी वि. मिशाल दारूवाला 11-5, 11-8, 11-8; कुणाल सिंग विजयी वि. अजय देशमुख ११-५, ११-४, ११-६; शाहबाज खान विजयी वि. कृष्ण दरवाडा ११-६, ११-८, ११-४; वेदांत पटेल विजयी वि. दिना करण 11-1, 11-4, 11-1; आर्यमान सिंग विजयी वि. उत्सव सेन११-८, ११-९, ११-८; प्रदीप मलिक विजयी वि. आदित्य शेट्टी ११-२, ११-२, ११-०; हर्ष राणा विजयी वि. अजिंक्य पाटील 11-3, 11-3, 11-8. ००००० Unit-7

वेदांश कुशवाहाचा चुरशीच्या लढतीत विजय

आवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धा मुंबई : वांद्रे येथील ऑटर्स क्लब कोर्टवर खेळल्या गेलेल्या आवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेच्या (२०२६) पुरुष एकेरीच्या मुख्य ड्रॉच्या राऊंड ऑफ ६४ फेरीमध्ये…

ओंकार टिळकची अपयशी झुंज

 एमसीएफ राज्य कॅरम स्पर्धा मुंबई : मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन आयोजित व रोटरी क्लब ऑफ बोरिवली पुरस्कृत बोरिवली येथील मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन येथे सुरु असलेल्या ११ व्या एम सी एफ राज्य…

वैभव, ओम समर्थ, श्री समर्थ, व ओम साईश्वरची विजयी सलामी

 कुमार-मुली (ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा मुंबई : मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने ओम समर्थ भा. व्या. मंदिर आयोजित कुमार-मुली (ज्युनिअर- १८ वर्षाखालील) मुंबई जिल्हा अजिंक्यपद व…

ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचा ‘स्मॅश’ दबदबा

 – महाराष्ट्र राज्य ज्युनिअर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा ३ सुवर्णपदके तर एका ब्रॉंझ पदकाची कमाई” मुंबई येथील वरळीच्या  विलिंग्टन जिमखाना  येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा उल्लेखनीय आणि दिमाखदार कामगिरी करत ३ सुवर्ण पदके आणि १ कांस्य पदकाची कमाई केली. राज्यस्तरावरील स्पर्धांमध्ये सातत्याने पदकांची कमाई करत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीने महाराष्ट्रातील अग्रगण्य बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्र म्हणून आपला ठसा अधिक अधोरेखित केला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत सराव करणाऱ्या खेळाडूंनी ही यशस्वी कामगिरी नोंदवली. मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली मयूर घाटणेकर,  अक्षय देवलकर,  मितेश हाजीरनीस,  राजीव गणपुळे,  एकेंद्र दर्जी,  प्रसेनजीत शिरोडकर आणि  देवांग दलाल यांच्या प्रशिक्षणाखाली खेळाडू सातत्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवत आहेत. १९ वर्षांखालील मिश्र दुहेरी गटात सानिध्य एकाडे याने शानदार खेळ करत सुवर्ण पदक पटकावले. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यापूर्वी सानिध्य आणि त्याच्या जोडीदाराने उदयान साळुंखे व सारा साळुंखे यांचा पराभव केला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत सर्थक नलावडे व दितीशा सोमकुवर यांच्या विरोधात रंगलेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात २१-१४, २०-२२, २१-१८ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत ओजस जोशी व तन्वी घरपुरे यांच्या विरोधात पहिला गेम गमावल्यानंतर सानिध्यने दमदार पुनरागमन करत १२-२१, २१-१७, २१-१७ असा विजय मिळवला. अंतिम सामन्यात सयरा आणि सयाजी शेलार या जोडीवर २१-१४, २१-११ असा सरळ गेममध्ये विजय मिळवत सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली. १९ वर्षांखालील मुलांच्या दुहेरी गटात प्रथम मानांकित आर्यन बिराजदार आणि अर्जुन बिराजदार या जोडीने संपूर्ण स्पर्धेत अक्षरशः वर्चस्व गाजवत सुवर्ण पदक पटकावले. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी आदित्य पुजारी व प्रसन्न मन्ना यांचा २१-१०, २१-१६ असा सहज पराभव केला. उपांत्य फेरीत अभिक शर्मा व स्वरित सातपुते या जोडीवर २१-१२, २१-१३ असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात आयुष अडे आणि तनय मेहेंदळे यांच्या विरोधातही त्यांनी आक्रमक आणि नियंत्रित खेळाचे प्रदर्शन करत २१-१२, २१-१४ असा दिमाखदार विजय मिळवून सुवर्ण पदकाची कमाई केली. तर अपूर्व दवाडते याने मिश्र दुहेरी गटात कांस्य पदकाची कमाई करत अकॅडमीच्या पदकतालिकेत आणखी भर घातली. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे खेळाडू राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत असून, ठाणे शहराच्या क्रीडा क्षेत्राचा लौकिक उंचावत आहेत. खेळाडूंमधील शिस्त, मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि प्रशिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन यामुळे अकॅडमी महाराष्ट्रातील यशस्वी बॅडमिंटन केंद्र म्हणून ओळख निर्माण करत आहे. या स्पर्धेच्या यशामुळे सदर वर्षाच्या बॅडमिंटन खेळाच्या हंगामाची दणदणीत सुरुवात झाली आहे आणि या पुढील हंगामात केवळ राज्य नव्हे तर राष्ट्रीय  स्तरावर देखील ठाणे शहराचे नाव आपण मोठे करू असा विश्वास खेळाडूंनी व्यक्त केला आहे. खेळाडूंच्या या यशाबद्दल मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी समाधान व्यक्त करत आगामी राष्ट्रीय स्पर्धांमध्येही खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त  मीनल पलांडे यांनी सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आर्यन, विराज, योगेश, राजेश, सेजल, तन्वी, रुबी ठरले सर्वोत्तम लिफ्टर

 मुंबई महापौर पॉवरलिफ्टिंग स्पर्धा मुंबई : कीर्ती कॉलेज , वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम) येथे मुंबई महानगरपालिकेच्या सौजन्याने आणि मुंबई शहर पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई महापौर चषक…