०००००००००
ठाणे : स्वातंत्र्याच्या अमृतकालातील ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आशीर्वाद फाऊंडेशन, ठाणे यांच्या वतीने “राष्ट्रजागृती : आव्हाने, समाधान आणि सनातन धर्म” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानासाठी देशभरातील लाखो श्रोत्यांमध्ये लोकप्रिय असलेले ज्येष्ठ पत्रकार, आंतरराष्ट्रीय वक्ते आणि राष्ट्रवादी विचारवंत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम रविवार, १६ ऑगस्ट, दुपारी ११.०० वाजता, गडकरी रंगायतन, ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
आजच्या बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रजागृती, सनातन मूल्यांचे जतन आणि समाजासमोरील विविध आव्हानांवर पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ मार्गदर्शन करणार आहेत. ठाणेकरांसाठी त्यांचे हे व्याख्यान एक विचारप्रवर्तक आणि प्रेरणादायी पर्व ठरणार आहे.
कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून प्रवेश कार्यक्रम पूर्णतः विनामूल्य आहे. आसनव्यवस्था मर्यादित असल्याने “प्रथम नोंदणी – प्रथम प्रवेश” या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल. नोंदणीसाठी पोस्टरवरील QR Code स्कॅन करावा किंवा आयोजकांशी ह्या नंबर वरती ९९२०६९३३५५ / ८५९१६५०९०६ संपर्क साधावा
