Author: bittambatami.com

नेत्यांचा पोरखेळ

केरळमध्ये काँग्रसचे सरकार स्थानापन्न होऊन कामाला लागले खरे, पण पडद्यामागच्या घडामोडींनी पक्षांतर्गत पोरखेळ दाखवून दिला. तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर केरळच्या जनतेने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीला (यूडीएफ) कौल दिला. हा…

लोकांतील, लोकांचा लोकनेता; विलासराव देशमुख

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज ८१ वी जयंती. आजच्याच दिवशी म्हणजे २६ मे १९४५ रोजी लातूरमधील बाभळगावमध्ये त्यांचा जन्म झाला. विलासरावांनी पुण्यात बीएससी, बीए, एलएलबी यासारखे उच्च शिक्षण…

‘नीट’घोटाळ्याने व्यवस्थेवरच प्रश्न

देशातील वैद्यकीय शिक्षणाचे प्रवेशद्वार मानली जाणारी ‘नीट’ परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांपासून ते परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयापर्यंत, केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीपासून ते संसदीय समितीच्या हस्तक्षेपापर्यंत…

महागाई विरोधात कल्याणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक

– तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत वाढत्या महागाईचा केला निषेध कल्याण: वाढत्या महागाई विरोधात कल्याणमध्ये राष्ट्रावादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गट आक्रमक झाले असून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्या नेतृत्वाखाली कल्याणमध्ये तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत वाढत्या महागाईचा निषेध व्यक्त केला. पेट्रोल डिझेल दरवाढ आणि वाढत्या महागाई वरून कल्याण मध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं. कल्याण पश्चिमेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. वाह रे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल अशा घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. वाढत्या महागाई मुळे आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्व सामान्य जानतेला महागाईचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाढलेली हि महागाई त्वरित कमी न झाल्यास राष्ट्रवादी पक्षातर्फे रास्तारोको करण्याचा इशारा यावेळी पाटील यांनी दिला.  या आंदोलनात महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष राज जोशी,   डोंबिवली शहर अध्यक्ष भालचंद्र पाटील,  कल्याण पश्चिम विधानसभा कार्याध्यक्ष रुपेश थळे आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. 000000  

बकरी ईदच्या दिवशी दुर्गादेवी मंदिर बंद ठेवण्याची प्रथा तात्काळ बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कल्याण: दुर्गाडी मंदिर प्रवेशबंदीवरून कल्याणमध्ये राजकारण तापले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी सत्ताधार्यांवर सडकून टीका केली आहे. हिंदुत्ववादी सरकार असताना हिंदूंना मंदिरात प्रवेश मिळत नाही, सत्ताधारी पक्ष संघटनांना आंदोलनाची भाषा करावी लागत हे लज्जास्पद आणि हास्यास्पद असल्याचे विजय साळवी यांनी सांगितले. तसेच बकरी ईदच्या दिवशी किल्ले दुर्गाडी येथील श्री दुर्गादेवी मंदिर दर्शनासाठी होणारे निर्बंध व मंदिर बंद ठेवण्याची प्रथा तात्काळ बंद करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. किल्ले दुर्गाडी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पशनि पवित्र झालेले ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे. किल्ले दुर्गाडीवरील थी दुगदिवी मंदिर हे ठाणे जिल्हयातील जागृत देवस्थान असुन लाखो हिंदु भाविकांच्या श्रध्देचे केंद्र आहे. दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करुन दुर्गाडी मंदिर परिसरात निर्बंध लादले जातात. मंदिराकडे जाणारे मार्ग बंद केले जातात, घंटानादावर निर्बंध आणले जातात आणि अनेक भाविकांना देवीच्या दर्शनापासून वंचित रहावे लागते. अशा प्रकारे हिंदुंच्या धार्मिक अधिकारांवर घाला घालण्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरु आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार असुन या सरकारच्या काळातच हिंदुंना आपल्या आराध्य देवीच्या दर्शनासाठी संघर्ष करावा लागणे ही अत्यंत वेदनादायक आणि संतापजनक बाब आहे. त्यामुळे बकरी ईदच्या दिवशी श्री दुर्गादेवी मंदिर परिसरातील सर्व अनावश्यक निर्बंध तात्काळ हटवावेत. हिंदु भाविकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय देवीचे दर्शन घेण्याची हमी द्यावी. घंटानाद, आरती व इतर धार्मिक परंपरांवर कोणतेही निर्बंध लागू करू नयेत. संबंधित पोलिस व प्रशासकीय यंत्रणेला हिंदु भाविकांच्या धार्मिक अधिकारांचे संरक्षण करण्याबाबत स्पष्ट आदेश देण्याची मागणी विजय साळवी यांनी केली आहे. अन्यथा हिंदु समाजाच्या भावना, श्रध्दा आणि घटनात्मक अधिकारांच्या रक्षणासाठी लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 00000000

 बकरी ईद निमित्त अवैध जनावर वाहतुकीवर कारवाईचे निर्देश

मुंबई : राज्यात “बकरी ईद” निमित्त संभाव्य गोवंश हत्या रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. महाराष्ट्र पोलीस महासंचालक व मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवत संभाव्य गोवंश हत्या रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्यात संपूर्ण गोवंश हत्या बंदीचा कायदा लागू असून, २८ मेला साजऱ्या होणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर काही भागांत मोठ्या प्रमाणावर गोवंश हत्या होण्याची शक्यता आहे. विशेषतः मालेगाव-नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, धाराशिव, धुळे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विशेष दक्षता घेण्याचे निर्देश पत्रात दिले आहेत. स्थानिक पोलीस प्रशासनाने संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवावी, अवैध जनावर वाहतूक रोखावी, तसेच गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणालेत. तसेच, गोसंरक्षणासाठी कार्य करणाऱ्या गोरक्षकांवर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक आणि सुरक्षात्मक कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या पत्रामुळे राज्यातील बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून संवेदनशील भागांमध्ये विशेष बंदोबस्त ठेवण्याबाबत हालचाली सुरू झाल्याची माहिती पोलिस विभागाकडून मिळत आहे. 0000000000

 राज्यातील शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर

सरकारच्या घोषणा शेताच्या बांधापर्यंत कधी येणार रमेश औताडे मुंबई : राज्यातील खरीप हंगाम सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या अडचणींनी गंभीर रूप धारण केले असून सरकारच्या निष्क्रिय धोरणांमुळे ग्रामीण भागात संतापाची लाट उसळली आहे. पावसाचा लहरीपणा, खत-बियाण्यांचा तुटवडा, वाढते उत्पादन खर्च आणि बाजारात मिळणारा कवडीमोल भाव यामुळे शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. मात्र सरकारकडून केवळ बैठका, घोषणा आणि जाहिरातींचा पाऊस पडत असल्याची टीका होत आहे. रासायनिक खतांचे दर गगनाला भिडले, तरी पुरवठा अपुरा बियाण्यांच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. पाऊस अनियमित होत असल्याने काही भागात दुष्काळ तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. डिझेल, वीज आणि औषधांच्या दरवाढीमुळे शेती परवडत नाही. पीक विम्याचा लाभ मिळण्यात अडथळे येत आहेत. बँकांच्या वसुली नोटिसांमुळे शेतकरी मानसिक तणावाखाली आहेत. सरकारला उद्योगपतींची जात काळजी आहे. असा आरोप करत शेतकरी संघटनेचे अभ्यासक असे म्हणतात की, हजारो कोटींची कर्जमाफी उद्योगपतींसाठी सहज जाहीर होते. मात्र अन्नदाता शेतकरी मदतीसाठी हात जोडत फिरतो. राज्यातील अनेक भागांत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असताना सरकारकडे ठोस उपाययोजना नसल्याचा आरोप होत आहे. “डिजिटल शेती”च्या घोषणा, पण शेतात पाणी नाही, बांधावर जाऊन शेतकऱ्यांना सहकार्य करा असे सरकार मंत्रालयात बसून सांगत असल्याने सरकारचा आवाज मंत्रालयाच्या बाहेर फक्त वृत्तपत्रात छापून येतो. बांधावर व झाडावर फक्त आत्महत्या होत आहेत. सरकारकडून आधुनिक तंत्रज्ञान, ॲप आणि डिजिटल शेतीच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडे ना पुरेसे पाणी, ना वीज, ना आर्थिक पाठबळ आहे. “मोबाईलवरील योजना पोट भरत नाहीत,” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली. राज्यात तातडीने संपूर्ण कर्जमाफी, हमीभावाची कायदेशीर हमी, मोफत वीज, पीकविमा भरपाई आणि खत-बियाण्यांचा सुरळीत पुरवठा केला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. ग्रामीण महाराष्ट्रात शेतकरी हतबल झाला असताना सत्ताधारी नेते फक्त राजकीय प्रचार आणि कार्यक्रमांत व्यस्त असल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे. “शेतकरी जगला तर देश जगेल” हे विसरलेल्या सरकारविरोधात आता गावागावातून रोष व्यक्त होत आहे.

देशाला महासत्ता बनविण्यासाठी भाजपा शिवाय पर्याय नाही- नितेश राणे

मालवण- भाजपा हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष असून, हिंदुत्वाचा विचार देशभर प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य भाजपाने केले आहे. देशाला महासत्ता बनवायचे असेल, तर हिंदुत्वाचा विचार अधिक व्यापकपणे रुजविण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही, असे  प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी चौके वाघवणे येथे बोलताना केले. भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग यांच्यावतीने मालवण तालुक्यातील चौके वाघवणे येथील ‘नॅनी ग्रँड रिसॉर्ट’ येथे आयोजित ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत आयोजित प्रशिक्षण अभियान कार्यशाळेस भेट दिल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पालकमंत्री राणे यांनी यावेळी सर्वांना शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, प्रमुख वक्ते अभिजित सामंत उपस्थित होते. यावेळी बोलताना राणे म्हणाले की, आज एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्या समोर उभा आहे. भाजपा कार्यकर्ता हा अभिमान आहे. कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष म्हणजे भाजप. कार्यकर्त्यांना  दिलेला शब्द पाळला जातो तो पक्ष भाजप. एकजुटीने काम करा, आपला पक्ष मजबूत करा. कार्यकर्त्यांनी  पक्षासाठी आपला वेळ द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

विधान परिषदेसाठी पालघर भाजपचा आग्रह

नगरसेवक जास्त असल्याचा दावा शिवसेनेच्या शिंदे गटाला मतदारसंघ न सोडण्याची भूमिका योगेश चांदेकर पालघरः विधान परिषदेच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे जागा वाटपाचे सूत्र ठरले असले, तरी महायुतीतील तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दबाव आणून अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः पुणे, ठाणे-पालघर, नाशिक, अहिल्यानगरमधील जागांसाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. पालघरला स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आतापर्यंत कधीच प्रतिनिधीत्त्व मिळाले नसल्याने तसेच या वेळी भाजपच्या नगरसेवकांची संख्या शिवसेनेपेक्षा तिप्पट असल्याने पालघरच्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी, असा आग्रह भाजपच्या सर्वंच शाखांनी धरला आहे. तशा भावना पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून एक सदस्य निवडून द्यायचा आहे. या मतदार संघावर यापूर्वी शिंदेसेनेचा वरचष्मा होता; परंतु नुकत्याच झालेल्या निवडणुकीमुळे शिंदेसेनेचे वर्चस्व कमी झाले असून आता भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. पालघर जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि जिल्हा परिषदांचे सदस्य या निवडणुकीत मतदान करीत असतात; परंतु ठाणे आणि पालघर या दोन जिल्हा परिषदांच्या निवडणुका झालेल्या नसल्याने फक्त नगरसेवकच या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. भाजपचा मतदारसंघावर ठाम दावा ठाणे-पालघर मतदार संघात १,०३० नगरसेवक असून भाजपचे ४४४, तर शिंदेसेनेचे ३२६ नगरसेवक आहेत. युतीत शिंदेसेना ही जागा भाजपला सहजासहजी सोडणार नाही, हे स्पष्ट आहे. पालघर स्थानिक स्वराज्य मतदार संघातून यापूर्वी शिंदेसेनेचे रवींद्र फाटक निवडून आले होते. त्यांचा कार्यकाळ ८ जून २०२२ मध्ये संपुष्टात आला; परंतु त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका न झाल्याने विधान परिषदेसाठी निवडणूक झाली नव्हती. सांबरेंच्या शिंदेसेनेला पाठिंब्यानंतरही भाजपचेच पारडे जड शिंदेसेनेचे ३२६ नगरसेवक असले, तरी जिजाऊ संस्थेचे नीलेश सांबरे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने त्यांचे २० नगरसेवक त्यांना मदत करू शकतील. त्यामुळे त्यांची संख्या ३४६ होईल. दुसरीकडे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे ७१ नगरसेवक आहेत. भाजपबरोबर त्यांचे सध्या बिनसले आहे. अर्थात त्यांची मते महाविकास आघाडीला जाण्याची शक्यता कमीच दिसते. भाजपशी जरी जमत नसले, तरी राज्य सरकारशी जुळ‍वून घ्यायची त्यांची मानसिकता लक्षात घेतली, तर त्यांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरू शकतो. त्यांची मते निर्णायक ठरतील. राष्ट्रवादी (अजित पवार)चे २९ नगरसेवक महायुतीच्या बाजूने असतील. महाविकास आघाडीकडे फक्त दीडशे नगरसेवक महाविकास आघाडीला नगरसेवकांची मोठी जुळवाजुळव करावी लागणार आहे. काँग्रेसचे ४७, राष्ट्रवादी (शरद पवार)चे ३८, उद्धवसेनेचे १८, समाजवादी पक्षाचे ६ व इतर काही नगरसेवकांची संख्या १५० पेक्षा अधिक होते. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी शिंदेसेनेला मदत केली होती. दुसरीकडे छोट्या पक्षांचे नगरसेवक कोणाला मतदान करणार, हे उमेदवार जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल. मनसे ६, माकप ६, एमआयएम ५, कोणार्क विकास ४, भिवंडी विकास आघाडी ३, वंचित बहुजन आघाडी २, साई पक्ष १ व नऊ अपक्ष नगरसेवक आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घोडेबाजार होतो. त्यामुळे उमेदवार कोण आणि कोणत्या पक्षाचा यावर विजयाची गणिते ठरणार आहेत. कोण असतील मतदार? ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, वसई-विरार महापालिका, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ, पालघर, डहाणू, जव्हार या नगरपालिका तसेच शहापूर, मुरबाड, वाडा, विक्रमगड, तलासरी, मोखाडा या नगरपंचायतीचे नगरसेवक ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदान करतील. कुणाचा आग्रह? पालघर शहर भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ हेमंत सवरा, आमदार हरिश्चंद्र भोये, वीणा देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम, शहराध्यक्ष तथा नगरसेवक जयेश आव्हाड, वाड्याच्या नगराध्यक्षा रीमा गंधे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नंदन वर्तक, सरचिटणीस अशोक वडे तसेच महिला आघाडीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना ठाणे-पालघर मतदारसंघासाठी आग्रही का  आहे आणि पक्षश्रेष्ठींकडे आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्याचे सांगून पालघर जिल्ह्यातील कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे. 0000000000

मुरबाडच्या समस्यांवर ‘बाळ्यामामा’ ॲक्शन मोडवर

आरोग्य, एसटी, शिक्षणाच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची ग्वाही राजीव चंदने मुरबाड : “जनतेचे प्रश्न हीच माझी प्राथमिकता” या भूमिकेची प्रचिती देत भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा शनिवारी थेट मुरबाडकरांच्या भेटीला पोहोचले. शिवनेरी…