Author: bittambatami.com

ग्रामपंचायतच्या मनमानी कारभारामुळे गावातील स्वच्छतेचा बट्ट्याबोळ

 – ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सोयगाव : सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा ग्रामपंचायतच्या मनमानी कारभारामुळे गावातील स्वच्छतेचा बट्ट्याबोळ झाला असून  नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी समाजसेवक मुश्ताक शेख यांनी केली आहे. गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून गटारीची नियमित साफसफाई केली जात नसल्याने  काही ठिकाणी गटारी जाम झाल्यामुळे तुडुंब भरल्या आहे.तर काही ठिकाणी गटारी नागरिकांनी बुजून टाकल्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावरुन वाहत असते.नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे गटारीतील सांड पाण्याचे काही ठिकाणी डबके साचल्याने गावात दुर्गंधी पसरली असून  डासांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामपंचायतच्या हलगर्जी पणामुळे गावात स्वच्छतेचा बट्ट्याबोळ झाला आहे. डासांच्या प्रदूर्भावाने लहान मुलांसह नागरिक, वयोवृद्ध व महिलांचे आरोग्य धोक्यात आले असून थंडीताप, डायरीया, मलेरिया व डेंगू  सारख्या साथीच्या रोगांच्या दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र ग्रामपंचायत अजूनही झोपेतच असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. महिलांची कुचंबणा गावात महिला व पुरुषांसाठी एकही सार्वजनिक शौचालय नसल्याने गावाच्या आजूबाजूला दुर्गधी पसरत आहे. ग्रामपंचायत कडून कोणतीही उपाय योजना केली जात नसल्याने सोयगाव -चाळीसगाव राज्य महामार्ग क्रमांक २४ गावालगत रस्त्याच्या दुतरफा महिला शौच्यास उघड्यावर बसत असल्याने महिलांची कुचंबणा होत आहे. शाळेत पायी जाणाऱ्या विध्यार्थी व नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत असून आरोग्यावर परिणाम होत आहे. याच रस्त्यावरून लोकप्रतिनिधी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचा वापर असून कोणीही तसदी घेतली नाही यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांचे निधन:

ठाणे : शिवसेना नेते तसेच ठाणे महानगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, त्याच सोबत ठाणे महापालिकेचे प्रथम महापौर सतीश प्रधान यांचे निधन झाले आहे. रविवारी दुपारी २ च्या सुमारास सतीश प्रधान यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. सोमवारी सकाळी…

कोपनहेगन होणार पहिली ‌‘कार्बन न्यूट्रल‌’ राजधानी

हवामानबदलावीर चर्चा होते, जागतिक परिषदा होतात. जग 2050 पर्यंत कार्बनमुक्त करण्याची भाषा होते. ठराव होतात. परिषद संपली की पुढच्या वर्षांपर्यंत यासंदर्भातील धूळ झटकली जात नाही. याला काही शहरे, काही देश…

शिक्षणवाटांचे भवितव्य जोखणारे वर्ष

पान १ वरुन तरच या क्षेत्राला भूतकाळातील चुका टाळून समर्थ भविष्याची पायाभरणी करता येईल. चांगले, दर्जेदार शिक्षण हे केवळ समृद्ध राष्ट्राचा दर्जा मिळवण्यासाठीच नाही तर देशातील तरुण लोकसंख्येचा लाभ घेण्याच्या…

एकदिलाची कामगिरी

  सरत आलेले वर्ष 2024 अनेक अर्थांनी लक्षणीय आणि नव्या संधींचे नवीन शक्यतांचे वर्ष ठरले आहे. वर्षाची सुरुवात झाली तेंव्हाचे राजकीय चित्र हे विरोधी पक्षांच्या काँग्रेस प्रणित आघाडीच्या पूर्णतः बाजूचे…

डोंबिवलीत स्मार्ट सहेली उपक्रम सुरू

डोंबिवली : अबला महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमुळे एकीकडे पोलिसांकडून महिलांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जात आहेत. तर दुसरीकडे लोकल वा लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येही प्रवासी महिला असुरक्षित नसल्याच्या घटना घडत आहेत.…

नियम मोडणाऱ्या बेशिस्त चालकांना दाखवला वाहतूक पोलिसांचा इंगा

वाहतूक पोलिसांकडून कारवाईची झोड; बेशिस्त चालकांवर ब्रेथ ॲनालायझरचा वापर डोंबिवली : एकीकडे रस्ते अपघातांत वाढ होत चालली असून वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस आणि शासनाकडून वारंवार आवाहन केले…

विशाल गवळीला दोन ते तीन महिन्यात होणार फाशी

मुख्यमंत्री फडणवीसांचं पीडितेच्या वडिलांना आश्वासन   कल्याण : कल्याण येथील चक्कीनाका भागातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवासांपूर्वी समोर आला होता.…

कोळसेवाडी परिसरातील नागरिकांनी विशाल गवळीच्या पुतळ्याला दिली फाशी

कल्याण : कल्याण कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 13 वर्षीय लहान मुलीचे अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत केलेल्या हत्याकांडामुळे संतापाची लाट पसरली असून आरोपी विशाल गवळी याला फाशी द्या…