Author: bittambatami.com

अमित शहांच्या निषेधार्थ आनंद नगरमधील भीमसैनिकांनी व्यक्त केला रोष

ठाणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत संविधानाचे निर्माते भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात देशभरात पडसाद उमटले आहेत. बुधवारी कोपरी भागातील आनंदनगर मधील भीमसैनिकांनी…

किसान सभेच्या पुढाकाराने आज नाशिक येथे शेतकरी महिला परिषद

शेतकरी महिलांचे सर्व प्रश्न केंद्रस्थानी आणणार – डॉ. अशोक ढवळे अनिल ठाणेकर ठाणे: शेतकरी महिलांचे सर्व प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी किसान सभेने पुढाकार घेतला असून शेतकरी महिलांच्या हक्क व अधिकारांचा उद्घोष करण्यासाठी नाशिक येथे २६ डिसेंबरला राज्यस्तरीय शेतकरी महिलांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे या परिषदेचे उद्घाटन करणार असून महिला शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्याने लावून धरणाऱ्या मकाम या संघटनेच्या नेत्या सीमा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे परिषदेला विशेष मार्गदर्शन करणार आहेत. किसान सभेचे माजी राज्य अध्यक्ष जे. पी. गावीत, सीटू संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या नसीमा शेख, प्राची हातिवलेकर, शेतमजूर युनियनच्या सरिता शर्मा, एस.एफ.आय. विद्यार्थी संघटनेचे नेते रोहिदास जाधव, सोमनाथ निर्मळ, डी.वाय.एफ.आय. संघटनेचे नेते दत्ता चव्हाण, नंदू हाडळ परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. शेतीमध्ये अपार कष्ट करणाऱ्या शेतकरी महिलांचे प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी किसान सभेच्या पुढाकाराने नाशिक येथे २६ डिसेंबर रोजी शेतकरी महिलांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. शेती प्रश्नांची चर्चा करत असताना सरकारच्या धोरणामुळे विदारक बनलेले कृषी अरिष्ट, शेतीमालाचा वाढता उत्पादन खर्च, शेतीमालाला रास्त भावाची मागणी, नैसर्गिक आपत्ती इत्यादी विषयांची नेहमीच चर्चा होते. मात्र शेतीमध्ये सर्वाधिक कष्ट करणाऱ्या शेतकरी महिलांच्या प्रश्नांवर फारशी चर्चा होत नाही. शेत जमिनीवर व राहत्या घरांवर महिला शेतकऱ्यांचा मालकी हक्क, महिला शेतकऱ्यांच्या कष्टाला रास्त दाम, मोफत श्रमाला श्रम म्हणून मान्यता व त्याचा रास्त मोबदला, महिलांवरील अन्याय व अत्याचार, महिला शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्यासाठी तंत्रज्ञान व संशोधनाची आवश्यकता, व्यसन, हुंडा, बालविवाह, धार्मिक व जातीय शोषण व भेदभाव, स्वच्छतागृहाचा हक्क इत्यादी अनेक प्रश्न दुर्लक्षित केले जातात.महिला शेतकऱ्यांच्या विविध समस्या, प्रश्न व हक्कांची या परिषदेत चर्चा होणार असून महिला शेतकऱ्यांच्या हक्क व मागण्यांची एक सनद या परिषदेमध्ये संमत करण्यात येणार आहे. परिषदेनंतर राज्यभर विविध जिल्ह्यांमध्ये या सनदेचे वाचन करणारे जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. किसान सभेच्या पुढाकाराने होत असलेल्या या परिषदेमध्ये ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या विविध संघटनांमधील महिला नेतृत्वांना आवर्जून आमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेसाठी जनवादी महिला संघटना, सीटू ही कामगार संघटना, शेतमजूर युनियन, एस.एफ.आय. व डी.वाय.एफ.आय. या विद्यार्थी व युवक संघटना सहकार्य करत असून या संघटनांचे ग्रामीण भागात कार्यरत असलेले महिला नेतृत्व या परिषदेमध्ये सहभागी होणार आहे, अशी माहिती किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, जे.पी.गावीत, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांनी दिली.

राहुल कर्डिले नाशिक मनपाचे नवे आयुक्त

– डॉ. अशोक करंजकर यांची उचलबांगडी हरिभाऊ लाखे नाशिक : भूसंपादनात विशिष्ट विकसकांना् झुकते माप, संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या काही निविदा आणि वारंवार सुट्टीवर असणे अशा कार्यशैलीने चर्चेत राहिलेले नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांची अखेर शासनाने उचलबांगडी केली. त्यांच्या जागी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनपा आयुक्त डॉ. करंजकर यांची कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बदली झाली आहे. २२ जुलै २०२३ रोजी त्यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. ते अनेक कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. प्राधान्यक्रम बाजूला ठेवत प्रशासनाने राबविलेली भूसंपादन प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. काही विकसकांना महापालिकेने झुकते माप देत सुमारे ६२ कोेटी रुपये दिले. ही बाब उघड झाल्यानंतर मागील महायुती सरकारच्या काळात भाजप आमदारांनी याची चौकशी करून आयुक्तांची बदली करण्याची मागणी केली होती. कुठल्याही विषयावरून गदारोळ उडाला की, डॉ. करंजकर हे सुट्टीवर निघून जात असत. असे अनेकदा घडले. शेतकऱ्यांना डावलून विकसकांना मोबदला दिल्याने शेतकऱ्यांनी महापालिका मुख्यालयात गोंधळ घातला होता. विधीमंडळाच्या नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात भाजप आमदारांनी वादग्रस्त भूसंपादन व निविदा प्रक्रियांबाबत तक्रारी केल्या होत्या. अधिवेशन काळात आयुक्त डॉ. करंजकर हे सुट्टीवर निघून गेले होते. करंजकर यांच्या निष्क्रियतेविषयी लोकप्रतिनिधींसह सर्वच नाराज होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन शासनाने डॉ. करंजकर यांची बदली केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. मनपा आयुक्तपदी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने त्यांना दिले आहेत.

अंबरनाथचे गोल्डमॅन, रिपब्लिकन नेते अजय जाधव यांना वाहिली आदरांजली

अशोक गायकवाड अंबरनाथ : अंबरनाथ मधील गोल्डमॅन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पक्षाचे अंबरनाथ शहर माजी अध्यक्ष, माजी नगरसेवक, अजय जाधव यांना विविध संस्था संघटनेच्या वतीने रविवारी,(दि.२२) रोजी भावपूर्ण आदरांजली वाहन्यात आली. अध्यक्षस्थानी दत्ता सरवदे होते. दिवंगत अजय जाधव हे अंबरनाथ मधील गोल्ड मॅन म्हणून ओळखले जात होते. दलित पँथर ते रिपब्लिकन चळवळीत ते कार्यरत होते. पुण्यानुमोदन कार्यक्रमात प्रारंभी ब्रम्हदेश येथील भन्ते प्रियदर्शी आणि बुद्धगया येथील भन्ते बौद्धरत्न यांनी धार्मिक कार्यक्रम आटोपला. बौद्धाचार्य मोरे यांनी प्रवचन दिले. या प्रसंगी झालेल्या आदरांजली सभेत भारतीय बौद्धमहासभा राज्य शाखेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर बर्वे, राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अंबरनाथ शहर सचिव, माजी नगरसेवक कबीर गायकवाड, अंबरनाथचे माजी उप नगराध्यक्ष वाघमारे, नासिक विभागातील सरपंच अर्जुन डांगळे, कवी दादा पगारे, वसंत जाधव, मनोज दोंदे, फारूक शेख आदिची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. शोकसभेला माजी नगरसेवक नासिर कुंजाली, आर. पी. आय अंबरनाथ शाखेचे सचिव दिलीप जाधव, ऑर्डनन्स चतुर्थी श्रेणी कर्मचारी संघटनेचे नेते बी बी मडीखांबे, जयभीम सोसायटीचे प्रतिनिधी सुनील अधांगळे, महिला कार्यकर्त्या रोशनी शेख, निर्मला घोक्षे आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते उद्योजक यश जाधव यांनी केले होते तर सूत्रसंचालन डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठान अध्यक्ष राहुल हंडोरे यांनी केले.

उल्हासनगरात प्रलंबित मागण्यांसाठी मनसे कामगार सेनेचे आंदोलन

उल्हासनगर : : गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांच्या प्रलंबित मागण्या होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे युनिट अध्यक्ष दिलीप थोरात यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. 10,20,30 वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना सेवा लाभ दयावा, अनुकंम्पा तत्वावर असलेल्या कामगारांना न्याय दयावा, सर्वच संर्वगाच्या पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती बाबत त्वरित निर्णय घेणे, नियमबाह्य कारभार सोपवण्यात आलेल्या अधिकारी वर्गाबाबत खुलासा करणे, सफाई कामगार यांना मोफत घरे नावावर करणे, कत्राटी कामगारांची पगारवाढ करणे आदि मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच 30 डिसेंबरपर्यंत मागण्यांची पूर्तता करण्यात आली नाही तर खळ खट्याक करण्यात येणार असा इशाराही देण्यात आला. या आंदोलनात अध्यक्ष दिलीप थोरात यांच्यासह सचिन साठे, अनिल देवकर, रमेश वाघेला, राजेश मकवान, हरेष बेहनवाल, अजय गायकवाड, समाधान निकम, नितू बोरकर, प्रमिला खाबायतकर, शांताराम शेळके आदी सहभागी झाले होते.

उल्हासनगरमध्ये ४६ अनधिकृत नळ जोडण्या तोडल्या

पुन्हा अनधिकृत जोडणी केल्या गुन्हेही दाखल होणार, पालिकेचा इशारा उल्हासनगरः शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवर बेकायदा पद्धतीने जोडणी करत पाणी चोरणाऱ्यांवर उल्हासनगर महापालिका प्रशासनाने कारवाईला सुरूवात केली आहे. नुकतेच पालिकेने अशा मुख्य जलवाहिनीवरील ४६ अनधिकृत जोडण्या तोडल्या आहेत. येत्या काळात पुन्हा या जोडण्या केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यास मदत होणार असल्याची पालिकेला आशा आहे. उल्हासनगर शहरातील पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी अनेकदा निर्णय घेतले गेले. मात्र त्यात काही अंशी सुधारण झाली असली तरी गळती, चोरीचे प्रमाणही कायम आहे. शहरातील पाणी समस्यांवर चर्चा करण्यासाठी नुकतीच एका विशेष बैठतीचे आयोजन उल्हासनगर महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. या बैठकीत मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्यांचा प्रश्न चर्चिला गेला. मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्यांमुळे अधिकृत ग्राहकांना पाणी पुरवण्यात अपयश येते. त्यामुळे नागरिकांना हक्काचे पाणी मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे या मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्या काढून टाकण्यावर बैठकीत एकमत झाले. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त जमिर लेंगरेकर आणि किशोर गवस यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ जोडण्या काढून टाकण्याचे निर्देश दिले. नुकतीच पालिकेच्या वतीने ही कारवाई सुरू करण्यात आली. यात पहिल्या टप्प्यात  उल्हासनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गायकवाड पाडा येथील पाले जोडणी येथून कारवाईला सुरूवात करण्यात आली. या ठिकाणी मुख्य जलवाहिनीवर असलेल्या २२ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. त्यानंतर पुढच्या भागातील २४ अनधिकृत नळ जोडण्या तोडण्यात आल्या. अनधिकृत नळजोडण्या काढण्यात आल्या असल्या तरी भविष्यात अशा नळजोडण्या होणार नाही यासाठी पालिका प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे अशा नळ जोडण्या करणाऱ्यांवर यापुढे गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिता पालिका प्रशासनाने दिले आहे. अनधिकृत नळजोडण्या तोडल्याने पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची आशा आहे. Slug – पुन्हा अनधिकृत जोडणी केल्या गुन्हेही दाखल होणार, पालिकेचा इशारा उल्हासनगरः शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवर बेकायदा पद्धतीने जोडणी करत पाणी चोरणाऱ्यांवर उल्हासनगर महापालिका प्रशासनाने कारवाईला सुरूवात केली आहे. नुकतेच पालिकेने अशा मुख्य जलवाहिनीवरील ४६ अनधिकृत जोडण्या तोडल्या आहेत. येत्या काळात पुन्हा या जोडण्या केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यास मदत होणार असल्याची पालिकेला आशा आहे. उल्हासनगर शहरातील पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी अनेकदा निर्णय घेतले गेले. मात्र त्यात काही अंशी सुधारण झाली असली तरी गळती, चोरीचे प्रमाणही कायम आहे. शहरातील पाणी समस्यांवर चर्चा करण्यासाठी नुकतीच एका विशेष बैठतीचे आयोजन उल्हासनगर महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. या बैठकीत मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्यांचा प्रश्न चर्चिला गेला. मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्यांमुळे अधिकृत ग्राहकांना पाणी पुरवण्यात अपयश येते. त्यामुळे नागरिकांना हक्काचे पाणी मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे या मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्या काढून टाकण्यावर बैठकीत एकमत झाले. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त जमिर लेंगरेकर आणि किशोर गवस यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ जोडण्या काढून टाकण्याचे निर्देश दिले. नुकतीच पालिकेच्या वतीने ही कारवाई सुरू करण्यात आली. यात पहिल्या टप्प्यात  उल्हासनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गायकवाड पाडा येथील पाले जोडणी येथून कारवाईला सुरूवात करण्यात आली. या ठिकाणी मुख्य जलवाहिनीवर असलेल्या २२ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. त्यानंतर पुढच्या भागातील २४ अनधिकृत नळ जोडण्या तोडण्यात आल्या. अनधिकृत नळजोडण्या काढण्यात आल्या असल्या तरी भविष्यात अशा नळजोडण्या होणार नाही यासाठी पालिका प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे अशा नळ जोडण्या करणाऱ्यांवर यापुढे गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिता पालिका प्रशासनाने दिले आहे. अनधिकृत नळजोडण्या तोडल्याने पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची आशा आहे.

विनोद कांबळी यांना ३० लाखांची मदत;

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती ठाणे : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जमा झालेली ३० लाख रुपयांची मदत त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात पाठविण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. विनोद कांबळी यांच्या भेटीसाठी प्रताप सरनाईक गेले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच, यापुढे त्यांच्यावर ठाण्यातील तीन रुग्णालयात मोफत उपचार केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हे मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. १५ दिवसांपूर्वी भिवंडी येथील आकृती रुग्णालयातील डाॅक्टरांचे पथक वांद्रे येथील कांबळी यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी कांबळी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन शक्य झाल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार, कांबळी यांच्या कुटुंबियांनी शनिवारी त्यांना भिवंडी आकृती रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक कांबळी यांच्यावर उपचार करत आहेत. कांबळी हे डॉक्टर आणि माध्यमांसोबत संवादही साधताना दिसतात. कांबळी यांना चालताना त्रास होत होता. तसेच इतरही अनेक आजार त्यांना होते. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांना माहिती मिळताच त्यांच्या आदेशानुसार त्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी भेट त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच डॉ.  श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यानंतर बुधवारी दुपारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विनोद कांबळी यांना जेव्हा-जेव्हा उपचाराची गरज पडेल. त्यावेळेस, गंगुबाई संभाजी शिंदे, इंदिराबाई बाबूराव सरनाईक आणि आकृती रुग्णालय हे तीन रुग्णालय विनोद कांबळी यांच्या वैद्यकीय सेवेसाठी मोफत उपलब्ध असतील. एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार विनोद कांबळी यांची भेट घेतली. डॉ.  श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून पाच लाखांची मदत जाहीर झाली आहे. त्यांच्या बँक खात्यात चार ते पाच लाख जमा झाले आहेत आणि आणखी २० लाख असे एकूण ३० लाख रुपये विनोद कांबळी यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा केले जातील. आम्ही अजूनही मदतीसाठी आवाहन केले आहे. ते देखील त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा होतील असे सरनाईक यांनी सांगितले.

विनोद कांबळी यांना डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून ५ लाखांची मदत

अनिल ठाणेकर क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना प्रकृती अस्वास्थ्यतेच्या कारणास्तव कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कांबळी यांस वैयक्तिक ५ लक्ष रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून ही मदत पूढील आठवड्यात करण्यात येणार असून येणाऱ्या काळात त्यांना अजून मदत करण्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिल्याचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी सांगितले भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक माजी फलंदाज विनोद कांबळी यांना प्रकृतीच्या कारणास्तव भिवंडी येथील आकृती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार त्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी भेट घेऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली तसेच आकृती हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा करून विनोद कांबळी यांच्या उपचारात कोणतीही गोष्ट कमी राहणार नाही याची काळजी घ्या अशी विनंती केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीबद्दल क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी कृतज्ञता व्यक्त केली तसेच हॉस्पिटलमध्ये भेटण्याची विनंती केली. लवकरच उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची भेट घेऊन कांबळी परिवाराला मदत करणार आहेत.

‘मेकिंग द डिफरन्स’ संस्थेच्या संजीवनी प्रकल्पाद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्राला विविध वस्तू

ठाणे : ठाणे ग्रामीण भागातील आदिवासी, ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी व्यवस्थित व्हावी यासाठी ‘मेकिंग द डिफरन्स’ एनजीओ आणि पीपीएफएएस म्यूचुअल फंड कंपनीच्या सीएसआर फंड द्वारे मेकिंग द डिफरन्स संस्थेच्या मदतीतून संजीवनी…

Heading- जहाजावरील क्षेपणास्त्राच्या हल्ल्यातील सागरी कामगार सुरक्षितपणे मुंबईत

– सागरी कामगारांना  सुरक्षितपणे परत आणणे ही सर्वोच्च प्राधान्याची बाब – मिलिंद कांदळगावकर अनिल ठाणेकर ठाणे : यमनजवळ यंदा झालेल्या एका भीषण घटनेनंतर एसा स्टार जहाजावरील सर्व भारतीय सागरी कामगार सुरक्षितपणे मुंबईत परतले आहेत.आपल्या सागरी कामगारांना  सुरक्षितपणे परत आणणे ही नुसीसाठी सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे, असे नॅशनल युनियन सिफेरर्स ऑफ इंडिया (नूसी)चे  जनरल सेक्रेटरी व खजिनदार मिलिंद कांदळगावकर यांनी सांगितले, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली. ५ डिसेंबर २०२४ रोजी या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला झाला होता, ज्यामुळे रेड सी प्रदेशातील तणाव वाढल्याचे दिसून आले. सागरी कामगारांना यशस्वीरीत्या  सुरक्षितपणे आणल्याचे  श्रेय नॅशनल युनियन सिफेरर्स ऑफ इंडिया (नूसी) आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक कामगार महासंघ (आयटीएफ) यांच्या नेतृत्वाखालील धाडसी व्यवस्थापकीय प्रयत्नांना जाते. या संस्थांनी सागरी कामगारांना त्यांच्या कुटुंबियांपर्यंत सुरक्षित पोहोचवण्यासाठी अहोरात्र काम केले.  आपल्या सागरी कामगारांना  सुरक्षितपणे परत आणले, ही नुसीसाठी सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे,” असे  नुसीचे जनरल सेक्रेटरी व खजिनदार मिलिंद कांदळगावकर यांनी सांगितले.आंतरराष्ट्रीय समुद्री सहकार्याच्या प्रभावीपणे केलेल्या कार्याचे हे यशस्वी उदाहरण आहे. यमन किनाऱ्याजवळील जहाज वाहतुकीच्या मार्गांवर वाढत्या हल्ल्यांपैकी एसा स्टारवरील   हा एक भीषण हल्ला होता. या घटनेमुळे व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसंबंधीचा धोका निर्माण झाला आहे..मुंबईच्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर परतणाऱ्या सागरी कामगारांचे त्यांच्या कुटुंबियांनी भावनिक स्वागत केले. त्याठिकाणी वैद्यकीय पथक तत्पर होते, परंतु प्राथमिक अहवालांनुसार  सर्व कामगारांची प्रकृती चांगली असून ते सुरक्षित  आहेत. सागरी कामगार संघटनां  आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे  सागरी कामगारांना मुंबईत सुरक्षितपणे  परत आणून कामगारांच्या हक्कांचे व सुरक्षिततेचे रक्षण करण्यामध्ये  महत्त्वपूर्ण योगदान आहे. तसेच, संकटग्रस्त समुद्री मार्गांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सावधगिरी व आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज अधोरेखित केली आहे.  किनाऱ्यावर सुरक्षित आलेल्या सागरी कामगारांच्या कुटुंबियांनी परत आणण्यासाठी  सहभागी झालेल्या सर्व संस्थांचे आभार मानले.आमच्या प्रिय व्यक्तींना सुरक्षितपणे घरी परत आणले. हा आमच्यासाठी मोठा दिलासा आहे, असे एका कुटुंबीयाने सांगितले. या कठीण काळात नुसी व आयटीएफ कडून मिळालेला पाठिंबा अनमोल होता.या घटनेनंतर, विशेषत: समुद्री संघर्षग्रस्त भागांमध्ये  सुरक्षा उपाय अधिक प्रभावी करण्यासाठी पुन्हा एकदा सुरक्षेची मागणी वाढली आहे. व्यापारी जहाजांच्या सुरक्षिततेसाठी समुद्री प्राधिकरणे सद्यपरिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती मिलिंद कांदळगावकर यांनी दिली.