Author: bittambatami.com

लोकसभा निवडणुकीत विजयोत्सव,तर विधानसभेत जनमत विरुद्ध गेल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा रडीचा डाव – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : लोकसभा निवडणुकीच्यावेळी १०. पैकी ८ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजयी झाले आणि तो विजयोत्सव साजरा करण्यात आला की हा महाराष्ट्रातील जनतेचा विजय आहे.पण विधानसभेत तेच जनमत महाविकास आघाडीच्या विरुद्ध गेल्यानंतर रोज रडीचा डाव खेळण्याचे काम डॉ.जितेंद्र आव्हाड करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे. डॉ.जितेंद्र आव्हाड यांची शॉर्टटर्म  मेमरी लॉस झालेला आहे, या निष्कर्षाप्रत मी आलेलो आहे. याचक  कार्यालयामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मी सांगितले होते की, १४९ म्रंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील  २४ हजार दुबार मतदार आहेत हा सर्वप्रथम आक्षेप मी स्वतः निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नोंदविला होता. १२ हजार दुबार नावे ही १४४ कल्याण ग्रामीण मधील, १४९ म्रंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील  मध्ये आहेत. हा सर्वप्रथम आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अणि जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही नोंदविला होता. याच्याविरुद्ध आर ओ कडे तीन नावे वगळता येणार नाहीत यासाठी थयथयाट करायला कोण गेले होते ? याची शोधपत्रकारिता करावी, सीसी फूटेच तपासावे, याचे सत्य आपल्या डोळ्यासमोर येईल. जितेंद्र आव्हाड यांना स्वतःच्या विजयावर विश्वास नाहीय का ? की आपण एवढ्या मताधिक्याने कसा जिंकलो? याची शंका मनामध्ये आहे का ? आम्ही तर अत्यंत विनम्रपणे मुंब्रा कळव्यातील जनतेने जो जनादेश दिला तो स्विकारलेला आहे. जितेंद्र आव्हाड हे ईव्हीएम हॅक करुन त्यांच्या मतदारसंघांमध्ये विजयी झालेत का ? अशाप्रकारची शंका आता त्यांच्या वर्तवणुकीवरुन येत आहे.लोकसभा निवडणुकीच्यावेळी १०. पैकी ८ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजयी झाले आणि तो विजयोत्सव साजरा करण्यात आला की हा महाराष्ट्रातील जनतेचा विजय आहे.पण विधानसभेत तेच जनमत महाविकास आघाडीच्या विरुद्ध गेल्यानंतर रोज रडीचा डाव खेळण्याचे काम डॉ.जितेंद्र आव्हाड करत आहेत. ईव्हीएबाबत शंका असेल तर जितेंद्र आव्हाड यांनी प्रथम राजीनामा द्यावा पोटनिवडणूक आपोआप लागेल.  मग ही निवडणूक ईव्हीएम घ्यायची की बॅलेट वर घ्यायची हे निवडणूक आयोग ठरवेल. जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएम कसे हॅक होते हे प्रत्यक्ष निवडणूक आयोगाला दाखवावे, पण त्यातुन हे देखील समोर येईल की त्यांचा विजय देखील ईव्हीएम हॅक करुन केला आहे, हे सत्य देखील जगासमोर येऊ शकते.२८८ विधानसभा जागांपैकी २४ ठिकाणी पराभूत उमेदवारांनी दुबार वीवीपॅट मोजणीचा आग्रह केला आहे. याचा अर्थ ९० लोकांना ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही. हेच यावरुन सिद्ध होते.आणि २४ ठिकाणी देखील रिकाउंटींग होईल तेव्हा त्यांना देखील विश्वास होईल की महाराष्ट्रातील जनतेने त्यांना नाकारले आहे.ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२४ -२५ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केली त्या दिवसापासून महाविकास आघाडी ही योजना कशी फेल होमार ? या योजनेला पैसे मिळणार नाहीत? तसेच या योजनेच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये देखिल गेले. पण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिनही नेत्यांच्या नेतृत्वाखाली ५ महिन्यांचे इन्स्टॉलमेंट महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिबीटी ने गेले आणि ज्या महाविकास आघाडीने ह्या योजनेला विरोध केला, जे या योजनेच्या विरोधात कोर्टात गेले त्यांच्याच जाहीरनाम्यामध्ये सत्तेत आल्यानंतर ३ हजार पैसे देऊ अशा प्रकारे खोटं देखिल बोलले गेले. म्हणजे एकीकडे महाविकास आघाडीने दीड हजार रुपयांना विरोध केला, हि योजना पुढे चालणार नाही असे वक्तव्य केले, त्याच्या विरोधात मा. उच्च न्यायालयात गेले. पण त्याच महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये ३००० रुपये माता भगीनींच्या खात्यामध्ये आम्ही देऊ अशा प्रकारे ते खोटं बोलले. म्हणूनच महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींनी महाविकास आघाडीचा पराभव केला.  लाडकी बहीण योजना फेल करण्यासाठी महाविकास आघाडी कोर्टा मध्ये गेली, असे आनंद परांजपे म्हणाले. ०००

ठामपाचा नवीन विकास आराखडा कळवा – खारीगांव उद्ध्वस्त करणारा- डॉ. जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर ठाणे : महापालिकेने नवीन प्रारुप विकास आराखडा तयार केला आहे. हा विकास आराखडा विशिष्ट हेतू समोर ठेवून करण्यात आला आहे. विकासाला आमचा विरोध नाही. मात्र, माणसे संपवून केला जाणारा विकास काय कामाचा? ठामपाच्या या विकास आराखडय़ात संपूर्ण कळवा – खारीगांव उद्ध्वस्त होणार आहे. आराखडे मंजूर असलेल्या सोसायट्यांमधून अवाढव्य रस्ते तयार करून पाचशे ते हजार इमारतींवर वरवंटा फिरवण्याचा कट आखला असून  यात तब्बल ४५ हजार रहिवाशी बेघर होणार आहेत.  कोणाच्या भल्यासाठी हा आराखडा तयार करण्यात आला आहे?  असा सवाल करून या आराखडय़ाच्या विरोधात जनआंदोलन उभे करण्याचा इशारा मुंब्रा कळव्याचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. नव्या प्रारुप विकास आराखड्यात कळवा आणि खारीगांव भागातील तब्बल १ हजारांच्या आसपास इमारती बाधीत होणार आहेत. गावठाण भागही उद्ध्वस्त होणार आहे. कळवा खाडी पुलापुढील भागात असलेल्या तीन इमारती या पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन येथील रहिवाशी बेघर होणार आहेत. कळव्यातील ४५० इमारती या विकास आराखडय़ामुळे बाधीत होणार असून खारीगावात देखील ५५० च्या आसपास इमारती बाधीत होऊन येथील तब्बल ४५ हजारांच्या आसपास कुटुंबे थेट रस्त्यावर येणार आहेत. येथील मंदिरे, मैदाने, बाधीत होत असल्याचेही डॉ. आव्हाड यांनी सांगितले. विकास आराखडा तयार करताना ज्या काही करामती केल्या आहेत; त्याचाही पर्दाफाश आपण करणार असून कावेरी सेतूची मालकी कोणाकडे आहे. त्याचा एफएसआय वापरता येतो का? ते देखील आता पाहणार असल्याचे ते म्हणाले.कळवा- खारीगांव येथील रहिवाशांना मारुन असा विकास होणार असेल तर त्याला आमचा विरोध आहे.  ठाणे महानगरपालिकेने खारीगांवमधून डीपी रोडचा प्रस्ताव टाकला आहे. हा डीपी रोड पुढे नाशिक महामागार्ला जोडला जाणार आहे. या डीपी रोडमुळे खारीगांवची मूळ संस्कृती नष्ट होणार आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या खारीगांवातील १७ रहिवासी इमारती, ग्रामपंचायतपासूनची १८ जुनी घरे तसेच खारीगांवची ग्रामदेवता जरीमरीचे प्राचीन मंदिरही या विकास आराखडय़ामुळे तोडले जाणार आहे.  त्यामुळे अशा विकास प्रस्तावाच्या विरोधात आता सर्वपक्षीय एकत्र येऊन आंदोलन उभे केले जाईल,  असा इशाराही त्यांनी दिला. तसेच लोकांना उद्ध्वस्त करणारा हा विकास आराखडा एक इंचही पुढे जाऊ दिला जाणार नाही, असेही ते म्हणाले. इथे विकास आराखड्याचा गाजावाजा केला जात आहे. मात्र कळवा, मुंब्रा या भागातील विकास आराखड्यातील रस्त्यांवरच अतिक्रमणे उभी राहत आहेत. येथील पालिका अधिकारी प्रति चौरसफुटामागे  ३०० रुपये घेऊन आपले खिसे भरत आहेत. परंतु कारवाई करण्यासाठी पालिका पुढे येत नसल्याचा आरोपही आव्हाड यांनी यावेळी केला. ००००

महापरिनिर्वाण दिनानिमित्त 5 व 6 डिसेंबरला रात्रभर लोकलसेवा सुरु ठेवा:- वर्षाताई गायकवाड

मुंबई : संविधान निर्माते महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने महामानवास अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दरवर्षी मुंबईत दाखल होत असतात. मुंबईतील चैत्यभूमी येथे लाखोंचा जनसागर भेट देत…

समीर भुजबळ यांचे राष्ट्रवादीत पुनर्वसनाचे संकेत

हरिभाऊ लाखे नाशिक : नांदगाव विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करणारे राष्ट्रवादीचे (अजित पवार) माजी पदाधिकारी समीर भुजबळ हे पराभूत झाल्यानंतर पुन्हा या पक्षाचे ज्येष्ठ नेते, काका छगन भुजबळ यांच्याबरोबर सक्रिय झाले आहेत. समीर हे सोबत होते, आहेत आणि राहतील, अशा शब्दांत काकांनी पुतण्याची पाठराखण केल्यामुळे राष्ट्रवादीत (अजित पवार) नव्याने त्यांचे पुनर्वसन होण्याचे संकेत मिळत आहेत. स्थानिक राजकारणात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. विधानसभा निवडणुकीत समीर भुजबळ हे मैदानात उतरल्याने उभयतांमध्ये पराकोटीचे मतभेद झाले होते. नांदगावमधील बंडखोरीचे पडसाद नांदगावच नव्हे तर, जिल्ह्यातील अन्य मतदारसंघात उमटले. राष्ट्रवादीच्या (अजित पवार) मुंबई शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन समीर भुजबळ यांनी नांदगावमधून अपक्ष उमेदवारी केली होती. तेव्हापासून छगन भुजबळ यांनी काहिसे अलिप्त धोरण स्वीकारत त्यांचे निवडणूक लढवणे ही बंडखोरी नसल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला. पक्षाचा राजीनामा देऊन ते निवडणूक लढत असून शिंदे गटाने देवळालीत अधिकृत उमेदवार दिल्याकडे काकांनी लक्ष वेधले होते. नांदगावमधील या उमेदवारीने कांदे-भुजबळ वाद पुन्हा उफाळून आला. परस्परांवर आरोप-प्रत्यारोप झाले. हे वाद प्रचारासह मतदानाच्या दिवशी समर्थकांना धक्काबुक्की, धमक्यांपर्यंत गेले होते. निवडणुकीत कांदे यांनी भुजबळ यांना पराभूत करुन काका-पुतण्याला एकाचवेळी शह दिला. विधानसभा निवडणुकीआधी छगन भुजबळ यांनी पुत्र पंकज यांची विधान परिषदेवर वर्णी लावली होती. पराभूत झालेले पुतणे समीर भुजबळ यांचे पुनर्वसन आता कुठे, कसे करणार, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. गुरुवारी महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त मुंबई नाका येथे फुले स्मारकात छगन भुजबळ यांनी अभिवादन केले. यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी समीर हे बरोबर होते, आहेत आणि उद्याही राहतील, अशा मोजक्याच शब्दांत काय ते सांगून टाकले.

सरस्वती मंदिर हायस्कूल आणि बंगाली एज्युकेशन सोसायटी यांच्यात रंगणार अंतिम सामना

आंतरशालेय खो-खो स्पर्धा मुंबई : सरस्वती मंदिर हायस्कूलसच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त आंतरशालेय लंगडी व खो-खो स्पर्धांचे आयोजन केले आहे माहीमच्या सरस्वती मंदिर हायस्कूल, सेनापती बापट मार्ग येथे आयोजित आंतरशालेय खो-खो स्पर्धा सुरु आहेत. पहिला उपांत्य सामना सरस्वती मंदिर हायस्कूलने अहिल्या विद्या मंदिरचा १८-१० असा एक डाव आणि ८ गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. सरस्वतीच्या खेळाडू रिया सिंगने उत्कृष्ट कामगिरी करत नाबाद १:४० मिनिटे खेळून ७ गुण मिळवले, तर राधिका कोंडुसकरने १:५० मिनिटे खेळत ३ गुणांची भर घातली. वैदवी बटावलेनेही प्रभावी खेळ करत नाबाद ३:१० मिनिटे खेळले आणि १ गुण मिळवला. दुसऱ्या बाजूला, अहिल्या विद्या मंदिरच्या अर्णवी शेंगाळेने आक्रमणात ६ गुण मिळवत एकहाती लढत दिली, मात्र तिला संघाकडून पुरेशी साथ न मिळाल्याने संघाला पराभव पत्करावा लागला. दुसरा उपांत्य सामना बंगाली एज्युकेशन सोसायटीने वाडीबंदर एमपीएस स्कूलवर १५-०४ असा एक डाव आणि ११ गुणांनी विजय मिळवला. बंगाली संघाकडून कार्तिकी कानसेने ५:३० मिनिटे खेळत ३ गुण मिळवले, सिद्धी शिंदेने ५:३० मिनिटांत ४ गुणांची कमाई केली, तर अनघा पन्हाळेने १:२० मिनिटे खेळत २ गुण मिळवले. त्यांच्या प्रभावी खेळामुळे संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. वाडीबंदर एमपीएस स्कूलकडून निधी शिगवण आणि अंकिता वाकोडे यांनी प्रत्येकी १ गुण मिळवला, परंतु संघाची एकत्रित कामगिरी अपयशी ठरली. आता अंतिम फेरीत सरस्वती मंदिर हायस्कूल आणि बंगाली एज्युकेशन सोसायटी यांच्यात चुरस पाहायला मिळेल. ००००

कामगार महर्षी आंबेकर स्मृती शालेय-कॉलेज मोफत कॅरम स्पर्धा १० डिसेंबरला

मुंबई : कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती आंतर शालेय-कॉलेज मोफत कॅरम स्पर्धा १० ते १२ डिसेंबर दरम्यान परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर…

मराठी भाषा टिकविण्यासाठी लेखकांनी मायबोली भाषेत लेखन करावे  – रामदास फुटाणे

मुंबई : महाराष्ट्रात अनेक दिवाळी अंक निघत असून दिवाळी अंक हे महाराष्ट्राचे भूषण आहे, तर देहू व आळंदी ही महाराष्ट्राची विद्यापीठे आहेत.  मराठी भाषा टिकवण्यासाठी लेखकांनी आपले लेख , कथा व…

कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन व आणीबाणी सेवा                                      

कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खडकपाडा , वायले नगर, कल्याण पश्चिम येथील वरटेक्स सॉलिटेअर ए.१ या इमारतीला आग लागल्याची वर्दी श्री अविनाश या इसमाने भ्रमणध्वनी क्रमांक ९८९२४०९२६० द्वारे दिनांक २६ नोव्हेंबर…

वृद्ध महिलेची ७८ लाखांची सायबर फसवणूक

    मुंबईः आर्थिक गैरव्यवहारात अडकल्याची भीती दाखवून बोरिवलीमधील वृद्ध महिलेची ७८ लाख ७० हजार रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरोधात उत्तर…