Author: bittambatami.com

मॅक्रॉनयांनी अनुभवला छत्रपतींचा ‘शिवसोहळा’

मुंबई : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपल्या मुंबई भेटीत खास वेळ काढून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवसोहळा आवर्जुन पाहिला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांनी या शिवसोहळ्याचा अनुभव घेतला. शिवसोहळ्यातील…

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी घेतला महासभा सभागृहाचा आढावा

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी घेतला महासभा सभागृहाचा आढावा अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा येत्या २० फेब्रुवारीला आयोजित केली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर यांनी महासभेच्या सभागृहाची प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. यावेळी महापालिका सचिव मनिष जोशी, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड तसेच कार्यकारी अभियंता महेश बोराडे उपस्थित होते. महापौरांनी सभागृहातील आसनव्यवस्था, ध्वनी प्रणाली, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था आणि इतर मूलभूत सोयीसुविधांची तपासणी केली. ठाणे महानगरपालिकेत सर्वपक्षीय १३१ नगरसेवक निवडून आले असून, याशिवाय १० स्वीकृत सदस्य सभागृहात येणार आहे. या पार्श्वभूमीवर एकूण सदस्य संख्या लक्षात घेता सभागृहातील आसनव्यवस्थेची महापौरांनी आढावा घेतला.  महापौरांनी नमूद केले. ९सर्वसाधारण सभा ही लोकप्रतिनिधींसाठी महत्त्वाचे व्यासपीठ असून कामकाज निर्विघ्न आणि शिस्तबद्ध पार पडणे आवश्यक आहे. त्यामुळे तांत्रिक बाबी, ध्वनिव्यवस्था आणि प्रशासकीय तयारीत कोणतीही त्रुटी राहू नये, याची दक्षता घ्यावी. तसेच महासभेच्या कामकाजाचा प्रारंभ बदललेल्या सुचनांनुसार राष्ट्रीय गीत अर्थात वंदे मातरम् आणि राज्यगीताने, तर  महासभेचा समारोप राष्ट्रगीताने होणार असून ही ध्वनीफ‍ितीवर लावण्यात यावीत असेही महापौरांनी नमूद केले. एकूणच सर्वसाधारण सभा सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडावी, यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सांगितले.

 रायगड जिल्ह्यात २०२६ साठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

रायगड जिल्ह्यात २०२६ साठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर अलिबाग : रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीतील शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांसाठी सन २०२६ या वर्षाकरिता तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. संबंधित अधिसूचना जिल्हाधिकारी किशन…

४ मार्च रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

४ मार्च रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन अलिबाग : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन साजरा केला जातो. मात्र मार्च २०२६ महिन्यातील पहिला सोमवार (२ मार्च) हा होळी सणानिमित्त स्थानिक सुट्टीचा…

  पुरुष व महिला गटात पश्चिम रेल्वेला दुहेरी मुकुट

कै. उमेश शेणॉय स्मृती चषक व्यावसायिक खो-खो स्पर्धा पुरुष व महिला गटात पश्चिम रेल्वेला दुहेरी मुकुट मुंबई : दादरच्या कै. अजितदादा पवार क्रीडा नगरीत जल्लोषाचा जणू स्फोटच झाला! मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने अमर हिंद मंडळ आयोजित कै. उमेश शेणॉय स्मृती चषक पुरुष व महिला व्यावसायिक ‘डायनॅमिक’ खो-खो स्पर्धेत कै. उमेश शेणॉय स्मृती चषकावर पश्चिम रेल्वेने असा झंझावाती ताबा मिळवला की प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत विजयाचा जल्लोष आकाशाला भिडवला. पुरुष आणि महिला दोन्ही गटांत दुहेरी मुकुट पटकावत पश्चिम रेल्वेने स्पर्धेत आपले वर्चस्व ठसठशीतपणे सिद्ध केले. या स्पर्धेत पुरुषांमध्ये महाराष्ट्र पोष्ट व  मुंबई पोलिस यांनी उपविजेतेपद मिळवले. तर पुरुषांमध्ये बँक ऑफ इंडियाला तृतीय क्रमांकावर तर बृहन्मुंबई महानगरपालिकेला चतुर्थ क्रमांकावर व महिलांमध्ये महावितरण कंपनीला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांच्या हस्ते पार पडले. अंतिम सामन्यात २४-१८ चा विजयी जल्लोष! पुरुष गटातील अंतिम सामन्यात पश्चिम रेल्वेने महाराष्ट्र पोष्टवर २४-१८ असा ६ गुणांनी विजय मिळवत थरारक यश संपादन केले. महाराष्ट्र पोष्टने नाणेफेक जिंकून आक्रमणाची निवड केली; मात्र पश्चिम रेल्वेच्या शिस्तबद्ध संरक्षणापुढे त्यांचा डाव कोसळला. विजयी पश्चिम रेल्वेच्या वृषभ वाघ (२.४५ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी अष्टपैलू खेळ सादर करत संघाला भक्कम आधार दिला. राहूल मंडल (२ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी संरक्षणात भिंत उभी केली, तर आदित्य गणपुले (१.५० मि. संरक्षण व २ गुण), मजहर जमादार (१.१० मि. संरक्षण व ४ गुण), निखील सोडये (नाबाद १ मि. संरक्षण व २ गुण), अमित पाटील (२.१० मि. संरक्षण) आणि विजय शिंदे (१.२० मि. संरक्षण) यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत विजयावर शिक्कामोर्तब केले. पराभूत महाराष्ट्र पोष्टच्या अक्षय मासाळ (१.५० मि. संरक्षण व २ गुण), लक्ष्मण गवस (१ मि. संरक्षण व ४ गुण), प्रतिक देवारे व सनी तांबे (प्रत्येकी १.३० मि. संरक्षण व २ गुण), हर्षद हातनकर (१.२० मि. संरक्षण व २ गुण) आणि प्रज्ञेश पाटील (४ गुण) यांनी दिलेली झुंजार लढत कौतुकास्पद ठरली. सामन्यावर पंच प्रमुख म्हणून देवेंद्र बर्डे यांनी जबाबदारी पार पाडली. तृतीय क्रमांकासाठी चुरशीची लढत पुरुषांच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात बँक ऑफ इंडियाने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा ३०-२८ असा अत्यंत अटीतटीच्या सामन्यात पराभव करत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या लढतीने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवली होती. वैयक्तिक पुरस्काराचे मानकरी ठरलेले तारे पुरुष गट •            उत्कृष्ट संरक्षण : राहूल मंडल (पश्चिम रेल्वे) •            उत्कृष्ट आक्रमक : लक्ष्मण गवस (महाराष्ट्र पोष्ट) •            अष्टपैलू खेळाडू : वृषभ वाघ (पश्चिम रेल्वे) महिला गट •            उत्कृष्ट संरक्षण : पायल पवार (Mumbai…

विहंगच्या विजयात संदीपची चमक

विहंगच्या विजयात संदीपची चमक ठाणे : डावखुरा मध्यमगती गोलंदाज संदीप यादवच्या प्रभावी माऱ्यामुळे विहंग इंटरप्राइजेस संघाने टिम वर्क स्पोर्ट्स मॅनेजमेंट संघावर सात विकेट्सनी दणदणीत विजय मिळवत सुवर्ण महोत्सवी ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या क गटात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सुनीलने सात धावांत चार बळी मिळवून प्रतिस्पर्ध्यांना ६६ धावांवर रोखले. त्यानंतर विजयी संघाने ३ बाद ६८ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या टिम वर्क स्पोर्ट्स मॅनेजमेंट संघाच्या एकाही फलंदाजाला संदीपसह शुभम शेवाळे आणि लोहित सुराणाने खेळपट्टीवर टिकू दिले नाही. वेदांत सिंगने सर्वाधिक १५ धावा बनवल्या. तर आनंदराव भोईटेने ११ धावा केल्या. शुभम आणि लोहितने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. त्यानंतर जितेंद्र देशमुखने नाबाद २७ आणि सुधीर यादवने नाबाद १४ धावांची भर टाकली. प्रथमेश कदम आणि फरहान खानने प्रत्येकी १३ धावांची खेळी केली. या डावातील तिन्ही बळी विश्वदीप जाधवने मिळवले. संदीप यादवला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. संक्षिप्त धावफलक : टिम वर्क स्पोर्ट्स मॅनेजमेंट: १९.४ षटकात सर्वबाद ६६ (वेदांत सिंग १५, आनंदराव भोईटे ११, संदीप यादव ५-२-७-४, शुभम शेवाळे ४-११-२, लोहित शर्मा २.४-४-२) पराभूत विरुद्ध विहंग इंटरप्राइजेस : १३.२ षटकात ३ बाद ६८ (जितेंद्र देशमुख नाबाद २७, सुधीर यादव नाबाद १४, प्रथमेश कदम १३, फरहान खान १३, विश्वदीप जाधव ७-१-२९-३).

पी. एम. बाथतर्फे जिल्हा कॅरम स्पर्धेचे आयोजन

पी. एम. बाथतर्फे जिल्हा कॅरम स्पर्धेचे आयोजन मुंबई :  पीएमबाथ अँड बोट क्लब ट्रस्टच्यावतीने आणि मुंबई जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने चर्नी रोड २८ फेब्रुवारी व १ मार्चला मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी मुंबई जिल्ह्याला संलग्न असलेल्या क्लब मार्फत खेळाडूंनी आपली नावे शुक्रवार २० फेब्रुवारीपर्यंत सायंकाळी ६ ते ८ दरम्यान महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, शिवाजी पार्क, दादर येथे नोंदवावीत.

भाषा गौरव दिनानिमित्त ‘चित्रउत्सव अभिजात मराठीचा’

भाषा गौरव दिनानिमित्त ‘चित्रउत्सव अभिजात मराठीचा’ ‘सुंदरा’ फेम मीना नेरुरकर यांचा कलाश्रमच्या उपक्रमात सहभाग अभिनेते राजा परांजपे यांना अभियान सन्मान पुष्पात नृत्यांजली अर्पण ‘कलाश्रम’ या संस्थेच्या वतीने प्रत्येक महिन्याला ‘अभियान सन्मान’ हा उपक्रम राबवला जातो. यंदा या फेब्रुवारी महिन्यात होणारे हे ७४ वे पुष्प आहे. स्वातंत्र्यसैनिक डॉ. पशुराम पाटील कला केंद्राच्या अंतर्गत ही संस्था कार्य करते. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम डॉ. मीना नेरुरकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका, नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शिका अशी त्यांची ओळख आहे. शुक्रवार, २७ मार्च ‘मराठी भाषा गौरव दिनी’ सायंकाळी ४ वाजता. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर चौथा मजला, चित्रकला दालन, प्रभादेवी येथे हा कार्यक्रम होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात दिवंगत झालेल्या प्रज्ञावंतांचे स्मरण आणि तसे कार्य करणाऱ्या गुणीजनांना ‘दखलपत्र’ देऊन त्यांचा सन्मान करणारा हा उपक्रम असतो. नटवर्य प्रभाकर पणशीकर यांची पत्नी आणि नाट्यसंपदा संस्थेचे व्यवस्थापन जबाबदारी स्वीकारणाऱ्या दिवंगत विजया पणशीकर, चित्रकार, सजावटकार वसंत तोडणकर, वृत्त निवेदक, लेखक अनंत भावे या दिवंगतांचे स्मरण यावेळी केले जाणार आहे. यांच्या नावाचे ‘दखलपत्र’ सुप्रिया प्रोडक्शन या नाट्यसंस्थेला गती देणाऱ्या अनिता चव्हाण, चित्रकार, सजावटकार प्रकाश लहाने, वृत निवेदक, पत्रकार विशाल पाटील, ज्या गिरणी कामगार पुत्राने कलेच्या प्रांतात यश मिळवले आहे. त्यांना ‘अव्वल पुरस्कार’ देऊन गौरवांकित करण्यात येते. रोख रक्कम, दखलपत्र असे त्याचे स्वरूप असते. दिवंगत आदर्श श्रमिक पांडुरंग परब, आदर्श गृहिणी रुक्मिणी परब यांच्या नावाचा हा मान यंदा  रंगभूषा, प्रकाश योजना, नेपथ्यकार सुनील देवळेकर यांना प्राप्त झालेला आहे. परब यांचे सुपुत्र, ज्येष्ठ रंगकर्मी अशोक परब यांचे मार्गदर्शन या पुरस्काराला लाभलेले आहे.  प्रत्येक महिन्याला महाराष्ट्राचे नाव उज्वल करणाऱ्या प्रज्ञावंतांना प्रत्यक्ष कलाकृती सादर करून आदरांजली वाहिली जाते. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते राजा परांजपे यांना निवृत्त पोलीस अधिकारी, गायक हरिश्चंद्र ठोंबरे आणि नृत्यांगना अनघा देसाई ‘बाई मी विकत घेतला शाम’ या गाण्यावरती भावमुद्रा सादर करून नृत्यांजली अर्पण करणार आहेत. २७ फेब्रुवारी ‘मराठी भाषा गौरव दिन’चे निमित्त घेऊन संस्थेने ‘चित्रउत्सव अभिजात मराठीचा’ या ६७ व्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. चित्रपट निर्माते, पर्यावरण तज्ञ, संपादक डॉ. किशोर भोईर यांच्या स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन ही स्पर्धा आयोजित केली आहे. डॉ. कामिनीदेवी भोईर यांचे मार्गदर्शन या स्पर्धेला लाभले आहे. लेखक, दिग्दर्शक, निर्माते सतीश रणदिवे हे या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ यावेळी होणार आहे. ज्योती शिंदे, शेजल जाधव, मानसी धारप, रोहन वानखेडे, सुजाता गोलटकर, सलोनी बोरकर, मृण्मयी मोडक आदींचा या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे. नंदकुमार पाटील हे या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आहेत तर नंदिनी पाटील या संचालिका आहेत.

  वंचित, गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

महाराष्ट्र चाईल्ड डेव्हल्पमेन्ट लेबर वेल्फेअरच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त वंचित, गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ठाणे – महाराष्ट्र चाईल्ड डेव्हल्पमेन्ट लेबर वेल्फेअरच्या वतीने २५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वंचित, गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप  ठाण्यातील शेठ एनकेटी हॉल, खारकर आळी या ठिकाणी करण्यात आले. गेल्या २४ वर्षापासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड इ. जिल्ह्यातील व तालुक्यातील आदिवासी, मागासवर्गीय, भटके-विमुक्त जाती जमाती, बालमजूर, निराधार, अनाथ, आणि बालसुधारगृहातील गरीब व गरजू मुलामुलींसाठी विनामूल्य शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संस्था राबवीत आहे. यावर्षी देखील ३००० मुलामुलींसाठी विनामूल्य शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम (गणवेश, नोटबुक, चप्पल-बूट, बॅग, पाटी-पेन्सील, कंपास पेटी, पेन, व इत्यादी शैक्षणिक साहित्य) आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ऍड. निरंजन डावखरे हे उपस्थित होते. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे उद्घाटन  डावखरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. या प्रसंगी महाराष्ट्र चाईल्ड डेव्हल्पमेन्ट लेबर  वेल्फेअरचे   चेअरपर्सन बुधाजी पाटोळे, सुरेखा राऊत, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी मनीषा झेंडे, चाईल्ड लाईन हेल्पच्या सोनाली पुफळा, प्रियेश साबळे पाटील, बालाजी इंजिनियरिंगचे सर्वेसर्वा प्रीतम रॉय आणि ठाणे जिल्हा, मुंबई जिल्हा,पालघर जिल्हा, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील बालशिक्षण सुधार केंद्रातील व शाळांतील शिक्षक कर्मचारी तसेच महाराष्ट्र राज्य विधवा व निराधार श्रमिक महिला संघटनेचे अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते आदिवासी, मागासवर्गीय, गरजु व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.या कामामध्ये प्रकल्पाचे सर्वेसर्वा प्रियेश साबळे पाटील यांचा मोठा वाटा असून अतिशय मोलाचे योगदान आहे. त्यांच्या अनुषंगाने आणि अथक प्रयत्नाने २०२१ पासुन या प्रकल्पाने आतापर्यंत १ करोड ८२ लाख मुला मुलींची शिक्षणाची विनामूल्य सेवा केली असून या सर्वे मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला.

संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त दिव्यात गोरबंजारा समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती

संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त दिव्यात गोरबंजारा समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती दिवा- संत सेवालाल गोर बंजारा समिती (दिवा) यांच्या वतीने संत सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. प्रेरणा टॉवर, दिवा महोत्सव मैदानाजवळ, दिवा शिळ रोड (पूर्व) येथे रविवारी सायंकाळी आयोजित या कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर गोरबंजारा समाजाने संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमा रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण दिव्यात फिरवण्यात आली. तसेच भोग विधी कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता संपन्न झाला. उपस्थितांनी संत सेवालाल महाराज यांच्या विचारांचे स्मरण करत सामाजिक ऐक्य व बांधिलकी जपण्याचा संकल्प केला. संत सेवालाल गोरबंजारा समिती (दिवा) कमिटी अध्यक्ष शंकर पवार, सचिव तारासिंग पवार, खजिनदार मिथुन आडे, तर कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार राजेश मोरे, माजी आमदार सुभाष भोईर, शिवसेना दिवा शहर प्रमुख, नगरसेवक रमाकांत मढवी, नगरसेवक शैलेश पाटील, स्नेहा अमर पाटील, नगरसेविका दर्शना म्हात्रे, विभाग प्रमुख भालचंद्र भगत, समाजसेवक कैलास भगत, बालाजी कदम उपस्थित होते. त्यावेळी प्रमुख अतिथी चंदर राठोड, वासु सेठ राठोड, बाबू राठोड, देविदास राठोड हे सर्व मान्यवरांनी उपस्थीती दाखवून जयंती कार्यक्रमाचा आनंद घेतला. त्यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विजय पवार, प्रविण राठोड, लक्ष्मण चव्हाण, रामदास चव्हाण, रमेश राठोड, रामेश्वर पवार, चंदू चव्हाण, गुंडू राठोड, शंकर राठोड, श्याम राठोड, गणेश पवार, संतोष पवार, रमेश राठोड, वशिया राठोड, रामू राठोड, रामदास चव्हाण तसेच संत सेवालाल महाराज गोरबंजारा समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.