Author: bittambatami.com

विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यामधील भावनिक नातेसंबंधांचा स्नेहपूर्ण समन्वय ही काळाची गरज – डॉ. आनंद नाडकर्णी 

विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यामधील भावनिक नातेसंबंधांचा स्नेहपूर्ण समन्वय ही काळाची गरज – डॉ. आनंद नाडकर्णी अनिल ठाणेकर ठाणे: विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये भावनिक नाते संबंध यांचा स्नेहपूर्ण समन्वय असणे ही काळाची गरज आहे. शाळा, शाळेची इमारत व परिसर यांच्याबद्दल एक घट्ट नाते विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये निर्माण झालेले असते. सरस्वती सेकंडरी शाळेच्या “पेरणी ते कापणी” शेती प्रकल्पाचे कौतुक करताना प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी यांनी सांगितले. या समारंभास, शाळेचे माजी विश्वस्त आणि मुख्याध्यापक अशोक टिळक, मनिषा टिळक, विश्वस्त विकास दामले, विश्वस्त अनुराधा आपटे, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरस्वती मंदिर ट्रस्टच्या  विमला कर्वे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने प्रतिवर्षी विमला कर्वे स्मृतीव्याख्यान आयोजित करण्यात येते. यंदाचे हे अकरावे वर्ष होते.विमला कर्वे यांनी ६ जून १९५२ रोजी प्राथमिक शाळा सुरू केली. ६ जून २०२६ ते ६ जून २०२७ हे शाळेचे ‘ अमृत महोत्सवी वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येणार आहे. अमृत महोत्सवी वर्ष शुभारंभाची मुहूर्तमेढ विमला कर्वे यांच्या स्मृतिदिन समारंभाचे औचित्य साधून रोवली गेली. या कार्यक्रमात प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी यांची ‘प्रकट मुलाखत,शाळेची माजी विद्यार्थिनी हर्षदा बोरकर यांनी डॉक्टरांची मुलाखत घेतली.  यावेळी बोलताना डॉक्टरांनी असे सांगितले की, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये भावनिक नाते संबंध यांचा स्नेहपूर्ण समन्वय असणे ही काळाची गरज आहे. शाळा, शाळेची इमारत व परिसर यांच्याबद्दल एक घट्ट नाते विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये निर्माण झालेले असते. सरस्वती सेकंडरी शाळेच्या “पेरणी ते कापणी” शेती प्रकल्पाचे कौतुक करताना त्यांनी सांगितले, विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता शिक्षकांनीही समृद्ध आणि परिपूर्ण होणे गरजेचे आहे. तसे प्रयत्न करून शिकविल्यास शाळेतून सर्वांगीण विकास होऊन विद्यार्थी बाहेर पडेल आणि बाहेरील जगाच्या महाकाय व्यवस्थेशी तोंड देऊन यशस्वीपणे जीवन व्यतीत करु शकेल. यासाठी जसे दाणेदार पीक हाताशी येण्यासाठी पेरणी आणि कापणी  या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पूर्वीचा काळ आणि आताचा काळ यामध्ये खूपच फरक आहे. आज समाजामध्ये विविध प्रकारचे तणावयुक्त जीवन माणसे जगत आहेत. अशावेळी त्या तणावापासून मुक्त होण्यासाठी विविध मानसिक आणि भावनिक गोष्टीची जोड देऊन त्यावर काम करणे काळाची गरज आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विमला कर्वे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी विश्वस्त सुरेन्द्र दिघे यांनी केले. यावेळी बोलताना श्री. दिघे सरांनी दोन्ही माध्यमातील शाळा मधील  “विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या मध्ये स्नेहपूर्ण  संबंध  रुजवणे आणि जोपासणे हे अमृत वर्षाचे वैशिष्ट्य असणार आहे. स्नेह – संवाद आणि सन्मान हे त्रिसूत्र  हे अमृत वर्षाचे ब्रीदवाक्य असणार आहे. शाळेच्या विभागवार झालेल्या शालेय समितीत घेतलेल्या निर्णयाला अनुसरून विश्वस्त मंडळाने मराठी शाळा याच इमारतीत राहिल  आणि सीबीएससी शाळा नवीन तयार होत असलेल्या इमारतीत नवीन शैक्षणिक वर्षांपासून सुरू होईल. सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्यविकास, विज्ञान तंत्रज्ञान अशा अनेक गोष्टी विविध उपक्रमांद्वारे शिकविल्या जातील. सरस्वती सेकंडरी स्कूलचे मुख्याध्यापक भरत खोटरा यांनी आभार मानले आणि  कार्यक्रमाची सांगता झाली.

‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने नवी मुंबईतील गुरुद्वारा प्रमुखांशी आयुक्त डॉ.कैलास‍ शिंदे यांचा संवाद

‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने नवी मुंबईतील गुरुद्वारा प्रमुखांशी आयुक्त डॉ.कैलास‍ शिंदे यांचा संवाद अशोक गायकवाड नवी मुंबई : २८ फेब्रुवारी व १ मार्चला सेक्टर २९ खारघर ओवे मैदान येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपन्न होणाऱ्या ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त संपूर्ण जगभरातून मोठया संख्येने लक्षावधी नागरिक उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्वोतोपरी सेवा सुविधा पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गुरुव्दारांच्या प्रमुख पदाधिकारी यांची विशेष बैठक महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयातील विशेष समिती सभागृहात संपन्न झाली. याप्रसंगी हिंद-दी-चादर कार्यक्रमाचे नमुंमपा मुख्य समन्वय अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, परिवहन व्यवस्थापक योगेश कडुस्कर, परिमंडळ १ उपआयुक्त सोमनाथ पोटरे, वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, शिक्षणाधिकारी अशोक कडुस, उपमुख्य अग्निशमन अधिकारी पुरूषोत्तम जाधव आणि इतर अधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गुरुव्दारांचे प्रमुख पदाधिकारी तेजिंदर सिंग (वाशी), इंद्रपाल भाटीया (कोपरखैरणे), सतनाम सिंग(कोपरखैरणे), मनजित सिंग (सानपाडा), इंद्रजित सिंग(तुर्भे-सानपाडा) हे प्रत्यक्ष सभागृहात व जसपाल सिंग सिध्दू (सीबीडी बेलापूर), मेहेरसिंग रंधवा व अम्रपालसिंग रंधवा (ऐरोली) हे दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित होते. या बैठकीची सुरुवात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनकालावर आधारित सुप्रसिध्द गायक सतिंदर सरताज यांनी गायलेल्या भक्तीगीताने करण्यात आली. त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.४२ घणसोली येथे इयत्ता ४ थी मध्ये शिकणारी विदयार्थिंनी कु.कलिना दास हिने गायलेल्या याच भक्तीगीताचे प्रसारण करण्यात आले. सध्या हे भक्तीगीत सोशल मिडीयाच्या विविध डिजीटल प्लॅटफॉर्मवरुन सर्वदूर लोकप्रिय झाले आहे. बैठकीस उपस्थित गुरुव्दाराच्या प्रमुखांनीही या लहान मुलीचे भरभरुन कौतुक केले. याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कार्यक्रमाची व्यापक प्रचार व प्रसिध्दी करण्यास सुरुवात झाली असल्याचे सांगितले व महानगरपालिकेमार्फत आयोजित विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. या अंतर्गत शाळांमध्ये दररोज सकाळी भक्तीगीत प्रसारण, डॉक्युमेंटरी प्रसारण तसेच प्रभात फेरी, निबंध –वक्तृत्व-चित्रकला-गायन-वाचन-घोषवाक्य अशा विविध स्पर्धांचे भव्यतम स्वरुपात आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १.७५ लाखाहून अधिक विदयार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. याशिवाय आरोग्य विभागामार्फत ठिकठिकाणी १२४ आरोग्य शिबीरांचे नियोजन करण्यात आले असून आतापर्यंत झालेल्या ५० शिबीरांमधून ७७३६ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतलेला आहे. तसेच दररोज लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात येत असून ११ फेब्रुवारीपासून २२ ठिकाणी झालेल्या स्वच्छता मोहीमांमध्ये ३९३८ नागरिकांनी व एनएसएस विदयार्थ्यांनी महापालिका अधिकारी, कर्मचारी व स्वच्छताकर्मींसमवेत सहभाग घेतला आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रात १४ मोठे डिजीटल होर्डिंग, ६ मोठे स्थिर होर्डिंग्ज तसेच ८० फ्लेक्स होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे बसस्टॉपवरही बॅनर्सव्दारे प्रसिध्दी करण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रातील ५ मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये २९ स्क्रिनवर शोच्या आधी सतिंदर सरताज यांचे भक्तीगीत प्रसारित करण्यात येत आहे. कार्यक्रमास मोठया संख्येने जनसमुदाय येणार असल्याने महानगरपालिकेने २ हजारहून अधिक नागरिकांची निवासव्यवस्था, ये-जा करण्यासाठी बसेस व्यवस्था, वैदयकीय आरोग्य व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था, शौचालय व्यवस्था, पिण्याचे पाणी व्यवस्था अशी विविध व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली. याप्रसंगी गुरुव्दारा प्रतिनिधींकडून आलेल्या सूचना जाणून घेण्यात आल्या व त्यांची त्वरित अंमलबजावणी करावी असे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवी मुंबई महानगरपालिका संपूर्ण सहकार्य करेल असा विश्वास देत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी याबाबतच्या कोणत्याही प्रकारच्या कामासाठी नवी मुंबई महानगरपालिकेशी थेट संपर्क साधावा असे आवाहन उपस्थित गुरुव्दारा प्रमुखांना केले.

केडीएमसीत मालमत्ता कर व पाणीपटटीची अभय योजना विचाराधीन नाही

केडीएमसीत मालमत्ता कर व पाणीपटटीची अभय योजना विचाराधीन नाही कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील करदात्यांस मालमत्ता कराची देयके यापूर्वीच बजावण्यात आलेली आहेत. मालमत्ता कराच्या रक्कमा विहित मुदतीत महापालिकेत जमा…

 ई चलनमध्ये प्रचंड घोळ

ई चलनमध्ये प्रचंड घोळ दंडवसुलीच्या नावाने वाहनधारकांची बेकायदेशीर लूट ५ मार्चपासून वाहतूकदारांचे राज्यव्यापी आंदोलन ठाणे : मोटार वाहन विभाग व पोलीस दलाकडून महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणारी ई-चलन व्यवस्थाच म्हणजे वाटमारी…

  भाजपाचे ‘सबका साथ, सबका विकास’ थोतांड

भाजपाचे ‘सबका साथ, सबका विकास’ थोतांड मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे जुने निर्णय रद्द करण्याची भाजपा सरकारची कृती लोकशाहीसाठी घातक – वर्षा गायकवाड मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य…

 डोंबिवली-मुंबईत बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघड

डोंबिवली-मुंबईत बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघड उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या जीवाशी खेळ मानपाडा पोलिसांकडून दोन वितरक गजाआड बनावट टेल्मा एएमबीपीच्या टॅबलेट विक्री करणारी टोळी गजाआड कल्याण: उच्च रक्तदाबासाठी वापरल्या जाणाऱ्या टेल्मा…

  जलसंवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम

जलसंवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम मुंबई महानगर प्रदेशात एकंदर ६७ ठिकाणी प्रोजेक्ट अमृतचे आयोजन कल्याण : संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या…

  टिटवाळ्यात नियंत्रण सुटलेल्या ट्रकचा थरार

टिटवाळ्यात नियंत्रण सुटलेल्या ट्रकचा थरार अनेक वाहनांना दिली जोरदार धडक कल्याण: टिटवाळा पूर्वेकडील असलेल्या मुख्य गणेश मंदिर रोडवर बुधवारी सकाळी ११च्या दरम्यान भीषण अपघाताची घटना घडली. एका मोठ्या मालवाहू ट्रकने…

शिवजन्मोत्सवनिमित्त आज शिवसन्मान ज्योत यात्रा

शिवजन्मोत्सवनिमित्त आज शिवसन्मान ज्योत यात्रा ठाणे – शिवजन्मोत्सवनिमित्त शिव सन्मान ज्योत यात्रा २०२६ चे आयोजन सकल मराठा समाज, ठाणे व मराठा क्रांती मोर्चा, ठाणे यांच्या वतीने गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी करण्यात…

२१ फेब्रुवारीला नवलेखक कार्यशाळेचे आयोजन  

२१ फेब्रुवारीला नवलेखक कार्यशाळेचे आयोजन ठाणे: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व अनघा प्रकाशन, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून एक दिवसीय नवलेखक कार्यशाळेचे (कवितालेखन) आयोजन…