Author: bittambatami.com

 कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील सीआरझेड, आरआरझेड क्षेत्राच्या ऱ्हासाला पायबंद कधी बसणार?                              

कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील सीआरझेड, आरआरझेड क्षेत्राच्या ऱ्हासाला पायबंद कधी बसणार? कांदळवनांचा वाढता ऱ्हास कधी थांबणार ? कल्याण : कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात सीआरझेड आरआरझेड क्षेत्राचा वाढता ऱ्हास पाहता यावर प्रशासनाने कठोर पायबंद घालत हे क्षेत्र संरक्षित करणे गरजेचे आहे. गेली आठ वर्षात प्रशासकीय राजवटीत सीआरझेड, आरआरझेड क्षेत्रात झालेले अनाधिकृत भराव आणि कांदळवनाच्या ऱ्हासाचा फटका पाहता प्रशासनाने सीआरझेड, आरआरझेड क्षेत्राची कठोर अमंलबजावणी केली पाहिजे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रफळ ६७.६५ चौ.कि.मी. अंदाजे, भौगोलिक परिस्थिती समुद्र सपाटीपासून ० ते २० मीटर उंच तीन बाजूंनी खाडी यामध्ये  बारावे जंक्शन जवळील कल्याण खाडी, ते मोठागाव खाडी परिसर असा मोठा परिसर उल्हास खाडी  सीआरझेड  अंतर्गत समावेश आहे. तर कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात  उल्हास नदी, काळूनदी, वालधूनी नदी यादेखील बारावे जक्शंन जवळ कल्याण खाडीला येऊन मिळतात. कल्याण-डोंबिवली मनपा परिसरातील सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) आणि आरआरझेड (रिव्हर रेग्युलेशन झोन) संबधित नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसत असून कल्याण-डोंबिवली हा भाग खाडीच्या जवळ असल्याने येथे सीआरझेड नियम लागू होतात. डोंबिवलीतील कोपर, आयरे आणि मोठागाव या खाडी नजीकच्या भागांत सीआरझेड, उल्लंघन करून चाळी बांधल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. भूमाफियांनी खाडीकिनारच्या  भागात भराव टाकून अतिक्रमण केले असून, त्यावर कारवाईसाठी पर्यावरण प्रेमी सातत्याने मागणी करत आहेत. शहारातील जमिनी संपल्याने अनधिकृत बांधकामदारांनी आता आपला मोर्चा खाडीकिनारी वळवला आहे. या अनधिकृत बांधकामासाठी खाडी किनारच्या खारफुटीच्या झाडांची तोड सुरु असून ‘पर्यावरणाला यातून धोका निर्माण होत आहे. खारफुट अर्थात खाडीकिनारच्या जमीनीवर असणाऱ्या वृक्षांना पर्यावरणाच्या दृष्टीने भरपूर महत्व आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या वृक्षांची आवश्यकता असते. या सीआरझेड क्षेत्रातील कांदळवन दलदलीच्या भागावर भूमाफिया यांची वक्र दृष्टीमुळे अनाधिकृत भराव करीत बांधकामाची जागा निर्माण करायला या ठिकाणी असणाऱ्या खाडी किनारच्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होत आहे. तर काही ठिकाणी विकासकामांच्या कॉंक्रीटीकरणामुळे कांदळवनांना फटका बसल्याने खारे पाणी येत नसल्याने कांदळवने बाधित होत आहेत. या वृक्ष तोडीकडे प्रशासनाने योग्य लक्षपुरवून कारवाई करत नसल्याने या वृक्षतोडीला आळा बसत नाही. ग्रामीण भागत नव्हे तर शहरी विभागातील अशा खारफुटीच्या झाडांची मोठया प्रमाणात तोड झाल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या या खारफुटीच्या तोडीने विविध आपत्तींना तोंड देण्याची वेळ यायची संभवाना असून प्रशासन येथे जातीने दुर्लक्ष करत आहे. वास्तविक पाहता कोणताही वृक्ष तोडण्यास रितसर परवानगी घेणे गरजेचे असते. परंतु खाडी किनारी भागात या वृक्षांची खुलेआम कत्तल करुन चाळी वा तत्सम अनधिकृत बांधकामे उभारली जात आहेत. खाडी किनारी संरक्षित करुन हरित पट्ट्याचे जतन करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु आर्थिक गणितातून या खाडी किनारी असणाऱ्या खारफुटीची कत्तल होत असल्याची चर्चा आहे.  तसेच अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती, हाय टाईड यावेळेस कांदळवन क्षेत्रातील खारफुटी ही पाण्याचा वाहता प्रवाह इतरत्र  पसरण्यापासून रोखण्यासाठी नैसर्गिक स्त्रोत्र असल्याचे जाणकार सांगतात त्यामुळे खारफुटीचे संवर्धन काळाची गरज आहे.         आता तरी प्रशासनाने डोळसपणे कारवाईचा बडगा उगरित खारफुटीची झाडे वाचवून खाडी किनारी संवर्धन केले पाहिजे व पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे अशी मागणी जोर धरु पाहत आहे. “खारफुटीच्या वृक्षतोडीच्या तक्रारी आम्ही मुंबई कांदळवन कक्षकडे वर्ग करतो असे वृक्ष प्राधिकरणाचे क.डों.म.पा अधिकारी संजय जाधव यांनी सांगितले.” तर नदी किनारी भागात देखील किनाऱ्यालगत भराव, नदी किनाराचा नैसर्गिक समतोलला बाधा आणित खोदकाम करीत मातीच्या नैसर्गिक उंचवटे यांचे सपाटीकरण  याबाबत प्रशासनाने दक्ष राहिले पाहिजे, तसेच नदी किनारा जवळील बांधकामा बाबत नियमावलीचे काटेकोर पालन याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. “याबाबत पर्यावरण दक्षता मंडळ व्यवस्थापक रूपाली शाईवाले यांच्याशी संपर्क साधला असता कांदळवन वाढता ऱ्हास संदर्भात सांगितले की, सातपूल जेटी कुभंरखाण पाडा, खाडी परिसर, जुनी डोंबिवली, खाडीपरिसर कोपर खाडीपरिसर, भोपर खाडी परिसर या परिसरात कांदळवन अजूनही अस्तित्वात असून या संदर्भीत परिसरात विकास कामे करताना  कांदळवनाचा ऱ्हास होणार नाही याकडे लक्ष देत खारफुटी चे संवर्धन करीत या परिसरात पाणथळ, दलदलीच्या ठिकाणी आढळणाऱ्या पक्षांचा अधिवास टिकून राहण्यासाठी, तसेच नैसर्गिक समतोल साधण्यासाठी खारफुटीचे संवर्धन करणे गरजेचे आहे.”

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात ऑनलाईन प्रवेश घेण्यास २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात ऑनलाईन प्रवेश घेण्यास २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ हरिभाऊ लाखे नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ११ विद्याशाखेंतर्गत असलेल्या विविध ८८ शिक्षणक्रमांचे शैक्षणिक सत्र जानेवारी २०२६ करीता नवीन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश घेण्यास येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच जानेवारी २०२५ या सत्रात ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षास प्रवेश घेतलेला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी द्वितीय वर्षाचीही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण व विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम, बी. एड. (सेवांतर्गत), बी. एड. (विशेष) तसेच विज्ञान विद्याशाखेच्या शिक्षणक्रमांव्यातिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांसाठी ही प्रवेश प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांना नियमित पदवी सोवत दूरशिक्षणाद्वारे अधिकची एक पदवी विनाविलंब शुल्कासह घेता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी दिली आहे. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापनेपासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजातील विविध घटकातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. त्यातून अनेक विद्यार्थी प्रशासकीय व खाजगी संवेत उच्चपदावर कार्यरत आहेत. मानाची पदे भूषवत आहेत. हे विद्यापीठ सर्वसामान्य ते विशेष पारंगत अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचे प्रवेशद्वार ठरत आलेले आहे. येथे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख तसेच वेब रेडिओ, दृकश्राव्य माध्यम व मोबाईलद्वारे देखील मार्गदर्शन केले जाते. दोन वेळा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित, दूरशिक्षण क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य यूजीसी मान्यताप्राप्त व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचलेले एकमेव मुक्त विद्यापीठ आहे. विद्यापीठातर्फे सेनादल सैनिक, बंदीजन, कृषि सेवक, शेतमजूर आणि समाजातील इतरही घटक यांच्यासाठी विशेष शिक्षणक्रम आहेत. शिवाय ए.आय. डाटा सायन्स, सायबर ॲक्ट ते बीए, बीकॉम, एम. ए., एम. कॉम., एम. लिब., एम. सी. ए. यासह विविध व आधुनिक कौशल्य विकासाचे प्रमाणपत्र, पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. हे सर्व शिक्षणक्रम नोकरदारांना आपली नोकरी व व्यवसायिकांना आपला व्यवसाय सांभाळून पूर्ण करता येतात. त्यामुळे संबंधित इच्छुकांना आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची व सर्वार्थाने प्रगती साधण्याची संधी उपलब्ध होत आहे. त्या अनुषंगाने दिनांक २० जानेवारीपासून विद्यापीठाच्या ११ विद्याशाखेंतर्गत विविध ८८  शिक्षणक्रमांचे ऑनलाईन प्रवेश सुरु करण्यात आले आहेत. त्यात प्रमाणपत्र – ३२, पदविका – ३०, पदवी – ११ व पदव्युत्तर १५ शिक्षणक्रमांचा समावेश आहे. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही फक्त ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्र्माचे शुल्क देखील ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल. प्रवेशासाठीची मुदतवाढ ही येत्या दिनांक २८ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या विहित मुदतीत विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac  या वेबसाईटला भेट द्यावी. तेथे Admission  या पर्यायावरून Prospectus येथे विविध शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिका उपलब्ध आहेत. काही तांत्रिक अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत (०२५३)२२३०५८०, २२३१७१५, २२३०१०६, २२३१७१४ या विद्यार्थी मदत केंद्रावरील दूरध्वनी क्र्मांकावर किंवा ९३०७५७९८७४, ९३०७५६७१८२ अथवा ९२७२०४६७२५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा आणि लवकरात लवकर प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे व विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांनी केले आहे.

कोपरखैरणे विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई; २० हजारांचा दंड वसूल

कोपरखैरणे विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई; २० हजारांचा दंड वसूल नवी मुंबई महानगरपालिकाच्या अतिक्रमण विभागामार्फत कोपरखैरणे विभागात अनधिकृत बांधकामांवर धडक निष्कासन कारवाई करण्यात आली. ही कारवाई आयुक्त डॉ. कैलास शिंदे…

  शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मोहन्यात पार पडला रोजगार मेळावा

शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मोहन्यात पार पडला रोजगार मेळावा तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी नगरसेवक राहुल कोट यांचा पुढाकार कल्याण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कल्याण-डोंबिवली महानगरपालिका व लाईटहाउस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या सहकार्याने आम्ही सेवेकरी सामाजिक संस्था, मोहोने अध्यक्ष नगरसेवक राहुल कोट  यांच्या वतीने आंबिवली पूर्वेतील मोहने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नालंदा बौद्ध विहार याठिकाणी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन आज मंगळवारी करण्यात आले होते. नगरसेवक राहुल कोट यांच्या पुढाकाराने हा रोजगार मेळावा पार पडला. सद्ध्याच्या तरुणाईला रोजगाराचा प्रश्न भेडसावत असून तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचे आश्वासन नवनिर्वाचित नगरसेवक राहुल कोट यांनी निवडणुकीत दिले होते. नागरिकांना दिलेले वचन पूर्ण करत या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात १०वी, १२वी, पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग आदी शैक्षणिक पात्रता असलेल्या फ्रेशर व अनुभवी उमेदवारांनी सहभाग घेतला. या उमेदवारांना मॅन्युफॅक्चरिंग, कंपनी वर्कर, ऑफिस, बॅक ऑफिस, डेटा एंट्री, बीपीओ, कॉल सेंटर, सेल्स, मार्केटिंग, हॉस्पिटल, हेल्थकेअर, सिक्युरिटी सर्व्हिसेस, ड्रायव्हर, हेल्पर, फील्ड जॉब, आयटी, कॉम्प्युटर, आयटीआय, सोशल मार्केटिंग आदी  संबंधित नोकऱ्या उपलब्ध होत्या. यावेळी माजी आमदार प्रकाश भोईर, नगरसेविका स्वप्नाली केणे, तेजश्री गायकवाड, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कल्याण शहर अध्यक्ष विनोद केणे, माजी नगरसेवक दया शेट्टी, माजी नगरसेविका सुनंदा कोट, माजी नगरसेवक मुकुंद कोट, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना विभाग अध्यक्षा अनिता कोट आदी मान्यवर उपस्थित होते. लाईटहाउस कम्युनिटीज फाउंडेशनचे क्लस्टर हेड निकेश पाटील, सेंटर हेड एकता कदम, प्लेसमेंट मॅनेजर देवा रिकामे, धनंजय काकडे आदींनी या रोजगार मेळाव्याचे नियोजन केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी हेमंत गायकवाड, लक्ष्मण जाधव, रोहित सोनावणे, अमित कोट, संदेश कोट, हरीश जावळे, रिंकू पाटील, जय पाटील, जावेद सय्यद, अरुण कांबळे आदींनी परिश्रम घेतले. या मेळाव्यात २६ कंपन्यांनी सहभाग घेतला. तर २१५ तरुणांनी रोजगार मेळाव्यात मुलाखत दिली. यापैकी मुलाखतींच्या दुसऱ्या फेरीसाठी १०२ उमेदवारांची निवड करण्यात आली. एका विद्यार्थ्याला स्पॉट ऑफर मिळाली. कोटक महिंद्रा बँक, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस, सारशी अभियांत्रिकी प्रायव्हेट लिमिटेड, रेड रोझ गारमेंट्स, पटेल रिटेल मार्ट्झ युनिकेअर हेल्थ केअर इत्यादी कंपन्या उपस्थित होत्या.

स्वीकृत नगरसेवक पदासाठी न्याय मिळेल या प्रतीक्षेत प्रामाणिक कार्यकर्ता

स्वीकृत नगरसेवक पदासाठी न्याय मिळेल या प्रतीक्षेत प्रामाणिक कार्यकर्ता भाजपाचे शहर सरचिटणीस प्रशांत माळी यांचे पक्ष श्रेष्ठींना साकडे कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत 122 नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष स्थायी समिती सदस्य निवड आणि स्वीकृत नगरसेवक निवडीकडे लागले आहे. केडीएमसीमध्ये 10 स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार असून यामध्ये 5 शिवसेना शिंदे गट, 4 भाजपा आणि एक शिवसेना ठाकरे गटाला जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावण्यासाठी प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते आपली ताकद पणाला लावत आहेत. अशातच भारतीय जनता पार्टीतील जुने कल्याण शहर सरचिटणीस प्रशांत माळी यांनी देखील पक्षाकडे स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब, निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी, जुने कल्याण शहर अध्यक्ष अमित धाक्रस यांना पत्र दिले आहे. प्रशांत माळी हे जोशीबाग सारख्या विभागातून जनसंघाचे नेते मुरलीधर पवार यांच्या नेतृत्वाखाली १९९६ शालेय जीवनापासून विद्यार्थी आघाडी, युवा मोर्चा शहर जिल्हा, सचिव, वॉर्ड अध्यक्ष तसेच सध्या भाजपा सरचिटणीस जुने कल्याण शहर या पदावर कार्यरत आहेत. लहानपणापासून भाजीपाला व्यवसाय करीत शालेय जीवन व त्यानंतर पूर्ण वेळ भाजपचे प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत. मधल्या काळात कल्याण (प.) मधील मोठ्या गटबाजीमुळे १ वर्ष पक्षाच्या बाहेर होते. एकदा महापालिकेची उमदेवारी हक्क असतांना ऐनवेळी पक्षात आलेल्या सदस्याला देण्यात आली. मागील वेळेस परिवहन सदस्यच्या वेळी जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या मुलासाठी माघार घ्यावी लागली. या वेळीस ही ओबीसीसाठी प्रभाग क्र. ८ मध्ये उमेदवारी मागितली होती पण बजरंग दलाचे जुने कार्यकर्ता या विभागात इच्छूक असल्यामुळे पक्ष नेतृत्वाने घेतलेला निर्णय मान्य करून त्या प्रभागात प्रामाणिकपणे कार्य केले. केडीएमसी सार्वत्रिक निवडणूकीच्या माध्यमातून केलेले प्रामाणिक कार्य व पक्षवाढीसाठी असलेली ओढ व पक्षाच्या माध्यमातून लोकसेवा करण्याचा मानस या सर्व बाबीकडे विचार करून तसेच सामाजिक शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून केलेले महापालिका क्षेत्रातील लोकहिताच्या कार्याचा सन्मान करून स्वीकृत सदस्यासाठी इच्छूक असलेल्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची मागणी प्रशांत माळी यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीलं पक्ष किती दाद देतो हे पहावे लागेल.

सानपाडा येथे भारत ई सेवा केंद्राचे उद्घाटन

सानपाडा येथे भारत ई सेवा केंद्राचे उद्घाटन मुंबई : नवी मुंबईच्या सानपाडा येथील सेक्टर ११ मध्ये भक्ती रेसिडेन्सी, बँक ऑफ बडोदा जवळ भारत ई सेवा केंद्राचे उद्घाटन नुकतेच प्रभाग १९च्या नवनिर्वाचित नगरसेविका शैला पाटील,  शिल्पा ठाकूर,  नगरसेवक भाऊ भापकर,  सुनील कुरकुटे, समाजसेवक   अजय पवार, श्री तानाजी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर,  नगरसेविका कोमलताई वास्कर, प्रभाग क्रमांक २२चे नगरसेवक अभिजीत देसाई, समाजसेवक मिलिंद सूर्याराव, शुभांगी सूर्याराव, समाजसेवक गणेश पावगे, सानपाडा  ७.५०गार्डन ग्रुपचे रणवीर पाटील,  दत्तात्रय कुरळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे  अध्यक्ष मारुती विश्वासराव, चिटणीस जगदीश एकावडे,  उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे, सीमा बोराडे, संघाचे माजी अध्यक्ष मारुती कदम,  उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे,  सह खजिनदार सुभाष बारवाल, उपाध्यक्षा डॉ. विजया गोसावी, हास्य क्लब गार्डन ग्रुप ६.३० चे भरत खरात, गार्डन ग्रुप ७.०५ चे जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा टोपी, रुमाल आणि तुलसीचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. नगरसेवक भाऊ भापकर आणि समाजसेवक अजय पवार यांनी  विश्वासराव कुटुंबियांच्या विजया इंटरप्राईजेस यांच्यातर्फे महाराष्ट्र सरकार आणि खाजगी सेवा एकाच ठिकाणी चालवल्या जाणाऱ्या सेवाभावी कार्याला शुभेच्छा दिल्या.

दिव्यांग मुलीचे आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण

दिव्यांग मुलीचे आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण मुंबई / रमेश औताडे नागपूर येथील दिव्यांग मुलगी कु. मानवता ऊर्फ बेशिका रवीकांत डोंगरे हिला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आझाद मैदान येथे बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. सोमवार १६ फेब्रुवारी पासून हे आंदोलन सुरू झाले असून विविध सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. “निर्णय झाल्याशिवाय माघार नाही, जिंकलो नाही तर कधीच नाही,” असा निर्धार व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. संबंधित प्रकरणात तातडीने कारवाई करून पीडितेला न्याय द्यावा, अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनस्थळी मानवता हिने हातात आपल्या नातेवाईकाचा फोटो धरून न्यायाची मागणी केली. प्रशासनाने संवेदनशीलतेने या प्रकरणाकडे पाहावे, अशी मागणी केली. आझाद मैदानावरील या उपोषणामुळे पुन्हा एकदा दिव्यांगांच्या हक्कांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

  कोकण रेल्वे दुहेरीकरणासाठी निधीची मागणी

कोकण रेल्वे दुहेरीकरणासाठी निधीची मागणी विलिनीकरण तातडीने पूर्ण करण्याचा प्रस्ताव लोकसभेत सादर राजेंद्र साळसकर नवी दिल्ली : कोकण रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभा नियम ३७७ अंतर्गत सभागृहात मांडली. हा प्रस्ताव लोकसभेच्या पटलावर ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. कोकण रेल्वे ही १९९०च्या दशकात साकारलेली ऐतिहासीक व दूरदृष्टीपूर्ण रेल्वे योजना असून , या प्रकल्पात भारतीय रेल्वेचा ५० टक्के तर उर्वरित संबंधित राज्यांचा   सहभाग होता. मूळ करारानुसार कोकण रेल्वेचे १०वर्षांच्या आत भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण होणे अपेक्षित होते.मात्र तीन दशके उलटून गेल्यानंतरही हे विलिनीकरण अद्याप प्रलंबित आहे. केरळ, कर्नाटक आणि  गोवा या राज्यानंतर हे महाराष्ट्र शासनानेही कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्यास मान्यता दिली आहे.महाराष्ट्र शासनाने “कोकण रेल्वे” हे नाव कायम ठेवण्याची अट घातली होती आणि ती केंद्र सरकारने मान्य केली आहे. सध्या कोकण रेल्वे आपल्या क्षमतेच्या सुमारे  १७५ टक्के वापरात कार्यरत आहे.मात्र स्वतंत्र महमंडळ असल्यामुळे इतर रेल्वे झोनप्रमाणे तिला केंद्राकडून नियमित अर्थसंकल्पीय सहाय्य मिळत नाही.निधीअभावी सुमारे ३५० किलोमीटर  मार्गाचे दुहेरीकरण, भूस्खलन प्रतिबंधक उपाययोजना आणि पायाभूत सुविधांची अत्यावश्यक कामे रखडली आहेत.परिणामी नव्या गाड्या सुरू करणेही शक्य नसल्याचे खासदार वायकर यांनी निदर्शनास आणले. दरम्यान,मुंबई-कोकण मार्गासह संपूर्ण कोकण रेल्वेचे दुहेरीकरण करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून तो मंजुरी प्रक्रियेत आहे.या प्रकल्पात बोगद्यांचे मजबुतीकरण, रूळांचे अद्ययावतीकरण आणि इतर तांत्रिक सुधारणांचा समावेश आहे.टप्प्याटप्प्याने दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर कोकण रेल्वेवरील प्रवासी गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

घरांसाठी १४ कामगार संघटनांच्या वतीने येत्या १० मार्च रोजी विधानभवनावर धडक मोर्चा!

घरांसाठी १४ कामगार संघटनांच्या वतीने येत्या १० मार्च रोजी विधानभवनावर धडक मोर्चा! मुंबई -घराच्या प्रश्नावर सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने निराश झालेल्या कामगारांमध्ये आता कमालीचा असंतोष उफाळून आला…

 मेट्रो दुर्घटनेत मृताच्या मदतीसाठी यादव समाज एकवटला

मेट्रो दुर्घटनेत मृताच्या मदतीसाठी यादव समाज एकवटला कल्याण: मुलुंडमध्ये मेट्रोच्या सुरु असलेल्या कामाचा एक स्लॅब कोसळला, ज्यामुळे घटनास्थळीच एकाचा मृत्यू झाला आणि इतर दोघांवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या रामधन यादव यांना मदत मिळवून देण्यासाठी रविवारी आर. एन. यादव यांच्यासह संपूर्ण यादव समुदायाचे सदस्य दिवसभर जबाबदार अधिकाऱ्यांकडून भरपाईच्या मागणीबाबत लेखी आश्वासन मागत राहिले, परंतु एमएमआरडीए किंवा उपकंत्राटदाराचा कोणताही अधिकारी प्रतिसाद देण्यासाठी उपलब्ध नव्हता. अखेर, दुपारी ४ वाजता, समुदायाच्या एका वरिष्ठ सदस्याने निर्णय घेतला की जर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ठोस निकाल लागला नाही तर त्यांना रस्त्यावर उतरून निषेध करण्यास भाग पाडले जाईल. ही माहिती माध्यमांना आणि पोलिस ठाण्याला मिळाल्यावर, एक अधिकारी पीडितेच्या कुटुंबाशी बोलण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहोचला. रात्री १० वाजेपर्यंत निकाल लागला, परंतु रात्री धनादेशावर स्वाक्षरी न झाल्यामुळे, अधिकारी लेखी आश्वासन देऊन निघून गेले. रात्री धनादेश न मिळाल्याने, कुटुंब रुग्णालयातून मृतदेह घेऊ शकले नाही. आज सोमवारी धनादेश मिळाला आणि मृतदेह घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी शंशिकांत यादव, ईश्वर देव यादव, पारस यादव, मोतीलाल यादव, राम यादव, जितेंद्र यादव, कमलेश यादव, आर.डी. यादव, राम झलक यादव, पप्पू यादव, जयसिंग यादव, कीर्ती यादव, रमेश यादव, सुरेश यादव, सुनील यादव, ईश्वर देव यादव आणि पारस यादव यांच्यासह सुमारे २०० समुदायाचे सदस्य उपस्थित होते. या सर्वांचे आर.एन. यादव यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आणि सांगितले की पीडितेला न्याय समुदायाच्या एकजुटीमुळे मिळाला.