Author: bittambatami.com

श्रद्धा संकल्प गणेशाची रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल!

मुंबई : गोरेगाव ( पूर्व ) येथिल  संकल्प संकुलातील, श्रद्धा संकल्प गणेशोत्सावाचे हे २१ वे वर्ष असून मंडळ रोप्य महोत्सवी वर्षा कडे वाटचाल करीत आहे. या वर्षीची मनमोहक गणेश मूर्ती, मूर्तिकार -समित मोघे यांनी साकारली असून सजावट कु. रजनी लांजेकर हिने केली आहे. गणेश उत्सव पाच दिवसाचा असून, उत्सव कालावधित, भजन, महिलांची पंचारती, विविध करमणूकीचे  कार्यक्रम, पारंपरिक मंगळागौर,  महाआरती, महाप्रसाद आदीचे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या वर्षीचे – सुनिल गोरड, चंद्रकांत माने,  दिलीप मोहिते, राहुल गांगुर्डे, आनंद सिहं, अशोक बाटे, नितीन गायकवाड, किरण इलग, प्रिया घटवाई, समीर कर्णिक, व अनंत निटुरे पदाधिकारी आहे. 000

विसर्जन सोहळ्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज, शहरात वाहतूक बदल

ठाणे : गणरायाला गुरुवारी निरोप दिला जाणार आहे. ठाण्यात विसर्जन सोहळ्यासाठी सार्वजनिक आणि घरगुती गणेशमुर्तींच्या विसर्जन मिरवणूका निघणार आहे. त्यामुळे ठाणे पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. सुमारे पाच हजार पोलिसांचा…

श्रीकांत चषक जिंकण्यासाठी ४८ ज्युनियर कॅरमपटूमध्ये चुरस

मुंबई : श्रीकांत चषक आंतर शालेय-कॉलेज कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी ज्युनियर ४८ कॅरमपटूमध्ये १४ सप्टेंबर रोजी कांदिवली-पूर्व येथे चुरस होणार आहे. श्रीकांत स्पोर्ट्स क्लब-कांदिवली व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित १८ वर्षाखालील…

नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये शतकीय संघांचा उत्स्फुर्त सहभाग

नवी मुंबई : महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेचे आयोजन क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे यांच्या सहकार्याने…

बोरीवलीच्या संजर शिंदे याची जर्मनीतील बाल सांस्कृतिक महोत्सवासाठी निवड

 गणेशोत्सव मंडळाने केला सत्कार मुंबई :  बोरिवली विभागातील संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रमोद शिंदे यांचे चिरंजीव कुमार संजर शिंदे याची युरोपमधील जर्मनीतील बाल सांस्कृतिक महोत्सवासाठी निवड झाली आहे. संजर शिंदे यांच्या निवडीबद्दल या भागात प्रचंड प्रमाणात आनंद व्यक्त करण्यात येत असून अखिल रुक्मिणी नगर उत्कर्ष संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कुलूपवाडी, बोरिवली (पूर्व) या मंडळाच्या वतीने कुमार संजर शिंदे याचा संस्थेच्या वतीने गौरव करून त्यास पुढील भवितव्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. भारतातून पाच मुलांची निवड झालेली आहे. कुमार संजर शिंदे याचा सत्कार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे विभाग प्रमुख उदेश पाटेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, सिनेट सदस्य मिलिंद साटम तसेच शाखा समन्वयक योगेश देसाई हे उपस्थित होते. संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी कुमार संजर शिंदे यास भरभरून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिल रुक्मिणी नगर उत्कर्ष संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कुलूपवाडी बोरिवली पूर्व या मंडळाचे पदाधिकारी राजू गीते यांनी केले. 0000

मोबाईल सोडा, मैदानावर या ; सार्वजनिक गणेशोत्सव सजावटीतून दिल्या कानपिचक्या

मुंबई :  आजकाल मोबाईल गेमच्या विळख्यात तरुणांपासून ते लहान मुले अडकली आहेत त्यामुळे मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होत आहे. तरुणांनी व लहान मुलांनी मैदानी खेळाकडे आकर्षित व्हावे व एक धाव आरोग्यासाठी असा…

क्यूआर कोडद्वारे ऑनलाईन सेवांचा लाभ

भाईंदर : नागरिकांशी संबंधित विविध प्रकारच्या सेवा महापालिकेने ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत, परंतु अनेकांना या सेवांचा लाभ कसा घ्यायचा, त्याची लिंक कशी मिळवायची याची माहिती नसते. यासाठी महापालिकीन एक…

खारघरमध्ये कृत्रिम तलावाला पसंती

खारघर : खारघर वसाहतीत गणपती बाप्पाच्या मूर्ती विसर्जनासाठी गणेशभक्त कृत्रिम तलावाला अधिक पसंती देत आहेत. कृत्रिम तलावात दीड दिवसाचे दोन हजार ८४२; तर पाच दिवसांच्या एक हजार ५२२ गणेशमूर्तींचे विसर्जन…

ज्ञानेश महाराव यांना अटक करण्याची जोरदार मागणी

पनवेल : लेखक ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर वाशी येथे आयोजित संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात अश्लाघ्य टीका केली होती, त्यामुळे आज पनवेलमध्ये ज्ञानेश महाराव यांचा हिंदू…