Author: bittambatami.com

 वसीम अहमद खान यांचे गायन

 दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने नाना आणि भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि भरत व शैलेश राजाध्यक्ष तसेच शारदा सबनीस यांच्या सहकार्याने वसीम अहमद खान यांचा गायन कार्यक्रम रसिकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. त्यांना तबल्यावर अभय दातार तर संवादिनीवर निरंजन लेले साथ देतील. हा कार्यक्रम रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ या दिवशी सायंकाळी पाच वाजता संस्थेच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिक माहितीसाठी संपर्क २४३०४१५०. वसीम अहमद खान यांची हेवा करणारी वंशावळ आहे. १३ व्या शतकापासून भारतात गायन क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या आग्रा घराण्याचे ते एकमेव थेट वंशज आहेत त्यांच्या गायकीत आग्रा धृपद गायनाचा प्रभाव आहे. धृपद आणि ख्यालच्या आवाजाने आशीर्वादित खान यांनी अनेकांना प्रभावित केले आहे. भारतातील प्रसिद्ध गायक उस्ताद रशीद खान यांनी चालवल्या जाणाऱ्या शाखरी बेगम मेमोरियल ट्रस्ट या अकादमीचे वरिष्ठ प्राध्यापक सदस्य म्हणून पाच वर्षे अध्यापन केले. ख्याल गायनाव्यतिरिक्त, खान यांच्या ठुमरी सादरीकरणांनाही रसिक आणि सामान्य प्रेक्षकांकडून प्रशंसा मिळाली आहे. ००००००

यंदाचा गणेशोत्सव बचत गटांसाठी आर्थिक फलदायी

 विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीतून १५ लाखांहून अधिकची आर्थिक उलाढाल ठाणे : गणेश उत्सवासाठी लागणाऱ्या शोभेच्या वस्तू, मखर, विद्युत रोषणाई, हाताने बनविलेल्या फुलांच्या टोपल्या यांसह विविध खाद्य पदार्थांची यंदा महिला बचत गटांकडून मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांकडूनही घरगुती वस्तूंनाच प्राधान्य दिले गेले असल्याने बचत गटांना यंदाचा गणेशोत्सव आर्थिक दृष्ट्या फलदायी ठरला असून जिल्ह्यातील महिला बचत गटांची सुमारे या वस्तू विक्रीतून १५ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बचत गट कार्यरत आहेत. जिल्ह्यातील बचत गटांची संख्या सुमारे दहा हजार इतकी असून यामध्ये एक लाख महिला जोडल्या गेल्या आहेत. मागील काही वर्षांमध्ये ठाणे जिल्ह्यातील या बचत गटांच्या माध्यमातून विविध लघुउद्योग, मध्यमउद्योग सुरू करण्यात आले आहेत. यातून बचत गटातील महिलांनाही एक सक्षम रोजगार उपलब्ध झाला आहे. तर या महिलांनी मिळून सुरू केलेल्या लघु आणि मध्यम उद्योगातून त्यांच्या आसपासच्या परिसरातील महिलांना देखील रोजगार उपलब्ध झाला आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी या उत्सवांच्या काळात या बचत गटांनी बनवलेल्या विविध वस्तूंना तसेच खाद्यपदार्थांना मोठी मागणी असते. गतवर्षीप्रमाणे यंदाच्या गणेशोत्सवात देखील या बचत गटांनी तयार केलेल्या विविध शोभेच्या वस्तूंना आणि खाद्यपदार्थांना मोठी मागणी आहे. उपहारगृहांमध्ये भेसळयुक्त मिठाईची भीती, मिठाईचे वाढलेले दर, तसेच फराळाच्या वाढलेल्या किंमती यामुळे यंदा अनेक भाविकांनी आणि मंडळांनी घरगुती पद्धतीने बनविलेल्या फराळ आणि मिठाईला पसंती दिली आहे. यामध्ये बचत गटाने तयार केलेल्या खाद्यपदार्थांचा अधिकतर समावेश आहे. त्याचबरोबर बांबूसह इतर पर्यावरण पूरक गोष्टींचा वापर करून तयार करण्यात आलेल्या शोभेच्या वस्तूंची ही यंदा बचत गटांकडून मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली आहे. यामुळे महिलांना मोठा आर्थिक लाभ झाला आहे. तसेच गणेशोत्सव सुरू होऊन अद्याप दोनच दिवस झाले आहेत. या कालावधीत महिला बचत गटांकडून वस्तू आणि खाद्य पदार्थांच्या विक्रीतून तब्बल १५ लाख रुपयांहून अधिकची आर्थिक उलाढाल करण्यात आली आहे. तर या महिलांनी तयार केलेल्या खाद्य पदार्थाना अद्यापही मागणी सुरूच असल्याची माहिती अंबरनाथ तसेच कल्याण येथील बचत गटांच्या महिलांनी सांगितले. यामध्ये विधवा आणि निराधार बचत गटांच्या देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या सर्व बचत गटांकडून मखर, कागदी फुलांच्या माळा, फुलांच्या टोपल्या, दिव्याचा वाती, तेल, अगरबत्ती, धूप, तूप यांसह विविध खाद्यपदार्थ यांची विक्री केली जात आहे. खेळते भांडवल मोलाचे राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिला बचत गटांना जिल्हा परिषदेच्या वतीने खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे. बचत गटांना झालेल्या या पतपुरवठ्यामुळे सर्व महिलांना त्यांचे लघु आणि मध्यम उद्योग अधिक सक्षम करण्यास मोठा हातभार लागला. त्यामुळे आज शेकडो बचत गट विविध उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळवत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी दिली आहे. कोट गणपती स्थापनेच्या दिवशी अनेक मंडळ आणि नागरिकांच्या दिवशी घरी पूजेचे आयोजन करण्यात येते. यावेळी आमच्याकडुन मोठ्या प्रमाणात मोदक, लाडू, खापरा वरच्या पुरणपोळ्या, उकडीचे मोदक यांची उत्तम विक्री झाली आहे. यंदाचा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने लाभदायी ठरला आहे. मयुरी अमृतकर, स्नेहबंध महिला बचत गट, अंबरनाथ

२७ गावांमधील पथदिवे कामांसाठी फेरनिविदा

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील २७ गावांमधील २६ कोटींची कामे घेण्यासाठी राजकीय पाठबळ असलेल्या ठेकेदारांमध्ये जोरदार चढाओढ सुरू होती. यात स्थानिक आणि नामवंत कंपन्या पालिकेने स्पर्धेतून काही कारणे देऊन बाहेर…

 सावत्र भावाची हत्या करणाऱ्यास सश्रम कारावास

 उल्हासनगरमध्ये जमिनीच्या वादातून झाली होती हत्या कल्याण : जमिनीच्या वादातून सावत्र भावाला लोखंडी सळईने मारहाण करून त्याची हत्या करणाऱ्यास कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्र. र. अष्टुकर यांनी १० वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. विष्णु राजाराम रामगुडे असे कारावास झालेल्या आरोपीचे नाव आहे. तुकाराम रामगुडे असे मृताचे नाव आहे. हे दोघे सावत्र भाऊ आहेत. रामगुडे कुटुंब उल्हासनगर येथे राहते. तुकाराम हे अंबरनाथ येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत नोकरीला होते. विष्णु आणि तुकाराम यांच्यात जमिनीवरून वाद सुरू होता. जानेवारी २०१७ मध्ये तुकाराम रामगुडे ऑर्डनन्स फॅक्टरीतून रात्रपाळी करून घरी आले होते. ते घरात बसले होते. त्यावेळी विष्णु रामगुडे तुकाराम यांच्या घराबाहेर येऊन शिवीगाळ करू लागला. तुकाराम यांनी घराबाहेर जाऊन विष्णु यांना तू शिवीगाळ कशासाठी आणि कोणाला करतो, असा प्रश्न केला. त्याचा राग विष्णुला आला. त्याने हातामधील लोखंडी सळईने तुकाराम यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने विष्णुने हा हल्ला केला होता, असे तुकारामची पत्नी वंदना यांनी पोलीस, न्यायालयातील जबाबात म्हटले आहे. या झटापटीच्यावेळी तुकाराम यांची पत्नी मध्ये पडून तुकाराम यांना विष्णुच्या मारहाणीपासून वाचविले. लोखंडी सळईचे घाव वर्मी बसल्याने तुकाराम रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना मध्यवर्ति रुग्णालय, तेथून खासगी रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना काही महिन्यांनी तुकाराम यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल झाला होता. कल्याण न्यायालयात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून सबळ पुराव्यांच्या आधारे विष्णु रामगुडे याला १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. एस. आर. कुलकर्णी, ॲड. इघारे, आरोपीतर्फे ॲड. भोपी यांनी काम पाहिले. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक एस. पी. आहेर, हवालदार के. पी. घरत यांनी केला होता. ०००००

कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ जिन्याच्या मार्गात बेकायदा गाळ्यांची उभारणी

डोंबिवली: गणेशोत्सवाच्या काळात कल्याण डोंबिवली पालिकेला असलेली सुट्टी, त्यानंतर पालिका अधिकारी गणपती विसर्जन कार्यक्रमात व्यस्त राहत असल्याने त्याचा गैरफायदा घेत, कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ (आयरे बाजू) भूमाफियांनी रेल्वेच्या जिन्याच्या समोर…

 पाणी बिलाची थकबाकी ठेवणाऱ्यांवर पालिकेची कारवाई

 शिळ-दिवा भागात कारवाईत ०६ मोटर पंप जप्त, ११ नळ जोडण्या खंडित   ठाणे : ठाणे महापालिकेची पाणी बिल थकबाकी वसुलीकरता पाणी पुरवठा विभागाने कारवाई सुरू केली आहे. या मोहिते शिळ-दिवा भागात ०६ मोटर पंप जप्त करण्यात आले. तर, ११ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. पाणी बिलाची रक्कम भरून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रुम सील करण्यात येत आहेत. तसेच, पाणी बिलाचा भरणा न करता, खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करुन घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचीही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली. थकीत बिलावरील प्रशासकीय आकारात सूट महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनाच्या थकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सूट लागू करण्यास महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मान्यता दिली आहे. थकीत पाणीपट्टी बिलावरील दंडात १०० टक्के इतकी भरीव सवलत जाहीर करण्यात आल्याने नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. ही योजना ०१ सप्टेंबर २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत लागू राहील. वरील योजनेचा लाभ घेऊन थकीत व चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरुन त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सवलत योजनेचा लाभ नागरिक घेवू शकतील. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बील धारकांनी पाणी पुरवठा देयके जमा केली असतील अशांना सदरची सवलत योजना लागू असणार नाही.  तसेच ही योजना व्यवसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही.

 कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित २४५ ग्राहकांच्या घरात परतला ‘प्रकाश’

महावितरण अभय योजनेतून मिळवली वीजजोडणी; व्याजमाफीसह मूळ थकबाकीत सवलत कल्याण : वीजबिल थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित केलेल्या कल्याण परिमंडलातील २४५ ग्राहकांची घरे प्रकाशाने पुन्हा उजळली आहेत. या ग्राहकांनी व्याज व विलंब आकार शंभर टक्के माफीसह किमान ३० टक्के थकबाकी भरणाऱ्यांना त्वरित वीजजोडणीची संधी देणाऱ्या महावितरण अभय योजना-२०२४ चा लाभ घेत ही संधी साधली. १ सप्टेबरपासून या योजनेची सुरुवात झाली असून परिमंडलातील २ लाख ९४ हजार ९१ घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना कायमस्वरुपी खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याची संधी यातून मिळणार आहे. परिमंडलातील ३८९ ग्राहकांनी आत्तापर्यंत या योजनेचा लाभ घेतला असून उर्वरित ग्राहकांनीही योजनेत सहभागी होण्याचे आवाहन मुख्य अभियंता चंद्रमणि मिश्रा यांनी केले आहे. अभय योजनेनुसार मार्च-२०२४ अखेर किंवा तत्पूर्वी वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित झालेले लघुदाब व उच्चदाब ग्राहक (सार्वजनिक पाणीपुरवठा व कृषीपंप ग्राहक वगळून) योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. थकबाकीची मुळ रक्कम एकरकमी किंवा सहा समान हप्त्यात भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पुर्णतः माफ़ होईल. योजनेतील सहभागी ग्राहकांना एकरकमी किंवा सहा समान हप्त्यात मूळ थकबाकी भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तर थकबाकी एकरकमी भरणाऱ्या उच्चदाब ग्राहकांना मूळ थकबाकीवर ५ टक्के आणि लघुदाब ग्राहकांना १० टक्के अतिरिक्त सवलत मिळणार आहे. मूळ थकबाकी एकरकमी अथवा ३० टक्के रक्कम भरुन योजनेत सहभागी होता येईल. त्यानंतर मागणीप्रमाणे आवश्यकतेनुसार तत्काळ नवीन वीजजोडणी मिळेल. ३० टक्के रक्कम भरणाऱ्या ग्राहकांना मूळ थकबाकी व्याजमुक्त अशा सहा समान हप्त्यात भरण्याची सवलत उपलब्ध आहे. कल्याण परिमंलातील २ लाख ९४ हजार ९१ ग्राहक या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. योजनेत सहभाग घेत या ग्राहकांना विलंब आकाराचे ३ कोटी ८१ लाख व व्याजाचे ४० कोटी ६१ लाख रुपयांची सवलत मिळवण्याची संधी आहे. त्यासाठी पात्र ग्राहकांनी https://wss.mahadiscom.in/wss/wss या पोर्टलवर केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. याशिवाय महावितरणच्या स्थानिक कार्यालयांमध्ये इच्छुक ग्राहकांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित झालेल्या संबंधित ग्राहकांनी अधिकाधिक संख्येने या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

फ्रँक्लिन पॉल या व्यक्तीने त्याच्या घरी राहता घरी सायन इथे गणपतीसाठी युनिक डेकोरेशन तयार केलेले आहे. ००००

जयदीप आपटेच्या पोलिस कोठडीत वाढ

सिंधुदुर्ग : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे व बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना मंगळवारी दुपारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यात आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी तर पाटीलला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली…