मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर ध्वनी अवरोधक
मुंबई : मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी या मार्गावर ध्वनी अवरोधक बसवण्यात आले आहेत. या मार्गावरील ५०८ किमी अंतरापैकी आतापर्यंत ८७.५ किमी परिसरात १ लाख ७५…
मुंबई : मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी या मार्गावर ध्वनी अवरोधक बसवण्यात आले आहेत. या मार्गावरील ५०८ किमी अंतरापैकी आतापर्यंत ८७.५ किमी परिसरात १ लाख ७५…
लाडक्या मंत्र्यांसाठी योजना मंत्री संजय राठोड, बिल्डरमंत्री लाभार्थी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या लाडक्या मुलावर कारवाई करा- विजय वडेट्टीवार मुंबई : महायुतीच्या मंत्र्यांनी सरकारी तिजोरी फस्त केली. त्यामुळे आता ‘भूखंडावर ताव मारा आणि तृप्त व्हा’ अशी नवी योजना महायुती सरकारने लाडक्या मंत्र्यांसाठी आणली आहे. या योजनेचे लाभार्थी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड आहेत. मंत्रीमंडळात असणाऱ्या बिल्डर मंत्र्यांनी देखील सातशे कोटींचा भूखंड जैन इंटरनॅशनल आर्गनायझेशनच्या नावाखाली हडप केला आहे. कुलाबा महसूल विभागातील हा मोक्याचा भूखंड खाणारा बिल्डरमंत्री सरकारचा लाडका आहे. कागद पत्रांची हेराफेरी करून भूखंड खाण्याचा उद्योग या हेराफेरी सरकारने सुरू केला आहे. नागपूर येथील हिट अँड रन प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या लाडक्या मुलावर कारवाईची मागणी करीत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर आज हल्लाबोल केला. आपल्या प्रचितगड या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सरकार मधील भ्रष्टाचार कागपत्रांची हेराफेरी समोर आणली. अधिक माहिती देताना वडेट्टीवार म्हणाले की, गोर बंजारा समाजासाठी नवी मुंबईतील बेलापूर येथे दीड एकर भूखंड मिळाला होता. हा पाचशे कोटींचा भूखंड स्वत:च्या खासगी ट्रस्टच्या माध्यमातून हडप करण्याचा पराक्रम मंत्री संजय राठोड यांनी केला असून गोरबंजारा समाजाची त्यांनी फसवणूक केली आहे.मंत्री राठोड यांना भूखंड देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिकारकक्षा बाहेर जावून मदत केली आहे. मंत्री राठोड यांच्या खासगी सचिवांच्या पत्रावर कारवाई करून हा भूखंड दिला आहे. यासाठी विहित पद्धतीचा अवलंब केलेला नाही. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया राबविलेली नाही. बेकायदेशीर पत्रावर निर्णय घेऊन हा भूखंड दिला आहे.गोरबंजारा समाजाची यामध्ये फसवणूक झाली आहे. भ्रष्टाचार उघडकीस आल्यावर मंत्री राठोड भूखंड परत करण्याची भाषा बोलत आहेत. परंतु आता वेळ निघून गेली आहे. त्यांचा इरादा समाजाच्या लक्षात आला आहे. राठोड यांनी मंत्री म्हणून देखील बेकायदेशीर काम केले आहे. २२०० कोटी बजेट असताना ८००० कोटींची टेंडर काढली आहेत. असेही वडेट्टीवार म्हणाले. सरकारमधील बिल्डर मंत्र्याने तर कहरच केला आहे. जैन इंटरनॅशनल आर्गनायझेशन या खासगी शिक्षण संस्थेच्या नावाखाली ७०० कोटींचा कुलाबा महसूल विभागातील भूखंड हडप केला आहे. याची सगळी प्रक्रीया पूर्ण झाली आहे. परंतु हा भ्रष्टाचार उघडकीस येईल या भीतीमुळे अजून शासन निर्णय निर्गमित केला नाही. सरकारने अशी चलाखी जरी केली असली तरी हे प्रकरण उजेडात आले आहे.असे वडेट्टीवार यांनी सांगितले. नागपूर येथील हिट अँन्ड रन प्रकरणाची सरकारने चौकशी करून भाजप प्रदेशाध्यक्षांच्या लाडक्या मुलावर कारवाई करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना केली. पुण्यातील पोर्शे कार प्रकरणात अजितदादा गटाच्या नेत्याने आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला. वरळी येथील अशाच प्रकरणात शिंदे गटाच्या नेत्याने आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला. आता तर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिस आरोपींना पाठिशी घालत आहेत. नंबर प्लेट काढून, सीसीटीव्ही नष्ट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
समानता आणण्यासाठी उच्चधिकारी समिती स्थापन मुंबई : विविध शासकीय संस्थामार्फत सामाजिक घटकांच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या योजनांमध्ये एक समानता आणण्यासाठी आता सर्वकष धोरण निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने उच्चाधिकारी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहेत. वित्त विभागाचे अपर मुख्यसचिव यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची सदर समिती गठीत करण्यात आली आहे. यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने १० सप्टेंबरला ‘शासन निर्णय ‘ जारी केला आहे. वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये नियोजन, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण व आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिवांसह उच्च व तंत्र शिक्षण, अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव या समितीचे सदस्य असतील. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), बार्टी, सारथी आणि महाज्योती संस्थामार्फत कार्यान्वित असलेल्या याशिवाय भविष्यात प्रस्तावित करण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, अधिछात्रवृत्ती, वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता, स्वाधार, स्वयंम अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये एक समानता रहावी, यासाठी ही समिती धोरण आखणार आहे. बार्टीमार्फत देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्ती योजनेतील विद्यार्थ्यांना ५० टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर निर्णयाच्या अनुषंगाने बार्टीच्या संशोधक विद्यार्थी संघटनांकडून शंभर टक्के दराने अधिछात्रवृत्ती मंजूर करण्याची वारंवार विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार २०२२ मधील ७६३ विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून व शपथ पत्र घेऊन पात्र विद्यार्थ्यांना शंभर टक्के अधिछात्रवृत्तीचा लाभ देण्यास मान्यता दिली आहे. हा निधी बार्टीनेच त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या निधीतून करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. याकरिता शासनाकडून अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
बगिचा आरक्षणावर बेकायदा इमारतीची उभारणी डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील रेतीबंदर छेद रस्ता ते सत्यावान चौक दरम्यानच्या गावदेवी मंदिर मैदानाजवळ कल्याण डोंबिवली पालिकेचे बगिचा आरक्षण असलेल्या एका भूखंडावर भूमाफियांनी सात माळ्याची बेकायदा इमारत उभी केली आहे. या इमारतीमधील सदनिका घर खरेदीदारांना बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करून भूमाफियांनी खरेदीदारांची फसवणूक सुरू केली आहे, अशी तक्रार उमेशनगर मधील रहिवासी संजय वसंत म्हात्रे यांनी पालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांच्याकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के. एच. गोविंदराज, पालिकेच्या साहाय्यक संचालक नगररचना दीक्षा सावंत, ह प्रभाग साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना देण्यात आल्या आहेत. शशिकांत सुरेश म्हात्रे, योगेश हरिश्चंद्र भोईर या भूमाफियांनी मधुकर शांताराम म्हात्रे, शरद शांताराम म्हात्रे यांच्या सहकार्याने या बेकायदा इमारतींची उभारणी केली आहे. ही बेकायदा इमारत पालिकेने यापूर्वी अनधिकृत घोषित केली आहे. बगिचा आरक्षणावरील ही बेकायदा इमारत जमीनदोस्त करावी म्हणून आपण सतत पालिकेत पत्रव्यवहार करत आहोत. आपणास पालिकेच्या ह प्रभागा कार्यालयाकडून दिशाभूल करणारी माहिती देण्यात येऊन या बेकायदा इमारतीला अधिकारी पाठबळ देत आहेत, असे संजय म्हात्रे यांनी सांगितले. सात माळ्याच्या या बेकायदा इमारतीची पालिकेची बनावट बांधकाम कागदपत्रे, महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून उभारणी करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी पध्दतीने या इमारतीमधील सदनिका भूमाफिया घर खरेदीदारांना विक्री करत असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.या बेकायदा इमारतीवर भुईसपाट करण्याची कारवाई प्रशासनाने करावी. अन्यथा आपण उच्च न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल करणार आहोत, असे म्हात्रे यांनी सांगितले. या बेकायदा इमारतीपासून १०० फुटावर राहुलनगरमध्ये रमाकांत आर्केड, सुदामा रेसिडेन्सी या दोन बेकायदा इमारती भूमाफियांनी उभारल्या आहेत. या बेकायदा इमारतींवरही पालिकेकडून कारवाई केली जात नाही. आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांनी या महत्वपूर्ण विषयात लक्ष घालून गावदेवी मंदिराजवळील शशिकांत म्हात्रे, योगेश भोईर यांची आणि राहुलनगर मधील रमाकांत आर्केड, सुदामा रेसिडेन्सी या तिन्ही बेकायदा इमारती भुईसपाट करण्यासाठी अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त आणि ह प्रभागातील अधिकाऱ्यांना आदेश देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडूनही करण्यात येत आहे. याविषयी उघड बोलले तर त्रास होईल या भीतीने कोणीही रहिवासी उघडपणे बोलत नाही. देवीचापाडा गावदेवी मंदिर येथील शशिकांत म्हात्रे, योगेश भोईर यांनी उभारलेल्या बेकायदा इमारतीची माहिती घेतो. ही इमारत यापूर्वीच अनधिकृत म्हणून घोषित केली आहे की नाही याविषयी खात्री करतो. ही इमारत आरक्षित भूखंडावर उभी असेल तर आयुक्तांच्या आदेशावरून ही इमारत भुईसपाट करण्यात येईल. याशिवाय, राहुलनगरमधील दोन्ही बेकायदा इमारतींवर कारवाई करण्यात येणार आहे.-राजेश सावंतसाहाय्यक आयुक्त,ह प्रभाग, डोंबिवली.
भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांच्याकडून स्वागत मुरबाड : तालुक्यातील खापरी ग्रामपंचायतीतील सदस्य व गावातील भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष गोटीराम पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेतला. या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पवार व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पवार उपस्थित होते. माजी आमदार गोटीरामभाऊ पवार व शिवसेनेचे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांना खापरी ग्रामपंचायतीत पदाधिकारी व ग्रामस्थांकडून कायम साथ देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली मुरबाड तालुक्यात विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातून विकासकामे सुरू असून, ग्रामस्थांना सुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांनी दिली. खापरी, कामतपाडा, वैतागवाडी कामतपाडावाडी भागात झालेल्या विकासकामांसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदी असताना सुभाष पवार यांनी पुढाकार घेतला होता, याचा आवर्जून उल्लेख उपसरपंच सुरेश भांगरथ यांनी केला. तसेच खापरी येथील अरुण सीताराम राऊत, पांडुरंग राऊत, कपिल राऊत यांच्यासह ४० ते ५० कार्यकर्त्यांचे भाजपामधून शिवसेनेत स्वागत केले. या वेळी सरपंच दीपक कवटे, संतोष देशमुख, अरुण (बंडू) पवार, महेश पवार, भाई देशमुख, नाना देशमुख, राजेश राऊत, चिंतामण वाघ, शंकर पारधी, अनिल भांगरथ, नेताजी भांगरथ, बुधाजी पारधी, संतोष वाघ, रघुनाथ हिलम, भालचंद्र लचका, योगेश भांगरथ, महेश भांगरथ, भूषण राऊत, कुणाल शिंदे, समीर पवार, गणेश बांगारा, दशरथ लचका, गणेश भला, अंकुश भांगरथ, सागर भांगरथ, काळुराम वाघ, प्रमोद लचका, पांडुरंग मुकणे, सचिन भांगरथ, सार्थक भांगरथ रोहित राऊत,प्रतीक राऊत,प्रशांत भांगरथ तुकाराम मुकणे संतोष भांगरथ कमलाकर भांगरथ, काशिनाथ पारधी, काशिनाथ मुकणे, सुनील फसाळे, संदेश पारधी, जगन मुकणे, सोमनाथ चवर, हिरामण हिरवा अशी शिवसेनेत प्रवेश केलेल्या भाजपा कार्यकर्त्यांची नावे आहेत.
अलिबाग (प्रतिनिधी)- कर्जत तालुक्यातील चिकनपाडा येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपी हनुमंत जैतु पाटील याची पोलिसांनी 36 तास चौकशी केली. तरी तो गुन्ह्याची कबूली देत नव्हता. कोणताही पुरावा सापडत नव्हता. त्यामुळे त्याला सोडून देण्याच्या तयारीत पोलीस होते. परंतु ज्या घरातून आरोपी निघाला होता; तेव्हा त्याच्या अंगात पांढरा शर्ट होता. सकाळी घरी आला तेव्हा त्याच्या अंगात वेगळे टीशर्ट होते. टीशर्ट का बदलले हे सांगू शकला नाही. त्यानंतर त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले. त्यामुळे हनुमंत हादरला आणि घराच्या हिस्स्यासाठी आपणच हे तिहेरी हत्याकांड केल्याची कबुली त्याने दिली. त्याला अटक करण्यात आले आहे, अशी महिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. कर्जत तालुक्यातील चिकनपाडा येथील मदन पाटील, त्यांची सात महिन्यांची गरोदर असलेली पत्नी अनिषा उर्फ माधुरी त्यांचा 11 वर्षांचा मुलगा विनायक यांची डोक्यात धारधार शास्त्रांनी वार करून हत्या केली. तिघांचेही मृतदेह फेकण्यात आले होते. या प्रकरणात हत्येमागच्या सर्व शक्यता तपासण्यात आल्या. तपास करत असताना मदन पाटील आणि त्यांचा सख्खा भाऊ हनुमंत यांच्यात घराच्या हिस्स्यावरून वाद होते अशी महिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी हनुमंत याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची 36 तास चौकशी केली. तरी तो गुन्ह्याची कबुली देत नव्हता. ही हत्या झाली तेव्हा आपण पोशीर येथे मामाकडे रहायला गेलो होतो. तेथून कुठे गेलो नाही असे पोलिसांना त्यांनी सांगितले. त्याचे मामा देखील हनुमंत आमच्याचकडे होता असे सांगत होते. पोलीस त्याला सोडून देण्याच्या मानसिकतेत होते. त्याचवेळी त्याने रात्री सफेद शर्ट घातला होता आणि सकाळी घरी आला तेव्हा त्याच्या अंगात वेगळा टीशर्ट होता, अशी माहिती मिळाली. टीशर्ट का बदलला. रात्री घातलेला पांढरा शर्ट कुठे आहे?असे प्रश्न विचारताच तो निरूत्तर झाला. त्याचवेळी पोशीर येथील शाळेच्या आवारतील सीसीटीव्ही फुटेजमधील त्याच्या हालचाली त्याला दाखवण्यात आला. तो हादरला आणि गुन्ह्याची कबुली दिली. चिकनपाडा येथील घराचा हिस्सा मिळावा व वेगळे रेशकार्ड काढून द्यावे अशी मागणी हनुमंत थोरला भाऊ मदन याच्याकडे अनेक वर्ष करत होता. यावरू काही वर्षापूर्वी दोन्ही भावांमध्ये भांडण झाली होती. आपला भाऊ आपल्याला घराचा हिस्सा देणार नाही याची खात्री झाल्यामुळे मदनची हत्या करण्याचे हनुमंतने ठरवले. त्यानुसार गणेशचतुर्थीच्या निमित्ताने आपल्या पत्नीला माहेरी पाठवले. स्वतः पोशीर येथे मामाकडे राहण्यासाठी गेला. रात्री घरी मामाच्या घरी थांबला. मध्यरात्री घरातील सर्व मंडळी झोपल्यानंतर तो उठून चालत चिकनपाडा येथे भावाच्या घरी गेला. दरवाजा उघडा असल्यामुळे सरळ घरात शिरला. त्याने कुर्हाडीने मदन, अनिषा व विनायक यांच्यावर वार केले. घरातील रक्ताचे डाग फुसले. तीघांचे मृतदेह घराशेजारच्या ओढ्यात फेकले. रक्ताने माखलेला आपला सफेद शर्ट फेकला व दुसरे टीशर्ट घालून तो पुन्हा पोशीर येथे मामाच्या घरी गेला व गणपतीसमोर जाऊन बसला. चिकनपाडा येथे तिहेरी हत्याकांड झाल्याची बातमी पोशीरमध्ये पोहचली. तरी जणू आपण काही केले नाही असे हनुमंत वावरत होता. भावाच्या हत्येमुळे तो दुःखी झाल्याचे नाटक करत होता. त्यामुळे हनुमंत रात्रभर घरातच होता असे मामांना देखील वाटत होते. अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अटकला. हनुमंतनेच घराच्या हिस्स्यासाठी सख्खा भाऊ, गरोदर वहिनी आणि पुतण्याची हत्या केली हे उघड झाले तेव्हा सारेच हादरून गेले. रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी धुळा टेळे, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या पथकांनी तपास करून गुन्हा उघडकीस आणला. कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी धुळा टेळे पुढील तपास करत आहेत. ही पूर्वनियोजित हत्या आहे. यात एका गरोदर महिलेची हत्या झाली आहे. 11 वर्षाच्या लहान मुलाची हत्या करण्यात आली आहे. ही क्रुरता लक्षात घेता आरोपी हनुमंत पाटील याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. एक महिन्याच्या आत आरोपपत्र दाखल करून. हा खटला फास्टट्रॅकवर चालवाव अशी न्यायालयाला विनंती करणार आहोत, अशी माहिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. ००००
मुंबई : बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय निवड चाचणी टेबल टेनिस स्पर्धेमध्ये अंकित धीकोनियाने पुरुष गटात व कविता राणाने महिला गटात विजेतेपद पटकाविले. बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने ग्रँट रोड येथील वायएमसीए टेबल टेनिस हॉलमध्ये झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अंकित धीकोनियाने व्ही. कुलदीपचा ११-४, ११-४, ११-४ असा सहज पराभव करून अजिंक्यपदाला गवसणी घातली. प्रथमपासून आघाडीचे वर्चस्व राखणाऱ्या अंकितचे अचूक जोरकस फटके परतविण्यास अपयश आल्यामुळे व्ही. कुलदीपला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कविता राणा विरुद्ध कृतिका यामधील महिलांची अंतिम लढत अटीतटीची झाली. दुसऱ्या सेटमध्ये आक्रमक खेळ करीत १-१ अशी बरोबरी साधणाऱ्या कृतिका अग्रवालला अखेर कविता राणाने ११-६, ३-११, ११-७ असे चकविले आणि कविताने प्रथम क्रमांकावर झेप घेतली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे टेबल टेनिस पंच सीताराम गमरे, बँक ऑफ बडोदा क्रीडा विभागाचे प्रदीप सुरोशे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींनी विजेत्या-उपविजेत्यांचे अभिनंदन केले. अखिल भारतीय स्तरावर होणाऱ्या बँक ऑफ बडोदा आंतर विभाग टेबल टेनिस स्पर्धेसाठी मुंबई विभागीय संघाचे प्रतिनिधित्व पुरुष गटामध्ये अंकित धीकोनिया, व्ही. कुलदीप, आशिष दवे, अभी चटोपाध्याय तर महिला गटामध्ये कविता राणा, कृतिका अग्रवाल, प्रार्थना मस्तुल, क्लॅरेट पी. आदी टेबल टेनिसपटू करणार आहेत.
अशोक गायकवाड पनवेल : एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये कलाप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत, त्या अनुषंगाने या ठिकाणी नाट्यगृहाची आवश्यकता निर्माण झाली असून नाट्यगृहाच्या उभारणीसाठी सिडकोने पाच हजार चौरस मीटरचा भूखंड द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक व भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर मंडल अध्यक्ष व माजी नगरसेवक प्रवीण पाटील, माजी नगरसेक शत्रुघ्न काकडे, नरेश ठाकूर, कीर्ती नवघरे आदी उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल विधानसभा मतदारसंघाची आजमितीस लोकसंख्या जवळपास साडे पाच ते सहा लाखांच्या आसपास असून आज झपाट्याने विकसित होणारे क्षेत्र म्हणून पनवेल व उरण तालुक्यांकडे पाहिले जाते. भविष्यात या परिसरात येणाऱ्या विविध प्रकल्पांमुळे या परिसरातील लोकसंख्या अजूनही मोठया प्रमाणात वाढणार आहे. त्या अनुषंगाने नागरिकांच्या मुलभूत गरजांसोबतच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक गरजा पुरविणे हे शासन म्हणून आद्य कर्तव्य आहे. पनवेल परिसरामध्ये फक्त पनवेल येथील ‘आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके’ हे एकमेव नाट्यगृह आहे, त्यामुळे पनवेल परिसरातील सर्व नागरिकांच्या सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्याकरिता मर्यादा येत आहेत. पनवेल विधानसभा अंतर्गत खारघर विभाग हा अत्यंत सुनियोजित पध्दतीने विकसित होत असलेला विभाग असून, त्या ठिकाणची लोकसंख्याही मोठया प्रमाणावर वाढत आहे. खारघर क्षेत्राची ओळख ही उत्तम शैक्षणिक केंद्र (Educational Hub) म्हणून असून सेंट्रल पार्क गोल्फ कोर्स, उत्सव चौक तसेच अन्य धार्मिक प्रार्थनास्थळांमुळे एक वेगळी ओळख या परिसराची निर्माण झाली आहे. या परिसरात कलाप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणावर रहात असून त्यांची मागणी व सांस्कृतिक गरज लक्षात घेता खारघरमध्ये एका नाटयगृहाची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे खारघर परिसरातील मोकळ्या भूखंडापैकी ५००० चौ. मी.चा भूखंड नाट्यगृहाकरिता तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली आहे. पनवेलला कला व सांस्कृतिक वारसा आहे. त्याच प्रमाणे झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या खारघरमध्येही कलाप्रेमी आहेत. येथील नागरिकांची नाट्यगृह असावी अशी मागणी आहे. त्यानुसार सिडकोकडून भूखंडाची मागणी केली आहे. नाट्यगृहाची लवकरात लवकर उभारणी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, त्या अनुषंगाने सिडको आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
मुंबई : येत्या १६ ते २४ सप्टेंबर दरम्यान कर्नाल, हरियाणा येथे होणाऱ्या १९ वर्षाखालील ज्युनियर राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी भांडूपच्या अवघ्या १४ वर्षीय नववीत शिकत असलेल्या द्रिश्या श्रीकांत नाईक हीची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. नुकत्याच कोल्हापूर येथे झालेल्या राज्य निवड चाचणी स्पर्धेत द्रिश्याने चमकदार कामगिरी करताना ६ गुणांची कमाई करुन आपले हरियाणाचे तिकिट पक्के केले. या स्पर्धेत तिने ६ विजय मिळविले. तर दोन सामने गमावले. तिचा चौथा क्रमांक लागला. स्पर्धेत प्रथम ६ क्रमांक मिळवणारे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. शेवटच्या फेरीत द्रिश्याने यजमान कोल्हापूरच्या प्रथम मानांकन देण्यात आलेल्या दिव्या पाटीलचा पराभव करुन स्पर्धेत खळबळ माजवली. तसेच तिने पुण्याच्या फिडे रेटेड खेळाडू राजराजेश्वरी देशमुखला देखील नमविण्याचा पराक्रम केला होता. राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेली द्रिश्या मुंबईची एकमेव खेळाडू आहे. ३ वर्षे स्पर्धात्मक बुद्धिबळ खेळणाऱ्या द्रिश्याचे केतन पाटील प्रशिक्षक आहेत. ती रोज ४ तास नियमित सराव करते. तिचे वडिल आंतर कॉलेज बुद्धिबळ स्पर्धेत खेळले होते.