Author: bittambatami.com

वीज कर्मचाऱ्यांना घसघशीत वाढ; आता महाराष्ट्रात सर्वाधिक वेतन

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्य सरकारने महाराष्ट्र महावितरण व महापारेषण या कंपन्यातील कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ मिळाली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात तब्बल १९ टक्क्याने वाढ केली जाणार आहे. तीन्ही…

धुसफूस संपवा, कामाला लागा

अमित शहांचा महायुतीला ‘महासल्ला’ मुंबई : गेल्या काही दिवसात महायुतीतील बढ्या नेत्यांमध्ये होत असलेल्या जाहिर आरोप प्रत्यारोपाची केंद्री गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा यांनी गंभीर दखल घेतली आहे. महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ…

रिपब्लिकन पक्षाला (खोरिपा) महाविकास आघाडीने गृहीत धरू नये – उपेंद्र शेंडे

मुंबई : रिपब्लिकन पक्षाने (खोरिपा) लोकसभा निवडणुकीत संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी महविकास आघाडीला पाठिंबा दिला होता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा शरदचंद्र पवार साहेब यांना प्रत्यक्ष भेटून मा आ उपेंद्रजी शेंडे यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय सांगितला होता त्यानंतर राज्यभरात रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) च्या कार्यकर्ते यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला होता त्यामुळेच महाविकास आघाडीचे ३१ उमेदवार निवडून आले होते ह्या विजयात रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)चा खारीचा वाटा आहे आता राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत अशावेळी आम्ही राज्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या भेटीसाठी प्रयत्न केले तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या भेटीसाठी सुद्धा प्रयत्न केले आहेत मात्र कार्यबाहुल्यामुळे त्यांच्या भेटी होत नाहीत त्यामुळे जर महाविकास आघाडीला रिपब्लिकन पक्षाची (खोरिपा) गरज नसेल तर तसे कळवावे परंतु रिपब्लिकन पक्षाला गृहित धरू नये असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा आ उपेंद्रजी शेंडे यांनी सांगितले आहे रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक सरचिटणीस तसेच राज्यसभेचे माजी उपसभापती दिवंगत नेते बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा जन्मशताब्दी सोहळा २५ सप्टेंबर रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे ह्या जन्मशताब्दी सोहळाचा प्रचार करण्यासाठी आज मुंबईत आझाद मैदान येथे पक्षाच्या कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा आ उपेंद्रजी शेंडे साहेब यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती त्यानंतर पत्रकार परिषदेत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे यांनी सांगितले की दि १२ सप्टेंबर पासून विदर्भाचा दौरा करणार आहेत ह्या दौऱ्यात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याबरोबर बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे ह्यावेळी बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा जन्मशताब्दी सोहळा यशस्वी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत सुचना करण्यात येणार आहे त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीबाबत काय भूमिका घ्यायची याचा आढावा कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून घेण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीबाबत भूमिका बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात जाहीर करण्यात येणार असल्याचे सुद्धा भाऊ निरभवणे यांनी सांगितले पत्रकार परिषदेत पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष भागवत कांबळे, सरचिटणीस विक्रांत पाटील, उपाध्यक्ष सलीम सय्यद, फरहाना ताई पठाण, इस्माईल मनियार उपस्थित होते अशी माहिती पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष भागवत कांबळे  यांनी दिली आहे.

आदी वंदू तुज मोरया…

 निवडणूकीच्या धामधुमीत आज आपल्या दोन दिवसांच्या मुंबई भेटीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपा प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आदी…

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शेतकरी, पोलिस, स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केली गणरायाची आरती

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाची आरती आज शेतकरी, पोलिस, स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया… मंगलमुर्ती मोरया या जयघोषाने वातावरण भारावून गेले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते. सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मान्यवरांनी वर्षा निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. हिंगोली जिल्ह्यातील लोहारा येथील काही शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते. त्यांच्या हस्ते गणपतीची दुपारची आरती करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची घरे, शेती पूर्णपणे वाहून गेली. त्यासंदर्भात बालाजी आढळकर, सखाराम बोडके, उमेश चव्हाण हे शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते. त्यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या शेतकऱ्यांची भेट घेऊन विचारपुस करीत त्यांना दिलासा दिला. यावेळी वर्षा निवासस्थानी कर्तव्यावर असलेले पोलिस, स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते देखील यावेळी आरती करण्यात आली.

गणेशोत्सवात नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छता प्रचार

नवी मुंबई : या वर्षीचा गणेशोत्सव इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त साजरा करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यामार्फत करण्यात आले असून विविध माध्यमांतून हे आवाहन नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. या करिता आधुनिक सोशल मिडीयाच्या ऑनलाईन माध्यमांप्रमाणेच पारंपारिक मुद्रित माध्यमांचाही प्रभावी उपयोग करण्यात येत आहे. गणेशोत्सव कालावधीत श्रीगणेशासमोर पूजन करतांना आरत्या म्हटल्या जातात हे लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आरती संग्रह प्रकाशित करण्यात आला असून दुमड पानांच्या स्वरुपातील या आकर्षक आरती संग्रहाच्या एका बाजूस पारंपारिक आरत्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत व दुस-या बाजूस स्वच्छता विषयक कचरा वर्गीकरण, प्लास्टिक प्रतिबंध, निर्माल कलशांचा वापर, सजावटीत प्लास्टिक व थर्माकोलऐवजी कागद कापड अशा पुनर्वापरयोग्य साहित्याचा उपयोग तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर टाळून शाडूच्या श्रीमूर्तींची प्रतिष्ठापना करणे आणि नैसर्गिंक जलस्त्रोतांचे रक्षण करीत कृत्रिम तलावातच विसर्जन करण्याचे संदेश प्रसारित करण्यात आलेले आहेत. या आरती संग्रहाचे प्रकाशन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते, अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या उपस्थित करण्यात आले. हे आरती संग्रह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, सोसायट्या व नागरिकांपर्यंत पोहचविण्यात आले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेने आरती संग्रहासारख्या पारंपारिक माध्यमाचा उपयोग करुन स्वच्छता व पर्यावरणाचे संदेश प्रसारित करण्यासाठी प्रभावीपणे राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. ००००

गौरीच्या आगमनासाठी बाजारपेठा फुलल्या

गौरीच्या आगमनासाठी बाजारपेठा सजल्या आहेत.  मुंबईतील दादर मार्केटमध्ये गौरीचे मुखवटे तसेच  गौरीच्या सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी  गर्दी उसळली होती…   मुंबई:  गणरायाच्या आगमनानंतर अडीच दिवसातच म्हणजे भाद्रपद मासातील शुद्ध सप्तमीला…

ठामपा क्षेत्रात दीड दिवसांच्या १७११३ गणेश मूर्तींचे विसर्जन

ठाणे :ठाणे महापालिका क्षेत्रातील दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन रविवारी भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. यावर्षी महापालिका क्षेत्रात दीड दिवसांच्या १७११३ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी याही वर्षी चांगला प्रतिसाद दिला.त्याचप्रमाणे महापालिकेच्या गणेश मूर्ती स्वीकृत केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण २४५ गणेश मूर्तींचे तसेच, फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील २७ गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नागरिकांनी कृत्रिम तलावांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले. आयुक्त राव यांनी कोपरी विसर्जन घाट, रायलादेवी, उपवन, नीळकंठ येथील कृत्रिम तलाव, कोलशेत विसर्जन घाट येथे भेट देऊन विसर्जन व्यवस्थेची सोमवारी पाहणी केली. दीड दिवसाच्या विसर्जनाच्या वेळी आलेल्या अनुभवानुसार सर्व ठिकाणी विसर्जन व्यवस्थेत आवश्यक सुधारणा कराव्यात, स्वच्छता ठेवावी, अशा सूचना आयुक्त राव यांनी दिल्या. या पाहणीच्या वेळी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, शंकर पाटोळे, सचिन पवार, मनोहर बोडके, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, स्थानिक सहाय्यक आयुक्त, स्थानिक कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ गेली १३ वर्षे गणेशोत्सव काळातील निर्माल्य व्यवस्थापन करीत आहे. दीड दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे १२ टनाहून अधिक निर्माल्य संकलित झाले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे. तसेच निर्माल्यांतील अविघटनशिल घटकांचे वर्गीकरण करून ते पुर्नप्रक्रियेसाठी पाठवण्या‍त येणार आहेत. यावर्षीही प्लास्टीक, थर्मोकोल यांचे निर्माल्यातील प्रमाण कमी झाले आहे. कृत्रिम तलाव (१५) – ८७००, खाडी विसर्जन घाट (०९) – ६५२०, विशेष टाकी व्यवस्था (४९) – १६२१,फिरती विसर्जन व्यवस्था (०६) – २७, मूर्ती स्वीकृती केंद्र (१०) – २४५, एकूण:१७११३. यावर्षी फिरती विसर्जन व्यवस्था नौपाडा-कोपरी, माजिवडा-मानपाडा, वागळे आणि वतर्कनगर या चार प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहे. सकाळी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रभाग समितीमधील विविध ठिकाणी ठराविक काळासाठी हे फिरते वाहन विसर्जन व्यवस्थेसह उपलब्ध राहील. त्यावरील टाकीमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करता येईल. या विसर्जन व्यवस्थेचे वेळापत्रक ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर, ‘पर्यावरणपूरक गणपती विसर्जन व्यवस्था २०२४’ या शीषर्कावर उपलब्ध उपलब्ध करण्यात आले आहे. गेल्यावर्षीपासून महापालिकेने कृत्रिम तलावांच्या सोबतीने छोट्या टाक्यांचीही व्यवस्था विसर्जनासाठी केली होती. त्यानुसार, गेल्यावर्षी ४२ ठिकाणी टाक्यांची सुविधा उपलब्ध होती. ती संख्या यंदा ४९ एवढी करण्यात आली. तसेच, जेल तलाव, मढवी हाऊस-राममारुती रोड, महागिरी कोळीवाडा, टेंभी नाका, रिजन्सी हाईट्स-आझादनगर, लोढा लक्झेरिया, कामगार हॉस्पिटल, किसन नगर बस स्टॉप, मॉडेला चेक नाका, देवदया नगर-शिवाई नगर या १० ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्रे आहेत.आंबेघोसाळे, मासुंदा दत्त घाट, खारीगाव, घोलाईनगर, दातिवली तलाव, खिडकाळी तलाव, न्यू शिवाजी नगर कळवा तलाव, निळकंठ वूड्स- टिकूजीनी वाडी, रेवाळे, बोरिवडे, ब्रम्हांड ऋतू पार्क, हिरानंदानी रायलादेवी-१, रायलादेवी-२,  उपवन तलाव परिसर-वर्तकनगर, देवदयानगर अशा १५ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर, कोपरी, पारसिक रेती बंदर,  रेतीबंदर -१, रेतीबंदर-२-राणानगर, फास्ट ट्रॅक ब्रिज, बाबाजी पाटील वाडी, शंकर मंदिर घाट, कोलशेत, बाळकूम अशा ०९ ठिकाणी विसर्जन घाटांची व्यवस्था आहे.

ठामपा क्षेत्रात दीड दिवसांच्या १७११३ गणेश मूर्तींचे विसर्जन

ठाणे :ठाणे महापालिका क्षेत्रातील दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन रविवारी भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. यावर्षी महापालिका क्षेत्रात दीड दिवसांच्या १७११३ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी याही वर्षी चांगला प्रतिसाद दिला.त्याचप्रमाणे महापालिकेच्या गणेश मूर्ती स्वीकृत केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण २४५ गणेश मूर्तींचे तसेच, फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील २७ गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नागरिकांनी कृत्रिम तलावांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले. आयुक्त राव यांनी कोपरी विसर्जन घाट, रायलादेवी, उपवन, नीळकंठ येथील कृत्रिम तलाव, कोलशेत विसर्जन घाट येथे भेट देऊन विसर्जन व्यवस्थेची सोमवारी पाहणी केली. दीड दिवसाच्या विसर्जनाच्या वेळी आलेल्या अनुभवानुसार सर्व ठिकाणी विसर्जन व्यवस्थेत आवश्यक सुधारणा कराव्यात, स्वच्छता ठेवावी, अशा सूचना आयुक्त राव यांनी दिल्या. या पाहणीच्या वेळी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, शंकर पाटोळे, सचिन पवार, मनोहर बोडके, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, स्थानिक सहाय्यक आयुक्त, स्थानिक कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ गेली १३ वर्षे गणेशोत्सव काळातील निर्माल्य व्यवस्थापन करीत आहे. दीड दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे १२ टनाहून अधिक निर्माल्य संकलित झाले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे. तसेच निर्माल्यांतील अविघटनशिल घटकांचे वर्गीकरण करून ते पुर्नप्रक्रियेसाठी पाठवण्या‍त येणार आहेत. यावर्षीही प्लास्टीक, थर्मोकोल यांचे निर्माल्यातील प्रमाण कमी झाले आहे. कृत्रिम तलाव (१५) – ८७००, खाडी विसर्जन घाट (०९) – ६५२०, विशेष टाकी व्यवस्था (४९) – १६२१,फिरती विसर्जन व्यवस्था (०६) – २७, मूर्ती स्वीकृती केंद्र (१०) – २४५, एकूण:१७११३. यावर्षी फिरती विसर्जन व्यवस्था नौपाडा-कोपरी, माजिवडा-मानपाडा, वागळे आणि वतर्कनगर या चार प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहे. सकाळी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रभाग समितीमधील विविध ठिकाणी ठराविक काळासाठी हे फिरते वाहन विसर्जन व्यवस्थेसह उपलब्ध राहील. त्यावरील टाकीमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करता येईल. या विसर्जन व्यवस्थेचे वेळापत्रक ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर,

स्वच्छ, सुंदर आणि विकसित जिल्ह्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

अशोक गायकवाड नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खूप वाव आहे. शहराचा विस्तार होत असताना योग्य नियोजन आणि उत्तम पायाभूत सुविधांच्या विकासावरही लक्ष द्यावे लागणार आहे. त्यादृष्टीने स्वच्छ, सुंदर आणि विकसित जिल्ह्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. शासकीय विश्रामगृहात वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसोबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यावेळी उपस्थित होते. राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, जिल्ह्याच्या अविकसित भागाच्या विकासावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने क्षेत्र निश्चित केल्यास शासन स्तरावरून सहकार्य मिळविणे सोयीचे होईल. कृषी आणि पशुधनाच्या विकासावरही विशेष लक्ष देऊन ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासालाही चालना देण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. औद्योगिकदृष्टीने विकसित होणाऱ्या नाशिकसारख्या शहरात तंत्रशिक्षणासाठी आधुनिक सुविधांनीयुक्त संस्था असणे गरजेचे आहे. आयआयएम, आयआयटी दर्जाच्या सुविधा असणाऱ्या तंत्रशिक्षण आणि व्यवस्थापन संस्था येथे गरजेच्या आहेत. शासनस्तरावरही याबाबतचा विचार करण्यात येईल, असे राज्यपाल राधाकृष्णन सांगितले. राज्य शासनाच्या विविध पथदर्शी योजनांच्या जिल्ह्यात होत असलेल्या अंमलबजावणीबाबत राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सविस्तर माहिती घेतली. महसूल दस्तावेजचे डिजिटायझेशन, राज्यात सेवा हक्क कायद्याची चांगल्यारीतीने अंमलबजावणी होत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांच्या हक्कांची योग्यरितीने जपणूक व्हावी. बचत गटांना आदिवासी भागात पोषण आहार पुरवठा करण्याबाबत नियोजन करावे. वायनरीच्या गरजेनुसार द्राक्ष पिकाबाबत संशोधनाला चालना देण्यात यावी, कांदा प्रक्रिया उद्योगाबाबतही प्रयोग व्हावेत. त्यासाठी बाजाराची मागणी आणि पुरवठा साखळीचा अभ्यास व्हावा. शासन प्रक्रिया उद्योगांना सहकार्य करीत असल्याने अशा उद्योगांना चालना देता येईल. यादृष्टीने प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी केली. कृषी विकासाच्या बाबतीत विशेषतः द्राक्षे आणि कांदा पिकाच्या बाबतीत अधिक संशोधन होण्याच्यादृष्टीने कृषी विद्यापीठांशी सहकार्य करून त्याला गती द्यावी, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगितले. जल जीवन मिशन, पीएम किसान, राज्य शासनाच्या विविध योजनांची माहितीही त्यांनी घेतली. नाशिक शहराने स्वच्छ भारत अभियानात यशस्वी होण्यासाठी उत्तम नियोजन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी, राज्यपाल महोदयांनी जिल्हा प्रशासन महानगरपालिका, आदिवासी विकास, पोलिस विभाग यांच्या संदर्भातील विविध बाबीवर चर्चा केली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी, शहर आणि लगतच्या परिसर विकासासाठी पायाभूत बृहत् आराखडा करण्याची गरज व्यक्त केली. येथील परिसर पर्यावरणाच्यादृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळे त्याची काळजी घेतली जाणे आवश्यक आहे. याबाबत आराखडा तयार करून सादर करण्याची सूचना राज्यपाल राधाकृष्णन यांनी केली. कुंभमेळ्याची पूर्वतयारी करतांना विकासकामांचे योग्य नियोजन करावे अशी सूचना राज्यपालांनी केली. जिल्हाधिकारी शर्मा यांनी, जिल्ह्यात तंत्रशिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरील संस्था स्थापण्याचे प्रयत्न असल्याचे सांगितले. जिल्ह्याला पर्यटन विकासासाठी मोठा वाव आहे. त्यावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरात रोजगार निर्मितीच्या अधिक संधीसाठी आयटी पार्क उभारण्याचा प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी दिली. या बैठकीनंतर राज्यपाल राधाकृष्णन यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीशीसंवाद साधत जिल्ह्याच्या विकासाबाबत चर्चा केली.