Author: bittambatami.com

अश्विन शेठ ग्रुप बिल्डरकडून फसवणुक झालेल्या ग्राहकांना न्याय मिळवून देणार – प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर   अश्विन शेठ ग्रुप या बिल्डरकडून ग्राहकांची फसवणुक होऊ नये म्हणून ठाणे महापालिकेने दक्षता घेणे गरजेचे आहे. याबाबत मंगळवारी ठाणे पालिका आयुक्तांच्या दालनात आयुक्त, वास्तूविशारद व ग्राहक प्रतिनिधींबरोबर बैठकीचे आयोजन केलेले आहे जेणेकरून अश्विन शेठ ग्रुप बिल्डरकडून फसवणुक झालेल्या सर्व ग्राहकांना न्याय मिळवून देणार असल्याची माहिती स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये विवियाना मॉल शेजारी अश्विन शेठ ग्रुप या बिल्डरचे अनेक विकास प्रकल्प असून त्यामध्ये ज्युरी नावाच्या गृहप्रकल्पाचा देखील समावेश आहे. सन २०१६ मध्ये अश्विन शेठ ग्रुप बिल्डरने हा प्रकल्प लॉन्च केला असून बहुतांश घरे ही मध्यमवर्गीय ग्राहकांना विकली गेलेली आहेत. यामध्ये २८ माळ्याचे  ३ टॉवर असून ६ विंग आहेत. प्रत्येक माळ्यावर ४ फ्लॅट आहेत.  सन २०१७ मध्ये रेरा कायदा अस्तित्वात आल्यानंतर अश्विन शेठ ग्रुप बिल्डरने ग्राहकांना डिसेंबर २०२२ ही पजेशनची अंतीम तारीख दिली होती. परंतू, सन २०२४ उजाडले तरी अद्यापपर्यंत या शेकडो ग्राहकांना घरे देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे अश्विन शेठ ग्रुप बिल्डरच्या पार्ले येथील व्यावसायिक कार्यालयावर व ज्या ठिकाणी प्रकल्प चालू आहे तेथील कार्यालयावर हे सर्व ग्राहक दर शनिवार-रविवार रूमचे पजेशन मागण्यासाठी जात होती परंतू, या सर्व ग्राहकांच्या तोंडाला पाने पुसली जात होती.काही ग्राहकांच्या मतानुसार अश्विन शेठ ग्रुप बिल्डरच्या विकास प्रकल्पाला बांधकाम नकाशे मंजूर नसतानाही घरे विकली गेलेली आहेत. तसेच ग्राहकांना रूम बुकिंग करताना घर वेगळे दाखविले परंतू, पजेशन देताना मात्र वेगळ्याच ठिकाणी घरे देत असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्राहकांच्या प्रतिनिधींनी स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रार केली. ३ ऑगस्ट, २०२४ रोजी अश्विन शेठ ग्रुप या बिल्डरकडून सर्व ग्राहकांना साईटवर बोलाविले असता विकासकाच्या वतीने त्यांच्या एच.आर. डिपार्टमेंटने पजेशन आता यावर्षी न देता सन २०२५ मध्ये देऊ, असे सांगितले. त्यामुळे सर्व ग्राहक भडकले व बिल्डराच्या विरोधामध्ये नारे लावायला लागले. यावेळी ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला होता. १५० ते २०० ग्राहकांच्या जमावाने बिल्डरांच्या कर्मचार्यांना घेराव घातला त्यामुळे तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता त्यावेळी विकासकांनी पोलिसांना बोलाविले. हे मुख्यमंत्र्यांचे ठाणे असून या परिसराचे आमदार प्रताप सरनाईक प्रतिनिधीत्व करीत असतील व या ठिकाणी ९० टक्यांपेक्षा अधिक ग्राहक महाराष्ट्रीयन असतील तर ठाण्यामध्ये विकासकांकडून ग्राहकांची फसवणुक करण्याची हिंमत कशी काय होते, असे ग्राहकांनी सांगितले. ही सर्व घटना स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांना कळताच ह्या प्रकल्पाच्या जागेवर जाऊन या प्रकल्पाचे वास्तुविशारद प्रवीण जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही प्रतिनिधीत्व करीत असलेल्या मतदारसंघातील प्रकल्पांमध्ये कुणाची फसवणुक होऊ देणार नाही असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. यासाठी महापालिकेने दक्षता घेणे गरजेचे असल्यामुळे त्यांनी ठाणे मनपा आयुक्तांशी चर्चा करून मंगळवारी, ६ ऑगस्ट, २०२४ रोजी दुपारी १२ वाजता आयुक्तांच्या दालनात वास्तूविशारद व ग्राहकांच्या प्रतिनिधींबरोबर एका बैठकीचे आयोजन केलेले आहे, जेणेकरून अश्विन शेठ ग्रुप बिल्डरकडून फसवणुक झालेल्या सर्व ग्राहकांना लवकरात लवकर न्याय मिळू शकेल. 00000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील चरित्रग्रंथाचा ०७ ऑगस्ट रोजी ठाण्यात प्रकाशन सोहळा!

ठाणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजवरचा जीवनप्रवास शब्दबद्ध करण्यात आलेल्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा बुधवारी, ०७ ऑगस्टला…

आज पनवेलमध्ये ‘भजन स्वरपुष्प’

पनवेल : लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नादब्रम्ह साधना मंडळ खारघर व पनवेल तालुका सांस्कृतिक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ५ ऑगस्ट रोजी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन…

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे मंजुषा पाटील यांचे गायन

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभांतर्गत मंजुषा पाटील यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात हा कार्यक्रम रविवार दिनांक…

बीओबी कप १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धा  ११ ऑगस्टला 

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग प्रायोजित बीओबी कप ६/७/८/९/१०/११/१२/१४ वर्षाखालील मुलामुलींची बुध्दिबळ स्पर्धा ११ ऑगस्ट रोजी आरएमएमएस सभागृह, परेल, मुंबई-१२ येथे होणार आहे. आयडियल…

‘राष्ट्रीय समूह गान’स्पर्धेत एसपीएमच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी

मुंबई :  भारत विकास परिषद, कोथरूड शाखा, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित ‘राष्ट्रीय समूहगान स्पर्धा ‘ ही महर्षी स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर, पुणे’ येथे ०३ ऑगस्टला संपन्न झाली. या स्पर्धेत आपल्या ‘शिक्षण…

मुलुंडमधील गृहनिर्माण सोसायट्यांना जाहीर आवाहन

मुंबई : मराठा मंडळ मुलुंड या आमच्या मान्यवर संस्थेतर्फे दरवर्षी अनेक लोकोपयोगी कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केले जातात. मंडळातर्फे येत्या १० ऑगस्ट रोजी, शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता मुलुंडमधील गृहनिर्माण सोसायट्यांतील रहिवाशांकरीता…

मलेरिया, डेंग्यूला रोखण्यासाठी परिसरातील विशेष तपासणी शिबीरांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

नवी मुंबई- सद्स्थितीत पावसाळा कालावधी सुरु असून हिवताप / डेंग्यू सारख्या किटकजन्य आजाराच्या डासांकरिता पोषक वातावरण तयार झाले आहे. हिवताप / डेंग्यूसारख्या किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्याकरिता आणखी ठोस उपाययोजना राबविण्याच्या…

माळी समाज मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न

ठाणे : श्री संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त ठाण्यात माळी समाज मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तसेच माळी समाज स्नेह संमेलन एनकेटी हॉल, ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपा मिडिया सेल केंद्रीय समन्वयक तथा कोकण पदवीधर आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्यांक विभाग निरीक्षक नजीब मुल्ला, माजी नगरसेवक मनोहर डुंबरे, माळी समाज अध्यक्ष नवनीत सिनलकर, कार्याध्यक्ष डॉ. अक्षय झोडगे, उपाध्यक्ष श्रीधर रासकर, सरचिटणीस स्वप्नील वाघोले, खजिनदार दशरथ साबळे, महिला संघटक अलका सिनलकर, महिला उपाध्यक्ष अरुंधती डोमाळे आदी मान्यवर उपस्थित होते. 00000

मुंब्र्याच्या बदनामी विरोधात सर्वधर्मीय युवक अभियान राबविणार !

ठाणे : गेल्या १५ वर्षात मुंब्रा प्रचंड प्रमाणात विकास झाला आहे. पायाभूत सुविधांमध्ये मुंब्रा आज इतर शहरांच्या तुलनेत विकसित होत आहे. तरीही, काही ठराविक लोकांकडून मुंब्र्याला बदनाम केले जात आहे.…