सौंदर्याची खाण, बॉलिवूडची शान; मधुबाला
आज १४ फेब्रुवारी, बॉलिवूडची मर्लिन मनरो, सौंदर्याची खाण, बॉलिवूडची शान, चित्रपट सृष्टीतीलच नव्हे तर भारतातील सर्वात सुंदर महिला असे जीचे वर्णन केले जाते त्या मधुबाला यांचा आज जन्मदिन. आज त्यांची…
आज १४ फेब्रुवारी, बॉलिवूडची मर्लिन मनरो, सौंदर्याची खाण, बॉलिवूडची शान, चित्रपट सृष्टीतीलच नव्हे तर भारतातील सर्वात सुंदर महिला असे जीचे वर्णन केले जाते त्या मधुबाला यांचा आज जन्मदिन. आज त्यांची…
व्हॅलेन्टाइन दिवस हा भारतीय नसला तरी प्रेम हा विषय मात्र जागतिकच नाही तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील सोनेरी-चंदेरी क्षणांचा सोबती असतो आणि त्यामुळेच कदाचित नव्या पिढीने प्रेमासाठी या दिवसाचा पाठपुरावा केला…
काल समाजमाध्यमावर पत्रकारांच्या एका समूहात एका पत्र परिषदेचे निमंत्रण प्रसारित केले होते. त्यात कोणाची आणि कोणत्या विषयावर पत्र परिषद हे तर नमूद केले होतेच, पण शेवटी पत्र परिषद संपल्यावर सर्वांना…
बांगलादेशला अमेरिकेची फूस बांगलादेशमध्ये ‘जमात-ए-इस्लामी’ या संघटनेवर यापूर्वी अनेक वेळा बंदी घालण्यात आली होती. अलिकडेच शेख हसीना यांची राजवट आरक्षण आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामुळे उलथवून टाकण्यात आली. तिथे युनूस मोहम्मद…
भारतातील रुग्णांसाठी जागतिक उपक्रमाचे उद्घाटन रमेश औताडे मुंबई : हृदयविकार आणि नसांशी संबंधित आजारांसाठी एकाच गोळीमध्ये अनेक औषधांचे मिश्रण असलेले उपचार आता भारतात होणार आहेत. फ्रान्समधील औषध निर्मिती कंपनी सर्वियर ने भारतात ‘ गॅटिन ‘ नावाचा एक जागतिक दर्जाचा उपक्रम सुरू करणार आहे. बऱ्याचदा गंभीर आजारांमध्ये रुग्णांना दिवसभरात अनेक वेगवेगळ्या गोळ्या घ्याव्या लागतात. यामुळे औषधे घेण्याचा कंटाळा येतो. “ एक गोळी, अनेक औषधे “ यामुळे रुग्णांना दररोज अनेक गोळ्या घेण्याऐवजी फक्त एकच गोळी घ्यावी लागेल. गॅटिनचे मुख्य ऑफिसर डॉ. क्षितिज पानसे म्हणाले की, आम्ही भारतातील तज्ज्ञ आणि सर्वियरचे जागतिक कौशल्य एकत्र करून रुग्णांना उच्च दर्जाची औषधे कमी वेळात उपलब्ध करून देणार आहोत. कार्यकारी उपाध्यक्ष शार्लेट मार्मोसेझ यांनी सांगितले की, रुग्णांचे आरोग्य सुधारण्यासाठी भारतात हा पहिलाच जागतिक प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात तब्बल १३५ कोटी रुपये ही कंपनी गुंतवणार आहे. ही औषधे भारतात तयार करून आशिया, लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील देशांमध्ये निर्यात केली जातील.
अडिवली येथील ऑस्टिन नगर रस्ता व रस्तालगत गटर बनविण्याची मागणी आई एकविरा महिला मंडळाचे केडीएमसी महापौरांना पत्र कल्याण : कल्याण पूर्वेतील मलंगरोडवरील अडिवली येथील ऑस्टिन नगर रस्ता व रस्तालगत गटर बनविण्याची, स्ट्रीट लाईट लावण्याची मागणी करण्यात आली असून याबाबत आई एकविरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सोनी क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांनी केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी यांची भेटून पत्र दिले आहे. गेल्या ६ ते ७ वर्षापासून अडिवली परिसरातील ऑस्टिन नगर, अंजनाबाई गॉर्डन, येथील रस्ता व रस्त्यालगत गटार बनविण्याकरिता व स्ट्रीट लाईट लावण्याकरिता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त व शहरअभियंता तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे आई एकविरा महिला मंडळ वारंवार पत्राद्वारे पाठपुरवा करित आहे. मंडळाच्या वतीने पाठपुरावा करीत असताना वारंवार आयुक्त व शहर अभियंता यांच्याकडून निधीची कमतरता असल्याचे त्यांच्याकडून उत्तर येत असून ऑस्टिन नगर, अंजनाबाई गॉर्डन, अडिवली येथील रस्त्याची अवस्था खूपच बिकट झालेली आहे. मंडळाच्या वतीने दोन वेळा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर निषेध व श्राध्द आंदोलन केले आहे. त्यामुळे या विभागाची पाहणी करुन तातडीने रस्ता व रस्त्यालगत गटार बनविण्याकरिता व स्ट्रीट लाईट लावण्याकरिता निधी उपलब्ध करण्याची मागणी आई एकविरा महिला मंडळाच्या वतीने महापौरांकडे करण्यात आली आहे.
फेस्कॉमची मुंबई महापौर रितू तावडेसोबत सदिच्छा भेट महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) अध्यक्ष आण्णासाहेब टेकाळे, मुंबई विभाग अध्यक्ष सुरेश पोटे व सदस्य दिलीप धारकर यांनी नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांची सदिच्छा भेट घेतली व ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या तसेच ज्येष्ठ नागरिक धोरण २०१३ व १८ बाबत कल्पना दिली मुंबई मधील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्या बाबत मा महापौर रितू तावडे यांनी सकारात्म प्रतीसाद दिला व लवकरच मिटिंग घेणे बाबत सूचना दिल्या, ज्येष्ठाचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले त्या बद्दल आम्ही आभार व्यक्त केले.
मानसिक आरोग्य जपण्यासाठी अध्यात्म आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे ही काळाची गरज – गौरांग दास अनिल ठाणेकर ठाणे : आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे मानसिक तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असून जगभरात मानसिक तणावामुळे दरवर्षी सुमारे एक ट्रिलियन डॉलरचे आर्थिक नुकसान होत आहे. धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात वाढता मानसिक तणाव ही जागतिक समस्या बनली आहे. भारतातही आत्महत्यांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून मानसिक आरोग्य हा अत्यंत गंभीर विषय बनला आहे. शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य जपण्यासाठी अध्यात्म आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचे मार्गदर्शन इस्कॉनचे आध्यात्मिक नेते आणि गोवर्धन इकोव्हिलेजचे संचालक गौरांग दास यांनी ‘तणावमुक्ती आणि आनंदी जीवनाची गुरूकिल्ली’ या महत्वपूर्ण विषयावर केले. ठाणे महानगरपालिका आणि इस्कॉन ठाणे यांच्यावतीने ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन गुरूवारी (१२ फेब्रुवारी) डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास ठाणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, उमेश बिरारी, दिनेश तायडे, अनघा कदम, मिताली संचेती, दिपक झिंजाड यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, महानगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर शर्मिला पिंपळोलकर,आुयक्त सौरभ राव यांच्या हस्ते गौरांग दास यांचा सन्मान करण्यात करण्यात आला.आज प्रत्येक व्यक्ती हा तणावातून जात आहे, मग तो विद्यार्थी असो, गृहिणी असो की, नोकरदार वर्ग असो, प्रत्येकाला काही ना काही चिंता असते. यातून मार्ग काढणे गरजेचे असते. खरं आनंदी जीवन जगण्यासाठी संतुलन, समाधान आणि सकारात्मकतेची गरज भासत असल्याचे नमूद करीत महापालिकेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले.प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना अडचणी येत असतात, त्यामुळे तणाव निर्माण होत असतो, दोष व्यवस्थेचा नसतो तर आपण कशा पध्दतीने प्रतिक्रिया देतो, येणाऱ्या आव्हानांना कसे सामोरे जातो हे महत्वाचे असते. धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला तणावमुक्त जीवन जगता यावे, तणावमुक्ती का आवश्यक आहे.संतुलित जीवनाचे नेमके सूत्र कसे अवलंबावे यासाठी इस्कॉनने ठाणे महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयुक्त सौरभ राव यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी भगवद्गीतेतील शिकवणीचा संदर्भ देत तणावाचे मूळ कारण अपेक्षा आणि वास्तव यांतील अंतर आहे. “आपण सर्वजण सत्ता, पैसा, प्रतिष्ठा मिळविण्याचा प्रयत्न करतो; पण परिणाम आपल्या हातात नसतो. आपल्या हातात केवळ प्रयत्न असतात, परिणामावर नियंत्रण नसते, ही जाणीव तणावमुक्तीची पहिली पायरी आहे,” असे गौरांग दास यांनी नमूद केले.जीवनातील स्पर्धा, बढती, यश-अपयश यामुळे निर्माण होणारा ताण वाढतो, अपेक्षा पूर्ण न झाल्यास मनावर ताण वाढतो आणि त्याचे परिणाम मानसिक आरोग्यावर होतात, असे सांगून भगवद्गीतेच्या मार्गदर्शनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. सन्मान, सेवा आणि सामूहिक शक्तीचा स्वीकार हे तणावमुक्त जीवनाचे महत्त्वाचे घटक असल्याचे सांगण्यात आले. “आपल्यापेक्षा मोठी शक्ती कार्यरत आहे, ही जाणीव ठेवून नम्रता आणि सेवा वृत्ती स्वीकारली तर मन शांत राहते,” असे मार्गदर्शन करण्यात आले. ‘चिंता सोडा आणि जगायला शिका’ (‘Stop Worrying and Start Living’ ) हा मंत्र दिला. बाह्य परिस्थितीवर आपले नियंत्रण नसले तरी, आपल्या जाणीवा आणि विचारांवर आपण ताबा मिळवू शकतो असे गौरांग दास यांनी नमूद केले. ठाणे महानगरपालिकेने इस्कॉनच्या सहकार्याने अशा प्रकारच्या व्याख्यानाचे आयोजन केल्याबद्दल महापालिका अधिकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.
सनियंत्रण समिती बरखास्त करण्याची स्थानिकांची मागणी मुकुंद रांजाणे माथेरान: माथेरान मधील हातरीक्षा ओढण्याची अमानवीय प्रथा पूर्णपणे बंद करून या श्रमिकांना एकूण ९४ पर्यावरण पूरक ई रिक्षा देण्यात याव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले असताना देखील सनियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हे आदेश धुडकावून लावले असून फक्त २० ई रिक्षा देण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी सनियंत्रण समितीचे अध्यक्ष के. पी. बक्षी, सचिव तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली यामध्ये आणखीन फक्त वीस ई रिक्षांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यातील १३ ई रिक्षा प्रशासन खरेदी करणार असून सात ई रिक्षा नगरपरिषदेने उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश बैठकीत देण्यात आले आहेत.त्याबाबतची अंमलबजावणी केव्हा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्या वीस ई रिक्षा सुरू असल्या तरी त्यासुध्दा वाढत्या पर्यटनामुळे खूपच कमी पडत आहेत.त्यामुळे उर्वरित ५४ हातरीक्षा चालकांच्या वाट्याला पुन्हा एकदा ही अमानवीय प्रथा नशिबी असणार आहे. सनियंत्रण समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे ही समिती ज्यांना या गावाविषयी सहानुभूती नाही,इथले पर्यटन बहरावे,स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याबाबत काहीएक देणेघेणे नसल्याने ही समितीच बरखास्त करून टाकावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. ———————————— सनियंत्रण समितीच्या झालेल्या बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत काही निमंत्रित पदाधिकारी,पर्यावरण क्षेत्रात काम करणारे काही सामाजिक कार्यकर्ते आणि रिक्षा संघटनेचे काही सदस्य उपस्थित होते.या प्रतिनिधींना बैठकीत चर्चा करण्याची कोणतीही संधी दिली नाही.या समितीने सुप्रीम कोर्टाचे आदेश धुडकावल्याने ई रिक्षा वाढीसंदर्भात प्रश्न पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ———————– महाराष्ट्रातुनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातुन याठिकाणी मोठया प्रमाणावर पर्यटक येत असतात.स्वातंत्र्य पूर्वकाळापासून इथे हातरीक्षा ओढण्याची अमानवीय प्रथा सुरू आहे.ही प्रथा बंद करण्यासाठी स्थानिकांनी थेट न्यायालयात धाव घेतली होती.त्यानंतर ई रिक्षाचा प्रायोगिक तत्वावरील प्रयोग यशस्वी झाल्याचा अहवाल आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ६ फेब्रुवारी पर्यंत ७४ हातरीक्षा बंद करून चालकांचे ई रिक्षा द्वारे पुनर्वसन करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते.ही मुदत संपून गेल्यावर आंदोलन सुध्दा करण्यात आले त्यानंतर प्रशासनाने १२ फेब्रुवारी पर्यंतची मुदतवाढ मागवून घेतली होती.
रक्तदानातील उत्कृष्ट कार्यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे एसएसटी महाविद्यालयाचा गौरव कल्याण : सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या एस.एस.टी. कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटचा मुंबई विद्यापीठातर्फे प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. रक्तदान शिबिरांच्या यशस्वी आयोजनाबरोबरच जनजागृतीत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची ही दखल आहे. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी भवन येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात विद्यापीठाच्या एनएसएस सेलचे ओएसडी प्रा.सुशील शिंदे, कार्यक्रम अधिकारी रमेश देवकर तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत महाविद्यालयाचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा एनएसएसचे ठाणे जिल्हा समन्वयक प्रा.जीवन विचारे आणि एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते. एस.एस.टी. महाविद्यालयाने रक्तदान शिबिरांसाठी व्यापक जनजागृती करत विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजवले. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून रक्तदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून प्रत्यक्ष शिबिरांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी यांनी सांगितले की, एस.एस.टी. महाविद्यालय सामाजिक जबाबदारी जपत रक्तदानाबरोबरच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बालके, समाजातील उपेक्षित घटक आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रातही सातत्याने कार्यरत आहे. भविष्यातही विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत समाजासाठी कटिबद्ध राहण्याचा महाविद्यालयाचा निर्धार आहे.