नवीन ई-पॉस मशीन्समुळे धान्य वितरणात येणार अधिक पारदर्शकता- सर्जेराव सोनवणे
अशोक गायकवाड रायगड : महाराष्ट्र शासनामार्फत जिल्ह्यातील सर्व १ हजार ४४२ रास्त भाव धान्य दुकानांत नवीन ई-पॉस मशीन्स या Iris Scanner सह उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नवीन ई-पॉसमशीन्स या आकाराने मोठ्या असून वापरण्यास अत्यंत सुलभ आहेत. तसेच नवीन ई-पॉस मशीन्समुळे लाभार्थ्यांच्या अंगठयाद्वारे आधार प्रमाणीकरणाची गती देखील वाढणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी दिली आहे.* राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत ई-पॉस मशीनद्वारे लाभार्थ्यांची आधार प्रमाणीकरण करुन (बायोमेट्रिक ओळख पटवून) लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार राज्यात सन २०१७ मध्ये लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून शिधा वस्तूंचे ऑनलाईन वितरण करण्यासाठी सर्व रास्त भाव धान्य दुकानांत ई-पॉस उपकरणे उपलब्ध करुन देण्यात आली होती. या ई-पॉस मशीन्स उपयोगात आणून बराच अवधी झाल्याने मशीन्स वारंवार नादुरूस्त होणे तसेच मशीनवर अंगठयाद्वारे आधार प्रमाणीकरण करताना खूप वेळ लागणे इ.समस्या उद्भवत होत्या. त्यामुळे आता नवीन मशीन देण्यात आल्या आहेत. या नवीन मशीनमुळे ज्या लाभार्थ्यांच्या हाताच्या बोटांचे ठसे अस्पष्ट झाल्याने आधार प्रमाणीकरण होत नाही अशा लाभार्थ्यांच्या डोळयांद्वारे आधार प्रमाणीकरण करता येणार आहे. यासाठी Iris Scanner हे उपकरण ईपॉस मशीनसोबत बसविले आहे. यामुळे धान्य वितरण व ई-केवायसी करणे देखील अधिक सोपे होणार आहे. याचा मोठया प्रमाणात फायदा कामानिमित्त स्थलांतरीत असलेल्या लाभार्थ्यांना देखील होणार आहे. या सर्व बाबींमुळे सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्य वितरण निश्चितच अधिक सुलभ, प्रभावी तसेच पारदर्शक होणार आहे. जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे आधार संलग्नीकरण, ई-केवायसी (आधारप्रमाणीकरण ) व मोबाईल सीडींग शिधापत्रिकेशी झालेले आहे याबाबत खात्री करुन घ्यावी. तसेच ज्या सदस्यांचे ई-केवायसी (आधारप्रमाणीकरण)व मोबाईल सीडीग अद्याप झालेले नाही, अशा सदस्यांना नजीकच्या रास्त भाव धान्य दुकानांत सुविधा उपलब्ध आहेत त्याचा लाभ घ्यावा. 00000
बेचिराख गाझात शांतता कधी ?
बरोबर २७७ दिवसांपूर्वी इस्त्रायलने हम्मास बंडखोरांचा उच्छाद कायमचा संपवण्याचा विडा उचलला आणि गाझा पट्टीवर प्रचंड बाँबहल्ले् केले आणि नंतर तिथे थेट रणगाडेही घुसवून आक्रमण सुरु केले. गाझा पट्टीतील शहरे, गावे,…
कॅलिडोस्कोप किस्से, बायकोची अजबगजब अट!
जग झपाट्याने बदलत आहे. आता पती-पत्नी दोघेही काम करत आहेत आणि आपले जीवन आरामात जगत आहेत; परंतु कधीकधी असेदेखील घडते की, पती पत्नीवर दबाव आणू लागतात. बायका नोकरी सोडतात आणि…
लोकसंख्या शिक्षण काळाची गरज
आज ११ जुलै आजचा दिवस जगभर जागतिक लोकसंख्या दीन म्हणून साजरा केला जातो. ११ जुलै १९८७ रोजी जगात पाच अब्जावे बालक जन्माला आले तेंव्हापासून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून…
खरा अंकुश कोणाचा?
खास बात डॉ. भालचंद्र कानगो लोकशाही असणाऱ्या सर्व देशांमध्ये लोकहितासाठी लोकांचा शासनावर अंकुश असणे अपेक्षित असते. मात्र सध्याची देशातीलच नव्हे तर जागतिक स्थिती बघता निवडणुकीच्या माध्यमातून हे साधणे शक्य होते…
नवी मुंबईत प्रेमांश फाऊंडेशनतर्फे ट्रक चालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर
नवी मुंबई : प्रेमांश फाउंडेशनने ‘सुश्रुत 2.0’ कार्यक्रमाच्या माध्यमातून ट्रक ड्रायव्हर्सच्या अपूर्ण आरोग्य गरजांवर लक्ष केंद्रित केले आहे. अॅमेझॉन आणि डोकऑनलाइन यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्याचा उद्देश हा आहे की या दुर्लक्षित समुदायाला आरोग्य आणि कल्याणाच्या दृष्टीने मदत करणे. मुंबईत या कार्यक्रमाची अंमलबजावणी होत असून 350 ट्रक ड्रायव्हर्सच्या एकात्मिक आरोग्य गरजांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत 5 जुलै ते 10 जुलै 2024 दरम्यान पाच दिवसीय आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये ट्रक ड्रायव्हर्ससाठी सुमारे 75 चाचण्यांची तपासणी केली जात आहे. या व्यतिरिक्त, कार्यक्रम अंतर्गत ट्रक ड्रायव्हर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी 60 हून अधिक डॉक्टरांशी कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी मोफत आणि अमर्यादित टेली-आरोग्य सल्लामसलत देण्यात येत आहे. या सेवांच्या माध्यमातून, ड्रायव्हर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांना आपत्कालीन स्थितीत आरोग्य तज्ञांशी संपर्क साधता येतो आणि एक वर्षासाठी अमर्यादित सल्लामसलत मिळते. प्रेमांश फाउंडेशनच्या संस्थापक आणि सीईओ डॉ. शिखा शुक्ला यांनी सांगितले की, “ट्रक ड्रायव्हर्सच्या कामाच्या स्वरूपामुळे आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे संसर्गजन्य रोगांचे प्रमाण जास्त आहे.” त्यांनी अॅमेझॉनचे आभार मानले कारण त्यांच्या मदतीमुळे या ट्रक ड्रायव्हर्सना आता त्यांच्या प्रवासातच डॉक्टरांशी संपर्क साधता येईल. या एकात्मिक आरोग्य कार्यक्रमाचा लाभ एकूण 1400 ट्रक ड्रायव्हर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत, बेंगळुरू, मानेसर आणि आता मुंबई येथे या कार्यक्रमाचा लाभ 5000 हून अधिक ट्रक ड्रायव्हर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.
जनावरांना साथीच्या रोगापासून सुरक्षित राहण्यासाठी मुरबाडमध्ये शिबिराचे आयोजन
राजीव चंदने मुरबाड : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद,पुणे अंतर्गत बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली,संलग्न यशोदिप सामाजिक विकास संस्था संचलित कृषी महाविद्यालय सरळगांव कृषी वर्धिनी विभागातील विदयार्थ्यांनी बळेगाव येथे गाई,म्हैसी,बैल, लहान लहान वासरे आजारी पडू नये,तसेच त्यांना कोणत्याही साथीच्या रोगा पासून सुरक्षित राहण्या करिता लसीकरणाचे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी डॉ.महेंद्र सूर्यराव,एच डी जाधव सर,शेतकरी तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. ग्रामीण भागात पावसाळा सुरु झाला कि साथीचे रोग सुरु होतात आणि या रोगा मध्ये जनावरे आजारी होतात साथीच्या रोगा पासून सुरक्षित राहण्या करिता बळेगाव येथील योगेश विशे यांच्या फार्मावर जनावरा करिता लसीकरणाचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ.महेंद्र सूर्यराव यांनी गाई,म्हैसी,बैल,वासरे यांना लसीकरण केले यावेळी उपस्थित शेतकरी विध्यार्थी यांना पाळीवप्राण्याच्या साथीच्या रोंगांची सखोल माहिती देत यावर कोणते उपाय केले पाहिजेत,कोणते आजार होतात या बाबत माहिती दिली बळेगाव येथे पहिल्यांदा जनावरा करिता लसीकरणाचे शिबीर घेण्यात आल्याने या शिबिरात करण्यात आलेल्या लसीकरणाने जनावरांचे आरोग्य निश्चितच सुरक्षित राहील म्हणत शेतकऱ्यांनी विद्यार्थी,शिक्षक,डॉ सूर्यराव यांचे आभार व्यक्त केले. लसीकरण शिबिरा वेळी पावसाळ्या मध्ये विशेष करून FMD,HS,Botolizum या सारखे साथीचे रोग जनावरा मध्ये पाहण्यासाठी मिळतात असल्याने एफ एम डी,या रोगावर डॉ. सूर्यराव यांनी लसीकरण केले यावेळी कृषी विद्यालयाचे विध्यार्थी रिचा डोईफोडे,तन्वी खामगांवकर,सिद्धी कारभारी,सानिका कारभारी,अपूर्वा केंजळे,कोमल खुशह,विश्वजीत पोतदार,आर्यन ऊंडे,शुभम भगत,यश कराळे,रोहन कनसे,यश वाघ,स्वराज कापसे,ओमकार नारूडकर,सिद्धार्थ सुंदरे,साईराज वाबळे,साईनाथ नरके, सुरज पवार,या विदयार्थ्यांनी लसीकरण शिबीर यशस्वी केले.
माझा प्रभाग माझी जिम्मेदारी
माजी नगरसेविकेचे राहिवाश्यांकडून आभार मुंबई : प्रभाग क्रमांक 20 (अ ) येथे ठाणेकर वाडी कन्हैया नगर येथील मार्गावरती राजश्री शिव छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर तसेच टीकम सोसायटी, संत…
