गोविंदा रे गोपाळा…
दहीहंडीसाठी बाळगोपाळांचा जोरदार सराव सुरु आहे. मुंबईतील वाळकेश्वरच्या बाणगंगा येथे पिंपळेश्वर मित्र मंडळाचे पथक दहीहंडी सराव करताना.
दहीहंडीसाठी बाळगोपाळांचा जोरदार सराव सुरु आहे. मुंबईतील वाळकेश्वरच्या बाणगंगा येथे पिंपळेश्वर मित्र मंडळाचे पथक दहीहंडी सराव करताना.
मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या आपकडून महाराष्ट्रातील विधानसभेसाठी तीन उमेदवार आतापर्यंत जाहीर करण्यात आलेत. आपकडून परभणीत सतीश चकोर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. मराठवाड्यातील बीड, लातूर पाठोपाठ परभणीतही आप उमेदवार लढणार असल्याचे…
मुख्यमंत्र्यांची मदतीची घोषणा जळगाव: नेपाळ येथील काठमांडू येथे देवदर्शनासाठी जात असताना भाविकांची बस दरीत कोसळली होती. या दुर्दैवी अपघातात जळगावच्या 26 भाविकांचा मृत्यू झाला. या नेपाळ येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्याच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे ५…
जळगाव : महिलांवर अत्याचार हा अक्षम्य अपराध आहे. तो करणारा कोणीही असो, तो सुटता कामा नये, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जळगाव येथे लखपती दीदी कार्यक्रम पार पडला. या वेळी…
मुंबई : मुंबईकरांसाठी खुषखबर आहे. यंदा मुंबईकरांना गणपती बाप्पाचे डे -नाईट दर्शन घेता येणार आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचे दर्शन डे-नाईट गणेशभक्तांना घेता यावे, यासाठी ‘बेस्ट’ (BEST) उपक्रमाने यंदाही रात्रभर सेवा देण्याचा निर्णय घेतला…
पालिकेची स्वतःची मिनीबस सुरू होण्याच्या प्रतिक्षेत नागरिक ! माथेरान : माथेरान करांच्या कर्जत ते माथेरान दरम्यानच्या वाहतूक व्यवस्थेचा मुख्य कणा म्हणून मिनीबस सेवेला अधिकाधिक प्राधान्य दिले जाते.या सेवेचा लाभ सर्वसामान्य लोकांना, व्यापारी त्याचप्रमाणे शैक्षणिक दृष्टीने महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठया प्रमाणावर होत आहे. ११ ऑक्टोबर २००८ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष मनोज खेडकर यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळेच अनेक खडतर आव्हाने पेलून ही मिनीबस सेवा उपलब्ध झाली असून आजवरच्या काळात याच सेवेच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेऊन आपले करियर करता आले आहे.सुरुवातीला ह्या बसने उत्तम प्रकारे सेवा उपलब्ध करून दिली होती. परंतु काही वर्षांपासून ह्या बसने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यातच या मार्गावरील दोन बसेसची पुरती वाताहत झाली असल्याने घाटरस्त्यात कुठेही बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ही बस व्यवस्थित प्रवास देईल याचीही शाश्वती राहिलेली नाही. पर्यटनस्थळ माथेरान मध्ये स्थानिकांना आजवर आपल्या मूलभूत अधिकार असो किंवा गावाची विकासात्मक कामे असोत नेहमीच इथल्या गलिच्छ राजकारणापायी संघर्ष करावा लागत आहे.राज्यातील विविध ठिकाणी सर्वत्रच शासनाच्या मिनीबसेस प्रवाशांना सेवा देत आहेत. त्यामुळे माथेरान नगरपरिषदेच्या माध्यमातून लवकरच या मार्गावर स्वतःच्या दोन बसेस उपलब्ध करून दिल्यास शालेय विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे नियमित प्रवास करणाऱ्या व्यापारी वर्गाला, नागरिकांना सोयीचे ठरू शकते असे स्थानिक बोलत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या माध्यमातून चालविण्यात येणारी कर्जत माथेरान मिनीबसची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.सुरुवातीच्या काळात माथेरानसाठी दोन मिनी बस दिल्या गेल्या होत्या नंतर त्यातील एक बस ही पनवेल येथे फिरविण्यात आली त्यामुळे येथील नागरिकांना एकाच बसवर अवलंबून राहून खडतर प्रवास करावा लागत आहे.फार जुनी बस असल्याने नेरळ माथेरान घाटात अचानक बंद पडल्याने प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. संबंधित प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन किमान दोन नवीन बस नागरिकांच्या सेवेत आणल्यास नागरिकांचा प्रवास सुखकर होईल आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला देखील याचा निश्चित फायदा होईल. चंद्रकांत जाधव— अध्यक्ष क्षत्रिय मराठा समाज माथेरान
१ लाख महिला ठरल्या पात्र एकूण लाभार्थी महिलांची संख्या सुमारे २ लाख ठाणे- राज्य सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील एक लाख अर्जांची छाननी ठाणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करून वेळेत…
मुंबई : जिजामातानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सन २०२४ -सन २०२५ ची कार्यकारिणीची निवड जाहिर करण्यात आली असून मंडळाच्या अध्यक्षपदी सुशील मनोज साळसकर यांची तर सरचिटणीसपदी मंगेश घेगडे यांची निवड करण्यात आली. जिजामातानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे कामगार विभागातील प्रख्यात मंडळ असून या मंडळ आजवर धार्मिक तसेच राष्ट्रीय व विविध सामाजिक विषयांवर आधारित देखावे सादर करून समाजप्रबोधनाचे कार्य करण्यासाठी सुपरिचीत आहे. भूकंप , पूर यासारख्या नैसर्गिक आपत्ती प्रसंगी मदतनिधी देऊन आपल्यापरीने खारीचा वाटा उचलून आपले सामाजिक दायित्व बजावण्याचं कामही हे मंडळ करीत असते. यंदा मंडळाचे हे ७३ वे वर्ष असून मंडळाची ७२वी वार्षिक सभा मंडळाचे विश्वस्त महेश पावसकर,प्रशांत सुर्वे,राजू नाईक यांंच्या उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली. या सभेत सन २०२४ ते सन २०२५ या वर्षासाठी कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली.कार्यकारी मंडळ पुढीलप्रमाणे.अध्यक्ष- सुशील मनोज साळसकर कार्याध्यक्ष – सुनिल जुवळे. उप कार्याध्यक्ष – ऋषिकेश खोत, कल्पेश नागे, अक्षय गोसावी. उपाध्यक्ष -राहूल कदम,वैभव गवस,अभिनय राणे. सरचिटणीस- मंगेश घेगडे चिटणीस- शुभम घाटगे,सिद्धार्थ कदम,अभिषेक नलावडे. खजिनदार- संदीप मेंगडे.हिशोब तपासणीस- राकेश खानविलकर.
मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि आमदार यांनी विजयाची हंडी फोडत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विजयाचा एल्गार पुकारला. निमित्त होते राहुल नारायण कनल आणि जश वीरा यांच्या…