Author: bittambatami.com

नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पूर्वतयारीचा अजित पवार यांच्याकडून आढावा

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येत असून त्यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या अनुषंगाने  प्रशासनाने करावयाच्या कार्यवाहीच्या पूर्वतयारीचा आढावा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज…

काळा घोडा परिसरात शनिवार-रविवारी वाहनांना बंदी

मुंबई : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेल्या काळा घोडा परिसरातील पाच रस्ते हे दर शनिवारी व रविवारी सायंकाळी केवळ पादचाऱ्यांसाठी खुले ठेवण्यात येणार आहेत. प्रत्येक शनिवारी आणि…

वाढवण बंदराविरुद्ध एकजुटीने लढा उभारला पाहिजे-  रघुनाथदादा पाटील

ठाणे : केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी व कष्टकरी कामगारांचे खूप नुकसान झाले आहे. वाढवण बंदरामुळे अनेक गावे प्रस्थापित होणारा असून मच्छीमार समाजाचे खूप नुकसान होईल,  त्यामुळे वाढवण बंदर रद्द करण्याच्या विरोधात…

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनची ५९वी वार्षिक सभा’ २८ सप्टेंबरला

मुंबई:- मुंबई शहर कबड्डी असो.ची २०२३-२४ची “५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा” शनिवार,२८ सप्टेंबरला संध्याकाळी ५ वाजता घेण्यात येणार आहे. भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा, मुंबई येथे मुंबई शहर संघटनेचे अध्यक्ष आमदार…

शिवनेरी मंडळाच्या कबड्डी स्पर्धेने मुंबईच्या कबड्डी मोसमाची सुरुवात ३ ऑक्टोबरपासून

मुंबई:- शिवनेरी सेवा मंडळाच्या विद्यमाने, मुंबई शहर कबड्डी  असोसिएशनच्या मान्यतेने ३ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत विशेष व्यावसायिक, व्यावसायिक “अ”, महिला तसेच कुमार गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या…

ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा?-ॲड आशिष शेलार

मुंबई : अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला पण एन्काऊंटर विरोधकांचा झाला आहे. कालपासून त्यांची व पिलावळांची वक्तव्य पाहतोय,हा बेशरमपणा आहे. अफजल गुरुची ‘बरसी’ करता तशी आता अक्षय शिंदेची पण ‘बरसी’ करणार…

 जिल्ह्यात प्रत्येक घरात नळाने पाणी पुरवठा, जलजीवन मिशन यशस्वी – डॉ. भरत बास्टेवाड

 ५ लाख ४८ हजार ६२० कुटुंबांपैकी ४ लाख ७१ हजार ८२६ कुटुंबांना नळ कनेक्शन अशोक गायकवाड अलिबाग : प्रत्येक घरात नळाने पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबावणी करण्यात आली असून ५ लाख ४८ हजार ६२० कुटुंबांपैकी ४ लाख ७१ हजार ८२६ कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली. रायगड जिल्ह्यातील ५ लाख ४८ हजार ६२० कुटुंबांपैकी ४ लाख ७१ हजार ८२६ कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले असून, या कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. विशेष म्हणजे उरण, म्हसळा, खालापूर तालुक्यातील १०० टक्के कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. केंद्र सरकारने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. या अंतर्गत प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला ज्या घरांमध्ये नळ कनेक्शन आहे, त्या घरांची माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ज्या घरांमध्ये वैयक्तिक नळ कनेक्शन नाही अशा घरांना नळ कनेक्शन देण्यात येत आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ८६ टक्के कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे.जिल्ह्यात जलजीवन मिशन यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी. वेंगुर्लेकर, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी योग्य नियोजन करून योजना प्रभावीपणे राबवित आहेत. तालुका : कुटुंबे : नळ कनेक्शन दीलेली कुटुंबे : टक्के, अलिबाग : ७१ हजार ३६४ : ५६ हजार १३२ : ७८.६७, कर्जत : ५४ हजार ५०९ : ४१ हजार ७९९ : ७६.६८, खालापूर : ३६ हजार ४७ : ३६ हजार ४७ : १००, महाड : ४२ हजार ४९९ : ३६ हजार ९४१ : ८६.९२, म्हसळा : १४ हजार ५६५ : १४ हजार ५६५ : १००, मुरुड : १६ हजार ४२३ : १५ हजार २६५ : ९२.९५, पनवेल : ८१ हजार ८३० : ७२ हजार ६०५ : ८८.७३, पेण : ४५ हजार ६७ : २९ हजार १९५ : ६४.७८, पोलादपूर : १६ हजार ५०३ : १३ हजार २९७ : ८०.५७,सुधागड : १५ हजार ८६५ : १२ हजार ४४५ : ७८.४४, तळा : ११ हजार ४९१ : १० हजार ३९६ : ९०.४७, उरण : ३६ हजार ३०० : ३६ हजार ३०० : १००, रोहा : ४२ हजार ६७० : ३७ हजार १९१ : ८७.१६, माणगाव : ४२ हजार १०४ : ३९ हजार ८१० : ९४.५५, श्रीवर्धन : २१ हजार ३८३ : १९ हजार ८३८ : ९२.७७ ०००००

पाणी पुरवठा विषयी जाहीर आवाहन

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेचे भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र व मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची व इतर कामे करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी सकाळी 10.00 ते रात्री…

 आशियातील सर्वात मोठया एपीएमसीच्या पाचही मार्केटमध्ये

 4 हजारहून अधिक नागरिकांनी राबविले महास्वच्छता अभियान नवी मुंबई : आशियातील सर्वात मोठया एपीएमसी मार्केटमध्ये लोकसहभागातून नवी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये नमुंमपा व एपीएमसी अधिकारी, कर्मचारी यांच्यासह लोकप्रतिनिधी, स्वच्छताकर्मी, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, युवक, विद्यार्थी आणि स्वच्छताप्रेमी नागरिक यांनी 4 हजारहून अधिक मोठया संख्येने सहभागी होत हे भव्यतम अभियान यशस्वी केले. यामध्ये विशेषत्वाने विविध महाविद्यालयांचे एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याप्रमाणे एपीएमसी मार्केटमध्ये काम करणा-या माथाडी कामगारांनी ते ज्या मार्केटमध्ये काम करतात तेथील स्वच्छता मोहीमेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छतामित्र तसेच एपीएमससी मार्केट्सचे स्वच्छताकर्मी यांनीही अभियान यशस्वी करण्यात योगदान दिले. विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व सदस्यही मोठ्या संख्येने या स्वच्छता मोहीमेत सक्रिय सहभागी झाले. एपीएमसी मार्केट मधील कांदा बटाटा मार्केट येथे अभियानाचा शुभारंभ करताना महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांच्यासह उपस्थितांनी स्वच्छता व प्लास्टिकमुक्तीची सामुहिक शपथ ग्रहण करीत स्वच्छतेस प्रारंभ केला. भाजीपाला मार्केट, फळ बाजार, मसाला मार्केट, दाणा बाजार अशा पाचही मार्केटमध्ये सखोल स्वच्छता मोहीम व्यापक जनसहभागातून राबविण्यात आली. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण देशभरात ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा साजरा करण्यात येत असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने व्यापक लोकसहभागावर भर देत दररोज विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियान अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवितांना त्यामध्ये विद्यार्थी सहभागावर भर दिला जात आहे. या महास्वच्छता अभियानामध्ये महानगरपालिकेच्या वतीने मॅकेनिकल स्विपींग मशीन, जेटींग मशीन, डस्ट सप्रेशन व्हेईकल, सक्शन युनीट, जेसीबी, डम्पर, कचरा संकलनाच्या घंटागाड्या आदी वाहनांचाही वापर करण्यात आला. जेटींग मशीनव्दारे एपीएमसी मार्केट परिसर स्वच्छ करण्यात आला. विशेषत्वाने भाजीपाला मार्केटमधील  प्लॅटफॉर्मची सफाई करण्यात आली. त्यासाठी प्रक्रियाकृत पाण्याचा वापर करण्यात आला. त्याचप्रमाणे निर्जंतुकीकरणही करण्यात आले. अडगळीच्या जागांचीही सफाई करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. यावेळी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी एपीएमसीचे सचिव डॉ.पी.एल. खंडागळे यांच्यासह भाजीपाला मार्केटची अंतर्गत व परिसर पाहणी करुन त्याठिकाणी नियमित स्वच्छता राहील अशाप्रकारे सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. या मोहीमेमध्ये नमुंमपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांच्यासह माजी मंत्री शशिकांत शिंदे, माजी आमदार संदीप नाईक, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक व सचिव डॉ.पी.एल. खंडागळे, नमुंमपा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व शिरीष आरदवाड, एपीएमसीचे सहसचिव डॉ.महेश साळुंखे पाटील व संचालक अशोक वाळुंज व शंकरशेठ पिंगळे, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील व विशाल डोळस, नमुंमपा घनकचरा विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व संतोष वारुळे तसेच इतर विभागप्रमुख, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. 00000

 छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम, मीरा भाईंदरच्या इतिहासाचे शो !

म्युझिकल फाउंटनच्या ‘वॉटर स्क्रीन’वर दिसणार मुख्यमंत्र्यांच्याहस्ते ३० सप्टेंबर रोजी लोकार्पण, १६ कोटींच्या खर्चातून पूर्ण झाले तलाव सुशोभीकरण -प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर/ अरविंद जोशी   भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील २ तलावांचे सुशोभीकरण करून त्यात ‘म्युझिकल फाउंटन’ बसविण्याचे काम पूर्ण झाले असून ३० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सायंकाळी या म्युझिकल फाउंटनचे लोकार्पण होणार आहे. मीरा भाईंदर शहरात पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रमाणात हे संगीत कारंजे बसवले गेले असून यामुळे तलावासोबतच परिसराच्या व शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. नवघर येथील तलाव व काशिमीरा येथील जरीमरी तलाव या तलावात म्युझिकल फाउंटन ३० तारखेपासून सुरु होणार असून दररोज रात्री म्युझिकल फाउंटनचे येथे शो येथे होतील , अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी आज दिली. दोन्ही तलावातील या कामांवर सुमारे १६ कोटी खर्च करून हे भव्य – दिव्य आकर्षक काम पूर्ण केले गेले असून मीरा भाईंदर शहर सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या कामात मोठी भर पडली आहे. मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील नवघर , गोडदेव , काशिमीरा तलाव हे जुने तलाव असून येथे परिसरातील नागरिक फिरण्यासाठी , निवांत वेळ घालविण्यासाठी सकाळ – संध्याकाळी येत असतात. त्यामुळे या तलावांचे सुशोभीकरण करून त्याठिकाणी संगीत कारंजे (म्युझिकल फाउंटन) बसविण्यासाठी ५० कोटी निधी देण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून याकामासाठी १०० टक्के निधी राज्य सरकार कडून आमदार सरनाईक यांनी मंजूर करून आणला होता. हा निधी राज्य सरकारने मीरा भाईंदर महापालिकेला दिला होता. त्यातून तिन्ही तलावात सुशोभीकरणाचे काम सुरु करण्यात आले. त्यातील दोन तलावातील कामे पूर्ण झाली आहेत. आमदार सरनाईक यांनी वेळोवेळी सुशोभीकरणाच्या कामाच्या साईटवर जाऊन आढावा घेतला, कामाला गती दिली. गेल्या ८ ते ९ महिन्याच्या कालावधीत हे काम पूर्ण झाले आहे.आमदार प्रताप सरनाईक यांनी माहिती देताना सांगितले की , नवघर येथील तलावाचे सुभोभिकारण करण्यात आले आहे आणि तलावात म्युझिकल फाउंटन बसवला गेला आहे. नवघर तलावाच्या आत असलेल्या म्युझिकल फाउंटन म्हणजेच संगीत कारंजे उडतील त्यावर ‘वॉटर स्क्रीन’ बनेल. त्यावर ऑडिओ व्हिडीओ कन्टेन्ट म्हणजेच पाच – पाच मिनिटांचे शो दाखवले जातील. आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज , अयोध्या येथील प्रभू श्री रामाचे मंदिर , मीरा भाईंदरचा इतिहास यावर हे म्युझिकल फाउंटन शो होणार आहेत व त्याची स्क्रिप्ट बनवली जात आहे. शिवाय राज्यात पहिल्यांदाच नवघरच्या तलावात म्युझिकल फाउंटन सोबत ‘फायर नोझल’ लावला गेला आहे. फायर नोझल म्हणजे म्युझिकल फाउंटन सुरु असताना काही नोझल मधून फायर निघते …वॉटर आणि फायरचा संगम येथे पाहायला मिळेल. शिवाय नवघर तलावाचे सुशोभीकरण करत असताना तलावाच्या परिसरात अम्पी थियेटर बनवले असून तेथे ५०० लोक बसून हा म्युझिकल फाउंटन शो बघू शकतील. लहान मुलांना खेळण्यासाठीची जागा आहे , तलावाला ग्रील लावले आहेत व लॅन्ड स्केपिंग गार्डन केले गेले आहे. नवीन कुंपण भिंत, नागरिकांना चालण्यासाठी पाथ वे , बसायला वेगवेगळे कट्टे बनवले आहेत. नवघरच्या तलावात होणारा म्युझिकल फाउंटनचा शो हा लक्षवेधी , नयनरम्य आणि पाहण्यासारखा असेल , असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. दररोज रात्री ७ , ८ व ९ वाजता म्युझिकल फाउंटनचे शो होतील व संपूर्ण मीरा भाईंदर मधून लोक ते बघण्यासाठी येतील असेही ते म्हणाले. आकर्षक लाईट इफेक्ट्स विद्युत रोषणाई या म्युझिकल फाउंटच्या वेळी पाहायला मिळेल आणि लोक हे पाहताना आनंद व्यक्त करतील. काशिमीरा येथील जरीमरी तलाव येथेही म्युझिकल फाउंटन बसवला गेला आहे. संगीतावर नाचणारे कारंजे येथे दिसतील. विशेष म्हणजे या संगीत कारंज्याची रंगसंगती दिवसाप्रमाणे व दिन विशेषांप्रमाणे बदलू शकणार आहे अशी त्यात व्यवस्था केली गेली आहे.  स्वातंत्र्य दिन , दिवाळी , श्री गणेशोत्सव असे जे जे महत्वाचे दिवस असतील त्या दिवशी त्या म्युझिकल फाउंटनचे रंग बदलतील आणि त्या रंगातील व त्या म्युझिकवर म्युझिकल फाउंटन बघायला मिळतील. देशभक्ती , भक्ती संगीत किंवा प्रत्येक दिवसाप्रमाणे म्युझिकल फाउंटन सुरु राहणार आहे , अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.  मीरा भाईंदरच्या दोन मोठ्या तलावांचे रूप पूर्णपणे या कामामुळे पालटले गेले असून परिसराच्या व शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. हे तलाव सुशोभीकरण करीत असताना तलावाचे पाणी कायम शुद्ध राहील याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा भाईंदरला भरभरून विकास निधी दिल्याने ठाण्याप्रमाणेच मीरा भाईंदर शहर खूप विकसित आणि सुशोभित होत आहे. ठाण्याप्रमाणेच मीरा भाईंदरही सुशोभीकरणात पुढे चालले आहे, असे आमदार सरनाईक म्हणाले. ठाण्याच्या उपवन तलावात म्युझिकल फाउंटन लावला गेला आहे. त्याचप्रमाणे आता मीरा भाईंदरच्या दोन तलावात हे म्युझिक फाउंटन लावले गेले आहेत. नवघर तलावात तर म्युझिकल फाउंटनचे काम करताना फायर नोझल पहिल्यांदा लावला गेला आहे. आमदार सरनाईक यांनी राज्य सरकारकडून निधी आणला. त्यांच्या संकल्पनेतून तलाव सुशोभीकरणासोबतच म्युझिकल फाउंटन लावले गेले. शिवाय आमदार सरनाईक यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा , जागेवर येऊन वेळोवेळी घेतलेला कामाचा आढावा व दिलेल्या सूचना यामुळे हे काम वेळेत पूर्ण झाले आणि संपूर्ण मीरा भाईंदरकर नागरिकांच्या पसंतीस उतरेल , असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.