पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी विशेषांकासाठी साहित्य पाठवा – मारुती विश्वासराव
ठाणे : अखिल भारतीय बंदर व गोदी उद्योगात जुनी असलेली मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनला १०४ वर्ष झाली असून, या युनियनचे ” पोर्ट ट्रस्ट कामगार ” या दिवाळी…
ठाणे : अखिल भारतीय बंदर व गोदी उद्योगात जुनी असलेली मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनला १०४ वर्ष झाली असून, या युनियनचे ” पोर्ट ट्रस्ट कामगार ” या दिवाळी…
ठाणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबरला स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने, १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा २०२४’ मोहीम…
ठाणे : रायगड जिल्ह्यातील साने गुरुजी स्मारक वडघर येथे नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये प्रा प्रवीण देशमुख यांना ज्येष्ठ कवयित्री निरजा यांच्या हस्ते आधारस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त…
आमदार सरनाईक यांच्या प्रयत्नाने मीरा भाईंदर स्वच्छ शहर मोहिमेसाठी राज्य सरकारकडून १५० कोटींचा निधी अनिल ठाणेकर/अरविंद जोशी भाईंदर : जनतेच्या सहभागामुळे स्वच्छ भारत – स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे रुपांतर एका राष्ट्रीय चळवळीत झाले आहे. या अभियानामुळे लोकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे. त्याचाच अधिक विस्तार करून ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात ‘स्वच्छ ठाणे – मीरा भाईंदर’ ही स्वच्छ शहर मोहीम २ ऑक्टोबर गांधी जयंती पासून सुरु करीत आहोत , असे आज आमदार प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले. मीरा भाईंदर शहरात नवीन आधुनिक टोगो वाहने , खत निर्मिती प्रकल्प तसेच प्रत्येक सोसायटीला ओला – सुका कचरा ठेवण्यासाठी डबे वाटप केले जाणार आहेत. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारकडून १५० कोटींचा निधी दिला आहे , अशी माहितीही आमदार सरनाईक यांनी दिली. आमदार सरनाईक यांच्या मतदारसंघातील प्रत्येक सोसायटी , इमारती , बैठ्या चाळींना चांगल्या दर्जाचे डस्टबिन्स वाटप सुरु केले जाणार आहे. मीरा भाईंदर शहरात ‘शून्य कचरा मोहीम’ राबवून शहर स्वच्छ – सुंदर करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाणार आहेत. लोकांच्या सक्रीय सहभागामुळेच ‘स्वच्छ सुंदर ठाणे – मीरा भाईंदर’चे हे स्वप्नही प्रत्यक्षात उतरेल याची मला ही मोहीम सुरु करताना खात्री आहे असेही आमदार प्रताप सरनाईक म्हणाले. ‘स्वच्छ सुंदर…आपले ठाणे – मीरा भाईंदर’ ही स्वच्छ शहर मोहीम २०२४ सुरु करण्याबाबत आज आमदार प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘स्वच्छ शहर मीरा भाईंदर’ मोहिमेची अंमलबजावणी होत असताना माझ्या मतदारसंघातील ठाणे आणि मीरा भाईंदर शहर स्वच्छ , सुंदर रहावे येथील हवामानाचा दर्जा चांगला रहावा व प्रदूषणमुक्त चांगले वातावरण सदैव रहावे यासाठी जे – जे प्रयत्न करता येतील ते मी प्रशासनाच्या मदतीने वेळोवेळी केले आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित कायमस्वरुपी स्वच्छतेसाठी स्वस्त आणि योग्य आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे हेही सध्याच्या दिवसात आवश्यक बनले आहे. यासाठी आपल्या शहरात काही नवीन योजना व उपक्रम हाती घ्यायचे मी ठरवले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या स्वच्छ शहर मोहिमेसाठी ठाणे शहरास १५० कोटी व मीरा भाईंदर शहरास १५० कोटी असा एकूण ३०० कोटींचा निधी दिला आहे अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली. ते पुढे म्हणाले की , या शासकीय निधीतून शहरातील प्रत्येक हौसिंग सोसायटीला आपण ओला व सुका कचरा ठेवण्यासाठी चांगल्या दर्जाचे २ डबे (डस्टबिन्स) वाटप सुरु करणार आहोत. जेणेकरून हौसिंग सोसायट्या ओला व सुका कचऱ्याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण करू शकतील आणि वर्गीकरण केलेला कचरा नंतर संकलित होईल. आमदार म्हणून मी शहरातील माझ्या मतदारसंघातील प्रत्येक हौसिंग सोसायट्यांना हे डबे देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे हौसिंग सोसायट्यांची वार्षिक आर्थिक बचतही होईल. सोसायट्याना कचऱ्याचे डबे देण्यासोबतच ओल्या कचऱ्याची समस्या पूर्णपणे कमी व्हावी यासाठी आधुनिक टोगो हे यंत्र वाहन खरेदी करण्यात आले आहे. ओला कचरा गोळा करून अत्याधुनिक टोगो वाहन शहरात फिरत असतानाच त्यात ओल्या कचऱ्यापासून खत बनविण्याचे काम करत राहील , अशी माहितीही आमदार सरनाईक यांनी दिली व टोगो वाहनाचे प्रात्यक्षिक ही यावेळी दाखवले. कचरा व्यवस्थापनाअभावी उद्भवणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी आता व्यापक प्रमाणावर सातत्याने प्रयत्न होणे आवश्यक आहे. यातील ओल्या कचऱ्याची समस्या पूर्णतः सुटावी या दृष्टीने ओल्या कचऱ्याचे रूपांतर खतात करणारे एक आधुनिक टोगो यंत्र वाहन तयार करून ते आपल्या शहरात आणण्यात आले आहे. ठाण्यासाठी २० व मीरा भाईंदर शहरासाठी २० टोगो व्हॅनची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या टोगो व्हॅनचा मोठा फायदा होत आहे. ठाण्यात गेले ६ महिने यशस्वीपणे सुरु असलेली टोगो व्हॅनची अंमलबजावणी आता मीरा भाईंदरमध्ये सुरु होणार आहे , अशी माहितीही आमदार सरनाईक यांनी दिली.आमदार सरनाईक यांनी माहिती दिली की , चालता – फिरता कचऱ्यापासून खत निर्मिती करणारे टोगो हे जगातील या प्रकारचे पहिलेच यंत्र वाहन आहे. टोगो (towgo) अर्थात ट्रीटमेंट ऑफ द वेस्ट ऑन द गो.. अशी ही संकल्पना असून कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी जागा, त्याचप्रमाणे कचऱ्यातून पसरणारी दुर्गंधी यासारख्या समस्यांवर हा एक सरळ व सोपा असा उपाय आहे. टोगो वाहन नैसर्गिक इंधनावर (CNG वर) चालत असल्याने आणि प्रक्रियेसाठी सौर ऊर्जेचा वापर करत असल्याने टोगो ही प्रदूषण विरहित आहे आणि निसर्गासाठी फारच सकारात्मक ठरत आहे. शहराच्या विविध भागात जाऊन टोगो कचरा गोळा करणार असल्याने कचऱ्याच्या ने – आण दरम्यान सांडणाऱ्या कचऱ्यातून पसरणारी घाण व दुर्गंधी यांचाही प्रश्न सुटणार आहे. टोगो ही ठिकठिकाणी जाऊन ओला कचरा गोळा करते. वाहन धावत असतानाच या टोगो मध्ये अवघ्या सात दिवसात या कचऱ्याचे रूपांतर खतात होते. ओल्या म्हणजे घनकचऱ्याचे खतात रूपांतर होण्यासाठी जरी सात दिवस लागत असले, तरीदेखील आपण या टोगो व्हॅन मध्ये दररोज कचरा टाकू शकतो आणि निर्माण होणारे कंपोस्ट खतही आपल्याला रोजच्या रोज मिळू शकते. यामुळे घरोघरी जाऊन कचरा गोळा करत असताना देखील खत निर्मितीसाठी लागणारी सर्व प्रक्रिया यात सुरूच असते. टोगो मधून निर्माण होणारे खत शहरातील उद्याने , रस्त्याच्या दुतर्फ़ा असलेली झाडे तसेच मोठ्या हौसिंग सोसायट्यांमधील उद्याने यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातूनही हे खत आपण नागरिकांना उपलब्ध करून देऊ शकतो असेही ते म्हणाले. या एका टोगो वाहनाची क्षमता दीड टन ओल्या कचऱ्यावर दररोज प्रक्रिया करण्याची आहे. सात दिवसात यात ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत होणार असले तरी दररोज दीड टन कचरा या वाहनात प्रक्रियेसाठी टाकू शकणार आहे. याचबरोबर शहरात ४ ठिकाणी खत बनविण्याचे स्वतंत्र प्रकल्पही प्रस्तावित करण्यात आले आहेत , अशी माहिती आमदारांनी दिली. ओला व सुका कचरा वर्गीकरण व सखोल स्वछता मोहिमेची सवय प्रत्येक सोसायटीला , प्रत्येक नागरिकाला लागली पाहिजे. यासाठी प्रत्येक बिल्डिंगला चांगल्या दर्जाचे डस्टबिन्स आम्ही वाटप करत आहोत. आपले शहर कायम स्वच्छ – सुंदर , आरोग्यदायी आणि प्रदूषणमुक्त , पर्यावरणस्नेही निरोगी वातावरण राहण्यासाठी , ‘सूक्ष्म कचरा व्यवस्थापन’ करणे आवश्यक आहे. ‘शून्य कचरा’ मोहीम ३६५ दिवस सुरु रहावी असे आम्हाला वाटत असले तरी शहरातील प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेचे दूत बनून यात सहभाग घेतला पाहिजे. जे डबे आम्ही वाटप करणार आहोत त्याची देखभाल निगा सोसायटीने ठेवायची आहे. तर सार्वजनिक ठिकाणे , फुटपाथ , जिथे लोकांची गर्दी असते अशा ठिकाणीही कचरा टाकण्यासाठी डस्टबिन्स ठेवले जाणार आहेत , अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छ शहर आपले ठाणे – मीरा भाईंदर’ ही मोहीम आम्ही सुरु केली आहे. २ ऑक्टोबर पासून ही मोहीम पूर्णपणे प्रत्येक प्रभागात सुरु होणार आहे. ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी , कार्यकर्तेही प्रत्येक प्रभागात जाऊन जनजागृती करणार आहेत. आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून पूर्ण प्रयत्न करीत आहोत. आता प्रत्येक नागरिकाने स्वच्छ शहरासाठी शपथबद्ध होऊन या मोहिमेला अधिक मजबुतीने साथ दिली पाहिजे. म्हणजे देशातील पहिल्या १० स्वच्छ-सुंदर शहरात आपल्या ठाणे , मीरा भाईंदरचे नाव घेतले जाईल त्याचवेळी ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाले असे आम्हास वाटेल असेही आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. ०००००
ठाणे : ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणानंतर प्रवाशांची जितकी म्हणून अडचण होईल, तितक्या प्रमाणात अडथळे निर्माण करण्याचा विडा मध्य रेल्वे प्रशासनाने उचलल्याचे दिसत आहे. सर्वात आधी रुंदीकरणासाठी घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे…
डोंबिवली : पुणे येथील गोखले अर्थशास्त्र-राज्यशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरून विख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांना हटविल्याने देशभरातील विद्वतजन, अर्थतज्ज्ञांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्याच बरोबर डोंबिवलीतील विविध क्षेत्रातील…
मतांच्या राजकारणात माथेरान विकासात्मक दृष्ट्या पिछाडीवर माथेरान : माथेरान या नगावाला विकसनशील क्षेत्र बनण्यासाठी नेहमीच संघर्ष करावा लागला आहे आणि यापुढेही भावी पिढीला आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करावा लागू नये यासाठी येथील आशावादी भूमिपुत्रांना आजही स्वप्नवत जीवन जगावे लागत आहे.इथली काही मोजकीच राजकीय पक्षांची मंडळी ज्यांना खरोखरच या गावासाठी काहीतरी नवीन करण्याची मनीषा आहे त्यांनाही त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कामे करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत आटोकाट प्रयत्न करावे लागत आहेत.इथल्या एखाद्या पक्षाचे नेतृत्व विकासाची गंगा आणण्यासाठी कार्यक्षम असले तरीसुद्धा मुख्यमंत्री असोत किंवा अन्य खात्याच्या मंत्र्यांना ह्या गावाची कैफियत अथवा गार्हाणी कथन करावयाची झाल्यास तालुक्यातील आमदार किंवा जिल्ह्यातील खासदार याना विश्वासात घेऊन जाणे क्रमप्राप्तच आहे अन्यथा होणाऱ्या कामास देखील हेतूपूर्वक खोडा आणून कोणतीही विकास कामे पूर्णत्वास जाऊच शकत नाही याचा प्रत्यक्ष अनुभव स्थानिकांना आलेला आहे आणि ही येथील वस्तुस्थिती असल्याचेही स्थानिकांमधून बोलले जात आहे. काही दिवसांनी विधानसभा निवडणूका होणार असल्याने कर्जत खालापूर मतदार संघात उमेदवारीसाठी प्रत्येक पक्षात चढाओढ सुरू असून तालुक्यातील गल्लीबोळात प्रचाराची धामधूम सुरूच आहे, प्रत्येक पक्षात पक्षप्रवेश त्याचप्रमाणे मतदारांच्या भेटीगाठी सुरू असून जल्लोषात वाढदिवस आणि उत्सव साजरे होताना शक्तिप्रदर्शन जोरात सुरू आहे. आपली बाजू भक्कम असल्याचा अविर्भाव इच्छुक उमेदवार आणताना दिसत आहेत. तालुक्यातील आदिवासी वाड्या असोत किंवा अन्य अडगळीच्या ठिकाणी कधी नव्हे ते तिथे जाऊन त्या भागातील लोकांची विचारपूस,त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, नादुरुस्त रस्ते, वीज,पाणी समस्या याबाबत जातीने लक्ष केंद्रित करत आहेत. याच मतदार संघात जेमतेम तीन हजारांच्या आसपास मताधिक्य असलेले माथेरान हे पर्यटनस्थळ सुध्दा समाविष्ट आहे. परंतु आजतागायत या स्थळाकडे संबंधित निवडून येणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आजवर कानाडोळाच केलेला दिसत आहे.आपल्या पक्षाला साधारणपणे माथेरान मधून एक हजारांच्या आसपास मते मिळणार आहेत त्यामुळे निवडणूक काळात इकडे विधानसभा असो किंवा लोकसभा निवडणूक असो सहसा कुणीही उमेदवार वेळ वाया घालवत नाहीत आपल्या काही कार्यकर्त्यांना पाठवून जे काही निवडणुकीचे मतांबाबतचे व्यवहार आहेत ते पूर्ण केले जातात.जणू काही या उमेदवारांना इथल्या मतांचे काहीएक स्वारस्य नसल्याप्रमाणे वागतात. आश्वासने ही नेहमीप्रमाणे दिली जातात पण मतांच्या राजकारणामुळे अल्प मतदान असल्याने इथली विकास कामे पूर्ण करण्याची विधानसभा उमेदवारांना माथेरानच्या विकासाबाबत इच्छाशक्ती नाही.निवडुन आल्यावर सुध्दा इकडे फारसे फिरकत नाहीत. माथेरान करांची काही मोठी मागणी नाही.फक्त याठिकाणी पर्यटन वाढीसाठी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी अन्य ठिकाणी जाण्यासाठी उत्तम प्रकारे पर्यायी व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी फिनिक्युलर रेल्वे,प्रलंबित असणारा रोपवे प्रकल्प तसेच चौक येथून मोटार वाहन रस्ता थेट रामबाग पॉईंट पर्यंत उपलब्ध होऊ शकतो ही होणारी कामे असून त्यासाठी निवडून येणाऱ्या आमदारांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून कामे पूर्ण करणे बाकी आमची काहीच मागणी नाही असे जाणकार जेष्ठ मंडळी बोलत आहेत. स्वातंत्र्यानंतर सुध्दा आपल्या न्यायहक्कासाठी माथेरान सारख्या दुर्गम परंतु जगप्रसिद्ध पर्यटनस्थळी पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेल्या भूमिपुत्रांना संघर्षमय जीवन जगावे लागत आहे. काही प्रश्न असल्यास शासन दरबारी खेटे मारून कामे कशीबशी पूर्ण करून घ्यावी लागत आहेत आणि जी काही अशक्यप्राय कामे आहेत ती पूर्ण करण्यासाठी आमदार, खासदार यांना विनवण्या करून आशेवर राहावे लागत आहे मतांच्या राजकारणात माथेरान पिछाडीवर पडले आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे इथली अल्प मतदार संख्या त्यामुळे भविष्यात सुध्दा भूमिपुत्रांचे संघर्षमय जीवन राहणार की काय असा प्रश्न स्थानिक भूमिपुत्र उपस्थित करत आहेत.यासाठी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांसाठी किती धावपळ करावी हे त्यांनी स्वतःहून जाणले पाहिजे. 0000
विरार : विरार मध्ये गणपती विसर्जन करताना, गणेश भक्ताचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विरार पूर्व तोटले तलावात आज बुधवार ता 18 रोजी पहाटे साडे साडे तीन वाजता ही दुर्दैवी…
पालघरः वर्गात चार भिंतीच्या आत आणि शाळेच्या वेळेत केवळ पुस्तक घेऊन ज्ञानदान करणं म्हणजे शिक्षण नव्हे आणि असं काम करणारा शिक्षकही नव्हे, तर शिक्षणाची व्याख्या फार विस्तृत आहे. भारताचे दुसरे…
रामदास आठवले यांचा दावा योगेश चांदेकर पालघरः महायुतीवर संविधान बुडवायला निघाल्याचा आरोप करणारे आणि संविधान वाचवण्याची मोहीम काढणारे अमेरिकेत गेल्यानंतर मात्र आरक्षण रद्द करण्याची भूमिका घेतात. त्यांचा खरा चेहरा आता समोर आल्याने विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला त्याचा फटका बसणारा असून महायुतीला १५० ते १६० जागा मिळतील, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केला. यावेळी खासदार डॉ हेमंत सवरा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकरी भानुदास पालवे जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण भावसार भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव आरपीआयचे सचिन लोखंडे जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे जगदीश राजपूत आदी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त डहाणू येथे दिव्यांगांसाठीच्या विविध योजनांचे लाभार्थी व अन्य घटकांशी आठवले यांनी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी देशात आतापर्यंत झालेल्या पंतप्रधानात मोदी हे एकमेव पंतप्रधान असे आहेत, ज्यांनी संविधानावर माथा टेकवून शपथ घेतली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत केलेल्या तरतुदींचा विचार करता आरक्षण कोणालाही काढता येणार नाही, हेच मोदी यांनी सांगितले. त्यांच्या काळात देशातील पायाभूत सुविधांचा मोठ्या गतीने विकास झाला, असा गौरव आठवले यांनी केला. या वेळी त्यांनी चारोळ्या सादर केल्या. चुकीच्या प्रचारामुळे लोकसभेत नुकसान पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले, की लोकसभेच्या निवडणुकीत दलित आदिवासी आणि मुस्लिमांमध्ये चुकीचा प्रचार केल्यामुळे महायुतीला फटका बसला; परंतु राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांची आरक्षण नीती लक्षात आली असून आता त्याचा फायदा महायुतीला होणार आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार आहे, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही, असे सांगताना विधानसभेतही त्यांच्यामुळे फायदाच होईल, असा दावा आठवले यांनी केला. विधानसभेला हव्यात १२ जागा राज्यात महायुती सत्तेत आल्यानंतर भारतीय रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात काही जागा देण्याची आणि दोन महामंडळांचे अध्यक्षपद तसेच महामंडळाच्या काही जागा आणि जिल्हास्तरीय शासकीय समित्यांत रिपब्लिकन कार्यकर्त्यांना संधी देण्याचे ठरले होते; परंतु अजितदादा आल्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसला संधी मिळाली आणि आमची संधी मात्र हुकली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्याच वेळी आता महामंडळाचा विस्तार होत असल्याने आणि महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर होत असल्याने रिपब्लिकन पक्षाला ठरल्यानुसार महामंडळे मिळावीत, अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभेच्या बारा जागा आमच्या पक्षाला मिळाव्यात आणि राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी ही आठवले यांनी केली. मराठा समाजातील गरीबांना आरक्षण देण्याची मागणी मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी केलेली मागणी चुकीची नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वप्रथम आम्हीच लावून धरला होता, असे निदर्शनास आणून आठवले म्हणाले, की देशभरातील क्षत्रिय समाजाला आरक्षण देण्याबाबतचा प्रस्ताव विविध राज्यांनी आमच्याकडे पाठवला, तर त्यावर आमचे मंत्रालय निश्चित विचार करीन. महाराष्ट्रातून मराठा, गुजरातमधून पाटीदार, हरियाणामधून जाट, राजस्थानमधून राजपूत अशा विविध क्षत्रिय जातीसमूहाचा आरक्षणात समावेश आग्रह आहे. याबाबत देश पातळीवर निर्णय घ्यावा लागेल. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत तामिळनाडू सरकारच्या आरक्षणाचा अभ्यास करावा. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणे शक्य नाही. त्यामुळे आठ लाख रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्या गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी आठवले यांनी केली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला ओबीसीचा विरोध आहे. त्यामुळे हा प्रश्न जटील होईल. ओबीसीतून आरक्षण देण्याऐवजी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी सूचना आठवले यांनी केली. मर्यादेपेक्षा अधिक आरक्षण देशात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जातींचे प्रमाण २१ टक्के आहे. कालेलकर समितीच्या अहवालानुसार देशात ५२ टक्के ओबीसी आहे. या सर्व घटकांना आरक्षण आहे. आता आर्थिकदृष्टया मागासांना दहा टक्के आरक्षण देण्यात आले असून, त्यात मुस्लिम, मराठा, ब्राम्हण,लिंगायत आदी सर्व समाजघटकांचा समावेश आहे. मुस्लिम समाजातील बहुतांश घटक ओबीसीत आहे, असे निदर्शनास आणू वक्फ बोर्डासंबंधीच्या नवीन कायद्याचे आठवले यांनी समर्थन केले. वाढवण बंदराविषयी गैरसमज दूर करण्याची गरज वाढवण बंदराच्या प्रश्नाचा उल्लेख करून आठवले म्हणाले, की कोणत्याही पायाभूत सुविधांची कामे किंवा विकासाची कामे ठरलेल्या वेळेत झाली, तरच ती अंदाजपत्रकीय तरतुदीप्रमाणे होतात. त्यांना विलंब झाला तर खर्च वाढतो. त्यामुळे ही कामे कोणत्याही परिस्थितीत वेळेतच व्हायला हवीत. या प्रकल्पासाठी जमिनी देणाऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. त्यासाठी मदतीच्या खर्चाची तरतूद प्रकल्पाच्या खर्चातच समाविष्ट असली पाहिजे, अशी सूचना करून ते म्हणाले, की वाढवण बंदर हे ७६ हजार दोनशे कोटी रुपये खर्चाचे आहे. या बंदराच्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. या परिसराचा विकास होणार आहे. वाढवण बंदराला विरोध म्हणून आंदोलन करण्याचा घटनेने संबंधितांना अधिकार दिला असला, तरी आपण संबंधित लोकांची भेट घेऊन त्यांचे गैरसमज दूर केले पाहिजेत. आपणही त्यासाठी तयार आहोत. या भागातील प्रकल्पग्रस्तांना जादा नुकसान भरपाई आणि त्यांच्या मुलांना चांगल्या नोकऱ्या द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. देशातील ४५ टक्के लोकांना लाभ आपल्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अखत्यारित देशातील एकूण लोकसंख्येच्या ४५ टक्के लोकांचा समावेश होत असल्याचे सांगून आठवले म्हणाले, की समाजाला जोडण्याचे काम आमचे मंत्रालय करते. त्याचबरोबर समाजातील गोरगरीब लोकांच्या आर्थिक उन्नतीचा विचार करते. या मंत्रालयाने गेल्या चार वर्षांपूर्वी देशात नशामुक्त अभियान सुरू केले. त्यासाठी काही जिल्हे निवडण्यात आले होते. आता संपूर्ण देशाची निवड करण्यात आली आहे. देशातील तरुण व्यसनांच्या, अंमली पदार्थांच्या आहारी जात असल्यामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होत असून ती वाचवली पाहिजेत, यासाठी नशामुक्त अभियान हाती घेण्यात आली आहे. कोट्यवधी तरुणांना नशामुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला असून, त्यात यश येत आहे. या मंत्रालयांतर्गत आतापर्यंत ५१ कोटी लोकांची खाती उघडण्यात आली आहेत. ४६ कोटी लोकांना मुद्रा योजनांचा फायदा देण्यात आला आहे. पाच कोटी महिलांना उज्वल गॅस योजनेतून मदत दिली आहे. याशिवाय दिव्यांगासाठी साहित्य बनवणाऱ्या नागपूर येथील कंपनीला ३३० कोटी रुपये सुपूर्द करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. 0000