Author: bittambatami.com

‘पिपाणी’विरोधात शरद पवारांची निवडणूक आयोगात धाव

मुंबई :  लोकसभा निवडणूकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले होते तर जाणीवपुर्वक नुसती तुतारीही अपक्ष उमेदवाराला दिल्यामुळे साताराची जागा गमवावी लागली होती. लोकसभेतील चिन्हाचा हा घोळ…

दोन दिवसात रोहीत पवारांचा मोठा धमाका

मुंबई: विधानसभेचे पडघम राज्यात वाजू लागलेत. आरोप प्रत्यारोपांना सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहीत पवार यांनी येत्या दोन दिवसात मोठा धमाका करणार असल्याचे सुतोवाच केल्याने राजकीय वर्तुळात त्याची…

आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात महाआरोग्य शिबीर

सोलापूर : यंदाच्या आषाढी सोहळ्यात भाविकाच्या आरोग्यासाठी चार ठिकाणी होणार महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. पालखी सोहळे निघाल्यापासून यात्रा संपेपर्यंत आरोग्य विभाग वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी…

पुण्यात ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांच्या तैलचित्राचे अनावरण

पुणे : भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या तैलचित्रांचे अनावरण पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. म्हाळुंगे-बालेवाडी मधील महाराष्ट्र शासनाच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मुख्य…

 01 जुलै 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन

ठाणे  : भारत निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत दि.01 जुलै 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांनी मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी अर्ज करावे. तसेच सर्व…

जितेश कदमची अपयशी झुंज

एमसीएफ राज्य कॅरम स्पर्धा मुंबई : रोटरी क्लब ऑफ बोरिवलीच्या सहकार्याने एम सी एफ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बोरिवली ( पश्चिम ) येथे सुरु एम सी एफ ९ व्या राज्य मानांकन कॅरम…

डोंबिवलीतील पदवीधरांचा कोकण पदवीधर मतदानावर बहिष्कार

डोंबिवली :  येथील के.व्ही. पेंढरकर हे कॉलेज विनाअनुदानित करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. याविरोधात कॉलेजमधील शिक्षक व माजी विद्यार्थी गेल्या आठवड्याभरापासून साखळी उपोषणास बसले आहेत. याकडे शासन लक्ष देत नसल्याने येत्या…

‘पेंढरकर कॉलेज बंद होऊ देणार नाही’

मनसेचा सरकारला इशारा डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांना पत्र पाठविले होते. या पत्राला देसाई यांनी समाधानकारक उत्तर दिलेली नाही. कॉलेजला स्वायत्तता मिळाली असली तरी व्यवस्थापन अनुदानित कॉलेज बंद करु शकत नाही. व्यवस्थापनाची ही कृती शिक्षक, विद्यार्थी यांच्यावर अन्याय करणारी आहे. तसेच विद्यापीठ कायदा आणि सरकारी नियमांचे उल्लंघन करणारी आहे. या प्रकरणी शिक्षण मंत्र्याकडे दाद मागणार अन्यता मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा गांगुर्डे यांनी देसाई यांना दिला आहे. डोंबिवलीतील के.व्ही.पेंढरकर कॉलेज अनुदानित असताना ते ते विनाअनुदानित करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातला आहे. त्याविरोधात 14 जून पासून कॉलेज समोर शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांचे साखळी उपाेषण सुरु आहे. या आंदोलनाची गंभीर दखल घेत मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश संघटक संतोष गांगुर्डे यांनी सोमवारी डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव, डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांसह शिष्टमंडळ उपस्थित होते. एक तासांच्या प्रदीर्घ चर्चेअंती देसाई यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्याची सुनावणी 7 जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर काय ते बाेलू असे सांगितले. गांगुर्डे यांनी मराठी विभाग का बंद केला आहे. कॉलेजमध्ये बाऊन्सर ची गरज काय ? प्राध्यापकासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एका खोलीत काम ने देता बसवून का ठेवले जात आहे. या प्रकरणी जाब विचारला. चर्चेअंती संस्थाचालकांकडून मनविसे शिष्टमंडळाला कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे शासन दरबारी जाब विचारुन मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा ईशारा मनविसेने दिला. याबाबत शिष्ठमंडळाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची भेट घेऊन त्यांच्याही समस्या जाणून मनविसे पूर्णपणे त्यांच्यासोबत आहोत असे आश्वासन दिले.

हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी ‘ऑप्टा’ उपक्रम

असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाचा पुढाकार मुंबई : भारतात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत २० ते २५ टक्के अधिक आहे. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीची प्रक्रिया असलेल्या अंजायनाला नियंत्रित केल्यास हे प्रमाण कमी होऊ शकते ही बाब लक्षात घेऊन डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘दी असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया’ने (एपीआय) अंजायनाला रोखण्यासाठी ‘ऑप्टा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत हृदयाशी संबंधित त्रास होत असल्याची तक्रारी असलेल्या रुग्णावर अंजायनावरील प्राथमिक उपचार करण्याचे डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. छातीत दुखणे, चालायला त्रास होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, शरीराच्या विविध भागात दुखणे अशा त्रासांकडे नागरिक व डॉक्टर दुर्लक्ष करतात. ही लक्षणे हृदयविकारापूर्वी असलेल्या अंजायनाची असतात. त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याची परिणीती हृदयविकाराच्या झटक्यामध्ये होते. त्यामुळे हृदयाशी संबंधित धोके कमी करण्यासाठी आणि रुग्णांना अधिक चांगले आरोग्य मिळावे यासाठी अंजायनाचे लवकरात लवकर निदान व्हावे यासाठी ‘एपीआय’ने प्रथमच अंजायना सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर ‘ऑप्टिमल ट्रीटमेंट ऑफ अंजायना (ऑप्टा) : द नीड ऑफ दि अवर’ हा उपक्रम हाती घेतला आहे. यात आजाराचे वेळीच निदान होण्यासाठीचा कृती आराखडा तयार केला असल्याची माहिती एपीआयचे महासचिव डॉ. अगम व्होरा यांनी दिली. अंजायनाची समस्या लवकरात लवकर ओळखून त्यावर उपचार सुरू करणे, हृदयविकार बळावण्याची प्रक्रिया संथ करणे, हृदयविकाराचा धोका कमी करणे तसेच औषधावर होणारा अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी ‘ऑप्टा’ हा महत्त्वाचा उपक्रम आहे. ऑप्टा पडताळणी सूची, ऑप्टा प्रश्नावली आणि ऑप्टा दृष्टीकोन अशा तीन प्रक्रिया ‘एपीआय’ने विकसित केल्या आहेत. त्याच्या योग्य अंमलबजावणीने अंजायना व पर्याययाने हृदयविकाराचा झटका रोखणे शक्य होणार असल्याचे एपीआयचे अध्यक्ष डॉ. मिलिंद नाडकर यांनी सांगितले. दुर्लक्षित असणाऱ्या अंजायनाबाबत जागरुकता निर्माण करणे आणि देशातील डॉक्टर आणि हृदयविकार तज्ज्ञांच्या माध्यमातून हा उपक्रम अधिक सक्षमपणे राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हृदयविकाराच्या आजारांशी संबंधित मृत्यूंच्या बाबतीत भारत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. दरवर्षी हृदयविकाराने मृत्यू होणाचे प्रमाण पुरुष व स्त्रियांमध्ये अनुक्रमे २०.३ टक्‍के आणि १६.९ टक्‍के इतके आहे. त्यामुळेच अंजायनाकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. भारतीयांमध्ये बरेचदा अंजायनाच्या सर्वसाधारण लक्षणांपेक्षा वेगळी लक्षणे दिसून येतात. ज्यांच्यामुळे अचूक निदान करण्यामध्ये अडथळे येऊन डॉक्टरांकडून लक्षणांपासून आराम मिळण्यासाठीची औषधे दिली जातात. त्यामुळे हा धोका अधिकच वाढत आहे. हा धोका कमी करण्यासाठी ‘ऑप्टा’ उपक्रमांतर्गत माहिती घेत रुग्णांना सर्वात प्रथम ॲस्पिरीन हे औषध देणे कधीही सोयीस्कर असल्याचे ज्येष्ठ हृदयविकार तज्ज्ञ डॉ. व्ही. टी. शाह यांनी सांगितले.

कल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीचा विळखा

दोन्ही मार्गिकांमधून एकाच दिशेने वाहने सोडण्याचा प्रकार कल्याण: कल्याण शिळफाटा रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलीस दररोज संध्याकाळी दोन्ही मार्गिकांमधून एकाच दिशेने वाहने सोडतात. या कालावधीत समोरून दोन्ही मार्गिकांमधून येणारी वाहने काही अंतरावर वाहतूक पोलिसांकडून किमान १५ मिनिटे रोखून धरली जातात. वाहतूक पोलिसांच्या या मनमानी नियोजनामुळे काही दिवसांपासून शिळफाटा रस्त्यावर पुन्हा वाहन कोंडी होऊ लागली आहे. शिळफाटा रस्त्यावर वाहने धावण्याचा वेग सर्वाधिक आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहने धावती असली की वाहन कोंडी होत नाही. वाहतूक नियोजनाच्या नावाने कोळसेवाडी वाहतूक विभागाचे पोलीस काटई नाका, खिडकाळी, देसई हद्दीत संध्याकाळच्या वेळेत कल्याणकडून शिळफाटा दिशेने येणारी वाहने रोखून धरतात. त्याचवेळी शिळफाटा दिशेने जाणारी वाहने दोन्ही मार्गांमधून एकाच वेळी सोडतात. या वाहनांची रांग संंपली की मग कल्याणकडे येणारी रोखून धरलेली वाहने दोन्ही मार्गिकांमधून सोडली जातात. किमान पंधरा मिनिटे वाहने रोखून धरण्याच्या या प्रकरामुळे शिळफाटा रस्त्यावर दररोज वाहन कोंडी होऊ लागली आहे. वाहतूक नियोजनाच्या या अजब नियोजनामुळे प्रवासी त्रस्त आहेत. शिळफाटा रस्त्यावरून दोन्ही बाजुने सतत वाहने धावत असली तर वाहन कोंडी या रस्त्यावर होत नाही. वाहने एकाच जागी रोखून धरण्याच्या प्रकारामुळे खिडकाळी, काटई, निळजे, मानपाडा, शिळफाटा रस्त्याचे पोहच रस्त्यांवरील वाहने अडकून पडतात. संध्याकाळच्या वेळेत नोकरदार, शाळकरी विद्यार्थी घरी परतत असतात. त्यांना या कोंडीचा सर्वाधिक फटका बसतो. मुंबई, नवी मुंबईतून यापूर्वी खासगी वाहनाने शिळफाटा रस्त्यावरून घरी सात ते साडे सात वाजता पोहचणारा प्रवासी आता साठे ते नऊ वाजता पोहचत आहे. साडे सहा वाजता घरी पोहचणारे विद्यार्थी शाळेच्या बस वाहन कोंडीत अडकत असल्याने सात ते साडे सात वाजता घरी पोहचत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. वाहतूक पोलिसांनी वाहने रोखून धरण्याची पध्दत बंद करून शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक धावती ठेवावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. अधिक माहितीसाठी कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचीन सांडभोर यांना संपर्क केला, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मोबदला नाही कल्याण शिळफाटा रस्त्यालगतच्या ११ गावांमधील रस्ते बाधित शेतकऱ्यांंना शासनाने गे्ल्या तीन महिन्यापूर्वी सुमारे ३५० कोटीचा मोबदला जाहीर केला आहे. हा मोबदला अद्याप शेतकऱ्यांंना वाटप करण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांनी मोबदला मिळाल्याशिवाय शिळफाटा रस्ता रुंदीकरणासाठी जमीन न देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे काटई, निळजे, मानपाडा, कोळे गाव हद्दीतील रस्तारूंदीकरण अद्याप रखडले आहेत. लोकसभेची आचारसंंहिता लागू होण्यापूर्वी शासनाने रस्ते बाधितांना भरपाईची रक्कम जाहीर केली होती. आता आचारसंहिता संपली आहे ही रक्कम तातडीने शेतकऱ्यांना वितरित करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.