Author: bittambatami.com

‘वावीकर आय इन्स्टिट्यूट’मध्ये चष्म्याचा नंबर काढण्याचे अत्याधुनिक मशीन दाखल

प्रसिध्द अभिनेते श्रेयस तळपदे ब्रँड ॲम्बेसेडर ठाणे : डोळ्यांच्या चष्म्याचा नंबर काढण्यासाठी ठाण्यातील वावीकर आय इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त मशिन दाखल झाले आहे. या मशिनच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करुन चष्म्याचा नंबर काढला जाणार असल्याची माहिती इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा डॉ. चंद्रशेखर वावीकर यांनी दिली आहे. प्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे हे वावीकर आय इन्स्टिट्यूटचे आता ब्रँड ॲम्बेसेडर असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. माजिवडा सर्व्हिस रोड येथील वावीकर आय इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक मशीन दाखल झाले असून त्याची माहिती एका पत्रकार परिषदेत शुक्रवारी देण्यात आली. यावेळी ठाणेवैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, डॉ वैशाली वावीकर, सरस्वती विद्या प्रसारक ट्रस्ट संस्थेच्या अध्यक्षा मीरा कोरडे, ठाणेवैभव चे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ आदी उपस्थित होते. काही वर्षांपूर्वी माझ्या डोळ्याला जखम झाली होती त्यावेळी वावीकर आय इन्स्टिट्यूटमध्ये उपचार घेतले. माझे सासरेही येथेच डोळ्यांवर उपचार घेतात. त्यामुळे इन्स्टिट्यूटशी कौटुंबिक नाते असल्याचे अभिनेता श्रेयस तळपदे यांनी सांगितले. वावीकर आय इन्स्टिट्यूटने ठाण्यातच नव्हे तर आशियामध्ये नेहमीच पहिल्यांदा नवनवीन तंत्रज्ञान आणल्याचे सांगत इन्स्टिट्यूट ग्रामीण भागात आपल्या मोबाईल आय व्हॅन च्या साहाय्याने करत असलेल्या सेवा कार्याचेही श्रेयस तळपदे यांनी कौतुक केले.स्मार्टसाईट यंत्राद्वारे शस्त्रक्रिया करणारे हे नवीन मशिन अत्याधुनिक आहे. रुग्णांच्या आवश्यकतेनुसार या तंत्रज्ञानाचा वापर होतो. पूर्वी पारंपरिक लॅसिक सर्जरी केली जायची आता या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे लॅसिक सर्जरी ला एक नवीन पर्याय तयार झाला आहे जो अधिक अचूक आणि सुरक्षित परिणाम रुग्णांना देणार आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आतापर्यंत १४ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतरच आज उद्घाटन करत असल्याची माहिती डॉ चंद्रशेखर वावीकर यांनी दिली.

माथेरानमध्ये नव्या एटीएममुळे पर्यटकांना दिलासा

माथेरान : माथेरान मध्ये आज माथेरान नागरी सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून 85 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील स्थानिक व पर्यटकांना एक वेगळी भेट देताना स्वतःचे एटीएम सुरू केले आहे यामुळे पर्यटकांना…

 पेपर फुटीला आळा घालण्यासाठी दक्षता कक्ष स्थापन करा

पदवीधर निवडणुकीत मविआचे ऐक्य मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश आणि सरकारी नोकरभरती परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांना पायबंद बसावा तसेच या प्रकरणांचा तपास जलदगतीने होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वतंत्रपणे विशेष दक्षता आणि तपास कक्ष स्थापन करावा, अशी मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवार ॲड. अनिल परब यांनी केली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या तयारी सदंर्भात रविवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची चेंबूर येथे बैठक पार पडली.बैठकीला काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा व उत्तर- मध्य मुंबईच्या खासदार प्रा. वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. यावेळी ॲड. अनिल परब म्हणाले की, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थी आणि पदवीधरांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात आले आहे. वैद्यकीयची नीट, प्राध्यापकासाठीची नेट, महसूल विभागाची तलाठी, पीएचडीची सीईटी, इयत्ता १२ वी बोर्ड आदी परीक्षांचे पेपर फुटत आहेत. पेपर फुटीमुळे परिक्षार्थींचे शैक्षणिक जीवन उध्वस्त होत आहे. पदवीधरांचे प्रतिनिधी असलेल्या विधान परिषदेच्या आमदारांसमोरचा हा ज्वलंत विषय राहिला पाहिजे. दक्षता कक्ष स्थापन करुन त्याचे संयोजन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे दिल्यास या प्रकरणांना आळा बसेल, असा दावा त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी विधान परिषद निवडणुकांना सामोरे जात आहे. काँग्रेस कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. या निवडणुकीतही मविआचे ऐक्य दिसेल. मविआ उमेदवार ॲड. अनिल परब मुंबई पदवीधर मतदारसंघातून सहज विजयी होईल, असा विश्वास काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी बैठकीत व्यक्त केला. विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक महाविकास आघाडी एकत्रपणे लढवत आहे. मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक अशा दोन जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) लढवत आहे. तर कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक अशा दोन जागा काँग्रेस लढवत आहे. मुंबई पदवीधरचे उमेदवार ॲड. अनिल परब यांच्या वचननाम्याचे शिवसेना नेते व युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि शिक्षणतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते शनिवारी प्रकाशन झाले. २६ जून रोजी मतदानअसून गेली ३० वर्षे मुंबई पदवीधरमधून शिवसेना सातत्याने मोठ्या मताधिक्क्याने विजयी होत आलेली आहे.

हज यात्रेकरूंच्या ९६८ सेवेकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा-शानू पठाण

ठाणे :  हज यात्रा करण्यासाठी मक्का येथे जाणाऱ्या भाविकांना सेवा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सेवेकऱ्यांची गरज भासते. या सेवेकऱ्यांना चांगले मानधन मिळत असल्याने ठराविक कालावधीसाठी गोरगरीब बेरोजगार तरूण मक्केत जात असतात. मात्र,…

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करावेत – सुनिल जाधव

अशोक गायकवाड रायगड : पात्र असूनही शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास इतर मागासवर्ग विमुक्त व भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरु केली असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग सुनिल जाधव यांनी केले आहे. बारावी उत्तीर्ण केलेल्या व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी मदत होणार आहे. इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश घेतलेल्या परंतु शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश न मिळालेल्या इतर मागासवर्ग व विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भोजनभत्ता, निवासभत्ता व निर्वाहभत्ता उपलब्ध करुन दिला जात आहे. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. ओबीसी, एसबीसी, व्हीजे, एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळतो. मोठया शहरातील भोजनभत्ता ३२ हजार, निवास भत्ता २० हजार, उदरनिर्वाह भत्ता ८ हजार मिळतो तर जिल्हा पातळीवर भोजन भत्ता २५ हजार निवास भत्ता १२ हजार उदरनिर्वाह ६ हजार रुपये मदत दिली जाते. पात्र विद्यार्थ्यांना काय मिळणार :- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना वार्षिक ६० हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. पात्र विद्यार्थ्यांना भोजनभत्ता, गृहनिर्माण भत्ता, राहणीमान भत्ता अशा विविध स्तरावरील भत्ते दिले जातात. या माध्यमातून अनेक गरजू विद्यार्थ्यांना लाभ मिळत असून उच्च शिक्षणासाठी मदत होत असते. या लागणारी कागदपत्रे :-विद्यार्थी ओबीसी, व्ही.जे.एन.टी., एसबीसी, प्रवर्गातील असावा, अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु असणे आवश्यक आहे, अभ्यासक्रमाशी संबंधित शैक्षणिक कागदपत्रे असावीत. अर्ज सादर करण्याकरीताचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :- उच्च शिक्षणाचे द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्ष-अर्ज स्विकारण्याची तारीख २० जून २०२४, अर्ज स्विकारण्याचा शेवटचा दिनांक-१५ जुलै २०२५, निवड यादी जाहीर करण्याचा दिनांक ०१ ऑगस्ट २०२४. उच्च शिक्षणाचे प्रथम वर्ष- अर्ज स्विकारण्याची तारीख ०५ ऑगस्ट २०२४, अर्ज स्विकारण्याचा शेवटचा दिनांक-२० ऑगस्ट २०२४,, निवड यादी जाहीर करण्याचा दिनांक ०२ सप्टेंबर २०२४. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभासाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रायगड, कच्छिभवन, नमिनाथ जैन मंदिरा जवळ, श्रीबाग रोड, अलिबाग, जि.रायगड या कार्यालयात अर्ज कसा करावा व कोठे करावा या संबंधी माहिती दिली जाईल.

योग दररोज करा, निरोगी रहा-गोविंद बोडके

पालघर : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी शुभेच्छा देऊन योग एक दिवस न करता दररोज करा व निरोगी रहा असा संदेश जिल्ह्यातील नागरिकांना दिला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत शुक्रवारी, लायन्स क्लब ऑफ पालघरच्या सभागृहात योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोडके बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी (सा. प्र) संजीव जाधवर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच शालेय विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना योग्य वेळेत योग्य धडे दिले तर ते कोणतीही गोष्ट चांगल्या पद्धतीने करतात त्यांचा आत्मविश्वास वाढतो यामुळे त्यांना प्रेरणा मिळते नेमकी ही बाब लक्षात घेता आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित साधत जिल्ह्यातील साधारण अडीच ते तीन हजार पेक्षा अधिक शाळांमधील जवळपास ३० हजार विद्यार्थ्यांनी योग दिना मध्ये उत्साहात सहभाग घेतला . असे जिल्हाधिकारी बोडके यांनी सांगितले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघर, इनरव्हील क्लब ऑफ पालघर व प्रजापती ब्रह्मकुमारी यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर येथील लायन्स क्लब सभागृहात योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यामधील शाळा,महाविद्यालय विविध कंपन्या व विविध संघटनांमार्फत योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त प्रत्येक ठिकाणी योगाची प्रात्यक्षिके पाहायला मिळाली योगाची प्रात्यक्षिके उत्तम प्रकारे शालेय विद्यार्थी करतील आणि त्यांच्या पालकांना सुद्धा योगासनाचे धडे देतील हा या मागच्या उद्देश होता.

राजकीय नेत्यांशी संबंध जपवणूक करणे  राजनीती नाही, ‘वसंत निती’ -प्रबोध डावखरे

ठाणे : सध्या ठाण्यामध्ये लोकसभा निवडणुकी  पूर्वीपासूनच वातावरण राजकीय झालेले होते. लोकसभा निवडणुकीचा  निकाल लागल्यानंतर लगेच पदवीधर मतदार संघाची निवडणूक आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली  आहे.  राजनीतीमय वादळात स्व. वसंत डावखरे यांचे…

मज्जा मानसशास्त्र यशाचा पाया आहे-रमेश पानसे

ठाणे : १९५२ ते १९६२ या शाळकरी वयात मी ‘ठाणेकर’ होतो. पण आज आयुष्याचा ८५ व्या वर्षी सिंहावलीकन करताना माझ्या शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक आणि शिक्षण म्हणून यशाची पायाभरणी श्री. हुनुमान व्यायामशाळेच्या या सोनेरी दशकातच झाली. बुध्दीला खेळाने उर्जा देता येते आणि ८ तासा झाेप ही बुध्दीमत्तेची सख्खी बहिण आहे. असा माझा विष्कर्ष आहे. पण त्यासाठी क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक आणि धार्मिक अशा बुहुविध आघड्यांवर एकाचवेळी कार्यरत असणाऱ्या शताब्दीपूर्ती करणाऱ्या श्री. हनुमान व्यायामशाळांसारख्या संस्थांनी मज्जा मानसशास्त्र अभ्यासायला हवे करण मज्जा मानसशास्त्र हा यशाचा पाया आहे. असे बोध्ाप्रज विचार प्रा. रमेश पानसे यांनी व्यक्त केले. श्री. समर्थ  सेवक मंडळ, ठाणे संचालित श्री. हनुमान व्यायामशाळेच्या शिव दौलत सभाग्रहात संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ सोहळा शनिवारी सायंकाळी संप्ान्न झाला. त्या प्रसंगी बालशिक्षण महर्षी प्रा. रमेश पानसे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना बोलत होते. प्रारंभी ध्वजवंदन करण्यांत आले तर बाल भवनाच्या चिमुरड्यांनी स्वागत केले. ४२ ते ८४ वर्षे वयोगटाच्या जेष्ठांनी मार्च पास्ट सादर केला. श्री. हनुमान व्यायामशाळा शताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष पुंडलिक खामकर यांनी प्रास्ताविक केले. शताब्दी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष उल्हास प्रधान, कार्याध्यक्ष संजीव हजारे, समिती कार्यवाहक सविता कळसे व्यासपीठावर उपस्थित होते. मिलिंद वैद्य यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. दिलीप वाघोलीकर व ८५ वर्षीय विलास शिरोडकर यांनी कविता सादर केल्या. विख्यात खो-खो प्रशिक्षक राजेंद्र साप्ते व शातायुषी सेवाभावी श्री आनंद भारती समाज ठाणे यांच्या शुभसंदेशांचे वाचन करण्यांत आले. महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष गिरीश लेले यांनी ऋणनिर्देश केले तर समितीचे खजिनदार डॉ. चैतन्य साठे यांनी नेटके सुत्रसंचालन केले.

रायगडच्या लिफ्टर गायत्री, अमृताचे यश

मुंबई : पटियाला (पंजाब ) येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय इक्विप स्पर्धेत रायगडच्या युवा लिफ्टर गायत्री महेश बडेकर आणि अमृता ज्ञानेश्वर भगत या दोघींनी शानदार कामगिरी केली. सब ज्युनिअर महिला ४३ किलो वजनी गटात गायत्रीने स्कॉट, बेंच प्रेस व डेडलिफ्ट या प्रकारात २५५ किलो वजन उचलून रौप्य पदक प्राप्त केले. त्याचबरोबर स्कॉट व डेडलीफ्ट या प्रकारात सुवर्णपदक मिळवले. कर्जत येथील  जे. व्हीं. आर. जिममध्ये गायत्री सराव करते. तिला हनुमंत खरात यांचे मार्गदर्शन मिळत आहे. तसेच राष्ट्रीय  ज्युनिअर इक्विप पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ४७ किलो वजनी गटात आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या अमृताने रौप्य पदक मिळवले. तिने स्कॉट, बेंचप्रेस आणि डेडलीफ्ट या प्रकारात एकूण ३१७.५ किलो वजन उचलले. या अगोदर राजस्थान येथे झालेल्या स्पर्धेत देखील अमृता ला रौप्य पदक मिळाले होते. पॉवर हाऊस क्लबचे (खोपोली) संचालक विक्रांत गायकवाड आणि अरुण पाटकर या दोघांचे मार्गदर्शन तिला मिळत आहे. गायत्री आणि अमृताने मिळवलेल्या या यशाबद्दल पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे अध्यक्ष गिरीश वेदक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या दोघींचे खास अभिनंदन केले असून भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ००००

ब्रम्हाकुमारीजच्या स्पोर्ट्स विंगकडून ऑलिम्पिक पदकाचे पूजन

पुणे ः पुण्यातील ब्रम्हाकुमारीजच्या स्पोर्ट्स विंगच्या वतीने ऑलिम्पिक पदक पूजन व परिसंवादव्दारे  आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बाणेर ब्रम्हाकुमारीज सेवा केंद्रात 1936 बर्लिन ऑलिम्पिकमध्ये पुण्याचे बाबू निमल यांनी जिंकलेल्या ऑलिम्पिक पदक पूजन करून ऑलिम्पिक दिन समारंभाची सुरूवात झाली. याप्रसंगी भारताचे पहिले पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर, ऑलिम्पिकपटू बालकृष्ण अकोटकर यांनी आपली ऑलिम्पिक यशोगाथा सांगितली.  खेळाडूंसाठी मनाच्या शक्तीसाठी राजयोग ध्यान व सकारात्मक विचार या विषयावर बीके रितू ठक्कर, माऊटआबू येथील स्पोर्ट्स विंगचे बीके आदिती, बीके जगबीर यांची खेळाडूंना मार्गदर्शन केले. यावेळी उपसंचालक सुहास पाटील, भाग्यश्री बिले, क्रीडा संघटक अजीत निमल,  दत्तात्रय कळमकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मनाची शक्तीव्दारे खेळाडूंना यशाकडे मार्गस्थ कसे व्हावे याचे राजयोग ध्यानाव्दारे मार्गदर्शन करीत बीके आदिती म्हणाले की, सकारात्मक जीवनशैली खेळाडूना यशाचा राजमार्ग गवसेल. ध्यानाच्या मनाच्या शक्तीव्दारे आपले खेळाडू राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय स्पर्धेत चमकतील. पुण्यातील 210 राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पदकविजेत्यांसह शिवछत्रपती क्रीडासंकुलातील क्रीडा प्रबोधिनीचे खेळाडू सहभागी घेतला होता. कार्यक्रमात जिम्नॉस्टिक्सची प्रात्यक्षिके उपस्थितांची मने जिंकली. राष्ट्रीय पदक विेजेते क्रीडापटू काजल माने, अक्षय जाधव, क्रीडा मार्गदर्शक संजोग ढोले, धीरज मिश्रा यांनी मनोगत व्यक्त केले. ऑलिम्पिक दिननिमित्त पुण्यात खेळाडूंसाठी प्रथमच निशुल्क ध्यान व मोटिव्हिशनल कॉन्सलिंग केंद्राचे उद्घाटन   ऑलिम्पिकपटू बालकृष्ण अकोटकर यांच्या हस्ते करण्यात आले. ुण्यातील खेळाडूंना रोज संध्याकाळी 6 ते 8 यावेळात या केंद्रात मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्तविक ब्रम्हाकुमारीज बाणेर केंद्राच्या प्रमुख बीके त्रिवेणी यांनी केले. सूत्रसंचालनाचे काम बीके शुभांगी यांनी केले. 0000