Author: bittambatami.com

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या तबला वादन स्पर्धेचे निकाल जाहीर

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तबला वादन स्पर्धेचे निकाल जाहीर झाले असून विजेत्यांचे केंद्राच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. पंडित बाळकृष्ण अय्यर, गिरीश गोगटे, हरेकृष्ण रथ यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. छोट्या गटातील विजेते अनुक्रमे –

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी  केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे स्वागत केले. गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री शाह यांचे शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना ‘शासन आपल्या दारी’ पुस्तकाची प्रत आणि गणपतीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा वृषाली शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे औक्षण करीत स्वागत केले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गृहमंत्री शाह यांनी मुख्यमंत्री शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली यांच्याशी संवाद साधला.

व-हाळदेवी विसर्जन घाटावर स्त्री सुरक्षेचा गजर

ठाणे : दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला जात असतानाच आशियाँ फाऊंडेशनच्या वतीने महिला सक्षमीकरण आणि स्री सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. सध्या राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांवर मात करण्यासाठी “भावाला संस्कार द्या… बहिणी सुरक्षित राहतील” ही संकल्पना राबविणारे अभियान आशियाँ फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहसीन शेख आणि सरचिटणीस दिपा सावंत – खोत यांनी राबविण्यास सुरूवात केली आहे. त्याच अनुषंगाने भिवंडीतील व-हाळदेवी तलाव येथे गणेश विसर्जनाचे औचित्य साधून पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्याद्वारे रित्विश्व ग्रुपने शाळा , कार्यालये, बाजार आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे लैंगिक शोषण आणि मुलींना आत्मरक्षण, पालकांची भूमिका, कायदे या विषयी   गौतम सोनवणे , साक्षी मंचेकर, अस्मिता मोरे, प्रमोद गायकवाड , मृण्मय जाधव यांनी पथनाट्याद्वारे प्रबोधन केले.  हे पथनाट्य सादर करण्यात रितेश जाधव  आणि मिरेश उजगरे यांनी मोलाची भूमिका बजावली. या पथनाट्याला गणेश विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.  

लाडकी बहीण योजना सुपरहीट;

मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर पुणे: हे सरकार सामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं, कष्टकरांचं आहे. हे सर्वांचं सरकार आहे, गेल्या दोन वर्षांत आम्ही सहाशे निर्णय घेतले. अनेक छोटे मोठे निर्णय घेतले. यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देखील जाहीर केली. मात्र, अनेक निर्णय…

पुण्यात भाजपा, राष्ट्रवादीत राडा

पुणे : भाजपच्या आमदारांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याच्या प्रयत्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी केला, असा आरोप करत भाजप पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी…

लाडक्या बहि‍णींमुळे होमगार्ड ‘नावडते’

मुंबई : राज्यात धुमधडाक्यात सुरु असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीणी’ योजनेचा फटका राज्यातील होमगार्डना बसल्याचे समोर आले आहे. लाडक्या बहीणी योजनेला पैसै वळवल्यामुळे निधीअभावी राज्यातील होमगार्डच्या भत्तावाढीला स्थगिती मिळाली आहे. तशा आशयाचं पत्रही सोशल मीडियावर व्हायरल…

ख्रिस्ती बांधवांचे श्रद्धास्थान असणाऱ्या  माउंट मेरीच्या जत्रेला आज मुंबईतील वांद्रे येथे सुरूवात झाली . येत्या १५ सप्टेंबर पर्यंत ही जत्रा सुरु राहणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आज मुंबईत आगमन झाले. मुंबईत त्यांच्या  स्वागताला करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.