Author: bittambatami.com

ठाण्यात प्रथमच गृहनिर्माण संस्थाचे महाअधिवेशन,

ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने १० हजार प्रतिनिधी येणार, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती अनिल ठाणेकर ठाणे : गृहनिर्माण संस्थांच्या पुर्नविकासात विविध समस्या व अडचणीबाबत चर्चा तसेच, मार्गदर्शन करण्यासाठी ७ जून ते ९ जुन या कालावधीत ठाण्यातील कोकणी पाडा, उपवन तलाव येथील मैदानात भव्य वातानुकुलीत मंडपात “गृहनिर्माण संस्थाचे महाअधिवेशन” व प्रदर्शन आयोजित करण्यात रोजी आले आहे.सुमारे आठ ते १० हजार सहकारी गृहनिर्माण संस्थाचे प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत तसेच अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर उपस्थित राहतील, अशी माहिती ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने होणारे हे ठाणे जिल्हयातील पहिलेच महाअधिवेशन असुन सुमारे आठ ते १० हजार सहकारी गृहनिर्माण संस्थाचे प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी ७ जून रोजी उदघाटन सोहळा, शनिवारी ८ जून रोजी महाअधिवेशन आणि ९ जून रोजी प्रदर्शन व सायंकाळी समारोप होईल..कार्यक्रमासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध असुन उपस्थितांच्या अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली असुन यावेळी गृहनिर्माण सोसायट्यांकरीता लागणारे किट दिले जाणार आहे. ठाण्यातील उपवन येथे प्रथमच होत असलेल्या या भव्य अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, गटनेते प्रविण दरेकर, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, सहकार आयुक्त आदीसह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. या अधिवेशनात गृहनिर्माण संस्थांचा पुर्नविकास, त्याचबरोबर त्याचबरोबर वेगवेगळ्या कारणांनी रखडलेले पुर्नविकास प्रकल्प, स्वयंपुर्ण विकासाच्या समस्या व स्वयंपूर्ण विकासासाठी अर्थसाह्य, वारंवार खोट्या तक्रारी करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी, गृहनिर्माण संस्थांच्या सहकार कायद्याबाबत सुधारणा तसेच, आवश्यक ते बदल या बरोबरच गृहनिर्माण संस्थांच्या वेगवेगळ्या समस्या तसेच अडचणी आदी विषयांवर मार्गदर्शन करून त्या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा देखील केला जाणार आहे.तसेच,या अधिवेशनात यासंदर्भातील वेगवेगळे ठराव देखील पारित केले जाणार आहेत. दरम्यान, महाअधिवेशनात आयोजित प्रदर्शनामध्ये गृहनिर्माण संस्थासाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिकांचे स्टॉल्स, विकासक,अर्थसाह्य करणाऱ्या संस्था त्याचबरोबर रेन हॉर्वेस्टींग व घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांचे स्टॉल्स असणार आहेत. तेव्हा, ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शविण्यासाठी नोंदणी करावी,अथवा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयात संपर्क साधावा. असे आवाहन सीताराम राणे यांनी केले आहे. चौकट सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पहिल्याच महाअधिवेशनात गृहनिर्माण संस्थांसाठी सहकार कायदा, पुनर्विकासबद्दल व स्वयंपुनर्विकास संबंधित समस्या या विषयावर ठराव मांडण्यात येणार आहेत. त्यासाठी https://bit.ly/thanehousingmaha adhiveshan2024 या लिंकवर ३० मे, २०२४ पूर्वी आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा. असे आवाहन सीताराम राणे यांनी केले आहे.

मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !

वाचक मनोगत लोकसभेच्या रिंगणातील पाचव्या टप्याची निवडणूक नुकतीच पार पडली. ही निवडणूक खऱ्या अर्थाने गाजली ती मतदारांच्या गायब झालेल्या नावामुळे. मतदार याद्यांमधून मतदारांची नावे गायब होणे हे दर निवडणुकीस स्वाभाविक…

जागतिक कासव दिन

दिन विशेष श्याम ठाणेदार २३ मे हा दिवस संपूर्ण जगात जागतिक कासव दिन म्हणून साजरा केला जातो. १९९० पासून हा दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो. आपल्या संस्कृतीत कासवाला खूप…

मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम?

पर्यावरण मिलिंद बेंडाळे सर्व प्रकारच्या प्रदुषणाबरोबरच वाढते वायू प्रदूषण ही गंभीर समस्या असून मातेच्या गर्भात असताना वा पहिल्या दोन वर्षांमध्ये मुले प्रदुषित हवेच्या संपर्कात आल्यास त्यांच्या मेंदूची रचना बदलत असल्याचे…

जे. पी. नड्डांचे विधान…

भारतीय जनता पक्ष आता पूर्णतः सक्षम झाला असून स्वबळावर तो संपूर्ण कारभार चालवू शकतो. अशावेळी भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आधार घेण्याची काहीही गरज नाही, अशा आशयाचे विधान भाजपचे…

कोकणची मुले हुशार !

बारावीच्या निकालात कोकण नंबर वन पुणे : कोकणची माणसे साधी भोळी आपण नेहमीच एकत आलो आहोत, पण आता कोकणची मुले हुशार ही नवी टॅगलाईन बारावीच्या निकालामुले कोकणाला मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक…

श्रीमंत बापाच्या मुलाची मस्ती उतरणार; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस इन अॅक्शन

 पुणे अपघातातील आरोपीवर वयस्क म्हणूनच कारवाईची तयारी, 0 बालहक्क मंडळाच्या आदेशाविरोधात पोलिस दाद मागणार 0 मुलाच्या बापाला औरंगाबादमधून अटक पुणे: पुण्यातील श्रीमंत बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत बाईकवरून चाललेल्या जोडप्याला आपल्या आलिशान अशा…

विदर्भात पुन्हा पावसाचे थैमान!

शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला नागपूर : विदर्भात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने थैमान घातले. या अवकाळीचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी…

भ्रष्ट पोलीस आणि तितकाच भ्रष्ट आमदार- संजय राऊत

मुंबई : पंचवीस वर्षांचे एक जोडपं एका मस्तवाल मुलाच्या निष्काळजीपणामुळे, श्रीमंतीच्या माजुरडेपणामुळे रस्त्यावर तडफडून मेले आणि पोलीस आयुक्त कोणाला वाचवत आहेत?. याप्रकरणी पोलिसांवर दबाव आणणारे स्थानिक सुनील टिंगरे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत, ते तसेच वागणार.…