Author: bittambatami.com

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम. के. मढवी यांना जामीन

ठाणे : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवी मुंबईतील माजी नगरसेवक मनोहर मढवी यांना ठाणे पोलिसांनी खंडणी प्रकरणी अटक केली होती. गुरुवारी त्यांना ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यामुळे एम. के. मढवी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवी मुंबईतील ऐरोली भागात एम. के. मढवी नगरसेवक म्हणून निवडून आले होते. शिवसेना फूटल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन दिले आहे.एम. के. मढवी हे खासदार राजन विचारे यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. कळवा येथील एका कंत्राटदाराला ऐरोली भागात खोदकाम करायचे होते. त्यासाठी मढवी यांनी कंत्राटदाराकडून दीड लाख रुपये खंडणी उकळली होती. २७ एप्रिलला ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने मढवी यांना आणखी एक लाख रुपयांची खंडणी घेताना पकडले होते. या घटनेनंतर ठाकरे गटाकडून या कारवाईचा निषेध केला जात होता. ही कारवाई राजकीय सूडामुळे झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. एम. के. मढवी यांनी ठाणे न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. गुरुवारी ठाणे न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत त्यांना जामीन मंजूर केला.

ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ३ हजार परवानाधारक अग्निशस्त्र जप्त

ठाणे : निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने ठाणे पोलिसांनी परवानाधारक अग्निशस्त्र जप्त करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ४ हजार ४५७ परवानाधारक अग्निशस्त्र आहेत. त्यापैकी ३ हजार ७४८ अग्निशस्त्र पोलिसांनी जप्त केले आहेत. काही महिन्यांपूर्वी आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर परवानाधारक अग्निशस्त्राने गोळीबार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी परवानाधारक अग्निशस्त्राविषयी सावधगिरीची पावले उचलली आहेत. ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघ येतो. या मतदारसंघातील बहुतांश भाग ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतो. ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहराचा भाग येतो. तर या लोकसभा मतदारसंघांचा उर्वरित भाग ठाणे ग्रामीण, मिरा भाईंदर आणि नवी मुंबई क्षेत्रात येतो. निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत शस्त्र परवानाधारकांनी शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा करणे बंधनकारक असते. निवडणुकीच्या वेळी अग्निशस्त्रांचा वापर करता येत नाही. अग्निशस्त्र वापरणाऱ्यांकडून मतदारांवर प्रभाव पाडणे, धमकावणे किंवा मतदारांना एखाद्या विशिष्ट पक्षाला मतदान करण्यास भाग पाडण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तसेच निवडणुका निष्पक्ष पार पाडल्या जाव्यात म्हणून पोलिसांकडून ही अग्निशस्त्रे जप्त केली जातात. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात एकूण ४ हजार ४५७ परवानाधारक अग्निशस्त्र आहेत. त्यापैकी ३ हजार ७४८ अग्निशस्त्र जप्त करण्यात आली आहेत. असे असले तरी सुरक्षेच्या कारणास्तव काही जणांना त्यातून वगळण्यात आले आहे. तर काहींना सुरक्षेच्या कारणास्तव शस्त्र बाळगण्याची सक्ती आहे. बँक सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा संस्थांचे सशस्त्र कर्मचारी, कर्तव्यावर असलेले सरकारी कर्मचारी आणि अंगरक्षक यांच्या सक्तीमुळे शस्त्रे ठेवण्यास सूट देण्यात येते. उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या बंदुकीने शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. यात महेश गायकवाड बचावले असले तरी या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यामुळे ठाणे पोलिसांनी शस्त्र वापरकर्त्यांवर लक्ष ठेवले आहे.

निवडणूक मशीन्सची ऑनलाईन पध्दतीने सरमिसळ

25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर लागणाऱ्या ठाणे : ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी विधानसभानिहाय मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी पुरविण्यात येणाऱ्या कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट…

डॉ. श्रीकांत शिंदे यांना वाढीव मताधिक्यासाठी प्रयत्न करा – दशरथ पाटील

अनिल ठाणेकर कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत शिवसेना उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांचा विजय शंभर टक्के आहे म्हणून हुरळून जाऊ नका तर यश किती टक्क्यांनी मिळतो आहे याला महत्व आहे. यामुळे डाॅ श्रीकांत शिंदे यांना वाढीव मताधिक्य कसे मिळेल याकडे लक्ष द्यायला हवे. असे मत शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांनी व्यक्त केले. तर कल्याण मतदारसंघात ४८८ कोटींची विकास कामे करणार्‍या डॉ.श्रीकांत शिंदे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी केले. कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत शिवसेना उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या खारीगाव पारसिक नगर येथील निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात दशरथ पाटील व उमेश पाटील हे बोलत होते. यावेळी  माजी नगरसेवक दिनेश कांबळे, विभाग प्रमुख शाम पाटील, उपविभाग प्रमुख रवि नाटील उपविभाग प्रमुख नरेंद्र पाटील, शहरप्रमुख नरेंद्र शिंदे, भाजपचे सचिव चंद्रहास मोरे, मनसे शहरप्रमुख सुशांत सूर्यराव, कळवा मुंब्रा महिला आघाडी सहसंघटक रचना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांच्या काळात काश्मीरमधील ३७० कलमाबाबतचा झालेला निर्णय स्वागतार्ह आहे. सर्वधर्मीयांसाठी एकच समान नागरी कायदा आणण्यात यावा, यासाठी मोदी सरकार सत्तेत येणे गरजेचे आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्वात जास्त लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांना एखाद्या कामाबाबत फोन केला तर तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याची दखल घेत काम तडीस नेतात. खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी जितका निधी कल्याणमध्ये आणला तितका निधी संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही मतदारसंघात आला नाही. श्रीकांत शिंदे संसदेत अभ्यासपूर्ण भाषण करतात. विकासाला त्यांचे नेहमी प्राधान्य असते. यामुळे महायुती पुरस्कृत शिवसेना उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांना वाढीव मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांनी केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी या परिसराचा विकास केला आहे. ४८८ कोटींची विकास कामे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मार्गी लावली आहेत, यात खारीगाव-पारसिक परिसरातील कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचा समावेश आहे. ४ तारखेला खासदार म्हणून निवडून आल्यावर डॉ.श्रीकांत शिंदे यांना खारीगाव पारसिक परिसरातील शिल्लक विकास कामांच्या सोडवणूकीसंदर्भात चर्चा करणार आहोत. यामुळे येत्या २० मे रोजी कल्याण लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे यांना मोठ्या मताधिक्काने विजयी करुया, असे आवाहन शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी यावेळी बोलताना केले.

महापालिका, पोलीस आणि महावितरण यांचा एकत्रित नियंत्रण कक्ष १ जूनपासून कार्यान्वित

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश मोबाईल नंबर आणि पर्यायी नंबर सुरू राहील याची अधिकाऱ्यांनी घ्यावी दक्षता ठाणे : नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांमधील समन्वय उत्तम असावा यासाठी महापालिका, पोलीस आणि महावितरण यांचा एकत्रित नियंत्रण कक्ष १ जूनपासून कार्यान्वित होणार आहे. कोणत्याही प्रकारच्या आपत्तीमध्ये यंत्रणांनी अतिजलद प्रतिसाद द्यावा, त्यावरच त्यांच्या कार्यक्षमतेचेच मूल्यांकन होईल, असे प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व यंत्रणांच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत केले. ठाणे महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणांच्या समन्वयाचा आढावा घेण्यासाठी तसेच, समस्यांवर मार्ग काढण्यासाठी मान्सूनपूर्व आढावा बैठकीचे आयोजन गुरूवारी सायंकाळी नागरी संशोधन केंद्र, माजिवडा येथे करण्यात आले होते. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह महापालिकेचे सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख आदी उपस्थित होते. त्याचबरोबर, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, प्रादेशिक परिवहन विभाग, तहसिलदार, शासकीय रुग्णालय, मध्य रेल्वे, हवाई दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, महावितरण, टोरंट पॉवर, एमआयडीसी, एमएमआरडीए, एसटी महामंडळ, ठाणे मनपा परिवहन सेवा, महानगर गॅस, अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, लायन्स क्लब, जमाते इस्लामी हिंद, इंडियन रेड क्रॉस यांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जी. जी. गोदेपुरे यांनी सर्व यंत्रणांकडून अपेक्षित असलेल्या कार्यवाहीबद्दल सादरीकरण केले. उपस्थित प्रतिनिधींनी त्यांच्या विभागांच्या मान्सूनपूर्व तयारीबद्दल माहिती दिली. तर, बैठकीची सांगता अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी केली. ‘प्रलंबित कामे लवकर पूर्ण करावीत’ पावसाळा सुरू होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी आहे. या वेळेचा उपयोग करून सर्व यंत्रणांनी त्यांची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करावीत. आवश्यक तेथे महापालिकेच्या यंत्रणेला सोबत घेऊन समस्यांमधून मार्ग काढण्यात यावा, अशी सूचना आयुक्त राव यांनी केली. आपत्तीच्या काळात अफवा पसवल्या जात असल्याचे लक्षात आल्यावर तत्काळ त्याचे खंडन करून वास्तव स्थिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. त्यासाठी बल्क एसएमएस, समाज माध्यमे, प्रसारमाध्यमांची मदत घेण्यात यावी, असेही राव यांनी सांगितले. एकत्रित नियंत्रण कक्षात पालिका, पोलीस, महावितरण यांचे प्रतिनिधी २४ तास वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये हजर राहतील. त्यामुळे यंत्रणांमधील समन्वय साधणे सोपो होईल, असेही राव यांनी सांगितले. ठाणे महापालिका क्षेत्रात असलेले महापालिका आणि पोलीस यांचे १६०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नेटवर्क पूर्णपणे कार्यरत राहील, त्याची दुरुस्ती तत्काळ केली जाईल, यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात यावी, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. रेल्वे मार्गावरील पुलाची दुरुस्ती कोपरी येथे रेल्वेमार्गावरील पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्याची आवश्यकता असून त्याबद्दल रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांनी परवानगी दिल्यास या दुरुस्तीचे काम महापालिकेमार्फत करण्यात येईल, असेही राव यांनी सांगितले. भंगार, बेवारस वाहनांच्या विरोधात मोहीम रस्त्यावर असलेली बेवारस वाहने हटविण्यासाठी वाहतूक पोलीस आणि महापालिका यांनी संयुक्त मोहीम हाती घ्यावी. ही वाहने ठेवण्यासाठी जागा शासनाकडून उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे रहदारीस असलेले अडथळे दूर होतील. पुढील १५ दिवसात ही मोहीम व्हावी, असेही आयुक्त राव यांनी सांगितले. मेट्रो, एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी पावसाळ्यात कोणतेही मोठे खोदकाम टाळावे. खोदलेला भाग पूर्ववत करून वाहतूक योग्य करावा. खोदकाम अत्यावश्यक असल्यास त्यासभोवती व्यवस्थित बॅरिकेडिंग केले जावे, अशा सूचनाही आयुक्त राव यांनी या बैठकीत दिल्या. माजिवडा-कापूरबावडी फ्लायओव्हरचे काम करण्यात आले असून मानपाडा आणि पातलीपाडा फ्लायओव्हरच्या कामासाठी परवानगी मिळालेली नसल्याचे एमएसआरडीसीच्या प्रतिनिधींनी सांगितले. तर, गायमुख येथील घाट रस्त्याचे कामही वन विभागाच्या परवानगीमुळे सुरू होऊ शकलेले नाही. या पावसाळ्यात हा मार्ग सुस्थितीत राहील याची दक्षता बांधकाम विभागाने घ्यावी, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

ठाणे महापालिकेतर्फे शुक्रवारी महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त उमेश बिरारी यांनी पुष्पहार वाहून अभिवादन केले. त्याप्रसंगी, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व ठाणेकर नागरिक उपस्थित होते.

मतदार जोडो पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मतदान जनजागृतीसाठी हिरानंदानी  परीसरात ठाणे : लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करावे यासाठी काल ठाणे शहरातील हिरानंदानी इस्टेट परिसरात मतदार जोडो पदयात्राचे आयोजन करण्यात आले होते. २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत, १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. सदर हिरानंदानी इस्टेट परीसरात १४८ विधानसभा मतदारसंघ स्वीप पथक मधील कर्मचारी मोठ्या उत्साहात मॅस्कॉट या मनोरंजक कार्टून पात्राला सोबत घेऊन मतदान करा,मतदान करा लोकशाहीचा विजय करा आणि २० मे को सब काम छोडो मतदान करो या घोषणा मोठ्या आवाजात देऊन व हातात मतदान जनजागृतीचे संदेश यावेळी नागरिकांनी दिले. संपूर्ण हिरानंदानी इस्टेट परीसरात मॅस्कॉटच्या माध्यमातून नागरिकांचे मनोरंजन करत उपस्थित नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देवून येत्या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारांनी घराबाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा बाजूकडील नागरिक, व्यावसायिक, फळ, भाजी विक्रेते या मतदार लोकांना या रॅलीतून मतदान करण्यासाठी जागृती करण्यात आली.. रॅलीमधील मॅस्कॉट सोबत स्वीप कर्मचारी जनजागृती करीत असल्याचे पाहून मतदारांमध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला होता. मी मतदान करणारंच….. आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा.या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान दिनांक २० मे २०२४ असे दर्शवणारे माहितीपत्रकाचे ही वाटप मॅस्कॉटच्या हस्ते सर्व नागरिकांना करण्यात आले आणि लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी देशाच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी त्याचप्रमाणे मतदारांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहान सर्व नागरिकांना करण्यात आले.

गंधवतीचा अक्षय्य सोहळा

अक्षय्य तृतिया विशेष डॉ. तारा भवाळकर कधीही क्षय होत नाही ते अक्षय… अक्षय्य तृतीयेचा दिवस आणि त्यानिमित्त होणारे साजरीकरण हेच तत्त्व सांगून प्रत्येक चांगल्या गोष्टीचा क्षय रोखण्याची समज देते. ऋतूचक्रातील…

वारे विलीनीकरणाचे

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आता घर वापसीच्या मनस्थितीत आले आहेत असे चित्र आज दिसते आहे. फक्त आता ते एकटेच जातात की सोबत ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही घेऊन…