Author: bittambatami.com

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी. यावेळी महापालिकेतील कर्मचारी देखील उपस्थित होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर यांनी यावेळी पुष्पहार अर्पण केला. कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, सहायक कक्ष अधिकारी रवींद्र बच्छाव, नितीन राणे  आदींसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी

सहा उमेदवारांचे अर्ज दाखल ठाणे : 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी   विविध पक्षांच्या पाच उमेदवारांनी तर एका अपक्ष उमेदवाराने आपले नामनिर्देशन अर्ज 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर…

मुंबई, ठाणे, कल्याण, भाईंदर महानगरपालिकांना ७ मे रोजी अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश

ठाणे : मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि मिरा भाईंदर महानगरपालिका यांना आणि महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण विभागाचे प्रधान सचिव, जिल्हा न्यायदंडाधिकारी यांना मैला सफाई कामगारांचे सर्वेक्षण करण्याचे आणि सदर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या कामाचा व योजना राबविल्या असल्याचा रिपोर्ट येत्या ७ मे २०२४ रोजी सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत, अशी माहिती श्रमिक जनता संघाचे महासचिव जगदीश खैरालिया यांनी दिली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील गायत्री सिंह, सुधा भारद्वाज आणि संज्योत शिरसाठ यांनी न्यायालयात बाजू मांडली. सीवर डेथ प्रकरणी श्रमिक जनता संघाने दाखल करण्यात रिट याचिका क्र.१५७०/ २०२३ गमध्ये   मुंबई उच्च न्यायालयाने  पुन्हा १६ एप्रिल २०२४ रोजी महाराष्ट्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना मानवी मैला सफाई प्रतिबंध कायदाच्या तंतोतंत अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.सीवर डेथ घडतात – संडासाच्या मैला टाक्या साफ करतांना सफाई कर्मचाऱ्यांना मरण येते  –  म्हणजे अजूनही The Prohibition of Employment as Manual Scavengers and Their Rehabilitation Act 2013 चे उल्लंघन होत आहे. सदर कायद्याच्या तरतुदीनुसार मानवी मैला सफाईच्या कामावर प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. परंतु वारंवार सीवर डेथच्या घटना घडत आहेत. ही अमानुष प्रथा बंद होण्यासाठी न्यायालयाने महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण विभागाचे प्रधान सचिव, जिल्हा न्यायदंडाधिकारी यांना आणि मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि मिरा भाईंदर महानगरपालिका यांना मैला सफाई कामगारांचे सर्वेक्षण करण्याचे आणि सदर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या कामाचा व योजना राबविल्या असल्याचा रिपोर्ट येत्या ७ मे २०२४ रोजी सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत, अशी माहिती श्रमिक जनता संघाचे महासचिव जगदीश खैरालिया यांनी दिली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील गायत्री सिंह, सुधा भारद्वाज आणि संज्योत शिरसाठ यांनी न्यायालयात बाजू मांडली. महाराष्ट्र शासनाने राज्य निगराणी समिती (Monitoring Committee), दक्षता समिती (Vigilance Committee), राज्य स्तरीय सर्वेक्षण समिती, जिल्हा सर्वेक्षण समिती, उपविभागीय समित्या गठीत केलेल्या आहेत का? तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत? मैला सफाई कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांनी पुनर्वसन करण्यासाठी केलेले अर्ज आणि त्यावर झालेली अंमलबजावणी बाबतीतही रिपोर्ट सादर करण्याचे आदेश मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका आणि मिरा भाईंदर महानगरपालिका यांना या निकालात देण्यात आलेले आहेत. मुंबई, ठाणे, मिरा भाईंदर आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत वारंवार मलटाकी सफाई करतांना विषारी दुर्गंधीने गुदमरून मृत्यू कांड घडत आहेत. परंतु आजपर्यंत कुणाचेही पुनर्वसन करण्यासाठी शासनाने किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेतला नसल्याचा आरोप ही प्रसिद्धी पत्रकात करण्यात आला आहे. ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा सर्वेक्षण समिती नेमून वर्ष उलटून गेले आहे परंतु समिती सदस्यांनी मागणी करूनही बैठका घेतल्या जात नाहीत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत जून २०२३ मध्ये बंद दुषित गटार सफाई करतांना २२ वर्षीय आदिवासी तरुण ऋतिक कुरकुटे मरण पावला. परंतु त्यांच्या आश्रितांनी मागणी करून ही अजून नुकसान भरपाई अदा केलेली नाही. ठाणे जिल्हा सर्वेक्षण समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या कडे प्रत्यक्ष घटनेची चौकशी करण्यासाठी समिती सदस्यांनी आग्रह धरूनही पथक पाठवून सर्वेक्षण करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. या अमानुषरित्या मृत्यूमुखी पडलेल्या सफाई कामगारांवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी आणि कायद्यानुसार त्यांचे  न्याय्य पुनर्वसन व्हावे या उद्देशाने श्रमिक जनता संघाच्या अध्यक्षा मेधा पाटकर, उपाध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महासचिव जगदीश खैरालिया, म्युज फाऊंडेशनचे श्रेयस, निशांत बंगेरा, राकेश घोलप आदी कार्यकर्ते यांनी या प्रकरणी परिश्रम घेतले.

आयुक्त बदलले तरी, ठाण्यात अनधिकृत बांधकामे सुरूच !

आमदार संजय केळकर यांची संतप्त प्रतिक्रिया अनिल ठाणेकर ठाणे : ठाण्यातील अनधिकृत बांधकामांविरुद्ध आमदार संजय केळकर यांनी नागपूर अधिवेशनात आवाज उठवताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. मात्र तत्कालीन आयुक्तांनी कारवाईचा केलेला फार्स, नवीन आयुक्तांची नियुक्ती झाल्यानंतरही ठाण्यात आजही अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा संताप आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे. ठाण्यातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा आमदार संजय केळकर यांनी नागपूर अधिवेशनात गाजवला. त्यावेळी आ. संजय केळकर यांनी, ठाणे महापालिकेचे अधिकारी आयुक्तांच्या आदेशाची कशी पायमल्ली करतात याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे निर्देश दिल्याने तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर मोहीम हाती घेतली पण या बांधकामांना जबाबदार असलेल्या एकाही अधिकाऱ्याला निलंबित केलेले नाही. केवळ एका सहायक आयुक्ताला सक्तीच्या रजेवर पाठवून कारवाईचा फार्स केला. याबद्दलची खंत आ. संजय केळकर यांनी नवे आयुक्त सौरभ राव यांच्याकडे व्यक्त केली आहे. काही ठिकाणच्या बांधकामांचे तपशील तक्रारदारांनी सादर केले. पण कारवाई शून्य ! ७२ माणसं या शहरात एका इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडली, तरी सुद्धा प्रशासनाला अजून जाग आलेली नाही. ठाणे पश्चिमेकडील उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील पहिली राबोडी येथे शेरू कुरेशी या हॉटेल मालकाने आपल्या सागर हॉटेलच्या इमारतीवर बेधडकपणे बेकायदा मजले उभारण्यास सुरुवात केली आहे. या विरोधात राबोडीतील एका तक्रारदाराने दाखल केलेल्या रिट पीटीशनवर उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला आदेश देऊन सुरू असलेले अनधिकृत बांधकाम रोखण्याचे बजावले. न्यायालयाने स्पष्ट निर्देश देऊनही उथळसर प्रभागाचे अधिकारी ढिम्म असल्याचे जावेद शेख यांनी निदर्शनास आणले आहे. ही बाबही आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. अशीच परिस्थिती बाळकुम, ढोकाळी, कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट, कोपरी आदी भागात असून येथे कारवाईचा केवळ फार्स न करता प्रत्यक्ष ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. सध्या आचारसंहिता सुरू असून आयुक्तांनी ही बांधकामे तोडण्याची मोहीम हाती घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत, मात्र तरीही या प्रभागांत अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे  आमदार संजय केळकर यांनी आयुक्त श्री. सौरभ राव यांच्या निदर्शनास आणून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

महाराष्ट्रात अतृप्त आत्मा ते गुजरातमध्ये स्रीयांच्या अब्रुचे लुटेरे

निवडणूकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांचे शा‍ब्दिक वार पुणे :  महाराष्ट्रात निवडणूकीची रणधुमाळी सुरु असून आरोप प्रत्यारोपांचा अक्षरशा धुराळा उडाला आहे. आज देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी लाखोंच्या गर्दीपुढे सभा गाजवताना…

चांगल्या पावसाच्या शक्यतेने महागाई नियंत्रणात येणार

मॉन्सूनच्या सामान्य पावसाच्या अंदाजानुसार खाद्यपदार्थांच्या किमती कमी होण्याची सरकारची अपेक्षा आहे. अर्थ मंत्रालयाने मासिक आर्थिक अहवालात म्हटले आहे की परकीय चलनाची मजबूत आवक आणि अनुकूल व्यापार तूट यामुळे रुपया अधिक…

आला उन्हाळा तब्येत सांभाळा

उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी प्रतिबंधक उपायांबरोबरच काही दक्षता आणि खाण्यापिण्यावर बंधने ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये उष्माघाताचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर दिसतात. यात शरीराचे तापमान उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर…

व्यसनमुक्तीसाठी झटणारे तुकडोजी महाराज

विशेष अमोल स. भा. मडामे वरील अभंगातून तुकडोजी महाराज मुलांवर व्यसनांची छाया पडू नये त्यासाठी पालक व शिक्षकांनी व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे असा संदेश देतात. तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव…