Author: bittambatami.com

त्यांना’ गद्दार म्हणण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही…

सध्या निवडणूक प्रचार अगदी रंगात आलेला आहे. या प्रचारादरम्यान महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल परब, अरविंद सावंत, सुषमा अंधारे प्रभूती मंडळी शिंदे गटाच्या नेत्यांचा आणि उमेदवारांचा उल्लेख करताना आवर्जून “गद्दार” असं करतात.…

अजित पवार धमकी बहाद्दर- संजय राऊत

नाशिक : अजित पवारांची ख्याती सध्या धमकी बहाद्दर अशी झाली आहे. रोज उठून ते सध्या मतदारसंघात 10 लोकांना धमक्या देतात, अशी जोरदार टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर केली…

वाढत्या तापमानावरील उपाययोजनांसाठी आरोग्य विभाग सरसावले

मुंबई : मे महिना सुरू होण्यापूर्वीच राज्यात उन्हाचा तडाखा भयंकर वाढला आहे.  ग्रामीण भागासह शहरी भागातही उष्णतेची लाट धडकली आहे.  गेले काही दिवस  मुंबईच्या तापमानाने रविवारी पुन्हा उच्चांकी पातळी गाठली आहे. पुढील  काहा दिवस तापमानात…

सहा कोटी मराठ्यांची आता ९ एकरात सभा घेणार- जरांगे

आंतरवाली सराटी: मराठा आरक्षणासाठी आणि सगेसोयऱ्यांच्या आग्रहासाठी सहा कोटी मराठ्यांची आता ९ एकरात सभा घेणार आहे यासाठी येत्या १ मेला नारायण गडावर आमची बैठक होणार आहे. या बैठकीची संपूर्ण महाराष्ट्रात तयारी सुरु आहे, असे…

‘घोषणा करतात ४०० पारची, चर्चा काँग्रेसच्या जाहीरनाम्याची’

चव्हाणांचा भाजपावर हल्लाबोल  सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या प्रचारात ४०० पारचा नारा देतात आणि संपुर्ण भाषणात काँग्रेसच्या जाहीरनाम्यांची चर्चा करतात अशी खोचक टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर केली.…

महाविकास आघाडीची मंगळवारी रिपब्लिकन फ्रंटसोबत बैठक

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पुढील तीन टप्प्यांतील मतदानासाठी महाविकास आघाडी आणि प्रागतिक रिपब्लिकन आघाडी यांची एक संयुक्त समन्वय बैठक उद्या मंगळवारी ३० एप्रिल रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे.…

महायुतीत जागावाटपाचा संस्पेस कायम

मुंबई :  मुंबई, ठाण्यात आणि नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार वाजतगाजत उमेदवारांनी अर्ज दाखल करीत असताना त्याच जागावर महायुतीतमात्र सन्नाटा आहे. नक्की जागा कोण लढविणार याबाबतच अजून संस्पेस कायम आहे. त्यामुळे महायुतीच्या…

निजामने केली पुनमची निघृण हत्या!

श्रद्धा वालकर घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! मुंबई,  : मानखुर्द येथील साठेनगर परिसरात राहणाऱ्या पूनम क्षीरसागर नामक मातंग समाजातील तरुणीचा मृतदेह तुकडे करून एका सुटकेसमध्ये भरून निर्जनस्थळी ठेऊन देण्यात आला होता. निजाम…

मतदारांच्या जनजागृतीसाठी 5 मे रोजी मॅरेथॉनचे आयोजन

पालघर  : 5 मे रोजी सकाळी 6 वाजता विविध वयोगटातील नागरिकांसाठी “Run For Vote” मॅरेथॉनचे आयोजन SVEEP (Systematic Voter’s Education and Electoral Participation) अंतर्गत करण्यात आले आहे. भारत निवडणुक आयोगाकडुन लोकसभा सार्वत्रिक निवडणुका-2024 हा कार्यक्रम घोषित झालेला आहे. त्यानुषगाने पालघर जिल्हातील मतदारांमध्ये जनजागृती करुन मतदानासाठी प्रवृत्त करणे आयोगाकडील या विषयी स्थायी सुचना आदेशांची अंमलबजावणी करणे व नागरिकांमध्ये निवडणुक विषयी जनजागृती करण्यासाठी SVEEP (Systematic Voters…

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम आज घेण्यात आली. यावेळी अवर सचिव मिलिंद हरदास यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) निखिल गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) डॉ.आरती सिंह यांच्यासह वरिष्ठ शासकीय तसेच पोलीस अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. आज झालेल्या रंगीत तालीम मध्ये राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र बल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस ध्वज, मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज, मुंबई अग्निशमन दल ध्वज, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई पोलीस आणि मुंबई लोहमार्ग पोलीस ब्रास बॅण्ड पथक, राज्य राखीव पोलीस बलाचे पाईप बॅण्ड पथक, बृहन्मुंबई पोलीस विभागाचे निर्भया वाहन पथक, मुंबई अग्निशमन दलाचे हाय राईज फायर फायटिंग वाहन, हायड्रोलिक प्लॅटफॉर्म आणि 64 मीटर टर्न टेबल लॅडर आदी पथकांनी सहभाग घेतला. उत्कृष्ट संचलन पुरस्कार भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना रंगीत तालीम दरम्यान मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये शासकीय सेवेतील सहभागी पथकांच्या गटात गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याच्या सी-60 पथकाने प्रथम, राज्य राखीव पोलीस बलाने द्वितीय तर बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथकाने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. शालेय सहभागी पथकांमध्ये रोड सेफ्टी पेट्रोल (मुले), डॉ.अँटोनियो डा सिल्वा हायस्कूल, दादर च्या पथकाने प्रथम तर रोड सेफ्टी पेट्रोल (मुली), एमसीएम मुलींचे हायस्कूल, काळाचौकी च्या पथकाने द्वितीय क्रमांक पटकावला. स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम गटात नायगाव/ परेल भोईवाडा म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने प्रथम, ग्लोब मिल पॅसेज म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने द्वितीय तर सांताक्रुझ पूर्व मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने तृतीय क्रमांचा पुरस्कार मिळविला. या समारंभात किरण सुरेश शिंदे, अरुण सुरेश शिंदे, विवेक विनोद शिंदे यांनी सनई चौघडा वादन केले. तर शिबानी जोशी आणि पल्लवी मुजुमदार यांनी सूत्रसंचलन केले.