Author: bittambatami.com

ठाण्यात विचारेंनी अर्ज घेतला: महायुतीत अजुनही सस्पेंस

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होताच आज राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज घेतला. मात्र महायुतीतील भाजप किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नेमका कोण उमेदवार उभे राहणार याबाबत अद्यापही संस्पेंस कायम आहे. एकीकडे राजन…

दुसऱ्या टप्प्यात राज्यात  ५३.५१ टक्के  मतदान 

मुंबई :  महाराष्ट्रात शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात झालेल्या  लोकसभेच्या आठ जागांवर सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५३. ५१ टक्के मतदान झाले. काही तुरळक  घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. काही ग्रामस्थांनी त्यांच्या अडचणीमुळे मतदानावर बहिष्कार टाकला. काही…

दुष्काळात महाराष्ट्राला मदत करणाऱ्या अमुलवर मोदींनी खटला भरला- पवार

सोलापूर : दुष्काळात महाराष्ट्राला मदत करणाऱ्या अमुल कंपनीवर गुजराच्या तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी खटला भरला होता असा खळबळजनक आरोप शरद पवार यांनी केला आहे. दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना आमच्या विनंतीनुसार…

मुंबई कोस्टलचे ‘मिशन महाकाय’ यशस्वी !

मुंबई : कधी सागरांच्या लाटांचा तडाका तरी कधी धरणीमातेंनी घेतलेली सत्वपरिक्षा अशा अग्निदिव्यातून पुर्णत्वाच्या दिशेने निघालेला मुंबई कोस्टल रोडवरील सर्वात महत्वाचे आणि एतिहासिक असे मिशन महाकाय अखेर शुक्रवारी २६ एप्रिलच्या पहाटे 3 वाजून 25 मिनिटांनी यशस्वी झाले.…

सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्या; उमदेवारांना मात्र दिला दिलासा

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने ईव्हिएमच्या विरोधात सर्व याचिका आज फेटाळून लावल्या. ईव्हिएमव्दारे मतमोजणी न करता व्हिव्हिपॅट मधील मतपावत्यांची शंभर टक्के मोजणी करा ही याचिकाकर्त्यांची मुख्यमागणीही सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावत…

एमए शिकलेल्या युवकाचा ईव्हीएमवर कुऱ्हाडीचा घाव

नांदेड : नांदेडच्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदान केंद्रात एमए शिकलेल्या एका युवकाने एन मतदान सुरु असताना व्हीव्ही पॅट आणि ईव्हीएम मशीन कुऱ्हाडीने फोडल्या. भानुदास एडके असे या व्यक्तीचे नाव…

ईव्हिएमवर ठाण्यात साप तर नांदेडमध्ये कुऱ्हाड !

ठाणे : शुक्रवारचा दिवस ईव्हिएमचा होता. एकीकडे सुप्रीम कोर्ट ईव्हिएमवर विश्वास दाखवित असतानाच आज नांदेडमध्ये एका एमए झालेल्या युवकाने मतदान सुर असताना कुऱ्हाडीचे घाव घालून ईव्हीएमचे दोन तुकडे केले तर…

राज्यात हिवताप रुग्णांच्या मृत्यूमध्ये घट

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून मुंबईसह राज्यातील हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली असून हिवतापामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे हे शक्य झाले आहे. राज्य सरकार हिवतापाच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम राबवीत आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये औषधे उपलब्ध करण्याबरोबरच नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. या मोहिमेला मागील काही वर्षांपासून यश मिळताना दिसत आहे. यामुळे हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत आणि मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याची माहिती आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. राज्यात २०२१ मध्ये हिवतापाने १४ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र २०२२ मध्ये हिवतापामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २६ वर पोहोचली. यात २०२३ मध्ये घट होऊन ती १९ वर आली. २०२४ मध्ये आतापर्यंत हिवतापाचे २ हजार ६५० रुग्ण सापडले असून, एकाही मृत्यू दगावलेला नाही. ॲनोफिलिस डासामुळे हिवतापाचा प्रसार ॲनोफिलिस डास चावल्याने हिवतापाचा प्रादुर्भाव होतो. हिवतापाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून सोसायटी व इमारतीमधील पाण्याच्या टाक्यांच्या परिसरातील डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यात येत आहेत. तसेच नागरिकांमध्ये जागरूकता करण्यात येत आहे.

पाणपोईसाठी बाजारात रांजणच मिळेना

ठाणे : वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांची तहान भागविण्यासाठी ठाणे पालिकेने पाणपोई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने शहरात १५० तात्पुरत्या पाणपोई उभारण्याचे नियोजन आखले आहे. त्यापैकी तीन पाणपोई उभारल्या आहेत; मात्र इतर ठिकाणी पाणपोई उभारण्यासाठी आवश्यक असलेले रांजणच बाजारात उपलब्ध नसल्यामुळे पाणपोई उभारायची कशी, असा पेच पालिका प्रशासनापुढे उभा ठाकला आहे. दिवसेंदिवस ठाणे शहराच्या तापमानात कमालीची वाढ होत आहे. त्यात शहरातील उष्णतेचा पार ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. तर रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना उष्णतेमुळे उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. त्यामुळे याची दक्षता घेत ठाणे पालिकेने नागरिकांची तहान भागवण्यासाठी पाणपोई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिकेच्या आवाहनानुसार, सीएसआरच्या माध्यमातून १५० ठिकाणी पाणपोई सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे. त्यापैकी ठाणे रेल्वे स्टेशन, नौपाडा-आईस फॅक्टरी, तीन हात नाका – सिग्नल शाळेसमोर या तीन ठिकाणी समर्थ भारत व्यासपीठामार्फत पाणपोई सुरू केली आहे. पाणपोईसाठी आणखी २५ ठिकाणांची निवड पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने केली आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांबरोबर पालिकेने चर्चा सुरू केली आहे. या संस्थांही पाणपोई उभारणीसाठी पुढे येत आहेत. बाजारात छोटी मडकी उपलब्ध आहेत; मात्र पाणपोईसाठी १०० ते ७५ लिटरच्या रांजणची आवश्यकता आहे, ते बाजारात उपलब्ध होत नसल्याने पालिकेपुढे पाणपोई उभारणीचा पेच निर्माण झाल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. पाणपोई आहे; पण पाणीच नाही सध्याच्या घडीला ठाणे रेल्वे स्टेशन, नौपाडा-आईस फॅक्टरी, तीन हात नाका – सिग्नल शाळेसमोर या तीन ठिकाणी समर्थ भारत व्यासपीठामार्फत पाणपोई सुरू केली आहे. त्यात दररोज पिण्याचे शुद्ध पाणी भरण्याची व्यवस्था संस्थांमार्फत करण्यात येत आहे. अशातच ठाणे स्थानकात १०० लिटरचे रांजण ठेवून पाणपाई उभारण्यात आली आहे; मात्र त्यात पाणीच उपलब्ध नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. पालिकेमार्फत जनजागृती तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासन, ठाणे महापालिका, काऊन्सील ऑफ ऍनर्जी एनव्हायर्नमेंट ॲण्ड वॉटर या संस्थेने एकत्रितपणे सर्वंकष उष्णता उपाययोजना आराखडा तयार केला असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले. त्यानुसार पालिका क्षेत्रात विविध ठिकाणी उष्माघात, लक्षणे, घ्यायची काळजी यांची माहिती देणारे फलक, डिजिटल बोर्ड लावले आहेत. पोस्टर्सच्या माध्यमातून सर्व गृहसंकुलांपर्यंत ही माहिती पोहोचवली जात आहे.

उल्हासनगर महापालिकेचे माझी वसुंधरा अभियान

उल्हासनगर : महापालिका पर्यावरण विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरणविषयक जनजागृती करण्यात येणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील शाळांचे शिक्षक यांना पर्यावरण दुत म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांनी दिली. उल्हासनगर महापालिका पर्यावरण विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. शहर स्वच्छ, सुंदर व प्रदुषणमुक्त व्हावे, यासाठी नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव यांनी दिली. महापालिका महासभा सभागृहामध्ये शुक्रवारी महापालिका शाळांतील शिक्षक प्रतिनिधी यांचेकरीता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. प्रशिक्षणानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातील विविध कृतीमधुन पर्यावरणाविषयी जनजागृतीचे धडे देणार आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे पालक, पालकांमार्फत त्यांचे आप्तेष्ट शेजारी आदींना जनजागृती होण्यास मदत होणार आहे. असे आयुक्त अजीज शेख म्हणाले. शिक्षक हे पर्यावरण दुत म्हणून महत्वाचा घटक असुन प्रशिक्षण कार्यक्रमा नंतर ३७ शिक्षकांना पर्यावरण दूत म्हणून घोषित करुन प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले आहे. पर्यावरण प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये डॉ. सिमा कांबळे, प्राचार्य डी.डी. विपुते आदींनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन पर्यावरण विभागामार्फत इन्फिनिटी रिलेशन्स या संस्थेमार्फत करण्यात आले होते. तथापि, सदर कार्यक्रमासाठी पर्यावरण विभागप्रमुख विशाखा सावंत, जनसंपर्क अधिकारी, छाया डांगळे आदीजन उपस्थित होत्या.