Category: क्रीडा

प्रल्हाद नलावडे स्मृती शालेय कॅरम स्पर्धा प्रसन्न गोळेने जिंकली

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कॅरमप्रेमी स्व. प्रल्हाद नलावडे स्मृती चषक शालेय १५ वर्षाखालील विनाशुल्क कॅरम स्पर्धा पोद्दार अकॅडमी-मालाड स्कूलच्या प्रसन्न गोळेने जिंकली. उत्तम फटकेबाजीसह अचूक सोंगट्या टिपत प्रसन्न…

जे.के. स्पोर्टस्, वीर नेताजी, यश क्रीडा दुसऱ्या फेरीत दाखल

मुंबई शहराची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा – २०२४-२५ जे.के. स्पोर्टस्, वीर नेताजी, यश क्रीडा दुसऱ्या फेरीत दाखल मुंबई : जे.के. स्पोर्टस्, वीर नेताजी, यश क्रीडा यांनी मुंबई शहर…

पार्ले महोत्सवात होम मिनिस्टर ठरल्या शीला वावळे

विविध स्पर्धांमध्ये वरिष्ठ नागरिकांचाही लक्षणीय सहभाग मुंबई : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या स्पर्धेत पार्ले महोत्सव २०२४ च्या होम मिनिस्टर पैठणीच्या मानकरी ठरल्या शीला वावळे तर उपविजेत्या ठरल्या लक्ष्मी शिरसाट आणि वर्षा…

अंध खेळाडूंसाठी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन

ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल तर्फे काॅंक्वेस्ट २०२४ ही अंध खेळाडूंची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनच्या सहकार्याने ही स्पर्धा ठाण्यामध्ये रंगणार आहे. येत्या…

वारली चित्रावलीचे आयोजन

मुंबई : दीपाली चाळके हिच्या या संकल्पनेवर वारली चित्रावली हा अभिनव कार्यक्रम, विश्व भरारी फाउंडेशन आणि विलेपार्ले येथील ख्यातनाम चित्रकार चित्रा वैद्य आणि चंद्रशेखर नाईक, तसेच त्यांचे सहकारी यांच्या मदतीने…

तळाच्या फलंदाजांनी भुवड संघाला तारले

ठाणे :घसरगुंडी झाल्यावर तळाच्या फलंदाजांनी किल्ला लढवत सामना अनिर्णित राखत गणपत भुवड संघाला ठाणे फ्रेंड्स यूनियन क्रिकेट क्लब आयोजित १६ वर्षे वयोगटाच्या पहिल्या तुकाराम सुर्वे स्मृती दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या…

पुण्यात ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांच्या तैलचित्राचे अनावरण

पुणे : भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या तैलचित्रांचे अनावरण पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. म्हाळुंगे-बालेवाडी मधील महाराष्ट्र शासनाच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मुख्य…

जितेश कदमची अपयशी झुंज

एमसीएफ राज्य कॅरम स्पर्धा मुंबई : रोटरी क्लब ऑफ बोरिवलीच्या सहकार्याने एम सी एफ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बोरिवली ( पश्चिम ) येथे सुरु एम सी एफ ९ व्या राज्य मानांकन कॅरम…

मुंबई क्रिकेटवर शोककळा

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकरच्या झटक्याने काल न्यूयॉर्क, अमेरिका येथे निधन झालं. रविवारी रात्री एमसीएच्या पदाधीकाऱ्यांसाह न्यूयॉर्कमध्ये भारत आणि पाकिस्तान…

आरुष कोल्हेची  नाबाद शतकी खेळी

ड्रीम इलेव्हन कप (१४ वर्षाखालील) निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा वेंगसरकर संघ गावस्कर संघाने शास्त्री संघाला २०९ धावांवर रोखले मुंबई, ३० मे :  आरुष कोल्हेच्या (खेळत आहे १८३)  दमदार  नाबाद शतकी खेळीमुळे वेंगसरकर संघाने ड्रीम ११ कप या १४ वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेच्या शेवटच्या साखळी लढतीत पहिल्या दिवशी दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. पहिल्या दोन्ही लढतीत शतकाने हुलकावणी दिलयानंतर आज मात्र त्याने सारी कसर भरून काढण्याच्या जिद्दीने फलंदाजी केली आणि समोरून अन्य फलंदाजांची पाहिजे तेवढी साथ मिळत नसतानाही आपल्या धावांचा ओघ कायम राखला. त्याच्या नाबाद १८३ धावांमुळे वेंगसरकर संघाने पहिल्या दिवसाखेर ८६ षटकांत ७ बाद ३१९ धावांचा डोंगर उभा केला आहे.  त्यांच्या रोशन फारुकी (२२), अरहाम जैन (१८), लक्ष्मणप्रसाद विश्वकर्मा (२३) आणि दर्शन राठोड (खेळत आहे २२) यांची त्याला सुरेख साथ लाभली.  तेंडुलकर संघाच्या अनुज सिंग (३५/२), मोक्ष निकम (५०/२) आणि आर्यन कुमार (४८/२) यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले. कर्नाटक स्पोर्टींग येथील दुसऱ्या लढतीत सुनील गावस्कर संघाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या रवी शास्त्री संघाला ४६.४ षटकांत २०९ धावांवर रोखले. प्रवीर सिंग याने ६२ धावांत ४ फलंदाजांना तंबूचा रास्ता दाखविला तर शौर्य राणे (४४ धावांत ३ बळी) आणि शेन रझा (३४ धावांत २ बळी) यांनी देखील अचूक गोलंदाजी केली.  रवी शास्त्री संघासाठी यश सिंग या सलामीवीराने (५३)केवळ ३५ चेंडूत अर्ध शतकी खेळी करताना ११ चौकार ठोकले. शाहिद खान याने ६८ तर कबीर जगताप याने नाबाद ७४ धावांची खेळी करून संघाच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना गावस्कर संघाने  ३२ षटकांत २ बाद १०३ धावा केल्या आहेत, त्यात देवाशिष घोडके याचा ४२ धावांचा वाटा होता. संक्षिप्त धावफलक : कर्नाटक स्पोर्टींग – रवी शास्त्री संघ – ४६.४ षटकांत सर्वबाद २०९ (यश सिंग ५३, शाहिद खान ६८, कबीर जगताप नाबाद ७४; शेन रझा ३४/२, शौर्य राणे ४४ धावांत ३ बळी, प्रवीर सिंग ६२ धावांत ४ बळी) वि. गावस्कर संघ –  ३२ षटकांत २ बाद १०३  (वेदांग मिश्रा २४, देवाशिष घोडके ४२, अगस्त्य काशीकर खेळत आहे २५) ओव्हल मैदान – वेंगसरकर संघ – ८६  षटकांत  ७  बाद ३१९ (रोशन फारुकी २२, अरहाम जैन १८, आरुष कोल्हे  खेळत आहे १८३ , उज्ज्वल सिंग १५, दर्शन राठोड खेळत आहे 22; अनुज सिंग  ३५ धावांत २ बळी ,  मोक्ष निकम  ५०  धावांत २ बळी, आर्यन कुमार ४८ धावांत २ बळी) वि. तेंडुलकर संघ.   फोटो ओळी –  पहिल्या दिवसाअखेर नाबाद १८३ धावांची खेळी करणारा वेंगसरकर संघाचा फलंदाज आरुष कोल्हे.