Category: क्रीडा

  राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत ‘एमआयटी एडीटी’च्या भाग्यश्री घुलेची सुवर्ण कमाई

राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत ‘एमआयटी एडीटी’च्या भाग्यश्री घुलेची सुवर्ण कमाई आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या राष्ट्रीय सराव शिबिरासाठी निवड पुणे : आर्मी रोइंग नोड येथे नुकत्याच झालेल्या ४३व्या वरिष्ठ राष्ट्रीय रोईंग अजिंक्यपद स्पर्धेत…

ॲड. रमाकांत ओवळेकर चषक श्री माँ विद्यालयाने पटकावला

ॲड. रमाकांत ओवळेकर चषक श्री माँ विद्यालयाने पटकावला ठाणे: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने युनायटेड क्रिकेटर्स व सूर सुदान शौर्या स्वर संस्था आयोजित १४ वर्षाखालील मुलांसाठी ठाणे जिल्हा आंतरशालेय क्रिकेट सामना…

को-ऑपरेटिव्ह बँक युनियन क्रिकेट स्पर्धेत आजपासून ३२ संघ झुंजणार

को-ऑपरेटिव्ह बँक युनियन क्रिकेट स्पर्धेत आजपासून ३२ संघ झुंजणार मुंबई : माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखालील को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई आयोजित आंतर को-ऑपरेटिव्ह बँक टेनिस क्रिकेट…

  चेंबूरच्या लोकमान्य शिक्षण संस्थेने “विद्यार्थी चषक” पटकावला

चेंबूरच्या लोकमान्य शिक्षण संस्थेने “विद्यार्थी चषक” पटकावला लोकमान्यचा रजाक खान स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला मुंबई: चेंबूरच्या लोकमान्य शिक्षण संस्थेने सचिन्द्र आयरे फाऊंडेशनच्या विद्यमाने शालेय विद्यार्थ्याकरिता आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेचे…

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान–रामशेठ ठाकूर

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान–रामशेठ ठाकूर पनवेल : मातीतल्या खेळांपैकी एक असलेल्या कबड्डी खेळाचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे खेळाचे मोठे नुकसान झाले आहे, असे भावूक प्रतिपादन माजी…

  जपान संघाची अमर हिंद मंडळावर २४–२३ अशी मात

अमर हिंद मंडळात आंतरराष्ट्रीय कबड्डीचा थरार जपान संघाची अमर हिंद मंडळावर २४–२३ अशी मात जपानचा एका गुणाने नाट्यमय विजय! मुंबई: दादरच्या अमर हिंद मंडळाच्या क्रीडांगणावर आंतरराष्ट्रीय कबड्डीचा थरार अक्षरशः शिगेला…

भारताचा नामिबियावर विक्रमी विजय

भारताचा नामिबियावर विक्रमी विजय नवी दिल्ली : इशान किशन आणि हार्दिक पंड्या यांच्या स्फोटक अर्धशतकांच्या जोरावर भारताने नामिबियाचा ९३ धावांनी पराभव करत टी-२० विश्वचषकात अनोख्या विक्रमाची नोंद केली. धावांच्या विजयी…

चायनिज वर पिझ्झा भारी

चायनिज वर पिझ्झा भारी स्वाती घोसाळकर मुंबई : भारतात चायनिज फुडवर मक्तेदारी असणारे नेपाळी आणि जगभरात पिझ्झावर मक्तेदारी असणारे इटली आज वानखेडेवर आमनेसामने आले. पण दिवसमावळतीला अखेर चायनिज फुडवर पिझ्झा भारी पडला.…

  दादरमध्ये पुन्हा घुमणार ‘समर्थ’चा जयघोष!

३० वे समर्थ खो-खो शिबीर दादरमध्ये पुन्हा घुमणार ‘समर्थ’चा जयघोष! मुंबई: दादरच्या क्रीडांगणावर पुन्हा एकदा जोश, जिद्द आणि जाज्वल्य परंपरेचा संगम रंगणार आहे! भारतातील अग्रगण्य क्रीडा संस्था असलेल्या श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादरने शतकोत्तर वर्षात पदार्पण करताना क्रीडाप्रेमींसाठी आणली आहे खास मेजवानी, ३० वे समर्थ खो-खो शिबीर! खो-खोच्या मैदानावर शिस्त, चपळता आणि संघभावनेचा अनोखा संगम अनुभवण्याची सुवर्णसंधी यंदाही खेळाडूंना मिळणार आहे. परंपरेचा वारसा आणि गौरवशाली कामगिरी श्री समर्थ व्यायाम मंदिर ही केवळ संस्था नसून भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक प्रेरणादायी पर्व आहे. खो-खो क्षेत्रातील नामांकित संघ म्हणून समर्थची देशभरात ओळख आहे.  संस्थेतील खेळाडू व प्रशिक्षकांनी पद्मश्री पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, क्रीडा संघटक शिवछत्रपती पुरस्कार, एकलव्य पुरस्कार, वीर अभिमन्यू पुरस्कार अशा मानाच्या सन्मानांनी गौरव प्राप्त केला आहे. या तेजस्वी परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खो-खो शिबिराचे आयोजन व वेळापत्रक ३० वे समर्थ खो-खो शिबीर हे मंगळवार १७ ते गुरुवार २६ फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार आहे. समर्थ क्रीडा भवन पटांगण, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर (पश्चिम), मुंबई येथे हे शिबीर सायंकाळी ७ ते ८ या कालावधीत शिबिरार्थ्यांना संस्थेचे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील खेळाडू मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरार्थींना प्रामुख्याने खो खो, लंगडी, शरीरतापन, सूर्यनमस्कार, आसन इत्यादी शिकवले जाणार आहे. या कालावधीत राष्ट्रीय व राज्य स्तरावरील समर्थचे अनुभवी खेळाडू शिबिरार्थींना थेट मार्गदर्शन करणार आहेत. तसेच खो खो सह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या शिबिरास भेट देऊन मार्गदर्शन करणार आहेत.

– इन्शुरन्स शील्ड क्रिकेट स्पर्धा

– इन्शुरन्स शील्ड क्रिकेट स्पर्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा १४ धावांनी विजय मुंबई: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आयोजित इन्शुरन्स शील्ड क्रिकेट स्पर्धेत (२०२५-२६) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्सवर…