Category: Blog

Your blog category

उच्च न्यायालयाचे ठाणे महापालिकेवर ताशेरे

ठाणे शहरातील अनधिकृत होर्डिंगवरून शपथपत्र सादर करण्याचे पालिका प्रशासनाला आदेश ठाणे : ठाणे शहरातील भल्यामोठ्या ४९ अनधिकृत होर्डिंगवर कागदोपत्री कारवाईचा दिखावा करणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाला उच्च न्यायालयाने शुक्रवारी फटकारले. तसेच पालिकेला शपथपत्र सादर करण्यास सांगून ठोस कारवाईचे आदेश दिलेत. घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने बेकायदा होर्डिंगवर कारवाई केली होती. मात्र ठाणे महापालिकेने किती फलकांवर काय कारवाई केली याबाबत संदिग्धता होती. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ओवळा-माजिवडा विधानसभा विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी माहिती घेतली व त्यात धक्कादायक माहिती उघडकीस आली.  ठाणे महापालिका आयुक्तांना निवेदन देऊनही गेली अनेक वर्षे महापालिकेची फसवणूक करणाऱ्या होर्डिंग व्यवसायिकांसह, चुकीचा स्थळ पाहणी अहवाल देणाऱ्या जाहिरात विभागातील अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती. महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराला कंटाळून वकील सागर जोशी यांच्यामार्फत संदीप पाचंगे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर शुक्रवारी झालेल्या सुनावणीत महापालिकेची बाजू मांडणारे वकील मंदार लिमये यांना कोर्टाने खडेबोल सुनावले. महापालिकेने ११ कोटी रूपयांचा दंड ४९ जाहिरात फलक कंपन्यांना ठोठावला होता तसेच वसूल करायला ७ दिवसांची वेळ दिली होती मात्र महापालिका राजकीय दबावामुळे कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. अनधिकृत ४९ होर्डिंगवर काय कारवाई केली, याची माहिती सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, फलकांचा वाढीव आकार कमी करण्याचे आदेश देण्याशिवाय महापालिकेने काहीच कारवाई केलेली नाही. काही जाहिरात कंपन्यांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन करून भलेमोठे फलक लावण्यात आले आहेत. महापालिका अकार्यक्षम आहे किंवा होर्डींग व्यवसायात भागीदार आहे असे कडक ताशेरे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने ओढले. कोर्टाने आता संपूर्ण ठाणे शहरातील जाहिरात फलकांबाबत काय कारवाई करणार आहात याचे शपथपत्र पुढील तारखे आधी देण्यास सांगितले आहे. चौकाचौकात मृत्यूचे सापळे ठाणे महापालिकेने प्रत्यक्षात किती फलकांवर कारवाई झाली आणि उर्वरित फलकांचे काय झाले याबाबत स्पष्टता नव्हती. या कारवाईमुळे बेकायदेशीर होर्डिंग रोखण्यास मदत होईल आणि शहराचे सौंदर्यही टिकून राहील. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होणार नाही. होर्डिंग्जच्या नियंत्रणाबाबत ठोस धोरण आखण्याची आणि त्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे मत संदीप पाचंगे यांनी व्यक्त केले आहे.

 ठाणे जिल्ह्यातून बनावट औषधांची रुग्णांना विक्री

आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असण्याची शक्यता   ठाणे : जिल्ह्यातील भिवंडी शहरातून बनावट औषधांची रुग्णांना विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. औषध प्रशासनाने एक कोटी ८५ लाख रुपयांचा साठा जप्त केला असून ही औषधे अँटिबायोटिक (प्रतिजैविक) असल्याचे प्रशासनाने सांगितले. या प्रकरणी औषध प्रशासन विभागाकडून नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. आंतरराज्यीय टोळी यामध्ये सहभागी असून त्यादिशेने औषध प्रशासनाचा तपास सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून बनावट औषधांप्रकरणी आतापर्यंत आठ गुन्हे दाखल झाले आहेत. या बनावट औषधांचा साठा सरकारी रुग्णालयांमध्येही विक्री झाल्याचे उघड झाले होते. भिवंडीमधील एका गोदामामध्येही बनावट औषधांचा साठा असल्याची माहिती औषध प्रशासनाला प्राप्त झाली होती. त्यानुसार औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या औषधांचा साठा विक्रीस प्रतिबंधित केला होता. या औषधांचे नमुने तपासल्यानंतर ते बनावट आढळून आले. त्यानंतर पथकाने एक कोटी ८५ लाख रुपयांच्या बनावट औषधांचा साठा जप्त केला. याप्रकरणात औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट औषधांची विक्री रुग्णांनाही झाली आहे. या प्रकरणात आंतरराज्यीय टोळी कार्यरत असून त्यादिशेने औषध प्रशासनाचा तपास सुरू आहे. 00000

 ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन

 समतामूलक विचारांचा प्रचार – प्रसार करण्याची जबाबदारी आपलीच – आयुक्त सौरव राव   ठाणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी य देशाला फक्त संविधानच दिले नाही. तर, सामाजिक समता, बंधुता हे विचारही दिले आहेत. आजच्या दिवशी त्यांचे विचार अधिक ताकदीने प्रसारीत करण्याची जबाबदारी आपली आहे, असे प्रतिपादन ठामपा आयुक्त सौरभ राव यांनी केले. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार कक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळेस ते बोलत होते. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या पुढाकाराने पत्रकार कक्षात पत्रकारांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी,  अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनिष जोशी, बिरारे, गोदापुरे आदी उपस्थित होते. यावेळी सौरव राव यांनी,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर समाजाने चालावे, यासाठी पत्रकारांची जबाबदारी मोठी आहे, असे सांगितले. या प्रसंगी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वेळेवर हजर न राहणाऱ्या शिक्षकांवर कारवाई

आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांंच्याकडून मराठी शाळांची पाहणी डोंबिवली : मराठी शाळांची पटसंख्या वाढविणे त्याचबरोबर विनापरवानगी रजेवर जाणाऱ्या शिक्षकांची विनावेतन रजा मंजूर करावी तसेच वेळेत शाळेत हजर न राहणाऱ्या शिक्षकांवर…

photo-6 ठाणे महानगरपालिकेच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (माहिती व जनंसपर्क) उमेश बिरारी, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

भारतीय संविधान दिनानिमित्त आरपीआयचे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे, महासचिव प्रमोद इंगळे, प्रभाकर जाधव, ठाणे शहर अध्यक्ष  ओबीसी नेते सुरेश पाटील खेडे जिल्हाधिकाऱ्यांना अशोक शिंगारे यांना संविधान फेम देऊन शुभेच्छा दिल्या.

वाढते प्रदुषण व बदलते हवामान रोखण्यासाठी पर्यावरण संरक्षणाची गरज

पर्यावरणाची सुरक्षा व संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रानी पर्यावरणाच्या प्रती वैश्विकस्तर यावर आणि राजनीतीक व सामाजिक जागृती आणण्याकरिता संयुक्त राष्ट्राने २६ नोव्हेंबर १९७२ ला “विश्र्व पर्यावरण संरक्षण दिवस” साजरा करण्याची घोषणा…

बालदिन

आज १४ नोव्हेंबर, आजचा दिवस संपूर्ण देशात बालदिन म्हणून साजरा केला जातो. वास्तविक जागतिक पातळीवर २० नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो. १९५४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेने ठरवल्यानुसार, पाहिल्यांदाच बालदिन…

 केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल

ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांकरिता ठाणे : विधानसभा मतदारसंघ 134 भिवंडी (ग्रामीण), 135 शहापूर, 136 भिवंडी (पश्चिम), 137 भिवंडी (पूर्व) व 138 कल्याण (पश्चिम) या मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून रविंदर सिंधू (IRS) हे जिल्ह्यात हजर झाले आहेत. सिंधू हे विश्रामगृह पडघा, बोरिवली तर्फे, राहुर व शासकीय विश्रामगृह, ठाणे येथे दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना भेटण्याकरिता उपलब्ध असतील. त्यांचा संपर्क क्रमांक 7039080820 हा आहे तर ईमेल आयडी exp.observerbhiwandi@gmail.com हा आहे. विधानसभा मतदारसंघ 139- मुरबाड, 140 – अंबरनाथ, 141 – उल्हासनगर, 142 – कल्याण पूर्व, 143-डोंबिवली या मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून आशिषकुमार पांडे हे जिल्ह्यात हजर झाले आहेत. आशिषकुमार पांडे हे रेयॉन सेंच्युरी, शहाड येथे दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना भेटण्याकरिता उपलब्ध असतील. त्यांचा संपर्क क्रमांक 7039080844 तर ई-मेल आयडी expenobs139to143@gmail.com हा आहे. विधानसभा मतदारसंघ 144 कल्याण (ग्रामीण), 145 मिरा भाईंदर, 146 ओवळा माजिवाडा, 147 कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून सुरेंद्र पाल सिंग (IRS) (C& CP) हे जिल्ह्यात हजर झाले आहेत. सुरेंद्र पाल सिंग हे शासकीय विश्रामगृह, ठाणे येथे दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना भेटण्याकरिता उपलब्ध असतील. त्यांचा संपर्क क्रमांक 7039080892 तर ईमेल आयडी expenditure.observer25@gmail.com हा आहे. विधानसभा मतदारसंघ 148 ठाणे, 149 मुंब्रा कळवा, 150 ऐरोली, 151 बेलापूर या मतदारसंघाचे केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून जी.मनिगंडासामी (IRS) हे जिल्ह्यात हजर झाले आहेत. जी.मनिगंडासामी हे शासकीय विश्रामगृह, ठाणे येथे दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना भेटण्याकरिता उपलब्ध असतील. त्यांचा संपर्क क्रमांक 7039060688 तर ईमेल आयडी exp.observer.thane@gmail.com हा आहे. 0000