Category: Blog

Your blog category

मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम?

पर्यावरण मिलिंद बेंडाळे सर्व प्रकारच्या प्रदुषणाबरोबरच वाढते वायू प्रदूषण ही गंभीर समस्या असून मातेच्या गर्भात असताना वा पहिल्या दोन वर्षांमध्ये मुले प्रदुषित हवेच्या संपर्कात आल्यास त्यांच्या मेंदूची रचना बदलत असल्याचे…

संघर्षपूर्ण राजकारणाची शक्यता

दखल डॉ. अशोक चौसाळकर निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्ष आपली ध्येयधोरणे जाहिरनाम्यांमध्ये स्पष्ट करत असले तरी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर यातील बहुसंख्य मुद्दे मागे पडताना दिसतात. सार्वत्रिक निवडणुकांचा महत्त्वपूर्ण टप्पा…

|| नव्या दमाचे नवसंवत्सर ||

खेद कितीही दाटून आला, आजपासुनी सुटेल साथ | नव्या दमाचे नवसंवत्सर, सोबत करेल धरुनी हाथ || संगत असतानाही माझी, भलेबुरे जे घडले ते ते | कुणा लाभले सोबतीचे बळ, कुणी…

नायर रुग्णालयात एफओटी मशीन

मुंबई : नायर रुग्णालयातील श्वसनविकार विभागाला इंडियन ह्यूम पाईप कंपनी लिमिटेडच्या सीएसआर फंडातून अत्याधुनिक फोर्स्ड ऑसिलोमेट्री (एफओटी) मशीन मिळाले आहे. या सुविधेमुळे रुग्णांच्या श्वसन कार्यक्षमतेची चाचणी करणे अधिक सोपे होणार आहे. श्वसनविकाराच्या चाचणीदरम्यान रुग्णांना फुंकर मारण्यासाठी ताकद लावावी लागते, पण वयोमानामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना चाचणीदरम्यान फुंकर मारण्यात तेवढी सक्षमता नसते, पण मशीनमुळे फुंकर मारल्यानंतर श्वसननलिकेत असलेल्या अडथळ्यांचे निदान करता येणार आहे. तसेच श्वसननलिकेत असलेला दाब, दाह, सूज याचेही निदान होत असल्याने रुग्णावर तात्काळ उपचार करता येणार आहेत.

‘अन्याय सहन केलात, आता लढायला सज्ज व्हा’

राजन विचारे यांचं भावनिक आवाहन ठाणे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पाडले आणि ठाण्यातील आपल्या शाखा काबीज करण्याचे काम या मंडळींने केले. शिवसेनेसाठी वर्षानुवर्षे राबलेल्या महिला आघाडीतील एका कार्यकर्तीचे झुणका भाकर केंद्र होते. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ते तिला दिले होते. ती उद्धव ठाकरेंची साथ सोडत नाही हे पाहून हे झुणका भाकर केंद्र या मंडळींनी पाडायला लावले. पालांडे नावाचे माजी सैनिक असलेल्या एका माजी नगरसेवकाच्या मुलाच्या सोनोग्राफी केंद्राला नोटीस बजावली. इतका अन्याय सहन करुनही आपण लढत राहीलो. अन्याय सहन केलात आता पेटून उठा त्यांना जागा दाखविण्याची वेळ आली आहे, असे भावनिक आवाहन ठाणे लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी ठाण्यातील सावरकरनगर भागात प्रचाराचा शुभारंभ करताना केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. ठाण्यातील कोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावरकरनगर, लोकमान्यनगर भागात महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना विचारे यांनी उपस्थितांना आणि विशेषत: पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिघे साहेबांचे आशिर्वाद आपल्या मागे आहेत, निर्धास्त रहा असे भावनिक आवाहन केले. ज्या महिलेला उदरनिर्वाहासाठी दिघे साहेबांनी झुणका भाकर केंद्र देऊ केले, ती महिला तुमच्या गटात सहभागी होत नाही म्हणून एका रात्रीत तिचे केंद्र पाडले. पालांडे नावाचे पंच्चाहत्तरी गाठलेले माजी नगरसेवक आहेत. माजी सैनिक म्हणून या व्यक्तीला ठाण्यातील राजकीय वर्तुळात आदराचे स्थान आहे. या वयात पक्ष कसा सोडायचा या विवंचनेत असल्याने ते आहेत तेथेच राहू या भूमीकेत होते. त्यांच्या मुलाचे सोनोग्राफी केंद्र आहे. जागा भाड्याने घेऊन त्यांच्या डाॅक्टर मुलाने ते सुरु केले होते. या केंद्राला नोटीस बजावून त्यांना धमकाविण्यात आले. दिघे साहेबांच्या काळात मोठया प्रयत्नांनी उभ्या केलेल्या एकएक शाखा यांनी बळजबरीने ताब्यात घेतल्या. पोलिस, प्रशासन, दादागिरीच्या जोरावर हम करे सो कायदा असा सगळा कारभार होता. ठाण्यात ठाकरेंना मानणारे शिल्लक ठेवायचे नाहीत अशाच पद्धतीचे काम सुरु होते. तरीही आपण उभे राहीलो, लढलो. जुन्या शाखा गेल्या खिशातील पैसे टाकून वस्त्यावस्त्यांमधून नव्या शाखा उभ्या केल्या. सगळच पैशाने विकत घेता येत नाही, निष्ठा नावाची काही चिज असते की नाही, असा घणाघात विचारे यांनी यावेळी केला. राज्य आणि ठाणे ओरबडले जातय यावेळी बोलताना विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता सरकार आणि महापालिकेच्या कारभारावर टिका केली. आज ठाणे महापालिकेची अवस्था पहा. गेल्या काही दिवसांपासून येथील कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे शिल्लक नाहीत. आपले सरकार आहे किती काळ टिकेल माहीत नाही. त्यामुळे लुटा आणि ओरबाडून घ्या असा कारभार ठाणे महापालिकेत आणि राज्य सरकारमध्ये सुरु आहे. सर्वसामान्य माणसाला हे दिसत नाही असे तुम्हाला वाटत असेल. परंतु त्याचे उत्तर तुम्हाला लवकरच मिळेल, अशी टिका विचारे यांनी केली. ही शेवटची लढाई आहे असे समजा. परंतु एकत्र या. लोकांना समजावून सांगा, आमचा पराभव झाला तर तो निष्ठेचा, न्यायाचा पराभव असेल. इतके दिवस अन्याय सहन केलात आता लढायला तयार व्हा, असे आवाहन यावेळी विचारे यांनी केले.

काँग्रेसची गॅरंटी ही चायना मालासारखी –  केशव उपाध्ये

अनिल ठाणेकर ठाणे : अनेक वर्षे देशाची सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसने गरीबी हटाव सारखी अनेक आश्वासने दिली . मात्र यातले एकही आश्वासन पूर्ण केले नाही . अशा काँग्रेसने ५ गोष्टींची दिलेली गॅरंटी ही चायना मेड वस्तूंसारखी आहे, अशी टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी  गुरुवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन , प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी यावेळी उपस्थित होते. नक्कल करायलाही अक्कल लागते आणि ती अक्कल काँग्रेसकडे नाह हे मोदी सरकारची नक्कल करून काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी देशाला दाखवून दिले.केवळ एका घराण्याच्या विकासाची गॅरंटी देणाऱ्या काँग्रेसच्या नव्या गॅरंटीमुळे आता देशातील जनता पुन्हा फसणार नाही, उलट देशाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या मोदी सरकारच्या पारड्यात प्रचंड बहुमताने सत्तेचे दान टाकेल. गेल्या दहा वर्षांत प्रत्येक निवडणुकीत मतदारांनी झिडकारल्यानंतरही पुन्हा एकदा जनतेच्या फसवणुकीसाठी मोहब्बत की दुकान सारखे फसवे मुखवटे घालून काँग्रेसी नेते जनतेकडे मतांची याचना करीत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशाला विकासाची गॅरंटी दिली. ती पूर्ण करून दाखवली. गरीब, युवक, महिला, शेतकरी या चारच जाती देशात असून त्यांच्या विकासाकरिता भाजप कटिबद्ध असल्याची गॅरंटी पंतप्रधान मोदी यांनी देशाला दिली आहे. गरीबी हटाव नारा देणाऱ्या काँग्रेसच्या काही मोजक्या नेत्यांची आणि पक्षाला वेठीस धरणाऱ्या गांधी घराण्याची गरीबी हटली,  देश मात्र अधिकाधिक गरीब होत गेला. शेतकरी कर्जबाजारी झाला.  शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीच्या नावाखाली बँकांच्या तिजोऱ्या भरून शेतकऱ्याच्या पदरात मात्र कर्जाचे ओझे कायमच ठेवण्याचा पराक्रम काँग्रेसी सत्ताधीशांनी केला, पंतप्रधान मोदी केवळ गॅरंटीच्या घोषणा करत नाहीत, तर गेल्या दहा वर्षांत त्यांनी दिलेली  प्रत्येक गॅरंटी पूर्ण केल्याचे देशाने अनुभवले आहे. देशातील २५ कोटी लोकसंख्येच्या कपाळावरील दारिद्र्यरेषा मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे कायमची पुसली गेली असून जगाने याची दखल घेतली आहे. मोदी सरकारने जाहीर केलेला प्रत्येक संकल्प पूर्ण झाल्याचे चित्र देशाने पाहिले आहे. कलम ३७० रद्द करणे , राम मंदिर उभारणी , औद्योगिक विकास, रोजगाराच्या संधी,  महिलांचे सक्षमीकरण, अशा प्रत्येक क्षेत्रातील मोदी की गॅरंटी खरी ठरते हे लक्षात आल्यावर आता त्यांच्या गँरंटीची नक्कल करत न्याय आणि विकासाच्या कागदी घोषणा करून काँग्रेस पुन्हा देशातील जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसच्या प्रत्येक घोषणेतील पोकळपणा जनतेस माहीत आहे, याची जाणीव असूनही मोदी यांची नक्कल करताना काँग्रेसने आपली अक्कल एवढी गहाण टाकली, की मोदी मंदिरात गेले की यांचे नेते मंदिरांच्या पायऱ्या झिजवतात, मोदींनी गंगास्नान केले की यांचे नेते डुबकी मारतात, मोदी यांनी प्रचारयात्रा काढल्या की यांचे नेते देशात पदभ्रमणासाठी बाहेर पडतात. अशा नक्कल करण्याच्या हतबलपणामुळेच आता काँग्रेसने पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटी दिल्या आहेत. अशा पाच पंचवीस फसवणुकांतून जनता यापूर्वीही गेलेली असल्याने, आता नक्कल देखील कामाला येणार नाही, अशी खिल्ली प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उडवली.

सामाजिक भान देणारी आध्यात्मिक चळवळ!-शामसुंदर महराज सोन्नर

शेतकरी कीर्तन महोत्सव! शेतक-यांच्या व्यथा -वेदनांवर संत विचारांची हळूवार फुंकर घालून त्यांचे जगणे सुसह्य करण्याचा प्रयत्न शेतकरी कीर्तन महोत्सवातून होत आहे. व्यवस्थेने केलेल्या अन्यायाची जाणीव करून देत असताना त्याविरोधात लढण्याचे…

एमएमआरडीएच्या नवनगर निर्मितीमुळे १२४ गावे उद्ध्वस्त होण्याची भीती

उरण : शासनाने अटल सेतू प्रभावित क्षेत्रातील उरण, पेण, पनवेल तालुक्यातील १२४ गावांत नवनगर (तिसरी मुंबई) उभी करण्यासाठी एमएमआरडीएला नवे नगर विकास प्राधिकरण म्हणून नियुक्त केले आहे. यामुळे या गावातील नागरिकांचा…

पुतीन बनणार आणखी शक्तिशाली

रशियामध्ये नुकतीच निवडणूक झाली आणि या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे रशियाचे राष्ट्राध्यक्ष वालदिमिर पुतीन हे ८८ टक्के मते मिळवून सलग पाचव्यांदा विजयी झाले. २००० साली वालदिमिर पुतीन हे जेंव्हा पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले…

मोठी गुंतवणूक येतेय, सजग रहायला हवे

परामर्ष हेमंत देसाई युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन भारतात १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. या करारामुळे भारतातील आयटी सेवांची निर्यात वाढून कुशल मनुष्यबळाला परदेशात अधिक संधी प्राप्त होईल. येत्या सहा…