दिनेश उघडे पुरस्काराने सन्मानित
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार राजीव चंदने मुरबाड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उघडे यांनी केलेल्या सामाजिक कार्यात असलेली उल्लेखनीय कामगिरी पाहता त्यांचा अनेक ठिकाणी सन्मान होतं असतो, अतिशय शांत संयमी स्वभावाचे, सतत सामाजिक कार्यासाठी धडपड करणारा व्यक्तिमत्व यांचा सन्मान गोवा राज्यातील साहित्य कला सांस्कृतिक भवन पणजी या ठिकाणी, डी.जी राठोड फाउंडेशन व गार्गीज डी.आय.डी फाउंडेशन च्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ.शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षते खाली व उदघाटक डॉ. वैद्य गुंडोपंत सुतार, निसर्गपचार तज्ञ तसेच प्रमुख पाहुणे पोलीस उपअधीक्षक सदानंद संदाशिव व गोवा प्रसिद्ध अभिनेत्री अमित्रा नायक सलत्री सह द्विगज मान्यवरांचे शुभ हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा पुरस्काराने त्यानां सन्मानित करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या समवेत आंबेडकरी चवळीतील नेते भगवान पवार, रामचंद्र थोरात,रमेश देसले,महेंद्र धनगर,पत्रकार संजय बोरगे, शंकर करडे, संतोष उघडे, लक्ष्मण पवार, जितू पंडित, केतन साटपे,जितू अहिरे,ह्या सोहळ्यास उपस्थित होते. तसेच उघडे यांना पुरस्कार प्रदान केल्या मुळे यांच्या वर मुरबाड तालुक्या सह सर्वत्र महाराष्ट्रातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
