Category: होम

राज्यात घटलेल्या मतदानाच फटका कुणाला बसणार ?

48 पैकी 21 मतदारसंघात मतदान घटलं, ठाकरे की शिंदे, काका की दादा, कुणाला धक्का, कुणाला फायदा? मुंबई : लोकसभेसाठी महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूका होऊनही मतदारांना मतदान पेटीपर्यंत घेऊन जाण्यात सर्वच पक्ष अपयशी ठरले आहेत. राज्यातील ४८ पैकी तब्बल…

डोंबिवलीतील कंपनीच्या स्फोटात ९४१ मालमत्तांचे नुकसान

डोंबिवली : डोंबिवली येथील एमआयडीसीतील अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटामुळे किती नुकसान झाले याचे पंचनामे करण्यात आले असून एकुण ९४१ मालमत्तांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या स्फोटात झालेल्या एक ते दोन किलोमीटर…

मध्ये रेल्वेवर ३६ तासांचा मेगाब्लॅक

मुंबई : मध्य रेल्वेवरून येत्या १ आणि २ जूनला प्रवास करीत असाल तर रेल्वेचा प्रवास टाळा . कारण १ आणि २ जून रोजी मध्य रेल्वेकडून ३६ तासांचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या…

ठाण्यातील जिजाऊ अभ्यासिकेतील आदिवासी मुलांचे उज्वल यश

ठाणे : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात चालणार्‍या १० अभ्यासिकांतील येऊरच्या आदिवासी पट्टयातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत उज्वल यश संपादन केले. यामध्ये येऊरच्या अभ्यासिकेतील…

खुषखबर !  पाच दिवसात मान्सून केरळमध्ये थडकणार

मुंबई : उन्हाने होरपळून गेलेल्या अवघ्या देशवासीयांसाठी खुषखबर आहे. येत्या पाच दिवसात मान्सून केरळमध्ये थडकणार आहे. अंदमान-निकोबारमध्ये दाखल झालेला मान्सून हळूहळू पुढे सरकरत असून लवकरच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, येत्या पाच दिवसांत केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी…

मनोज जरांगेंचे ४ जूनपासून उपोषण

जालना : बीडमधील जातीवाद थांबवा, जर हा जातीवाद थांबला नाही, तर आपल्यावरील अन्याय दुर करण्याठी आपल्याला सत्तेत जावं लागणार आहे. अन्यथा शांत राहून मराठ्यांवर अन्याय करणाऱ्या जातीच्या उमेदवाराला पाडायचे म्हणजे पाडायचे. माझ्या मराठा बांधवांच्या मागणीसाठी…

विधान परिषद निवडणूकीत युती-आघाडीत धुसफूस

स्वाती घोसाळकर मुंबई : लोकसभा निवडणूकीत गळ्यातगळे घालून युतीधर्म निभावण्याच्या आणाभाका घेणारी महायुती आणि महाविकास आघाडीत विधान परिषद निवडणूकीवरून धुसफूस सुरु झाली आहे. ४ जूनला लोकसभेच्या निवडणूकीचा निकाल लागणार आहे. पण त्यापुर्वीच…

दहावीत ‘कोकण पॅटर्न’ पुन्हा नंबर १

राज्यात निकालांत मुलींनी बाजी मारली १८ विषयांचा १०० टक्के निकाल १८७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण निकालात मुंबई तिसऱ्या क्रमांकावर मुंबई : बारावीपाठोपाठ दहावीतही यंदा ‘कोकण पॅटर्न’ नंबर एक ठरला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि…

चिंतामणराव केळकर विद्यालयाचा  सलग १२ व्या वर्षी शंभर टक्के निकाल

अलिबाग : अलिबाग येथील चिंतामणराव केळकर विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल लावण्याची आपली परंपरा कायम राखली आहे. दहावीच्या परीक्षेत सलग १२ व्या वर्षीही चिंतामणराव केळकर विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. स्वरा अविनाश पाटील हिने ९७.६० गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला. मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत चिंतामणराव केळकर विद्यालयाचे मराठी माध्यमाचे २० विद्यार्थी, सेमी इंग्रजी माध्यमाचे ४८ विद्यार्थी तर इंग्रजी माध्यमाचे ५३ विद्यार्थी असे एकूण १२१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी ८ विद्यार्थी ९० टक्के  पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले.  ४४ विद्यार्थीना  ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले . ३४ विद्यार्थी ७० टक्के पेक्षा जास्त तर.२७ विद्यार्थी ६० गुण मिळवून उत्तीर्ण झाले.  ८ विद्यार्थी ५० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले. मराठी माध्यमात आर्या संदेश आठवले हेने  ८५ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा.मान मिळवला. सेमी इंग्रजी माध्यममध्ये मयुरेश शैलेश पाटील शाळेत पहिला आला. त्याने ९३ टक्के गुण मिळवले. इंग्रजी माध्यमध्ये   स्वरा अविनाश पाटील हिने ९७.६० गुण मिळवून  शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला.

शाहिद खानच्या शतकाने शास्त्री संघ २२९

ड्रीम एलेव्हन कप (१४ वर्षाखालील) निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा चिन्मय दुखंडेचे ६ बळी मुंबई :  मुंबईचा १४ वर्षाखालील संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱ्या ड्रीम ११ कप निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दोन दिवसीय  साखळी लढतीत रवी शास्त्री संघाने शाहिद खानच्या (१०४ धावा) शतकी खेळीमुळे सर्वबाद २२९ धावा केल्या. याच लढतीत  वेंगसरकर संघाच्या लेगस्पिनर  चिन्मय दुखंडे याने ४० धावांत ६ बळी घेण्याची करामत   केली. पहिल्या दिवसाअखेर वेंगसरकर संघाने बिनबाद ८३ धावा करत जोरदार प्रदर्शन केले आहे.  कर्नाटक सपोर्टींग येथील दुसऱ्या लढतीत गावस्कर संघाने तेंडुलकर संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना दिवसाखेर ९ बाद २४९ धावा केल्या आहेत. ओव्हल मैदानावरील लढतीत रवी शास्त्री संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शाहिद खान याने ११५ चेंडूत १२ चौकारांसह १०४ धावा करताना पाचव्या विकेटसाठी पार्थ ठाकूर (२७) यांच्यासह ९८ धावांची भागी रचली. आयांश चित्कारा (२१) आणि वेदांत कडू (१९) यांनीही संघाच्या धावसंख्येत थोडी भर टाकली.  वेंगसरकर संघाच्या चिन्मय दुखंडे याने आपल्या लेगस्पिन गोलंदाजीने ४० धावांत ६ बळी मिळवत प्रतिस्पर्धी संघाला ६७ षटकांतच २२९ धावांवर रोखण्याची करामत केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अरहाम जैन (खेळात आहे ३५) आणि ईशान पाठक (खेळात आहे ४०) या सलामीवीरांनी २५ षटकांत ८३ धावांची अभेद्य भागी रचत वर्चस्व राखले आहे. कर्नाटक सपोर्टींगवरील लढतीत सुनील गावस्कर  संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत ९ बाद २४९ धावांची मजल मारली आहे. ७ बाद १५९ अशा डळमळीत अवस्थेनंतर  कर्णधार शेन रझा (५२) याच्या अर्धशतकी खेळीमुळे आणि त्याने आठव्या विकेटसाठी आयुष गोहो  (२२) यांच्यासह केलेल्या ४२ धावांच्या महत्वपूर्ण भागीदारीमुळे ही मजल मारली आहे. गावस्कर संघासाठी स्वानंद पालव (२८), स्मित ठाकूर (३१), वेदांग मिश्रा (४८) यांनीही  फलंदाजीत योगदान दिले. तेंडुलकर संघासाठ कर्णधार हर्ष कदम याने ३३ धावांत ४ बळी  तर मोक्ष निकम याने ५७ धावांत ३ आणि हार्दिक गजमल याने ४९ धावांत २ बळी मिळविले आहेत. उद्या सामनाच दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. संक्षिप्त धावफलक –  ओव्हल मैदान =  रवी शास्त्री संघ – ६७ षटकांत सर्वबाद २२९ (आयांश चित्कारा २१, शाहिद खान १०४, पार्थ ठक्कर २७, वेदांत कडू १९; चिन्मय दुखंडे ४० धावांत ६ बळी) वि. दिलीप वेंगसरकर संघ – २५ षटकांत बिनबाद  ८३ (अरहाम जैन खेळत आहे ३५, ईशान पाठक खेळात आहे ४०). कर्नाटक सपोर्टींग = सुनील गावस्कर संघ – ९५ षटकांत ९ बाद २४९ (स्वानंद पालव २८, स्मित ठाकूर ३१, वेदांग मिश्रा ४८, शेन रझा ५२, आयुष गोहो २२; हार्दिक गजमल ४९ धावांत २ बळी, हर्ष कदम ३३ धावांत ४ बळी, मोक्ष निकम ५७ धावांत ३ बळी) वि. सचिन तेंडुलकर संघ.विजय बने – ९८१९०५९६७७ फोटो ओळी –  रवी शास्त्री संघाचा शतकवीर शाहिद खान (१०४ धावा) आणि दिलीप वेंगसरकर संघाचा चिन्मय दुखंडे (४० धावांत ६ बळी).