Category: होम

४२ वर्षाच्या जनसेवेनंतर रविंद्र नागे सेवानिवृत्त

मंत्रालयाच्या उपहारगृहात बजावली सेवा      मुंबई : रविंद्र यशवंत नागे, पर्यवेक्षक हे मंत्रालय उपहारगृहामध्ये सन १९८२ साली वेटर या पदावर रुजू झाले व सन १९८४ पासून विधान भवन उपहारगृहामध्ये कार्यरत आहेत. विधान भवन दुसरा मजला उपहारगृह व वातानुकुलीत उपहारगृहांतर्गत पीठासीन अधिकारी, दोन्ही सभागृहाचे  विरोधी पक्ष नेते, मुख्यमंत्री,  उप मुख्यमंत्री,  मंत्री, राज्यमंत्री,  विधानसभा सदस्य,  विधानपरिषद सदस्य, प्रधान सचिव, सचिव, सर्व समिती प्रमुख, सर्व समित्या, विधीमंडळ आणि मंत्रालय अधिकारी, परदेशी शिष्टमंडळे, पिठासीन अधिकारी यांच्या बैठका, मंत्रीमंडळांच्या बैठका, मंत्री महोदयांच्या दालनातील बैठका, अतिमहत्वाच्या व्यक्तींकडे राज्यातून विधान भवनामध्ये येणारे अभ्यांगत यांच्यासाठी विधान भवन २ रा मजला उपहारगृहातून खाद्यपदार्थ, पेय, आहार, अल्पोपहाराची सेवा पुरविण्यात येते. विधान भवन उपहारगृहातील सर्व कामे सहकारी कर्मचारी यांच्याकडून खेळीमेळीच्या वातावरणात करुन घेण्याची कला रविंद्र नागे यांना चांगल्याप्रकारे अवगत आहे. अधिवेशन कालावधीत कामाचा कितीही ताण असला तरी पूर्णत्वास नेण्याकरीता श्री. रविंद्र नागे नेहमीच परिश्रम घेत असतात. नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये चौरस आहारगृहातर्फे हैद्राबाद हाऊस उपहारगृह, विधान भवन उपहारगृह तसेच राजगृह उपहारगृह चालविण्यात येत असतात. सर्व कामांकडे श्री. रविंद्र नागे बारकाईने लक्ष ठेवून असतात, वेळप्रसंगी प्रत्येक उपहारगृहाला भेट देवून खाद्यपदार्थांचा आढावा घेणे तसेच काही मदत लागल्यास आवर्जून ती पूर्ण करणे हीबाब त्यांची अतिशय उल्लेखनीय अशी आहे. दि. ३१ जुलै, २०२५ रोजी श्री. नागे हे शासकीय सेवेतुन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. म्हणजेच हिवाळी अधिवेशन हे त्यांच्या सेवेचे नागपूरचे शेवटचे अधिवेशन आहे. रविंद्र नागे यांच्या देखरेखीखाली पर्यवेक्षक, आचारी व वेटर हे उकृष्टरित्या तयार झाले असून उपहारगृहाचे कामकाज उत्तरित्या सांभाळण्यास सक्षम झालेले आहेत. रविंद्र नागे यांचे सहकारी मणिलाल मोर्बेकर, जनार्दन मोरे, प्रकाश कोळी, गोपाल पुजारी, सहदेव पवार, किसन मराडे हे सुध्दा सन २०२५ मध्ये शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार आहेत. उपहारगृहाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी रविंद्र नागे व त्यांचे सहकारी यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. 00000

पायाभूत प्रकल्पांसाठी आदिवासींचे बळी

आमदार राजेंद्र गावित यांची चौकशीची मागणी नुकसान भरपाई न देता आदिवासींना केले बेघर योगेश चांदेकर   पालघरः पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी या जिल्ह्यातील आदिवासी बांधव सकारात्मक आहेत; परंतु त्यांना कोणतीही नुकसान भरपाई न देता बेघर केले जाते. त्यांची घरे, जमिनी हडपल्या जातात. त्यातून एका आदिवासी महिलेने आत्महत्या केली असून, या प्रकरणाची चौकशी करावी आणि संबंधित प्रांताधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार राजेंद्र गावित यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर झालेल्या चर्चेत केली. विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या विधिमंडळाच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात आ. गावित यांनी पालघर जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसाठी होणारे भूसंपादन आणि त्यात आदिवासींवर होणारा अन्याय विधानसभेत मांडून विधानसभेच्या अध्यक्षांचे या प्रकरणाकडे लक्ष वेधले. प्रशासनाकडून आदिवासींचा छळ तलासरी येथील कोचाई, बोरमाळ, आणि धानीवरी या ठिकाणी भूसंपादन करताना प्रांताधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी कसा जाच केला, याचे पाढे आ. गावित यांनी विधानसभेत वाचले. ते म्हणाले, की पालघर जिल्ह्यातून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग, मुंबई दिल्ली कॉरिडॉर, मेट्रो प्रकल्प, टेक्सटाईल पार्क, वाढवण बंदर आदींसाठी भूसंपादन केले जात आहे. भूसंपादन करण्याला कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही; उलट विकासासठी या भागातील आदिवासींची भूमिका सकारात्मक आहे. नुकसान भरपाई न देताच जागांचा ताबा वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या ज्या जमिनी आदिवासी बांधव कसत आहेत आणि ज्या जागेवर ते राहत आहेत, त्या जागा दांडगाई करून प्रशासन ताब्यात घेत आहे. कोणतीही नुकसान भरपाई न देता या जमिनी प्रशासनाने ताब्यात घेतल्या असून त्यामुळे आदिवासी बेघर आणि भूमिहीन झाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रचंड पोलिस फौजफाटा   बरोबर घेऊन प्रांताधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी आदिवासी बांधवांच्या घरांवर बुलडोझर चालवले. त्यांच्या जमिनी संपादित केल्या. घरे पाडली, असे गावित यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. सहा वर्षे पाठपुरावा करूनही भरपाई नाही गेल्या सहा वर्षांपासून आदिवासी बांधव नुकसान भरपईसाठी डहाणू येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चकरा मारत आहेत. पत्रव्यवहार करत आहेत; परंतु तरीही प्रशासन कोणतीच दाद द्यायला तयार नाही. या प्रकरणात पोलिस आणि प्रशासन कायदा हातात घेऊन आदिवासी बांधवांना बेघर करत त्यांना भूमिहीन करत आहेत. प्रशासन कायदा हातात घेत आहे, असे त्यांनी निदर्शनास आणले. आत्महत्येस भाग पाडल्याचा गुन्हा दाखल करा शासनाने आता या प्रकरणात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पोलिस आणि प्रशासनाच्या दडपशाहीला आणि दांडगाईला कंटाळून आदिवासी महिला लखमी बरफ यांनी आत्महत्या केली प्रशासनावर आदिवासी महिलेला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केली आहे.

नाखवा हायस्कूल,जिजाई बालमंदिर ठाणे शाळेत संपन्न

वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ ठाणे : छत्रपती शिक्षण मंडळाचे मो. कृ. नाखवा हायस्कूल व जिजाई बाल मंदिर प्राथमिक व पूर्व प्राथमिक  ठाणे या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ पार…

पत्रकार भीमराव धुळप “प्राइड ऑफ स्पंदन अवॉर्ड २०२४” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

रमेश औताडे मुंबई :आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वं. यंशवंतराव चव्हाण यांच्या कराडच्या पावन भूमीत २१ डिसेंबर  रोजी राज्यस्तरीय “प्राइड ऑफ स्पंदन अवॉर्ड २०२४” पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी आणि सत्कारमुर्ती म्हणून डाँ.निळकंठ धारेश्वर महाराज तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे माजी प्रमुख मंगेश चिवटे यांच्याहस्ते पत्रकार भीमराव धुळप यांना सन्मानित करण्यात आले. धुळप यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्याची स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट परिवाराने दखल घेऊन निवड केली होती.  याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डाँ.संदिप डाकवे, पत्रकार, कवी गजानन तुपे, पार्श्वगायिका कविता राम,निर्माते विठ्ठल डाकवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भीमराव धुळप यांना आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले असून ते धगधगती मुंबई वृत्तपत्राचे संपादक तसेच डीडी न्यूज चे संपादक आहेत. गेली अनेक वर्ष ते सामाजिक व शैक्षणिक कार्यात सतत अग्रेसर असतात. ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना ते वैद्यकी

Heading – संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आणि सांगलीतील कोकरूड येथील शिवाजीराव देशमुख यांच्या स्मारकासाठी निधीची मागणी

पुरवणी मागण्यावरील चर्चेदरम्यान आमदार प्रसाद लाड यांनी केली मागणी राजेंद्र साळसकर नागपूर :  रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य स्मारकासाठी आणि सांगली जिल्ह्यातील कोकरूड येथे विधान परिषदेचे माजी सभापती स्व. शिवाजीराव देशमुख यांच्या स्मारकासाठी निधी देण्याबाबत पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान आमदार प्रसाद लाड यांनी मागणी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मौजे कसबा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक बांधण्याचे प्रयोजन आहे. याच ठिकाणी मुघलांकडून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यात आली होती. या स्मारकासाठी १० कोटींचा प्राथमिक निधी वर्ग करण्यात आला होता. येथील जमीन उपलब्ध होण्यास काही तांत्रिक अडचणी होत्या, परंतु त्या आता दूर झाल्या आहेत. याठिकाणी केवळ पुतळा न उभारता स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास याठिकाणी दाखवता येईल, असे किमान १०० एक्करमध्ये स्मारक बनले पाहिजे, याकरिता ५० कोटींचा निधी द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार लाड यांनी केली आहे. त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील कोकरूड येथे विधान परिषदेचे माजी सभापती स्व. शिवाजीराव देशमुख यांच्या स्मारकासाठी १० कोटींचा निधी देण्याची मागणी याप्रसंगी आमदार लाड यांनी केली.

नागपूर – महाराष्ट्र राज्याचे सहकार गृहनिर्माण गृह ग्रामीण खणीकर्म शालेय शिक्षण राज्यमंत्री  पंकज भोयर यांचे अभिनंदन करताना मुंबई हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य गृहवित्त  महामंडळाचे संचालक प्रकाश दरेकर सोबत आमदार समीर मेघे, महाराष्ट्र राज्य गृहवित्त महामंडळाचे संचालक विनोद घोणे उपस्थित होते. त्याप्रसंगी माजी मंत्री दत्ता मेघे यांची सदिच्छा भेट झाली

– तळाच्या फलंदाजांनी भुवड संघाला तारले

तुकाराम सुर्वे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा ठाणे : आदित्य कौलगीचा अष्टपैलू खेळ, तळाच्या आर्यनकुमार आणि अमन सिंगने एक तासभर किल्ला लढवल्यामुळे गणपत भुवड एकादश संघाने सदाशिव सातघरे एकादश संघावर नाममात्र…

दिवस-रात्र कबड्डी स्पर्धेचे सोयगाव येथे  उद्घाटन

छञपती शिवाजी क्रीडा मंडळाच्या सोयगाव : येथील छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ व क्रीडा भारती छ्त्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित दिवस रात्र ५५ वजनी गटाच्या ५ तसेच ५७ वजनी गटाच्या २…

मुंबईत पाच हजार पुनर्विकास प्रकल्प लटकले

राजेंद्र साळसकर नागपूर : मुंबईतील अनेक झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन आणि अधिग्रहित उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्वसन प्रकल्पांमध्ये विकासकांकडून दिशाभूल करण्याचे काम केले आहे.त्यामुळे लाखो सर्वसामान्य  नागरिक फसवणूकीला बळी पडले आहेत.मुंबईत सध्या पाच हजार पुनर्विकास प्रकल्प प्रलंबित असल्याचा मुद्दा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )आमदार सुनिल शिंदे यांनी विधान परिषदेत विशेष उल्लेख सुचनेद्वारे उपस्थित केला. त्यामुळे या प्रकल्पांमुळे बाधित सुमारे तीन लाख कुटुंबे बेघर झाली आहेत.यातील काही प्रकल्प अपूर्ण आहेती, तर काही अजून सुरूही झालेले नाहीत.हे रहिवासी मोठ्या आर्थिक संकटात आहेत.या रहिवाशांना विकासकांविरोधात महारेरा प्राधिकरणाकडे याचिका करता यावी, यासाठी कायद्यात तरतूद करावी.अशी मागणी आमदार सुनिल शिंदे यांनी विधान परिषदेत केली. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि म्हाडा अधिका-यांच्या संगनमताने अनेक विकासकांनी पात्र रहिवाशांना अपात्र घोषित केलेले आहे.या पुनर्वसन प्रकल्पातून अपात्र ठरलेले,आपल्या हक्कापासून वंचित राहिलेले रहिवाशी त्यांते हक्क मिळविण्यासाठी धडपडत आहेत.अशा स्थितीत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणि उपकरप्राप्त इमारतींच्या गृहनिर्माण प्रकल्पातील रहिवाशांना फसवणूक केलेल्या विकासकाविरोधात महारेराकडे  तक्रार करता यावी यासाठी तरतूद करावी अशी मागणी केली. आमदार शिंदे म्हणाले की, मुंबई आणि ठाण्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या पुनर्विकास प्रक्रियेत विकासक भाडे देत नाहीत. एवढेच नाहीतर इमारतीचा पुनर्विकासही होत नाही,अशा समस्या वारंवार येत आहेत.अनेक पुनर्विकास प्रकल्पात रहिवाशांचे छत हरवले आहे.अनेक पिढ्या संपत आहेत.असे असूनही लोकांना घरे मिळालेली नाहीत.

११ व्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाध्यक्षपदी शामसुंदर महाराज सोन्नर यांची निवड

राजेंद्र साळसकर अकोला – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन ११ व १२ जानेवारी २०२५ रोजी अकोला येथे संपन्न होत असून त्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, प्रसिद्ध कीर्तनकार आणि संवेदनशील कवी शामसुंदर महाराज सोन्नर यांची निवड झाली आहे. तर स्वागताध्यक्ष म्हणून श्री गुरुदेव सेवा मंडळ युवा कार्यकर्ते मंगेशदादा कराळे यांची निवड झाली आहे, अशी माहिती रामेश्वर बरगत यांनी दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे गेल्या ११ वर्षांपासून आयोजन केले जात असून यात राष्ट्रसंताच्या साहित्यातील अध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय, साहित्यिक भूमिकांचे चिंतन होते. या विचार साहित्य संमेलनात साहित्य क्षेत्रातील विचारवंत सहभागी होत असतात. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिकाची निवड केली जाते. या वर्षी या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांची निवड करण्यात आलेली आहे. शामसुंदर महाराज हे ज्येष्ठ पत्रकार असून संवेदनशील कवी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात. त्यांच्या अनेक कवितांचे संदर्भ अनेक वक्त्यांच्या भाषणात कोट केले जातात. त्यांच्या तीन कवितांचे वाचन विधानसभेत वेगवेगळ्या आमदारांनी केले असून कवितेच्या रूपाने त्यांच्या विचारांची नोंद विधिमंडळाच्या रेकॉर्डमध्ये झालेली आहे. साहित्य क्षेत्रातील योगदानाबरोबरच पत्रकार म्हणूनही त्यांनी सामना, लोकमत, प्रहार या दैनिकात विविध  जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत. कीर्तन परंपरेला सामाजिक भान देण्यात त्यांचे मोलाचे योगदान असून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल विविध माध्यमांनी घेतलेली आहे. संत साहित्य आणि संविधान यांच्यातील परस्पर पुरकता अधोरेखित करणारे संविधान कीर्तन त्यांनी प्रचलित केले आहे. शिवाय पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये संविधान समता दिंडीच्या माध्यमांतून ते प्रबोधन करतात. त्यांच्या सामाजिक, साहित्यिक, अध्यात्मिक कार्याचा अनुभव लक्षात घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आल्याचे रामेश्वर बरगत यांनी सांगितले.