Category: होम

नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांचा अत्यावश्यक सेवासुविधांवर भर

नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांचा अत्यावश्यक सेवासुविधांवर भर मुकुंद रांजणे माथेरान :पर्यटक आणि नागरिकांना भेडसावत असणाऱ्या अडीअडचणी, समस्या त्याचबरोबर प्रलंबित प्रश्नांची उकल करण्यासाठी विद्यमान नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी अत्यावश्यक सेवासुविधांवर लक्ष केंद्रित केले असून गावातील विविध ठिकाणी जाऊन ज्या ठिकाणी शौचालयांची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहेत त्याबाबत पाहणी करून ती अद्ययावत करण्याबाबत संबंधित अधिकारी वर्गाला सूचना केल्या आहेत. मुख्य पॉईंट असणाऱ्या एको पॉइंट वर पर्यटकांची मोठया प्रमाणावर गर्दी असते त्याठिकाणी वनखात्याच्या अंतर्गत शौचालय बांधण्यात आलेले आहेत परंतु त्या शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे.त्यामुळे ती वापर करण्यास अयोग्य आहेत. याचा नाहक त्रास पर्यटकांना विशेष करुन महिला पर्यटकांना प्रकर्षाने जाणवत आहे. अन्य पर्यटनस्थळांच्या तुलनेत सुविधांचा अभाव याठिकाणी भासू नये यासाठी खुद्द नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी नगरपरिषदेच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी वर्गासोबत प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन संपूर्ण माहिती घेतली आहे.वनखात्याच्या संबंधित अधिकारी वर्गास सुध्दा त्यांच्या अखत्यारीत असलेल्या शौचालयांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी असे सूचित केले आहे. प्रशासकीय राजवटीत अनेक महत्वपूर्ण कामे पूर्ण होऊ शकलेली नाहीत.त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.कार्यक्षम नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या माध्यमातून नागरिक आणि पर्यटकांना भेडसावत असणाऱ्या समस्या मार्गी लागतील असा नागरिकांनी विश्वास व्यक्त केला आहे. ———————————————- जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केलेले आहे. प्रथम नागरिक या नात्याने आम्हाला समस्त नागरिकांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.आमच्या कार्यकाळात कोणत्याही प्रकारची महत्वपूर्ण कामे यामध्ये पर्यटक आणि नागरिकांना अभिप्रेत असणारी कामे,सेवासुविधा प्रलंबित न राहता ती युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या सर्व सदस्यांसोबत प्रयत्नशील आहोत. चंद्रकांत चौधरी—नगराध्यक्ष माथेरान

नाशिक जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांपुढे संकट

नाशिक जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांपुढे संकट अजूनही अनेक विद्यार्थी ‘अपार आयडी’ च्या प्रतिक्षेत हरिभाऊ लाखे नाशिक : बारावी उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतात. त्यातही सध्या व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा अधिक ओढा आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना सीईटी विभागामार्फत घेतली जाणारी परीक्षा देणे आवश्यक असते. परंतु, त्यासाठी विद्यार्थ्यांना ‘ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्रेशन’ (अपार) आयडी काढणे बंधनकारक आहे. परंतु, नाशिक जिल्ह्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार नसल्याने या विद्यार्थ्यांसमोर वेगळाच धोका निर्माण झाला आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत अपार आयडी ही संकल्पना पुढे आली आहे. अपार आयडी संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा डिजिटल मागोवा घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार ३१ जानेवारी २०२६पर्यंत शाळांतील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडून देण्यात आले आहेत. राज्यात २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात एकूण २ कोटी १५ लाख ४५ हजार १९४ विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. सीईटीसह कोणत्याही प्रवेशपूर्व परीक्षेचा अर्ज अपार आयडी असल्याशिवाय विद्यार्थ्यांना भरता येणार नाही. नाशिक प्रमाणेच मुंबई महानगर प्रदेश विभागातही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रक्रियेबाहेर राहिल्याने शिक्षण विभागाने शाळास्तरावर विशेष मोहिमा राबविण्याचे आदेश दिले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचा अपार आयडी आवश्यक झाला आहे. अपार आयडी प्रक्रियेत काही अडथळे निर्माण होत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. आधार प्रमाणीकरण हा सर्वात मोठा अडथळा असल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून करण्यात येत आहेत. राज्यभरात साडेपाच लाखापेक्षा अधिक अर्ज काही त्रुटींअभावी अपार अयाडीसाठी पात्र ठरलेले नाहीत. आधार पडताळणी न होणे, नाव आणि जन्मतारीख न जुळणे, पालकांची संमती न मिळणे, अशा काही प्रमुख कारणांचा त्यात समावेश असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. राज्यात पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये बारावीची राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी परीक्षा होणार आहे. त्यानंतर मार्च महिन्यापासून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांना सुरुवात होईल. बारावीनंतर विद्यार्थ्यांकडून देण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी अपार आयडी असणे बंधनकारक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांवरील ताण वाढलेला आहे. नाशिक जिल्ह्यात अजूनही अपार आयडीविना बारावीचे आठ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी बाकी आहेत. विद्यार्थ्यांना ज्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यावयाचा असेल, त्या अभ्यासक्रमासाठी असलेल्या प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यापर्यंत अपार आयडी तयार न झाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेला मुकावे लागण्याची भीती आहे. मार्च ते मे या महिन्यांदरम्यान सीईटी परीक्षा होण्याची शक्यता आहे. या परीक्षेसाठी अपार आयडी असणे बंधनकारक करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील बारावीच्या ८९.१६ टक्के विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झाले आहेत. परंतु, अजूनही आठ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार होणे बाकी आहेत. अपार आयडी तयार करण्यासाठी ३१ जानेवारी ही मुदत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडून देण्यात आली आहे. अपार आयडी तयार करण्याच्या कामात राज्यभरात होणाऱ्या महापालिका निवडणूक कामांचा अडथळा आल्याचा शिक्षकांचा दावा आहे.

 राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात १६ जानेवारी रोजी ‘क्लिनिकल मीट’

मनोरुग्णता विषयक अपंगत्व प्रमाणपत्र प्रक्रियेवर राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात १६ जानेवारी रोजी ‘क्लिनिकल मीट’ ठाणे  : मनोरुग्णता क्षेत्रात अपंगत्व प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अधिक शास्त्रीय, व्यावहारिक आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम व्हावी, या उद्देशाने राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा यांच्या वतीने बॉम्बे सायकियाट्रिक सोसायटीच्या सहकार्याने विशेष क्लिनिकल मीटचे आयोजन करण्यात आले आहे. “मनोरुग्णतेतील अपंगत्व प्रमाणपत्र प्रक्रिया (Disability Certification in Psychiatry)” या विषयावर आधारित ही शैक्षणिक कार्यशाळा शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील मेडिसिन लेक्चर हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली सौरभ कदम, तसेच बॉम्बे सायकियाट्रिक सोसायटीच्या अध्यक्ष व भाभा अणुसंशोधन केंद्राच्या मनोरुग्णता विभागाच्या प्रमुख डॉ. शोभा नायर असणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी २.०० वाजता होणार असून त्यानंतर शैक्षणिक सत्रांना सुरुवात हाेणार आहे. उद्घाटनानंतर  डॉ. अमेय पुसाळकर “अपंगत्व – ओळख व कायदेशीर चौकट” या विषयावर मार्गदर्शन करणार असून, मनोरुग्णतेतील अपंगत्वाची संकल्पना व विद्यमान कायदे व नियमावली यांची माहिती दिली जाणार आहे. या सत्राचे अध्यक्षपद डॉ. स्वप्नाली कदम व डॉ. शोभा नायर भूषवणार आहेत. तद्नंतर डॉ. आश्लेषा ढोले  यांचे “मानसिक आजारांचे मूल्यमापन व प्रमाणपत्र प्रक्रिया” या विषयावर व्याख्यान होणार असून, प्रमाणित मोजमाप पद्धती, दस्तऐवजीकरण व प्रक्रिया यांवर भर दिला जाणार आहे. तसेच डॉ. शीतल मेश्राम “न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर्ससाठी मूल्यमापन साधने” या विषयावर सादरीकरण करणार आहेत. तसेच यावेळी “अपंगत्व प्रमाणपत्र प्रक्रियेत येणाऱ्या दैनंदिन अडचणी” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदेंनी मुंबई पिंजून काढली मुंबई महानगर पालिकेच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या उमेदावरांसाठी अवघी मुंबई पिंजून काढली. त्यांच्या रोड शोला नागरिकांनी उत्स्फुर्त गर्दी केली होती. या…

एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन

एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ मतदान दिनांक १५ जानेवारीला घोषित केलेली आहे. सदर निवडणूकामी परिवहन उपक्रमाकडून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी १४ जानेवारीला सकाळी व १५ जानेवारीला दुपारी बस संचलन विस्कळीत होण्याची शक्यता असून काही बसमार्गावरील प्रवाशी बससेवा बंद करण्यात येणार आहे. तरी तात्पुरत्या स्वरूपात प्रवाशी जनतेस होणाऱ्या गैरसोयीबद्दल नमुंमपा परिवहन उपक्रम दिलगीर आहे. प्रवाशी जनतेने नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ या कालावधीत उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीच्या कामाकरिता परिवहन सेवेच्या २७५ बसेस तैनात

ठाणे महापालिका निवडणुकीच्या कामाकरिता परिवहन सेवेच्या २७५ बसेस तैनात ठाणे  : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ ची मतदान प्रक्रिया बुधवार, १५ जानेवारी रोजी पार पडणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी ठाणे परिवहन सेवेच्या मोठ्या प्रमाणावर बसेस निवडणूक कामकाजासाठी वापरण्यात येणार आहेत. दिनांक १४ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत परिवहन सेवेच्या सुमारे ७५ टक्के बसेस निवडणूक कामासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.  परिणामी, ठाणे शहरात दोन दिवस बससेवा मर्यादित राहणार असल्याचे परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी नमूद केले. निवडणूक प्रक्रियेसाठी १४ जानेवारी व १५ जानेवारीला २७५ बसेसचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळपासून दुपारी ३.०० वाजेपर्यत व दिनांक १५ जानेवारीला सायंकाळी ४.०० नंतर फक्त ८० ते ८५ बसेस शहरातील विविध मार्गावर चालविण्यात येणार आहे. परिवहन  बसेसची  वाहतूक प्रत्येक मार्गांवर तुरळक प्रमाणात सुरू राहणार आहे. या कालावधीत प्रवाश्यांनी इतर पर्यायी वाहतुकीचा अवलंब करुन परिवहन सेवेस सहकार्य करावे असे आवाहन  परिवहनच्या वतीने करण्यात आले आहे.

सामान्य माणसाला संघाने ‘ताकद’ दिली – उपेंन्द्र कुलकर्णी

सामान्य माणसाला संघाने ‘ताकद’ दिली – उपेंन्द्र कुलकर्णी अनिल ठाणेकर ठाणे : आत्मविस्मृत समाजाचे मत परिवर्तन करण्याचे काम त्याकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले. एक प्रकारे वाहक बनुन संघाने सामान्य माणसाला ताकद दिली. त्यामुळेच संघाचे विचार आज समाज स्विकारत आहे. असे प्रतिपादन करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र सेवा विभाग प्रमुख उपेंन्द्र कुलकर्णी यांनी ठाणेकरांचे वैचारिक प्रबोधन केले. ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती क्रिंडा संकुल मैदानात आमदार संजय केळकर यांनी आयोजित केलेल्या ४० व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेतील “संघ शताब्दी वर्ष” हे चौथे पुष्प रविवारी उपेंन्द्र कुलकर्णी यांनी गुंफले. व्याख्यानमालेच्या या सत्राच्या अध्यक्षपदी श्रीराम पटवर्धन होते. तर, कार्यक्रमाचे निवेदन ज्येष्ठ पत्रकार पु. ल. देशपांडे कला अकादमीचे सदस्य मकरंद मुळे यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष साजरे होत असताना अनेक उपक्रम साजरे होत असल्याचे सांगून उपेंन्द्र कुलकर्णी यांनी, १८८९ साली डॉक्टर हेडगेवार यांचा जन्म, १९२५ मध्ये संघाची स्थापना ते आजपर्यतच्या काळातील क्रांतीकारी घटना आणि राष्ट्रीय चळवळीशी जोडलेल्या घटनांचा उहापोह करून विपरीत स्थितीत संघ स्वयंसेवक कसे राहिले, या आठवणी दृगोचित केल्या. स्वयंसेवकांनी कशा प्रकारे सामाजिक कार्यात योगदान दिले, याच्या आठवणी जागवताना संघाच्या प्रार्थनेतील दाखले देत संघाच्या पंचपरिवर्तनाचे कार्य त्यांनी विस्ताराने विषद केले.डॉ. हेडगेवार यांच्या आधी हिंदुत्त्वाचा विचार अनेकांनी मांडला होता. पण, डॉक्टरांनी आपल्या विचाराला कृतीचे सातत्य असलेल्या संघ शाखांची मजबूत जोड दिली. हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचा मिलाफ त्यांनी घडवून आणला आणि हिंदुंना आत्मभान दिले. या देशातील हिंदू संघटित आणि सशक्त होऊ शकतो, हे सिद्ध करून दाखविणारे डॉ. हेडगेवार हे द्रष्टे नेते होते. हे संघटन टिकवायचे असेल तर समाजाच्या विविध क्षेत्रात त्याचा विस्तार झाला पाहिजे आणि त्याला विधायक कार्याची जोड दिली पाहिजे. या विचारातून मग संघ परिवारात अनेक प्रभावशाली संघटना सक्षमपणे उभ्या झाल्या. जनकल्याण समितीने तर, समाजामध्ये आपल्यापेक्षा पाचपटीने काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांना प्रोत्साहित करीत जनसंघटन वाढवून समाजाला तप्तर करण्याचे काम समितीने केले आहे. जोपर्यंत सामान्य माणुस जोडला जात नाही, तोपर्यत समाज जागृत होणार नाही, हे हेरून संघाने सामान्य माणसाला ताकद दिली. असे कुलकर्णी म्हणाले. समाजाच्या साथीने होणार हिंदु संमेलने आजकाल हिंदू कुटुंबातील संवाद हरवत चालला असून घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. तेव्हा, विसंवादावर मात करण्यासाठी कुंटुंब प्रबोधना करण्याकरीता यातुन सावरलेल्या दांपत्यांनी पुढे ५ कुटुंबांच्या प्रबोधनाची जबाबदारी घ्यायची आहे. हे संघाचे विचार आज समाज स्विकारत आहे, तेव्हा पुढील काळात हिंदूंचे व्यापक संघटन करण्यासाठी समाजाच्या साथीने हिंदुंची संमेलन करणार असल्याचे उपेंन्द्र कुलकर्णी यांनी सांगितले. या संमेलनासाठी समितीही स्थानिक समाजाचीच असणार असुन तेच संमेलने भरवणार आहेत, असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशिक्षण संस्थेत विशेष व्याख्यानाचे आयोजन

ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशिक्षण संस्थेत विशेष व्याख्यानाचे आयोजन यूपीएससी परीक्षार्थींना डीएएफ फॉर्म व सेवा प्राधान्याबाबत मार्गदर्शन ठाणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेला बसणाऱ्या प्रशिक्षणार्थी व विद्यार्थ्यांसाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने संचलित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था येथे “DAF Form Filling & Preference of Services” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार  नुकतेच विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे माजी विद्यार्थी व सध्या ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात कार्यरत असलेले सनदी अधिकारी डॉ. नितीन जावळे (IAS – २००३) प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या विशेष व्याख्यानात ठाणे व मुंबई शहरातील यूपीएससी परीक्षार्थींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमात डॉ. नितीन जावळे यांनी UPSC DAF फॉर्म म्हणजे काय, तो कसा भरावा, फॉर्म सबमिट केल्यानंतर बदल करता येतात का, सेवा प्राधान्य (Service Preference) कसे द्यावे, त्यात बदल कधी व कसा शक्य आहे, याबाबत सविस्तर व सुस्पष्ट मार्गदर्शन केले. याशिवाय कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता, सकारात्मक दृष्टिकोन, अभ्यासाचे योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, संयम, प्रामाणिकपणा, सातत्य व आत्मविश्वास यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या संवादात्मक सत्रामुळे प्रशिक्षणार्थींमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ठाणे महापालिकेचे उपआयुक्त सचिन सांगळे तसेच संचालक महादेव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशासकीय सेवेतील अनुभवातून मार्गदर्शन मिळाल्याने हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे प्रशिक्षणार्थींनी सांगितले. संस्थेचे गिरीश झेंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

जिल्हा परिषद निवडणुका जाहीर स्लग- ५ फेब्रुवारीला मतदान; ७ फेब्रुवारीला निकाल 

मुंबई: राज्य निवडणूक आयोगाने ग्रामीण महाराष्ट्रातील रखडलेल्या  १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सह्याद्री अतिथिगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  या निवडणुकीत जिल्हा परिषदांच्या ७३१ जागा आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागा भरल्या जाणार आहेत. महिलांबरोबरच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीयांसाठी मोठ्या प्रमाणावर आरक्षण लागू करण्यात आले आहे. ही निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या जिल्ह्यांमध्ये घेतली जात आहे. निवडणूक होणाऱ्या १२ जिल्ह्यांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर यांचा समावेश आहे. या निवडणुकीची अधिकृत सूचना १६ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध होणार असून, त्याच दिवसापासून १६ ते २१ जानेवारी या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. २२ जानेवारी रोजी अर्जांची छाननी होईल, तर २७ जानेवारी ही उमेदवारी माघारी घेण्याची अंतिम मुदत असेल. याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप करून अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे. मतदान ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतदारांना एक जिल्हा परिषदेसाठी आणि एक पंचायत समितीसाठी असे दोन मते द्यावी लागतील . ३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजता जाहीर प्रचार समाप्त होईल आणि त्यानंतर प्रचार तसेच जाहिरातींवर बंदी राहील. निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे २५,४८२ मतदान केंद्रे उभारण्यात येणार असून, पुरेशा प्रमाणात ईव्हीएम उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये ५१,५३७ कंट्रोल युनिट्स आणि १,१०,३२९ बॅलेट युनिट्सचा समावेश आहे. मतदार यादी १ जुलै २०२५ या आधारे तयार करण्यात आली असून, दुबार नावे असलेल्या मतदारांसाठी ” हे चिन्ह वापरण्यात आले आहे. मतदारांना माहिती मिळवण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप तसेच आयोगाची अधिकृत वेबसाइट उपलब्ध आहे.

निवडणूक निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज

निवडणूक निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार असून, ती निर्भय, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज…