माहिती अधिकाराचा वापर अर्थातच भारतीय संविधानाची अंमलबजावणी !
रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्ष ११ महिने १७ दिवसात ३९५ कलमे व ९ परिशिष्ट्ये असणारी जगातील सर्वांत मोठे संविधान लिहिले आणि २६ जानेवारी १९५० पासून या देशात संविधान…
रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्ष ११ महिने १७ दिवसात ३९५ कलमे व ९ परिशिष्ट्ये असणारी जगातील सर्वांत मोठे संविधान लिहिले आणि २६ जानेवारी १९५० पासून या देशात संविधान…
ठाणे : हिंदायान फाउंडेशनच्यावतीने दिल्ली – ठाणे – मुंबई – पुणे या मार्गे सायकल मोहीम आयोजित करण्यात आली असून या मोहिमेत हजारो सायकल प्रेमी सहभागी होणार आहेत. यावर्षी या मोहिमेची थीम…
मुंबई : जळगाव येथे झालेल्या तिसऱ्या मर्दानी स्पोर्ट्स राष्ट्रीय स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना एकुण १७ पदकांची कमाई केली. त्यात १० सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कास्य पदकांचा समावेश…
रमेश औताडे मुंबई : गेल्या २९ वर्षांमध्ये ११ हजारहून अधिक गरजू मुलांचे पालनपोषण करत त्यांना फक्त निवराच नाही तर , दर्जेदार शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या संधी देऊन त्यांच्या परिवर्तनासाठी आशेचा किरण ठरलेल्या संपर्क या सामाजिक संस्थेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. असे कौतुक नुसी चे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी केले. संपर्क संस्थेचे लोणावळ्यातील बाल ग्राम पाहून मी भारावून गेले. २९ वर्षापासून (सोशल ऍक्शन फॉर मॅनपॉवर क्रिएशन) SAMPARC संपर्क हि संस्था संपूर्ण भारतातील अनाथ, वंचित, आदिवासी आणि उपेक्षित मुलांसाठी काम करते. संपर्क चे संस्थापक आणि संचालक अमितकुमार बॅनर्जी यांच्यासोबत या भेटी दरम्यान दोन तास घालविण्याचा बहुमान मला मिळाला याचा मला आनंद आहे असे कांदळगावकर म्हणाले. संपर्क मधील पाच मुलींचे पुनर्वसन करून त्यांना स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यासाठी आम्ही नूसी NUSI च्या (नॅशनल युनियन ऑफ सीफेअरर्स ऑफ इंडिया) च्या माध्यमातून मदत करणार आहे. गोव्यातील प्रतिष्ठित नुसी मेरीटाईम अकादमी मध्ये जी पी रेटिंग प्रशिक्षणासाठी संपर्क संस्थेच्या पाच तरुणींची निवड केली असल्याचे कांदळगावकर यांनी यावेळी जाहीर केले. त्यांच्या शिक्षणाचा प्रत्येकी दोन लाख रुपये खर्च नुसी संस्था करणार असून नोकरीची शाश्वती देखील दिली आहे. आता सागरी क्षेत्रात अनेक करिअरच्या आशादायक संधी उपलब्ध झाल्या आहेत. वंचित मुलांच्या यशस्वी करिअरसाठी दोन्ही संस्था एकत्रितपणे कसे कार्य करू शकतात याचे हे चांगले उदाहरण आहे. अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली. 0000
सलमान पठाण मुंबई : 2 जानेवरी रोजी माहीम येथे करम फाउंडेशन कडून गरीब आणि विधवा महिलांना मुफ्त राशन, गरीब मुलांना शाळेसाठी फीस, आजरी रुग्णांना औषधे व त्या साठी आर्थिक मदत , गरीब मुलीच्या लग्नासाठी लागणारे साहित्य व विविध योजनांचा लाभ देण्यात आला. करम फाऊंडेशन हे महाराष्ट्रातील अधिकृत संस्था असून यांच्यामार्फत माहीम विभागातील व तसेच मुंबई उपनगरातील गरीब आणि विधवा महिलांना गेल्या चार वर्षापासून विविध स्तरावर मदत करत आहे त्यांच्याकडून गरीब मुलींचे लग्नासाठी लागणारे साहित्य आजारी रुग्णांसाठी दवाखान्यामध्ये लागणारा खर्च व त्याचबरोबर गरिबांना राशन वाटप इत्यादी प्रकारचे काम वारंवार केले जात आहे या करम फाउंडेशनचे अध्यक्ष फारुख सय्यद यांच्यामार्फत हे काम केले जाते आत्तापर्यंत करम फाउंडेशन यांच्यामार्फत 5 हजारच्या वर कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात आली आहे त्याचबरोबर याच्याकडून 15 जोडप्यांचे लग्न लावण्यास मदत करण्यात आली आहे. कोव्हिड महामारीच्या काळात यांनी 1 हजारच्या च्या जवळपास रुग्णांना ऑक्सीजान पुरवठा केलेला आहे, त्याचबरोबर आत्तापर्यंत 400 गरीब आणि होतकरू शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय शैक्षणिक साहित्य व शालेय फी साठी मदत करण्यात आली आहे. करम फाउंडेशन कधीही हे बघत नाही की मदत घेणारी गरीब व्यक्ती हिंदू आहे की मुस्लिम आहे जातीय भेदभाव न करता करम फाउंडेशन मदत करते आणि पुढेही भविष्यात करत राहू असे आम्हाला करम फाउंडेशनचे अध्यक्ष सय्यद फारुख यांनी सांगितले ०००००
गोरगरीब गरजूंना केले जेवण व ब्लँकेट वाटप कल्याण : ह्युमॅनिटी स्टील लाईव्ह च्या मार्फत तेजस सांगळे व त्यांचे सहकारी मुकुल सोनटक्के, आदित्य लासुरे, सुधीर शेट्टी, शुभम शुक्ला, श्रीराम अय्यर व अन्य सहकारी यांच्या मार्फत थर्टी फर्स्ट च्या पार्ट्या झुगारत गोरगरीब गरजूंना मोफत जेवण व ब्लँकेट वाटप करण्यात आले. हा उपक्रम गेले पंधरा वर्षे झाले करण्यात येत आहे. सरत्या वर्षाला 2024 ला गुड बाय करत 2025 मध्ये वेलकम करत कोणत्यातरी गोरगरिबांचे एक दिवसाचा पोट भरून व त्यांच्या अंगावर वस्त्र देण्यात आले. आपल्याला देवाने अन्न वस्त्र निवारा या सर्व गोष्टी दिल्या आहेत. तरीही आपण आपल्यापासून वंचित असलेल्या लोकांना या सर्व गोष्टी पुरवाव्यात आणि पुढच्या वर्षी या उपक्रमाला कल्याणातल्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा अशी प्रतिक्रिया तेजस सांगळे यांनी दिली. ०००००
नवी मुंबई : महानगरपालिकेमार्फत दरवर्षी 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिन नानाविध उपक्रम राबवून उत्साहाने साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला व मुलींकरिता…
कल्याण : कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्रमांक 28 काळा तलाव येथे मुख्य रस्त्यावर शिवसेनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. आमदार विश्वनाथ भोईर यांचे पुत्र तथा कल्याण जिल्हा युवासेना सचिव वैभव भोईर यांच्या हस्ते व शिवसेना उपशहर प्रमुख माजी नगरसेवक मोहन उगले, महिला आघाडी शहर संघटक नेत्रा उगले, विभाग प्रमुख अनंता पगार, उपविभाग प्रमुख दिगंबर ठाणगे, स्वप्नील मोरे, शाखा प्रमुख धर्मेंद्र भदोरीया, नितीन कदम, रितेश पावले यांच्या उपस्थितीत श्रीराम नगर व शक्ती चौक बेतुरकर पाडा येथे शिवसेना फलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच सर्व शाखाप्रमुख, महिला आघाडी युवासेना, ज्येष्ठ नागरिक व शिवसैनिक यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ पार पडला. 0000
७६ प्रकरणात गुन्हे दाखल ठाणे : डिसेंबर-२०२४मध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभागांमधून ३८९१ अनधिकृत फलक, पोस्टर्स, बॅनर्स हटवण्यात आले. तर, ७६ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनधिकृत फलक हटवण्याची मोहीम सातत्याने सुरू ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. ठाणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि प्रभाग समिती यांच्या मार्फत डिेसेंबर महिन्यात ३८९१ अनधिकृत फलक, पोस्टर्स, बॅनर्स हटवण्यात आले. ही कारवाई सहाय्यक आयुक्तांमार्फत सातत्याने सुरू आहे. एकूण ७६ प्रकरणात गुन्हेही दाखल करण्यात आल्याची माहिती उपायुक्त (अतिक्रमण) शंकर पाटोळे यांनी दिली. महापालिका क्षेत्राचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी दैनंदिन मोहीम राबवून अनधिकृत फलक हटवण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत, मा. उच्च न्यायालयाचेही अतिशय काटेकोर आदेश आहेत. त्याचे पालन सगळ्यांनी करावे. अनधिकृत पोस्टर, बॅनर, फलक लावला की त्यावर नोटीस आणि गुन्हे दाखल करणे ही कारवाई अतिशय प्रभावीपणे करण्यात यावी, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. तसेच, ठाणे महापालिका हद्दीत अधिकृत फलक लावण्यासाठी जाहिरात विभागाने जागा निश्चित केल्या आहेत. त्याचे शुल्क भरून केवळ त्याच ठराविक भागात फलक लावता येणार आहेत. त्याबाबत संबंधितांनी सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त शंकर पाटोळे यांनी केले आहे. 00000
मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे, यासाठी राज्याचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण तयार करण्याचे निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी बुधवारी दिले.…