सुपर ओव्हरमध्ये स्पोर्ट्स प्रमोशन ग्रुप विजयी
६६वी टी-२० बाळकृष्ण बापट स्मृती ढाल क्रिकेट स्पर्धा मुंबई : कुर्ला स्पोर्ट्स क्लब आयोजित ६६ व्या टी-२० बाळकृष्ण बापट स्मृती ढाल क्रिकेट स्पर्धेत उपउपांत्य फेरीच्या लढतीत सुपर ओव्हरपर्यंत लांबलेल्या सामन्यात…
डहाणूचा मनस्वी इंटरप्राईजेस संघ संदीप भुरभुरे चषकाचा मानकरी
‘परिवर्तन ग्रुप’च्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद योगेश चांदेकर पालघरः मोडगाव येथील ‘परिवर्तन ग्रुप’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी क्रिकेटच्या महासंग्रामात ६४ संघांनी भाग घेतला. आदर्श सरपंच स्वर्गीय संदीप भुरभुरे स्मृती चषकाचा मानकरी डहाणू तालुक्यातील चिखले येथील मनस्वी एंटरप्राइजेस संघ ठरला. या संघाला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. ‘परिवर्तन ग्रुप’ दरवर्षी संदीप भुरभुरे स्मृती चषक स्पर्धा भरवत असतो. गेली २४ वर्षे हा उपक्रम अखंड चालू असून पुढचे वर्ष हे या उपक्रमाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या स्पर्धेचे सर्व नियोजन ‘परिवर्तन ग्रुप’चे अध्यक्ष ॲड. काशिनाथ चौधरी हे करत असतात. दोन राज्ये एका केंद्रशासित प्रदेशातील संघ सहभागी दादरा नगर हवेली, गुजरात, नंदुरबार, रायगड, मुंबई, मालाड, ठाणे, भिवंडी, नाशिक, जव्हार, वाडा, शहापूर, पालघर, वसई, बोईसर, डहाणू, तलासरी आदी ठिकाणचे संघ या स्पर्धेत भाग घेत असतात. दरवर्षी ही स्पर्धा नीटनेटक्या नियोजनाने चर्चेत असते. या वर्षी या स्पर्धेत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यातील तसेच दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील मिळून ६४ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. दादरा नगर हवेली, गुजरातच्या संघालाहा पारितोषिक आदिवासी क्रिकेटचा महासंग्राम २०२४ आदर्श सरपंच स्वर्गीय संदीप भुरभुरे स्मृती चषक डहाणूच्या मनस्वी इंटरप्राईजेस चिखले या संघाने मिळवला, तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक दादरा नगर हवेलीतील प्रिन्स खानवेल या संघाने मिळवला. तिसरा क्रमांक वसईच्या बेनापट्टी संघांनी मिळवला, तर चौथा क्रमांक गुजरातच्या खेडगाव नवसारी येथील संघाने मिळवला. या स्पर्धेत मनस्वी स्पोर्टस् चिखले डहाणू येथील संघ मालिकावीर ठरला. या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण स्पर्धेचे पारितोषिक वितरण डहाणू मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले, विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुनील भुसारा, पालघरचे माजी आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पंकज कोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, ‘परिवर्तन ग्रुप’चे अध्यक्ष ॲड. काशिनाथ चौधरी, डहाणू पंचायत समिती सभापती आणि ‘परिवर्तन ग्रुप’चे कार्याध्यक्ष प्रवीण गवळी, उपसभापती पिंटू गहला आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. भुरभुरे यांचे मोठे योगदान गेल्या २४ वर्षांपासून आदिवासी क्रिकेटचा महासंग्राम सुरू असतो. सुरुवातीच्या काळात संदीप भुरभुरे यांचा या स्पर्धेच्या नियोजनात मोठा सहभाग होता. त्यांचे प्रोत्साहन होते. मैदानापासूनच्या सर्वच गोष्टी ते हाताळत असत; परंतु कोरोनाच्या काळात त्यांचे पाच मे २०२१ रोजी निधन झाले. ॲड. काशिनाथ चौधरी यांनी त्यांच्याच नावाने पुढे स्पर्धा चालू ठेवत या चषकाला संदीप भुरभुरे स्मृती चषक असे नाव दिले. आता त्याच नावाने ही स्पर्धा होत असून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी दोन राज्ये आणि आणि केंद्रशासित प्रदेशातील संघ सहभागी होत असतात. हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. ०००००
सर्व प्रकरण सेट केल्यानंतर वाल्मिक कराडचे पोलिसांसमोर सरेंडर – जितेंद्र आव्हाड
अनिल ठाणेकर ठाणे : ‘गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील मोस्ट वॉन्टेंड वाल्मिक कराड हा सरेंडर करणार होता हे मी अगोदरच सांगितले होते. यापूर्वीच मी ट्विट केले आहे,’ सर्व प्रकरण सेट करण्यासाठी इतके दिवस घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराड पुणे पोलिसांसमोर शरण आल्यानंतर केला आहे. संतोष देशमुख हे भाजपचे होते आमच्या पक्षाचे नव्हते, पण माणुसकी जिवंत राहावी यासाठी आम्ही लढतो आहोत.संतोष देशमुखांच्या कुटुंबाला सरकारी वकील देताना त्यांच्या कुटुंबाला विश्वासात घेणं आवश्यक आहे. माझी फडणवीसांना विनंती आहे की, मागच्या दोन-तीन वर्षात झालेल्या हत्यांची चौकशी करावी आणि त्यांच्याही कुटुंबियांना बोलवून घ्यावं. त्यावेळी कळेल की कोणी कोणाची जमीन बळकावली आणि कोणी कोणाची हत्या केली.” असाही घणाघात आव्हाड यांनी केला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्राची तुलना बिहारशी करण्यात आली होती. जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राच्या जनतेला जोपर्यंत वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत जनतेने शांत बसू नये असं आवाहनही यावेळी केलं. आव्हाड यांनी आणखी एका प्रकरणाचा दाखला देत सांगितले की, एक हत्या तर भयंकर आहे त्याची माहिती माझ्याकडे आहे, पोरीला फोन लावून दिला गेला आणि फोनवरून मुलीला सांगितलं की एक तर तू गोळी मारून घे नाही तर याला गोळी मारून घ्यायला सांग. याचा संपूर्ण तपशील त्यांनी यावेळी दिला नाही. धनंजय मुंडे यांच्याबाबतीत गंभीर आरोप करत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “नैतिकदृष्ट्या मी समाजतील, राजकारणातील घडामोडी वाचत असतो, लक्षात ठेवत असतो. त्यावरुन राजकारणात आत्तापर्यंत एवढे मोठे आरोप कोणत्याही मंत्र्यावर झाले नाहीत. ०००००
वामन म्हात्रेंची खेळी, किसन कथोरेंना धक्का
बदलापुरात भाजपचा माजी नगरसेवक शिवसेनेत बदलापूरः विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शिवसेनेच्या उपशहर प्रमुखाला भाजपात प्रवेश देत आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेचे वामन म्हात्रे यांना अप्रत्यक्ष आव्हान दिले होते. त्यानंतर आता शिवसेनेच्या वामन म्हात्रे यांनी चक्क भाजपच्या माजी नगरसेवकालाच गळाला लावले असून हा किसन कथोरे यांना धक्का मानला जातो. विशेष म्हणजे आमदार कथोरे यांचे निवासस्थान याच प्रभागात येते. गेल्या काही दिवसात बदलापुरात कथोरे विरूद्ध म्हात्रे वाद टोकाला पोहोचला असून एकमेकांवर शाब्दीक हल्ले करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने होतो आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या किसन कथोरे यांचा पाचव्यांदा विजय झाला. मात्र त्याचवेळी बदलापुर शहरात शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि भाजपचे किसन कथोरे यांच्यातील वाद टोकाला गेला. कथोरे यांच्या उमेदवारीला म्हात्रे यांनी निवडणुकीआधीच विरोध सुरू केला होता. त्यामुळे ऐन प्रचार रंगात येत असताना म्हात्रे यांनी प्रचारापासून अलिप्त राहणे पसंत केले. त्यातच आमदार कथोरे यांनी वामन म्हात्रे यांचा प्रभाव असलेल्या भागातील उपशहर प्रमुख तेजस म्हस्कर यांनाच भाजपात प्रवेश दिला. त्यामुळे शिवसेनेत संताप वाढला होता. म्हात्रे यांनी याबाबतची नाराजी थेट तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवली होती. तरीही शिंदे यांनी महायुतीचा धर्म पाळत कथोरे यांचाच प्रचार करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले होते. विधानसभा निवडणुकीनंतर हा वाद टोकाला पोहोचला. विजयानंतरच्या पहिल्याच भाषणात आमदार किसन कथोरे यांनी वामन म्हात्रे यांच्यासह सर्व पक्षांतर्गत आणि महायुतीतील विरोधकांना थेट आव्हान दिले होते. म्हात्रे यांनी कथोरे यांच्या टीकेला प्रत्युत्तरही दिले. त्यामुळे यांच्यात वाकयुद्ध वाढल्याचे दिसत होते. मात्र वामन म्हात्रे यांच्या पुढाकाराने आयोजीत आगरी महोत्सवात पहिल्याच दिवशी भाजपचे बदलापूर गावातील माजी नगरसेवक हेमंत चतुरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर मंगळवारी चतुरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. माझा प्रवेश यापूर्वीच झाला होता. आता फक्त सदिच्छा भेट घेतल्याची प्रतिक्रिया हेमंत चतुरे यांनी दिली. मी १३ वर्ष शिवसेनेचा शाखाप्रमुख म्हणून कार्यरत होतो. मी शिवसेनेकडून निवडणुकही लढवली होती. माझी बहीण शिवसेनेची नगरसेविका होती. मध्यंतरी मी भाजपात होतो. मात्र दोन वर्षांपासून मला प्रभागात काम करताना अडचणी येत होत्या. माझी घुसमट होत होती, त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया हेमंत चतुरे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. हा प्रवेश आमदार किसन कथोरे आणि भाजपासाठी धक्का मानला जातो आहे. आमदार किसन कथोरे यांचे निवासस्थान असलेल्या परिसरातून चतुरे नगरसेवक आहेत. त्यामुळे म्हात्रे यांनी विधानसभेतील फोडाफोडीची परतफेड केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. ही तर घरवापसी शिवसेनेचा कार्यकर्ता आत शिवसेनेत आला. हा पक्षप्रवेश नाही तर घरवापसी आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिली आहे. हेमंत चतुरे शिवसैनिकच होते. त्यांचा परिवार शिवसेनेशी संबंधित आहे. त्यांच्या प्रवेशामुळे बदलापुरात शिवसेना आणखी मजबूत होईल, असेही म्हात्रे बोलताना म्हणाले.
महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी दिलीप जगदाळे
कल्याण :महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी दिलीप जगदाळे नुकतेच रुजू झाले. ते भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकारी असून राज्याच्या विविध भागातील प्रशासकीय कामाचा तब्बल ३३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी…
‘मस्साजोग सरपंच हत्येच्या तपासाला गती मिळावी!’
शहापूर मराठा समाज मंडळाची मागणी शहापूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृन हत्येच्या घटनेला महिना होत आला असून अजूनही आरोपी मोकाट फिरत आहेत. हत्येचा तपास जलद गतीने व्हावा अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा शहापूर तालुका मराठा समाज मंडळाने शहापूर तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे दिला आहे.बिड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृन हत्येच्या घटनेला महिना होत आला असून मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहेत. हत्या कटाच्या मुख्य सूत्रधारावर एका बड्या राजकीय व्यक्तीचा वरदहस्त असून तपास प्रक्रियेतही हस्तक्षेप असल्याने त्यास अटक होत नसल्याने मराठा समाजाच्या सरकारप्रती भावना तीव्र आहेत. या गुन्ह्याचा जलद गतीने तपास व्हावा,तसेच योग्य तपास होणेसाठी एस.आय.टी. स्थापन करावी किंवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करून कटात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना कडक शासन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. तपास कामात सातत्याने दिरंगाई होत असेल तर महाराष्ट्र सरकारला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा शहापूर तालुका मराठा समाज मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.आज (दि. 31)सकाळी मराठा समाज मंडळाच्या शिष्टमंडळाचे अध्यक्ष विजय देशमुख, मिलिंद देशमुख, रवींद्र चौधरी, सचिन चौधरी व पदाधिकाऱ्यांनी शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांची भेट घेऊन हे निवेदन सुपूर्द केले. 00000
सौर उर्जा क्षेत्रात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भरीव कामगिरी
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने सौर उर्जा क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 10 प्रभाग क्षेत्र कार्यालयासाठी एकूण…
‘गो ग्रीन’ सेवेचा पर्याय निवडा व वीजबिलात एकरकमी 120 रुपये सूट मिळवा
नवीन वर्षात महावितरणची ग्राहकांना भेट मुंबई : नूतन वर्षांची भेट म्हणून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने केली आहे. महावितरणकडून ‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेनुसार गो-ग्रीन सेवा राबविण्यात येत आहे. त्यानुसार यापूर्वी या योजनेअंतर्गत ग्राहकांना मासिक वीज बिलात 10 रुपये सूट देण्यात येते. मात्र आता यापुढे पहिल्याच बिलात पुढील बारा महिन्यासाठी तत्काळ 120 रूपये एकरकमी सवलत मिळणार आहे. ‘गो ग्रीन’ सेवेचा पर्याय निवडणाऱ् या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा छापील कागदी बिला ऐवजी ई – मेल द्वारे वीज बिल पाठविण्यात येते. शिवाय गो ग्रीन ग्राहकांना मासिक वीज बिलात 10 रुपये सूट देण्यात येते. महावितरणने गो ग्रीन ग्राहकांसाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता यापुढे गो ग्रीन सेवा निवडणाऱ्या ग्राहकांना दरमहा ऐवजी पहिल्याच महिन्यातील वीज बिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्यात येणार आहे. महावितरणच्या 3 कोटी लघुदाब ग्राहकांपैकी अद्यापपर्यंत 4 लाख 62 हजार म्हणजेच 1.15 टक्के ग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडला आहे. भविष्यात हे प्रमाण वाढावे, या हेतूने महावितरणने गो ग्रीन पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वीजबिलात तत्काळपणे 120 रुपये एकरकमी सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व नोंदणीकृत वीज ग्राहकांना महावितरणकडून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडण्यासाठी एसएमएस पाठविण्यात येणार आहे. गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील वर्षभर व सेवेसाठी नोंदणी रद्द करेपर्यंत नोंदणीकृत ई-मेलवर वीज बिल पाठविण्यात येणार असून त्यापुढे दरमहा वीज बिलात 10 रुपये सूट देण्यात येणार आहे. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणने आवाहन केले आहे. गो ग्रीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळाला भेट द्या व गो ग्रीन चा पर्याय निवडा. 000000
पतंग उडवण्यासाठी चिनी मांजा, चिनी दोरा वापरण्यास ठाणे महापालिका क्षेत्रात प्रतिबंध – सौरभ राव
अनिल ठाणेकर ठाणे :महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, चिनी मांजा तथा सिंथेटिक-नायलॉन मांजाची विक्री, उत्पादन, साठवण आणि वापर टाळण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर तपासणी आणि जप्ती मोहीम नियमितपणे राबविण्यात येत आहे. त्यासाठी, प्रत्येक प्रभाग समितीत सहाय्यक आयुक्त स्तरावर कर निरिक्षक, स्वच्छता निरिक्षक, आरोग्य निरिक्षक, प्रदूषण नियंत्रण कर्मचारी यांचे दक्षता पथक तयार करण्यात आले आहे. तसेच, स्थानिक पोलिसांनाही याविषयी माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत या तपासणी मोहिमेत सर्व प्रभाग समिती क्षेत्रात एकूण २५५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे चिनी मांजा आढळला नाही. पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिक किंवा सिंथेटिक पदार्थापासून तयार केलेला चिनी मांजा, चिनी दोरा किंवा नायलॉन किंवा प्लास्टिक कृत्रिम मांजा हा माणसांसाठी तसेच पक्ष्यांना घातक ठरतो. त्यामुळे या मांजांच्या वापरावर ठाणे महापालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात त्याअनुषंगाने करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत सर्व प्रभाग समिती क्षेत्रात एकूण २५५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे चिनी मांजा आढळला नाही. मात्र, या तपासणीत एकल वापराचे सुमारे २१४ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच, ८९ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. पतंग उडवण्यासाठी तीक्ष्ण धातू किंवा काच घटक किंवा चिकट पदार्थ तसेच धागा मजबूत करणारा पदार्थ नसलेला केवळ सुती धागा वापरण्यास परवानगी आहे. चिनी मांजा म्हणून ओळखला जाणारा हा धागा तयार करण्यासाठी बारिक चूरा केलेली काच, धातू किंवा अन्य तिक्ष्ण पदार्थांचा वापर करण्यात येतो. अशा धाग्याचे उत्पादन, विक्री, साठवण आणि वापर यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने निर्बंध घातलेले आहेत. या धाग्याचे जैविकरित्या विघटन होत नसल्याने मल प्रणाली, जलनि:सारण बाधित होते. तसेच असे पदार्थ खाल्ल्याने जनावरांनाही इजा होते. तसेच, हा धागा विद्युत वाहक असल्याने वीज साहित्य आणि वीज उपकेंद्र यांच्यावरही भार येऊन वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे..या तपासणी दरम्यान, एकल वापराचे सुमारे २१४ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच, ८९ हजार रुपयांचा दंड करण्यात आल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यानी दिली.प्रतिबंधित सिंथेटिक, नायलॉन मांजाची विक्री, उत्पादन, साठवण, पुरवठा किंवा वापर याबाबतच्या तक्रारी करण्यासाठी ८६५७८८७१०१ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर, pcctmc.ho@gmail.com या इमेलवरही तक्रार नोंदवता येईल. 0000
