Category: होम

छतावरील सौरऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राची ‘पॉवरफुल’ कामगिरी 

केंद्राकडून मिळाली २६० कोटींची प्रोत्साहनपर रक्कम मुंबई : राज्यात आतापर्यंत २,३७,६५६ वीज ग्राहकांनी छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले असून त्यांची एकूण क्षमता २,७३८ मेगावॅट आहे. घरांच्या छतावर सौर पॅनेल बसवून वीजनिर्मिती करण्यात उत्तम…

नवीन वर्षाच्या स्वागताच्या वेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त

सुरक्षेसाठी 12 हजार पोलीस तैनात मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतवेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. 8 अप्पर पोलिस आयुक्त, 29 पोलिस उपायुक्त, 53 सहाय्यक पोलिस आयुक्त, 2184 पोलिस अधिकारी आणि 12 हजार 48 पोलिस अंमलदार गस्तीवर असणार आहेत, अशी माहिती…

मालेगावत बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना

किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा मुंबई : मालेगाव हे व्होट जिहाद, लँड जिहाद केंद्र असल्याचा आरोप भाजप नेते व माजी खासदार  किरीट सोमय्या यांनी केला. त्यामुळे सर्व तपास यंत्रणांच्या रडारवर मालेगाव शहर आले…

वातावरण निवळणार, थंडी वाढणार

मुंबई : राज्यात थंडीचा जोर कमी झालाय असं वाटत असताना आता पुन्हा एकदा राज्यात थंडी वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून पुढील 3 दिवस म्हणजे…

मी काकी वैद्य यांचा चिरंजीव…!

मी विजयकुमार दत्तात्रय वैद्य, जव्हारच्या खालसा संस्थानिक काकी वैद्य यांचा चिरंजीव”, अशी ओळख करुन देणारे जव्हार, ठाणे, चेंबूर, सांताक्रूझ मार्गे बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगरात आपली कर्मभूमी बनविणारे ज्येष्ठ…

दूरगामी निवाड्यांचे वर्ष

पान १ वरुन एखाद्या दोषीला उच्च न्यायालयाने तीन महिने किंवा त्यापेक्षा कमी कारावास किंवा तीन हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावल्या असल्यास उच्च न्यायालयात आव्हान देता येत नाही. ‌‘आयपीसी‌’मध्ये…

चुकीची दुरुस्ती

  भारतात शिक्षण क्षेत्रात जेवढे प्रयोग केले जातात, तेवढे प्रयोग अन्य कोणत्याही क्षेत्रात केले जात नाही. विद्यार्थ्यांना जणू गिनिपिग म्हणून पाहिले जात असते. विद्यार्थ्यांना गृहीत धरून प्रयोग केले जातात. एका…

यजमान सांगली, पुणे ग्रामीण, ठाणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, रायगड, कोल्हापूर, परभणी यांची कुमार गटात विजयी सलामी

५१वी कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा सांगली: यजमान सांगली, पुणे ग्रामीण, ठाणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, रायगड, कोल्हापूर, परभणी यांनी ५१व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या…

अंध खेळाडूंची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा दिमाखात सुरू

ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल तर्फे आयोजित केलेल्या काॅक्वेस्ट २०२४ या अंध खेळाडूंच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेस आज सेंट्रल मैदानावर दिमाखात सुरूवात झाली. ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनच्या सहकार्याने ही स्पर्धा…

२५वी रोचेस खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा

अथर्व सोनीला विजेतेपद ठाणे : आपल्यापेक्षा सरस गुणांकन असलेल्या वरिष्ठ बुद्धिबळपटूंना मागे टाकत १५ वर्षीय अथर्व सोनीने रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आयोजित २५ व्या रोचेस खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. स्पर्धेत अव्वल स्थान पटकावताना अथर्वने सात फेऱ्यांमध्ये साडे सहा गुणांची कमाई करत पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस आपल्या खिशात टाकले. अनिरुद्ध पोतवाड आणि ऋषी कदम अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. सहाव्या फेरीअखेर विजेतेपदासाठी चुरस निर्माण झाली होती. साडे पाच गुण असलेल्या अथर्वने सातव्या फेरीत फिडे मास्टर  अनिरुद्ध पोतवाडला मात देत विजयासह आपले वर्चस्व राखले. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी चौघांमध्ये चढाओढ होती. सहा गुणांसह बरोबरीत असलेल्या अनिरुद्ध आणि ऋषीने  जास्त गुणाकणांची नोंद करत इतरांना मागे टाकले. वडील सत्यभान सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्व वयाच्या सहाव्या वर्षांपासून बुद्धिबळाचे धडे गिरवत आहे. अथर्व बदलापूर येथील एअरसन इंग्लिश स्कुलमध्ये नवव्या इयत्तेत शिकत आहे. स्पर्धेत दीडशेहून अधिक बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. त्यात ७७ आंतरराष्ट्रीय गुणांकन असलेल्या बुद्धीबळपटूंचा समावेश होता. स्पर्धेतील इतर निकाल : ८ वर्षे वयोगट मुले : शिवांश करीआ, निवेश पांचाळ, सात्विक प्रधान. मुली : मिराई सरदाना, डेलिया खैरनार, मनवा पारकर. ११ वर्षे वयोगट मुले : आराध्य पार्टे, नीद्वयुष आनंद, आर्यन पांडे. मुली : मेहूली मुखर्जी, त्रिशा पांचाळ आराध्या धेंडे. १५ वर्षे वयोगट : सोनी अथर्व, विवान सरदाना, हिंदोळ घोष. मुली : गिरिशा पै, जीअना धरमसी, महती रामकुमार. सर्वोत्तम वयस्कर बुद्धिबळपटू : अनिल सनदांशी. सर्वोत्तम महिला खेळाडू : वनश्री कुन्नेकर. बिगर गुणांकित : ऋषी मोटवानी.