Category: होम

कोपरीवासीयांच्या हक्काच्या घरांसाठी नवकुंडीय महायज्ञात झाला जागर!

माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांच्याकडून आयोजन   ठाणे, दि. २७ (प्रतिनिधी) : कोपरीवासीयांच्या डोक्यावर हक्काच्या घराचे छत असावे, विकसकाकडून होणारी फसवणूक टळून घरांचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी कोपरी येथील सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञात जागर करण्यात आला. कोपरीतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत व विकसकांकडून होणाऱ्या संभाव्य फसवणुकीबाबत रहिवाशांचे प्रबोधन करण्यात आले. त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून कोपरी येथे सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाचे आयोजन केले आहे. या महायज्ञात धार्मिक कार्यक्रमांबरोबरच विविध कार्यक्रमांतून नागरिकांच्या हिताचे उपक्रम राबविले जात आहेत. कोपरीमध्ये मोठ्या संख्येने जुन्या इमारती आहेत. या पार्श्वभूमीवर महायज्ञाचे औचित्य साधून भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांनी `व्हिजन २०२५- कोपरी डेव्हलपमेंट’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याला कोपरी भागातील रहिवाशी सोसायट्यांचे पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. वास्तूविशारद मुकुंद गोडबोले यांनी कोपरीच्या भविष्यातील विकासाबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. कोपरी परिसरातील ३० टक्के सोसायट्या सीआरझेड २ मध्ये येत आहेत. मात्र, या प्रश्नावर माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी पुढाकार घेऊन रहिवाशी सोसायट्यांच्या प्रतिनिधींसमवेत नवी दिल्लीत दाद मागितली. त्यानंतर २०१९ च्या कायद्यानुसार दिलासा मिळाला असून, आता सीआरझेड २ मधील इमारतींचाही विकास होऊ शकतो. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या ७९-अ नुसार पुनर्विकासासाठी प्रत्येक सोसायटीने नियमानुसार प्रक्रिया राबवावी. एखाद्या विकसकाकडून वाढीव `एफएसआय’ व अन्य आश्वासनांना बळी पडू नये. त्या विकसक कंपनीचा पूर्वेतिहास तपासावा. त्यांनी पूर्ण केलेल्या इमारतीला भेट देऊन पाहणी करुन तेथील रहिवाशांकडून माहिती घ्यावी. त्यानंतरच सोसायटीने पुनर्विकास प्रकल्प राबवावा, असे आवाहन वास्तूविशारद मुकुंद गोडबोले यांनी केले. कोपरीवासियांना कोपरीतच घराचा प्रयत्न जागांच्या वाढत्या किंमतीमुळे ठाण्यातील कुटुंबे बदलापूर, कर्जत, टिटवाळ्यापर्यंत स्थलांतरीत झाली. परंतु, कोपरीतील रहिवाशांनी कोपरीतच नव्या घरात राहावे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. सोसायट्यांनी एकत्रित येऊन निविदा प्रक्रिया राबवून सोसायटीचा विकास करावा. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पुनर्विकासासाठी पुढाकार घेतल्यास त्यांना सर्वोतोपरी साह्य केले जाईल, असे आश्वासन. भरत चव्हाण यांनी दिले. कोपरीवासियांना चांगले व रुंदीकरण झालेले रस्ते, उत्तम मार्केट, नाट्यगृह आणि पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यादृष्टीकोनातून  `व्हिजन २०२५- कोपरी डेव्हलपमेंट’ साकारले जात आहे, अशी माहिती भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी दिली. 0000

 पार्ले महोत्सवात सहभागी स्पर्धकांनी गाठला उच्चांक

कला-क्रीडा-सांस्कृतिक क्षेत्राचा महोत्सव झाला अवघा पार्लेमय     मुंबई : रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करत असलेल्या आमदार पराग अळवणी यांच्या नेतृत्वाखालील पार्ले महोत्सव २०२४ ने स्पर्धकांचा उच्चांक गाठला असून मुंबईसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून जवळपास ६० हजार स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला असून प्रत्येकजण विजेतेपदासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसून येत आहे. या महोत्सवामुळे अवघी इथली डॉ. स्नेहलता देशमुख क्रिडानगरी पार्लेमय झालेली दिसून येत आहे. सहभागी होणारी प्रत्येक व्यक्ती हा महोत्सव यशस्वी करत आहे. त्याचबरोबर त्याची व्याप्ती देखील वाढत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात याच्यापेक्षा अधिक भव्य आणि व्यापक नियोजन करण्याच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्नशील आहोत तसेच स्पर्धेतील प्रत्येक सहभागी स्पर्धक हा आपल्या क्षेत्रात इतका निपुण आहे की, नक्कीच तो भविष्यात राज्य आणि देशाचा नावलौकिक वाढवेल, असा विश्वास असल्याचे पराग अळवणी यांनी सांगितले. महोत्सवाच्या सलग सातव्या दिवशी वेगवेगळ्या स्पर्धा झाल्या असून अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली आहे. मल्लखांब स्पर्धकांनी हा दिवस गाजवला असून समर्थ राणे याने पुरुष गटात तर श्रृती उतेकर हिने महिला गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या स्पर्धेतील विजेत्यांची अनुक्रमे नावे  – वैयक्तिक गट – पुरुष – समर्थ राणे, आदित्य पाटील, मृगंक पाठारे, निरंजन अमृते, अवधूत पिंगळे. महिला – श्रृती उतेकर, पूर्वा आंबोडकर, काव्यशी मसुरकर, खुशी पुजारी, तनश्री जाधव, पलक चुरी. सांघिक गट – पुरुष – पार्लेश्वर व्यायामशाळा, टीसुकाहार स्पोर्ट्स अकॅडमी, दहिसर स्पोर्ट्स फाऊंडेशन. महिला – समता क्रिडा भवन, पार्लेश्वर व्यायामशाळा, गोरेगाव जिमखाना. कॅरम स्पर्धेतील विजेत्यांची यादी अशी – खुला गट – मंगेश पंडित विजेता तर असिफ शेख उपविजेता. शालेय गट, मुले – पुष्कर गोळे विजेता तर प्रसन्ना गोळे उपविजेता, महिला गट – समृद्धी घाडीगावकर विजेती तर प्राजक्ता नारायणकर उपविजेती. कराओके संगीत स्पर्धा – पहिले तीन विजेते – पुरुष गट – मानस भागवत, सुहास कुलकर्णी, प्रियदर्शन गोंधळेकर, महिला गट – अष्टा हळदणकर, गौरी मिश्रा, सरिता पांचाळ, जोडी – प्रथम – अनिल कुलकर्णी व कृपा पै, द्वितीय – मानस भागवत व स्नेहा बेडेकर. सोजी मॅथ्यू यांना उत्तम गायकाचे पारितोषिक मिळाले. ०००००

 शिवशक्ती-अ, महर्षी दयानंद स्पोर्टस्, अंकुर स्पोर्टस् यांची उपांत्य फेरीत धडक

जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा मुंबई:- शिवशक्ती-अ, महर्षी दयानंद स्पोर्टस्, अंकुर स्पोर्टस् यांनी मुंबई शहर कबड्डी असो.ने आयोजित केलेल्या १४वर्षाखालील मुलींच्या गटात उपांत्य फेरी गाठली. शिवशक्ती-अ विरुध्द चंद्रोदय क्रीडा मंडळ, महर्षी दयानंद विरुध्द अंकुर स्पोर्टस् अशा उपांत्य लढती होतील. वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणावर सुरू असलेल्या उपांत्यपूर्व मुलींच्या सामन्यात शिवशक्तीने गणेश स्पोर्टस् चा दुबळा प्रतिकार ४९-३० असा मोडून काढला. विश्रांतीला २५-११ अशी आघाडी घेणाऱ्या शिवशक्तीने नंतर सावध खेळ करीत आपला विजय साकारला. वैष्णवी सुतार, जान्हवी पोतदार यांच्या चढाई पकडीच्या खेळाला याचे श्रेय जाते. गणेशच्या कावेरी बाईत, कृतिका बांदकर यांना विश्रांतीनंतर सुर सापडला. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात महर्षी दयानंदने रोहिणी कदम, धनश्री पालवे यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर शिवशक्ती-ब चा ५४-३३ असा पाडाव केला. पूर्वार्धात २८-१२ अशी आघाडी घेणाऱ्या महर्षी दयानंदने उत्तरार्धात त्याच गतीने खेळ करीत गुणांचे अर्धशतक पार केले. उत्तरार्धात शिवशक्तीच्या अस्मी कोकाटे, प्राची वर्मा यांनी आपला खेळ उंचावत पराभवातील अंतर कमी केले. अंकुर स्पोर्टस् ने जिजामाता महिला संघाला ४५-१४ असे सहज नमवित उपांत्य फेरी गाठली. विश्रांतीला ३१-०६ अशी भक्कम आघाडी घेत विजयाचा पाया रचला. विश्रांतीनंतर आणखी १५गुण घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. गायत्री गुप्ता, मुक्ता चौहान यांच्या झंझावाती खेळाला या विजयाचे श्रेय जाते. जिजामाताची सेजल मालप चमकली. पुरुषांच्या द्वितीय श्रेणी गटात शिवनेरी स्पोर्टस् ने ५-५ चढायांच्या डावात गोकुळ मित्र मंडळाला ४३-३७ अशी मात करीत दुसरी फेरी गाठली. मध्यांतराला २६-१८ अशी आघाडी घेणाऱ्या शिवनेरीला गोकुळ मित्र मंडळाला पूर्ण डावात ३४-३४ असे बरोबरीत रोखले. साहिल आवळे, अमन नवले यांच्या संयमी खेळाला या विजयाचे श्रेय जाते. गोकुळ मित्रच्या संतोष घडसी, संतोष भाटकर यांनी कडवी लढत दिली. पण संघाला विजयी करण्यात ते थोडे कमी पडले. द्वितीय श्रेणीच्या इतर सामन्यात गावदेवीने गणेशला २८-१३, वीर संताजीने न्यू वर्ड्सला ३१-१८ असे, हिंद केसरीने न्यु पर्शुराम बॉईजला ४०-१९ असे, तर अमरदिप ने नवनाथला ३४-२२ असे पराभूत करीत दुसरी फेरी गाठली.

प्रल्हाद नलावडे स्मृती चषक जिंकण्यासाठी शालेय ५२ कॅरमपटूंमध्ये चुरस

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कॅरमप्रेमी स्व. प्रल्हाद नलावडे स्मृती चषक शालेय १५ वर्षाखालील कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी ५२ खेळाडूंमध्ये २९ डिसेंबरला चुरशीच्या लढती होतील. आयएनजी स्कूल-वसईचाशान पालवणकर विरुद्ध पार्ले…

जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन

नवी मुंबई : महानगरपालिका इटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राव्दारे दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असतात. याचाच एक भाग म्हणून…

फेस्कॉमच्या ज्येष्ठ नागरिकांनसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

मुंबई : महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ – फेस्कॅाम मुंबई व नवी मुंबई प्रादेशिक विभागातर्फे वर्ष २०२५ च्या कॅरम, बुद्धिबळ तसेच गायन, उत्स्फूर्त वत्कृत्व, कथाकथन, सांघिक नृत्य, एकपात्री व द्विपात्री नाट्याभिवाचन  इत्यादी…

प्रताप जाधव सर्वोच्च“जीवन गौरव” पुरस्काराने सन्मानीत

नवी दिल्ली : भारतामधील सायकलिंग क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणा-या “जीवन गौरव” पुरस्काराने महाराष्ट्राच्या  प्रताप जाधव यांना नवि दिल्ली येथे झालेल्या समरंभात सन्मानीत करण्यात आले. येथे झालेल्या एका समारंभात एशियन सायकलिंग कॉन्फडरेशन…

सोमनाथ सुर्यवंशी संशयास्पद मृत्यू आणि अमीत शहा यांच्या निषेधार्थ

सोमवारी शिव-फुले-शाहू-आंबेडकरी अनुयायांचा संयुक्त मोर्चा   ठाणे : परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू आणि केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेले अवमानास्पद वक्तव्य याचा निषेध करण्यासाठी सोमवारी (दि. 30) ठाण्यात सर्व पुरोगामी, आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती शिव, फुले, शाहू, आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समितीचे निमंत्रक तथा ज्येष्ठ आंबेडकरी नेते नानासाहेब इंदिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळेस राजाभाऊ चव्हाण, भास्कर वाघमारे,  सुनील खांबे, सुखदेव उबाळे, आबासाहेब चासकर,  पंढरीनाथ गायकवाड,  गोविंद पठारे, प्रल्हाद मगरे, जयवंत बैले, शंकर जमदाडे, समाधान तायडे, राहुल घोडके, लोभसिंग राठोड, विशाल ढेंगळे, बाबासाहेब येडेकर, डॉ.प्रमोद जाधव, सुरेश कांबळे, अशोक कांबळे, विमलताई सातपुते, सुमनताई इंगळे, दैवशाळा हराळे आदी शिव, फुले, शाहू, आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समितीचे निमंत्रक उपस्थित होते. इंदिसे यांनी सांगितले की, सोमनाथ सुर्यवंशी हा कायद्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी होता. त्यामुळे तो कायदाबाह्य काम करण्याची शक्यताच नाही. मात्र पोलिसांनी त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून कस्टडीत डांबले आणि तिथे बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. तसा शवविच्छेदनाचा अहवालही परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाने दिलेला असतानाही पोलिसांनी दिलेल्या खोट्या माहितीच्या आधारे सभागृहात सरकारच्या वतीने चुकीची माहिती देण्यात आली. या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांन बडतर्फ करून आयपीसी 302 तथा बीएसएस 103 (1) अन्वये गुन्हा दाखल करून  त्यांना अटक करावी; तसेच, अमीत शहा लोकसभेत द्वेषातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानकारक विधान केले आहे. मात्र, अद्यापही त्यांनी माफी मागितलेली नाही. त्यांनी देशाची माफी मागावी तसेच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून त्यांना काढून टाकावे, या मागण्यांसाठी हा मोर्चा आहे. हा मोर्चा सकाळी १०.३० वाजता ठाणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास  अभिवादन करून निघणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पथमार्गे तलावपाळी येथे शिवरायांना मुजरा करून टेंभी नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाची सांगता होणार आहे. या मोर्चात हजारो लोक सहभागी होतील, असेही नानासाहेब इंदिसे यांनी सांगितले. 0000

ड्रीम ११ संघाला जेतेपद

मुंबई :  ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी, चर्चगेट संघाने दिलीप वेंगसरकर फाउंडेशनच्या वतीने माहुल येथे आयोजित केलेल्या ड्रीम ११ कप या १२ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे  विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी एम.सी.सी.…

हिरामण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रामदास आठवले यांचा वाढदिवस कर्जतमध्ये उत्साहात साजरा !

अशोक गायकवाड कर्जत : महाराष्ट्राच्या कानाकोप-यात अन्याय अत्याचाराविरोधात दंड थोपटून आवाज उठवून सर्वसामान्य बहुजन वर्गाला ” पँथर ” स्टाईल ने न्याय देऊन आपला सामाजिक बांधिलकीचा पगडा ” संघर्षनायक ” म्हणून ओळख निर्माण करणारे तसेच तमाम दलित – शोषित, वंचित बहुजन समाजाचे नेते, संघर्ष योद्धा रामदास आठवले यांच्या ६५ व्या वाढदिवसा निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रि.पा.इं. कर्जत तालुक्याच्या वतीने कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषद शाळा किरवली येथे विद्यार्थ्यांना फळ वाटप करून राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रिपाइंचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळीच रिपाइंच्या कार्यकर्त्यानी राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा जयघोष केला, त्यानंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजिप शाळा किरवली येथे शाळेत केक कापून व विद्यार्थ्यांना फळ वाटप करून वाढदिवस साजरा केला . दरवर्षी होत असलेल्या या रिपाइंच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे, ” शिक्षण हे ज्ञानरुपी तिसरा डोळा आहे” जो ज्ञान प्राशन करतो, तो गुरगुरल्या शिवाय रहात नाही, हि शिकवण विश्वरत्न बाबासाहेब डॉ.आंबेडकर यांची असल्याने शिक्षण घेणाऱ्या देशाच्या भावी पिढीस सक्षम बनविण्यासाठी व आपणही या समाजाचे काही देणे आहोत, यासाठी हा उपक्रम राबविल्याचे रिपाइंचे कर्जत ता. अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी सांगितले, तर किरवली शाळेत विविध उपक्रम राबवून शाळेला कुठल्याही प्रकारच्या मदतीची गरज भासल्यास ती केली जाईल असे आश्वासन दिले.दरम्यान कर्जत तालुक्यांतील विविध भागात मोठमोठे फलक लावुन व विविध स्तुत्य उपक्रम – राबवून रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी मुख्याध्यापिकामती प्रियांका प्रदीप हरवंदे, उपशिक्षिका  चित्रा किशोर पाटील, वैशाली रुपेश पाटील,शिक्षक आकाराम तुकाराम पाटील, राजेंद्र सोपान रुपवनकर, ह. भ . प. प्रभाकर गोविंद बडेकर यांचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले, यावेळी आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच पुढील भविष्यासाठी शाळेला शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी आरपी आय कर्जत ता. अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्या समवेत, कर्जत तालुका संपर्कप्रमुख किशोर द्वारकानाथ गायकवाड, कर्जत तालुका सचिव अशोक दत्तु गायकवाड, तालुका उपाध्यक्ष जगदीश शिंदे, खजिनदार विकास गायकवाड, कर्जत तालुका प्रसिद्धीप्रमुख विजय गायकवाड, उमरोली रा. जि.प वार्ड अध्यक्ष अमर गायकवाड, सावेळे पंचायत समिती वार्ड अध्यक्ष अमर जाधव, नेरळ शहर कार्याध्यक्ष हरिश्चंद्र सदावर्ते, मंजुळा किशोर गायकवाड, राधिका रविंद्र गायकवाड, योगिनी हिरामण गायकवाड, रेखा देवराम गायकवाड, रेखा चंद्रकांत जाधव, निशा प्रमोद लवांडे , अस्मिता जितेंद्र गायकवाड, शुभांगी महेंद्र भालेराव, कविता राजेश गायकवाड, शामिली सतीश गायकवाड, ज्योती हरिचंद्र रोकडे, कांचन उमेश भालेराव, अनुजा रुपेश रोकडे, शारदा सुखदेव भालेराव त्याचप्रमाणे आर पी आय चे असंख्य कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000